Maharashtra

Thane

CC/09/129

Darshan Girjaba Deore - Complainant(s)

Versus

Tata AIG General Insurance Co., Ltd., - Opp.Party(s)

27 Jun 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/09/129
 
1. Darshan Girjaba Deore
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Tata AIG General Insurance Co., Ltd.,
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.B. SOMANI PRESIDENT
  HON'BLE MRS. JYOTI IYER MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

                   ( व्‍दारा-श्री.आर.बी.सोमाणी-मा.अध्‍यक्ष )

      1.       प्रस्‍तुत दाखल होण्याचा ओघ जास्‍त आहे तसेच दैनिक बोर्डावर जास्‍त प्रकरणे असतात त्‍यामुळे लेखी जबाब दाखल झाल्याचे तीन महिनेचे आत प्रकरण निकाली काढले जाऊ शकलेले नाही. तसेच दैनिक बोर्डावर जास्‍त प्रकरणामुळे आदेशासाठी बंद केलेल्या प्रकरणात दिलेल्‍या तारखेला नि‍काल देऊ शकलेलो नाही.

 

2.      तक्रारदार यांना सामनेवाला यांनी दयावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे दाखल केल्‍यान्‍वये,तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे आहे.

3.      तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी की, त्‍यांनी सामनेवाला यांच्‍याकडून ता.25.08.2008 रोजी 20.34 पासुन विमा घेतला होता आणि त्‍याचदिवशी त्‍यांच्‍या वाहनाचा अपघात झाला.  सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम फेटाळून दोषपुर्ण सेवा दिलेली आहे.  तक्रारदार यांचा पॉलीसी घेण्‍याचा हेतु होता आणि म्‍हणून रक्‍क्‍म दिलेली आहे.  सामनेवाला यांचा बचाव योग्‍य नाही आणि त्‍यांनी दोषपुर्ण सेवा दिलेली आहे. 

4.      तक्रारदार यांनी लेखी जबाब / तक्रारीसोबत एकूण-4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 

5.      सामनेवाला यांनी बचाव घेऊन लेखी जबाब दाखल केला की, सामनेवाला यांची पॉलीसी ही ता.25.10.2008 रोजी नसुन ता.26.10.2008 पासुन सुरु होणार होती.  सदर पॉलीसी ही मिस रिप्रेझेन्‍टेशन करुन महत्‍वाची माहिती लपवून मिळवीली आहे.  तक्रारदाराची आधीची पॉलीसी ही ता.12.09.2007 ते ता.11.09.2008 पर्यंत बजाज अलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांच्‍याकडे होती.  सदरील वाहनाचा अपघात ता.25.10.2008 ला झाली असुन ते पॉलीसी सुरु होण्‍यापुर्वीचे आहे.  सामनेवाला यांनी तक्रारदाराचे संपुर्ण आक्षेप फेटाळलेले आहे.  ता.25.10.2008 रोजी 20.34 वाजता पावती दिल्‍याचे तक्रारदार खोटे सांगत आहेत आणि तक्रारीतील एफ.आय.आर. ता.27.10.2008 रोजी रजिष्‍टर झाले आहे आणि सदरील एफ.आय.आर. च्‍या विलंबाचे कोणतेही कारण दाखल नाही. 

6.      सदर करारातर्गत पॉलीसी अस्तित्‍वात येण्‍यापुर्वी तक्रारदाराचे वाहनाचा अपघात झाला आहे आणि म्‍हणून सदर पॉलीसी अंतर्गत तक्रारदारास कोणतीही रक्‍कम देय नाही.  सामनेवाला यांचे प्रतिनीधी यांच्‍याशी तक्रारदार यांच्‍या वडीलांचे टेलीफोनवर संभाषण झाले आहे.  सदर संभाषण हे ता.24.10.2008 रोजी झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सामनेवाला यांनी बचाव घेतला आहे की,तक्रारदाराचे वाहनाचे घटनेच्‍या तारखेस विमा नव्‍हता आणि म्‍हणून त्‍यांनी केलेली कृती ही योग्‍य व कायदेशीर आहे आणि तक्रारदार यांनी सामनेवाला यांना चुकीची माहिती देऊन व योग्‍य माहिती दडवून पॉलीसी घेतली आहे.  ठरल्‍यानुसार पॉलीसी ही ता.26.10.2008 पासुन अस्‍तीत्‍वात येणार होती असे उभय पक्षात ठरल्‍यावरुनच रक्‍कम स्विकारली आहे आणि अशा स्थितीत सामनेवाला यांनी कोणतीही दोषपुर्ण सेवा दिलेली नाही. 

