Maharashtra

Kolhapur

CC/20/143

Salim Babalal Buran - Complainant(s)

Versus

TATA AIG General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

S.S.Savardekar

25 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/143
( Date of Filing : 12 Mar 2020 )
 
1. Salim Babalal Buran
At,Nagav, Tal.Hatkangale
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. TATA AIG General Insurance Co.Ltd.
Sykes Extension, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 25 Jan 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्‍या

 

1.    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रारदार यांनी त्‍यांचे मालकीचे वाहनाचा विमा वि.प. कंपनीकडे काढलेला असून सदर इन्‍शुरन्‍सच्‍या मुदतीमध्‍ये तक्रारदार यांचे वाहन चोरीस गेले व त्‍याबाबत तक्रारदार यांनी ताबडतोब वि.प. कंपनीस तसेच नजीकच्‍या पोलिस ठाणेला सदरचे वाहन चोरीला गेलेबाबत कळविले होते.  तथापि वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमाक्‍लेम चुकीच्‍या पध्‍दतीने कंपनीच्‍या अटी व शर्तीचा भंग केला या कारणास्‍तव नाकारला आहे. याकरिता प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.

 

2.    क्रारदाराची तक्रार थोडक्‍यात पुढीलप्रमाणे

      तक्रारदार यांनी त्‍यांचे मालकीचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेंपो महिंद्रा बोलेरो टेम्‍पो (गाडी नं. एमई-09-सीयू-0723) या मालवाहतूक गाडीचा विमा वि.प. कंपनीकडे दि.18/7/2019 रोजी उतरविला आहे.  तक्रारदार यांनी दि. 13/8/2013 रोजी नवीन बोलेरो पिकअप टेम्‍पो स्‍वतःचे व कुटुंबाचे उदरनिर्वाहसाठी खरेदी केलेले होते व सदर वाहनाचा इन्‍शुरन्‍स पॉलिसी नं. 0160056635 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 18/7/2019 ते 17/07/2020 असा होता व आहे.  पॉलिसीचा वार्षिक हप्‍ता हा रक्‍कम रु.20394.41 इतका होता व आहे व तशी भरणा पावती व प्रमाणपत्र वि.प. कंपनीकडून तक्रारदार यांना मिळालेले होते व आहे.   तक्रारदार यांनी अर्जात नमूद वाहन हे कुरिअरसाठी भाडयाने लावून सदरचे वाहन स्‍वतः भाडयाने कुरिअरकरिता घेवून जात होते.  गेले 5 वर्षापेक्षा जास्‍त कालावधीसाठी तक्रारदार स्‍वतः वाहन फिरवत होते.  तक्रारदार हे रोज “ओम लॉजिस्‍टीक लि. ” संभाजीनगर, नागांव फाटा या कंपनीमधून सदर वाहन सकाळी 8 वाजलेपासून व रोज रात्री 10 वाजणेचे सुमारास परत घरी घेवून येत असत.  वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदार हे रोज रात्री 10.00 चे सुमारास स्‍वतःच्‍या मालकीचा बोलेरो पिकअज टेम्‍पो घरासमोरील मधल्‍या जागेत पार्कींग करायचे व दि. 29/7/2019 रोजी कंपनीला सुट्टी असल्‍याने ते कंपनीमध्‍ये गेले असता, दु. 3.00 वाजणेचे सुमारास काम पूर्ण झालेने घरी परत आले व नेहमी ज्‍याठिकाणी पार्कींग करतात, त्‍याचठिकाणी वर नमूद वाहनाचे पार्कींग केले व वाहन लॉक आहे की नाही याची खात्री करुनच ते घरी गेले.  नेहमीच्‍या सवयीप्रमाणे पुन्‍हा 10 ते 10.30 चे दरम्‍यान झोपणेपूर्वी वाहन आहे की नाही याची खात्री केली व दुस-या दिवशी दि.30/7/2019 रोजी सकाळी 5.00 चे दरम्‍यान घरासमोरील स्‍वतःचे मालकीचा टेम्‍पो ज्‍याठिकाणी पार्कींग केला होता, त्‍याठिकाणी नसलेचा दिसून आले. लगेचच वाहनाची शोधाशोध केली व सकाळी 8.30 चे सुमारास वि.प. कंपनीचे टोल नंबरवर फोन केला व वाहन चोरीस गेलेबाबतची सर्व हकीकत सांगितली.  सदरची तक्रार वि.प. कंपनीने नोंदही करुन घेतली.  तदनंतर सदरचे वाहन चोरीला गेलेबाबतची तक्रार जवळचे पोलस ठाणेलाही वि.प. विमा कंपनीने सांगितलेप्रमाणे देणेत आली.  तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचा एफ.आय.आर. नोंद करुन घेणेस विनंती केली.  तथापि ठाणे अंमलदार यांनी सदरची कच्‍ची नोंद करुन घेतली व गाडी कोणीतरी लपवून ठेवली असेल, तुम्‍ही शोधाशोध करा व संध्‍याकाळचे दरम्‍यान पुन्‍हा एक फेरी पोलिस स्‍टेशनला मारा असे कळविले. म्‍हणून तक्रारदार यांनी दि. 30/7/2019 रोजी सांयकाळी 6.30 वा. पुन्‍हा तपास अधिकारी समीर मुल्‍ला व श्री शिंदे यांना बरोबरच घेवून शोधाशोध केली.  मात्र सदरचे वाहन मिळून आले नाही व तदनंतर त्‍याबाबतची पक्‍की नोंद करुन घेवून दुस-या दिवशी एफ.आय.आर. दाखल करुन घेतला व सदरचे वाहन दि. 29/7/2019 रोजीचे रात्री 10.30 नंतर ते दि. 30/7/2019 रोजीच्‍या स. 7.00 वाजेपर्यंत चोरीला गेलेचे निदर्शनास आले.  सदरचे वाहन दिसून येत नाही याची खात्री ठाणे अंमलदार/तपास अधिकारी यांची झालेनंतर त्‍यांनी दि. 3/8/2019 रोजी दुपारी पक्‍का एफआयआर दाखल करुन घेतला.  तक्रारदार यांनी लगेचच वि.प. कंपनीचे एजंट श्री अरिफ कुरेशी यांना ताबडतोब सदरचे एफआयआरची प्रत पाठविली. मात्र दि. 23/11/2019 रोजीच्‍या पत्राने तक्रारदार यांनी अट क्र. 1 व अट क्र.8 चा भंग केल्‍याने सदर क्‍लेम नाकारण्‍यात येत आहे अशा चुकीच्‍या कारणाने पत्र पाठवून तक्रारदार यांचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेला आहे.  तक्रारदार यांनी मा.उपविभागीय पोलिस अधिकारी, करवीर विभाग, कोल्‍हापूर यांचेकडे जा.क्र. 2270/2019 गुन्‍हयाची अ वर्गात समरी मंजूर होणेबाबत दिलेल्‍या पत्राची प्रतही कंपनीस दि. 20/1/2020 रोजी दिलेली आहे.  मात्र असे असूनही वि.प. विमा कंपनीने सदरचा क्‍लेम नाकारलेला आहे.  याकरिता वि.प. कंपनीचे आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु.4,50,000/- इतकी नमूद केलेली आहे.  सदरची रक्‍कम वि.प. यांना देणेकरिता आदेश व्‍हावेत तसेच सदरचे रकमेवर दि. 30/7/2019 पासून द.सा.द.शे. 12 टक्‍के प्रमाणे व्‍याज देणेचे व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.1,50,000/-, नोटीस खर्च व वकील फी रु.3,000/- तसेच तक्रारअर्जाचा खर्च रु.25,000/- देणेचे आदेश वि.प. कंपनीस करण्‍यात यावेत असे तक्रारदार यांनी कथन केलेले आहे. 