7.           सामनेवाला यांनी जबाबासोबत 4 कागदपत्र दाखल केले ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने वादीत पॉलीसी, व सामनेवाला यांच्‍याकडील दस्‍ताऐवज, तसेच अटी व शर्ती समाविष्‍ट आहे.

8.    पुन्‍हा मंचाच्‍या परवानगीने सामनेवाला यांनी 3 कागदपत्रे दाखल केली. 

9.    तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपल्‍या कथनाचे समर्थनार्थ शपथपत्र दाखल केले तसेच लेखी युक्‍तीवाद दाखल केले व तोंडी युक्‍तीवाद सादर केले.

10.   तक्रारदार यांनी आपली भिस्‍त   

    1. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW

             DELHI.

             Oriental Insurance Co. Ltd.  ---Vs.--- P. Ramaraj

             Consumer Protection Act, 1986, Section 2 and 14- Insurance claim-

             Commencement of date, i.e. previous midnight unless it mentions time of its

             Commencement .

           

         2. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW

            DELHI.

            New India Assurance Co. Ltd. ---Vs.--- Integrated Organic Pvt. Ltd.

            Insurance claim- Repudiation- Ground that risk of the car was not covered at the      

      Time of the accident- Accident taking Place on 5.3.1992 – Cover note stating that

      Insurance cover commenced from 4.3.1992 Even if the payment was received by the

      O.P. from its agent on 5.3.1992 it could not be said that the cover note is bad as the

      Payment to the agent o0f the insurer tantamount to payment to the insurer itself –

      State Commission rightly assessed the claim – However, interest reduced from

      15% p.a.  to 12 % p.a.

     

11.  सामनेवाला यांनी आपली भिस्‍त

1. Bharathi Knitting company ---Vs.---  Worldwide Express Courier Division of Airfreight Limited ( MANU/SC/0628/1996) also reported in AIR 1996 Supreme Court Page No.2508.

In this matter Apex Court Concurred with the findings of National Commission that liability undertaken in contract between parties should be limited to extent undertaken.

2. DEOKAR EXPORTS PVT. LTD. ---Vs.---  NEW INDIA ASSURANCE COMPANY LTD. (2008) INSC 1619 ( 23 SEPTEMBER 2008)

This is the similar case where there was dispute regarding the period of insurance.  In this case also Supreme Court clearly opined that a policy of insurance is a contract based on an offer (proposal) and an acceptance.  It has been further held that in a contract of insurance, rights and obligations are strictly governed by the Policy of insurance (Page No. 11 and 12 of Judgment)  

         

12.   मंचासमक्ष वाद निकाली काढण्‍यासाठी खालील मुददे उपस्थित झाले.

1. वाहन क्रमांक-एमएच-04-डीजे-4500 याचा वादीत तारखेस म्‍हणजेच अपघात तारखेला म्‍हणजेच ता.25.10.08 रोजी  विमा अस्तित्‍वात होता किंवा नाही ?

2. जर होय तर सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा कलेम फेटाळून दोषपुर्ण सेवा दिलेली आहे काय ?

3.  काय आदेश ?