 

3.    तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत विमा पॉलिसी, विमा हप्‍ता भरलेची पावती, वाहनाचे आर.सी.कार्ड, टॅक्‍स पावती, क्‍लेम नाकारलेचे पत्र, एफआयआर, अंतिम अहवाल, पोलिस स्‍टेशनचे पत्र, वि.प. यांना तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस, नोटीसची पोहोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 

 

4.    वि.प. विमा कंपनीस आयोगाची नोटीस लागू झालेनंतर त्‍यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्‍हणणे दखल केले.  त्‍यांचे कथनानुसार वि.प. विमा कंपनीची कोणतीही सेवात्रुटी नाही.  सबब, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करावा असे कथन केलेले आहे.  तक्रारदार यांचे अर्जातील नमूद वाहन व त्‍याचा उतरविलेला विमा हा भाग वगळता बाकीची सर्व कथने वि.प. विमा कंपनीने नाकारलेली आहेत.  तसेच तक्रारदार यांनी मागितलेल्‍या नुकसानभरपाई व तक्रारअर्जाचे खर्चाबाबतही आपण काहीही देणे लागत नाही असे कथन केलेले आहे.  तक्रारदार यांचा योग्‍य त्‍या कारणास्‍तवच क्‍लेम नाकारलेला आहे असे स्‍पष्‍ट कथन वि.प. विमा कंपनीने केले आहे.  तक्रारदार यांनी अटी शर्तीतील अट क्र. 1 तसेच अट क्र. 8 याचे उल्‍लंघन केले असलेने सदरचा क्‍लेम नामंजूर करणेत यावा असे कथन केले आहे. 

 

अट क्र.1

Notice shall be given to the company immediately upon the occurrence of any accidental loss or damage in the event of any claim and thereafter, insured shall give all such information and assistance as the company shall require, in case of theft or criminal act which may be the subject of the claim under this policy.  The insured shall give immediate notice to the police and cooperate with the company in securing the conviction of the offender. 

 

अट क्र.8

            The due observance and fulfillment of the terms, conditions and endorsement of this policy in so far as they relate to anything to be done or complied with by the insured and the truth of statements and answers in the said proposal shall be conditions precedent to any liability of the company to make any payment under this policy.

 

5.    वि.प. यांनी या संदर्भात कागदयादीसोबत तपास अहवाल व पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. 

 

6.    तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्‍हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.   

 

­अ.क्र.

                मुद्दा

      उत्‍तरे

1

तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदारांनी केलेल्‍या मागण्‍या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ?     

होय, अंशतः.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

 

 

विवेचन

 

मुद्दा क्र.1

     

7.    तक्रारदार यांनी त्‍यांचे मालकीचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेंपो महिंद्रा बोलेरो नं. एमई-09-सीयू-0723 या मालवाहतूक गाडीचा विमा वि.प. कंपनीकडे दि.18/7/2019 रोजी उतरविला आहे. सदर वाहनाचा इन्‍शुरन्‍स पॉलिसी नं. 0160056635 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 18/7/2019 ते 17/07/2020 असा होता व आहे.  याबाबतीत उभय पक्षांमध्‍ये वादाचा मुद्द नाही.  तक्रारदार यांनी या संदर्भातील कागदपत्रेही दाखल केलेली आहेत.   सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे.  याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.

 

मुद्दा क्र.2 ते 4

 