कारणे व निष्‍कर्ष-

13. मुददा क्र.1 व 2-  दोन्‍ही मुददे एकमेकांशी सलग्‍न आहेत म्‍हणून एकत्रीत उत्‍तर देण्‍यात येते.  सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर करतांना कारण दिले की, वादीत दिवशी तक्रारदाराच्‍या वाहनाचा  विमा हा ता.26.10.08 पासुन अस्तित्‍वात आलेला आहे, कारण तसे तक्रारादार यांच्‍या वडीलांशी झालेल्‍या टेलीफोन वरील संभाषणानुसार त्‍यांनी दिलेल्‍या सुचनेनुसार रक्‍कम स्विकारलेली आहे आणि म्‍हणून सदर धनादेश हा जरी ता.25.10.08 रोजी जरी स्विकारलेला असला तरी सदर वाहनाचा विमा हा ता.26.10.08 पासुन अस्तित्‍वात आलेला आहे.  सामनेवाला यांनी तक्रारदाराव्‍दारे दाखल दस्‍ताऐवज रक्‍कम दिल्‍याच्‍या पावतीस विरोध दर्शविला आहे.  परंतु सदर दस्‍ताऐवजाच्‍या प्रती सामनेवाला यांनी सुध्‍दा दाखल केलेल्‍या आहेत.  आणि त्‍यातील नमुद नोंदीनुसार ता.25.10.08 चे 20.34 वाजता विमा हप्‍ता रक्‍कम स्विकारल्‍याचे स्‍पष्‍ट होते. 

14.     सामनेवाला यांनी दिलेली पावती ता.25.10.08 ची असुन त्‍याच दिवशी रात्री सदर वाहनाचा अपघात झालेला आहे.   सामनेवाला यांनी मंचासमक्ष तक्रारदाराचे वडील आणि सामनेवाला यांचे प्रतिनीधी यांच्‍यातील झालेली चर्चाबददलची सीडी आणि त्‍याबददल प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल केलेला आहे.  सदर संभाषण हे सामनेवाला यांचे प्रतिनीधी  यांच्‍यासोबत झाल्‍याचे प्रतिज्ञालेखासोबत दाखल दस्‍ताऐवजावरुन स्‍पष्‍ट होते.

15.     मंचासमक्ष सामनेवाला यांनी समानेवाला यांचे प्रतिनीधी श्री.महेश किंवा मधु इतर यांच्‍याशी झालेल्‍या चर्चे बददल संबंधीतांचे कोणतेही शपथपत्र प्रकरणात दाखल नाही असे जरी असले तरी मंचाच्‍या मते तक्रारदाराचा हेतु स्‍पष्‍ट होतो की,त्‍यांच्‍या वडीलांनी घटनेच्‍या आधी म्‍हणजेच ता.24.10.08 रोजी सामनेवाला यांच्‍या कार्यालयाशी पॉलीसी घेण्‍यासंबंधी फोनवरुन चर्चा केल्‍याचे सामनेवाला यांनी दाखल केले शपथपत्रावरुन तसेच लेखी जबाबावरुन स्‍पष्‍ट होते. 

16.     मंचाच्‍या मते तक्रारदाराच्‍या वडीलांचा हेतु सदर वाहनाचा विमा पॉलीसी घेण्‍याचा होता आणि त्‍या हेतुने तक्रारदार यांच्‍या वतीने त्‍यांच्‍या वडीलांनी केलेली कार्यवाही ही बोना फाईड वाटते.  कारण अपघात होण्‍यापुर्वीच विमा हप्‍ता सामनेवाला यांना मिळाला आहे.  इन्‍शुरन्‍स अॅक्‍ट-1938 चे कलम-64 व्‍ही.बी. नुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा हप्‍ता स्विकारल्‍यानंतर विमा पॉलीसी व करार अस्तित्‍वात येते आणि मंचाच्‍या मते सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या वाहनाचा विमा हप्‍ता घेतल्‍याच्‍या वेळेपासुनच अस्तित्‍वात असल्‍याचे मंचाव्‍दारे ग्राहय धरावे असे वाटते.  कारण सामनेवाला यांनी जरी बचाव घेतला व कायदयाचे व्‍यतिरिक्‍त कोणताही करार अस्तित्‍वात आणावयाचा होता, परंतु कायदेशीर बाबींवरुन असे स्‍पष्‍ट होते की,तक्रारदाराचे वडील ता.24.10.2008 पासुन सामनेवाला यांच्‍या संपर्कात होते आणि त्‍या अनुषंगाने त्‍यांनी ता.25.10.2008 रोजी विमा हप्‍ता रक्‍कम चेकव्‍दारे दिली आहे आणि ते सुध्‍दा घटनेच्‍या आधी. 

17.     याविषयी तक्रारदार यांनी आपली भिस्‍त पुढील निवाडयांवर घेतलेली आहे. 

        1. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW

                 DELHI.

                 Oriental Insurance Co. Ltd.  ---Vs. --- P. Ramaraj

        2. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW

                DELHI.

                New India Assurance Co. Ltd. ---Vs. --- Integrated Organic Pvt. Ltd.

मंचाच्‍या मते सदरील निवाडे या प्रकरणास लागु पडतात. 

18.     सामनेवाला यांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पुढील निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवलेली आहे.

        1. Bharathi Knitting Company ---Vs. --- Worldwide Express Courier    

          Division of Airfreight Limited (MANU/SC/0628/1996) also reported in

          AIR 1996 Supreme Court Page No.2508.In this matter Apex Court

          Concurred with the findings of National Commission that liability

          Undertaken in contract between parties should be limited to extent

          Undertaken.

        2. DEOKAR EXPORTS PVT. LTD. ---Vs.---  NEW INDIA ASSURANCE

          COMPANY LTD. (2008) INSC 1619 (23 SEPTEMBER 2008)

          This is the similar case where there was dispute regarding the period of     

          Insurance .  In this case also Supreme Court clearly opined that a policy of     

          Insurance is a contract based on an offer (proposal) and an acceptance.  It     

          Has been further held that in a contract of insurance, rights and obligations

          Are strictly governed by the Policy of insurance (Page No. 11 and 12 of    

          Judgment)

आणि नमुद केले आहे की, पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसारच विमा करार अस्तित्‍वात येईल आणि म्‍हणून तक्रारदाराची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.  मंचाव्‍दारे उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या निवाडयांचे वाचन केले असता मंचाच्‍या मते सामनेवाला यांनी दाखल केलेले निवाडे प्रस्‍तुत प्रकरणातील मुद्यांशी भिन्‍न असुन मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडे सामनेवाला यांच्‍या बचावास लागु पडत नाही.  सदर निवाडा DEOKAR EXPORTS PVT. LTD. ---Vs.---  NEW INDIA ASSURANCE COMPANY LTD. मध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने कलम-64 व्‍ही.बी. दि इन्‍शुरन्‍स अॅक्‍ट 1938 वर उहापोह करुन निर्देश दिलेले आहे आणि विमा हप्‍ते स्विकृतीच्‍या वेळेवर व तारखेपासुन विमा संरक्षण अस्तित्‍वात येतो आणि मंचाच्‍या मते सामनेवाला यांनी दाखल केलेला निवाडा काही अंशी तक्रारदाराच्‍या लाभार्थ आहे आणि म्‍हणून मुददा क्रमांक-1 ला होकारार्थी उत्‍तर देण्‍यात आलेले आहे.

सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम फेटाळून दोषपुर्ण सेवा दिली आहे काय?  मंचाने ग्राहय धरले आहे की,तक्रारदाराचा वाहन क्रमांक-एमएच-04-डीजे-4500 या वाहनाचा विमा घटनेच्‍या तारखेस व वेळेस होता आणि म्‍हणून मंचाच्‍या मते सामनेवाला यांनी घेतलेला तक्रारदाराचा क्‍लेम नामंजुरीचा बचाव योग्‍य नसुन फेटाळणे योग्‍य आहे आणि म्‍हणून मंचाच्‍या मते सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नामंजुन करुन /फेटाळून दोषपुर्ण सेवा दिली आहे व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.    