8.    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा हा अट क्र.1 व अट क.8 या कारणास्‍तव नाकारलला आहे.  अट क्र.1 चा विचार करता तक्रारदार यांनी सदरचे वाहन चोरीस गेलेची नोटीस ताबडतोब पोलिस स्‍टेशन तसेच वि.प. विमा कंपनीस देणे आवश्‍यक आहे व सदरची नोटीस तक्रारदार यांनी ताबडतोब दिली नसले कारणाने सदरचा विमा दावा या अटीनुसार नामंजूर केलेला आहे तसेच अट क्र. 8 चा विचार करता तक्रारदार यांनी अटी शर्तींचा भंग केला असलेकारणाने वि.प. विमा कंपनी सदरचे दायित्‍व स्‍वीकारणेस बांधील नाही.  मात्र तक्रारदार यांनी दाखल केले कागदपत्रे जसे की, गुन्‍हयाची अ वर्गात समरी मंजूर होणेबाबत मा.उपविभागीय पोलिस अधिकारी, करवीर विभाग, कोल्‍हापूर यांना दिलेले पत्र हे दि. 14/11/2019 चे असलेचे दिसून येते व या दिवशी तक्रारदार यांची अ समरी झालेचे दिसून येते.  तसेच तक्रारदार यांनी दि. 5/12/2019 रोजी सदरचे वाहन चोरीस गेलेबाबतची तक्रार वि.प. विमा कंपनीस दिलेचे दिसून येते.  वर नमूद कागदपत्रांचा विचार करता तक्रारदारास केवळ काही दिवसांचाच (दोन ते तीन दिवसांचाच) विलंब झालेची बाब या आयोगाचे निदर्शनास येते.  सबब, वि.प. विमा कंपनीने जरी विलंबाचे कारणास्‍तव सदरचा विमादावा नामंजूर केला असला तरी नक्‍की किती दिवसांचा विलंब झालेस की त्‍यास “विलंब” म्‍हणावे असे कुठेही नमूद नाही.  सबब, तक्रारदार यांनी लगेचच वाहनाचे चोरीबाबत कल्‍पना दिलेचे या आयोगाचे निदर्शनास येते.  या कारणास्‍तव सदरचा विमा कंपनीने घेतलेला हा आक्षेप केवळ मोघम स्‍वरुपाचा असलेने हे आयोग सदरचा आक्षेप फेटाळत आहे व तक्रारदार यांचा विमादावा हा वर नमूद कारणास्‍तव नाकारणे हे या आयोगास संयुक्तिक वाटत नाही.  वि.प. विमा कंपनीनेही इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट याकामी दाखल केलेला आहे तसेच पॉलिसीच्‍या अटी शर्तीही दाखल केल्‍या आहेत.  यावरुनही सदरचे वाहन चोरीस गेलेची बाब शाबीत होते.  तसेच तक्रारदार यांनी या संदर्भातील काही मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिर्णय दाखल केले आहेत याचाही विचार हे आयोग करीत आहे. 

 

(2018) I CPR 568 NC

IFFCO Tokio General Insurance Co.Ltd.

                        Vs.

Varsha Associates

 

वर नमूद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयाचा विचार करता यामध्‍ये Vehicle चोरीस दि. 10/8/2008 रोजी गेलेले आहे व वि.प. विमा कंपनीला तक्रारदार यांनी दि. 12/8/2008 रोजीचे पत्राने सदरचे वाहनासंदर्भात कळविलेले आहे. मात्र मध्‍यंतरीच्‍या काळात दि. 11/8/2008 रोजी टेलिफोनद्वारेहही वि.प. विमा कंपनीस कळविलेले आहे व सदरचा क्‍लेम मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाने मंजूर केलेला आहे व सदरचा न्‍यायनिर्णय हा याकामी लागू होत असलेने सदरची तक्रार मंजूर करणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.  सदरचे वाहन हे विमा जोखीम सुरु झालेपासून केवळ एक महिन्‍याचे आतच चोरीस गेले असलेकारणाने तक्रारदार हे विमाक्‍लेमपोटी त्‍या वाहनाची आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु.4,50,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्‍कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात.  तसेच तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी मागितलेली अनुक्रमे रक्‍कम रु.1,50,000/- व 25,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.  सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.

 

आदेश

 

1.    तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2.    वि.प. यांनी तक्रारदार यांना वाहनाची आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु.4,50,000/- देणेचे आदेश करणेत येतात.  तसेच सदरचे रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्‍कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज देणेचे आदेश करणेत येतात.

 

3.    वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.

 

4.    वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी. 

 

5.    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6.    जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्‍कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्‍याची वजावट करण्‍याची वि.प. यांना मुभा राहील.

 

7.    सदर आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.