20. मुददा क्र.3- तक्रारदार यांनी मंचासमक्ष मागणी केली आहे की,त्‍यांना वाहनाचे टोटल लॉस झाल्‍याने त्‍यांना रक्‍कम रु.3,35,280/- क्‍लेम रक्‍कम व त्‍यावर व्‍याज मिळून रक्‍कम मिळावी तसेच एकूण रक्‍कम रु.3,61,730/- ऐवढी मिळावी.  तक्रारदार यांनी सदर नुकसानभरपाई व क्‍लेम बददल कोणताही आधार दिलेला नाही.  परंतु मंचासमक्ष दाखल दस्‍ताऐवजावरुन असे स्‍पष्‍ट होते की, 30.11.2008 रोजी श्री.आर.बी.जोशी सर्व्‍हेअर यांनी अपघातग्रस्‍त वाहन क्रमांक-एमएच-04-डीजे-4500 याचा अंतिम सर्व्‍हे केला असुन त्‍यांनी सदरील वाहन टोटल लॉस या संज्ञेमध्‍ये ठेऊन सदरील वाहन दुरुस्‍त करणे योग्‍य नाही असे सर्व्‍हेअर श्री.जोशी यांनी नमुद केलेले आहे.  सदरील रिपोर्ट सामनेवाला यांना ता.04.12.2008 रोजी मिळाल्‍याचा दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. 

21.     मंचाच्‍या मते सामनेवाला यांनी सर्व्‍हेअर यांच्‍या अकलनानुसार योग्‍य घसारा कपात करुन तक्रारदार यांनी जाहिर केलेल्‍या वाहनाच्‍या किंमती Insured Declared Value पोटी नुकसानभरपाई अदा करणे आवश्‍यक होते असे झालेले दिसुन येत नाही. 

22.     यासर्व प्रकरणात तक्रारदार यांना भरपुर मानसिक त्रास सहन करावा लागला आहे आणि आर्थिक झळ पोहोचली आहे आणि म्‍हणून तक्रारदार सामनेवाला यांच्‍याकडून नुकसानभरपाई दाखल रक्‍क्‍म रु.25,000/- मिळण्‍यास पात्र आहेत.  तसेच किरकोळ खर्चापोटी रक्‍कम रु.1,450/- हे सुध्‍दा तक्रारदारास मिळावे असे मंचाचे मत आहे. 

23.     सामनेवाला यांनी रास्‍त व योग्‍य कारण न देऊन तक्रारदाराचा विमा फेटाळून त्‍यांची रक्‍कम रोखुन धरली होती आणि म्‍हणून सदर रकमेवर सामनेवाला हे तक्रारदारास ता.31.12.2008 पासुन दरसाल दर शेकडा 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍यास जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

24.     वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.                   

                     ---  आ दे श  ---

(1) तक्रारादार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे. 

(2) सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या वाहनाचा विमा काढला असुन घटनेच्‍या तारखेपासुन व

    वेळेत सदरील विमा करार अस्तित्‍वात होता आणि सामनेवाला यांनी तक्रारदाराचा कल्‍ेम

    रास्‍त कारण न देऊन फेटाळलेला आहे.

(3) सामनेवाला यांनी तक्रारदारास आय.डी.व्‍ही. विमाधारकाने जाहिर केलेली किंमत

    रु.3,35,280/- पैंकी योग्‍य व कायदेशीर घसारा कपात करुन उर्वरीत रक्‍कम     

    ता.31.12.2008 पासुन संपुर्ण रकमेवर चुकती होईपर्यंत दरसाल दर शेकडा 9

    टक्‍के प्रमाणे व्‍याजासह अदा करावी. 

(4) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक, शारिरीक नुकसानभरपाईपोटी रक्‍कम

    रु.10,000/- देय करावे तसेच किरकोळ खर्चापोटी रक्‍कम रु.1,450/- देय करावे.

(5) सामनेवाला यांनी उपरोक्‍त आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसांचे 

    आंत करावी.  अन्‍यथा आदेशीत रकमेवर देय व्‍याज 9 टक्‍के ऐवजी 12 टक्‍के राहिल

    याची सामनेवाला यांनी नोंद घ्‍यावी.

     (6)  आदेशाची प्रत उभय पक्षांना निशुल्‍क उपलब्‍ध करुन दयावी.

ठिकाण- ठाणे.

 
 
[HON'ABLE MR. R.B. SOMANI]
PRESIDENT
 
[ HON'BLE MRS. JYOTI IYER]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.