मा. सदस्यांची पदे रिक्त मंच अपुरा.
तक्रारदार गैरहजर.
सा.वाले यांचे वकील श्रीमती. वंदना मिश्रा हजर.
याक्षणी तक्रादाराचे वकील श्री. विकास शिंदे हजर.
त्यांनी निवेदन केले की, सदरहू प्रकरणात सा.वाले यांच्याकडून तक्रारदार यांच्या खात्यामध्ये रू. 1,00,000/-,जमा झालेले आहेत. परंतू तक्रारदार यांना वारंवार सूचना देऊनसुध्दा ते तक्रार मागे घेण्याकरीता मंचात उपस्थित राहत नाही. सबब, मंचानी योग्य तो आदेश पारीत करावा. मंच अपूर्ण.
प्रकरण दुपारच्या सत्रात नेमण्यात येते.
मंच पूर्ण.
प्रकरण दुपारच्या सत्रात नेमण्यात येते.
त्यानंतर प्रकरण 2.35 मिनीटांनी पुकारण्यात आले. मंच पूर्ण.
तक्रारदार गैरहजर.
तक्रारदारांचे वकील श्री. विकास शिंदे हजर.
वकीलांनी निवेदन केले की, या प्रकरणात तक्रारदाराना सा.वाले यांचेकडून विम्याची रक्कम प्राप्त झाली आहे. परंतू त्यांना वारंवार सूचना देऊन सुध्दा ते मंचात उपस्थित राहत नाही व अलीकडे ते वकीलांचा फोन सुध्दा घेत नाहीत.
तक्रारदाराना वकीलांनी पत्र पाठविले होते. त्याची प्रत दि. 09/02/2017 ला दाखल केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये व मंचाचा कार्यभार विचारात घेता, प्रकरण प्रलंबीत ठेवण्यानी काही साध्य होणार नाही. सबब, खालील आदेश.
आदेश
- तक्रार क्र 290/2016 नस्ती करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
- अतिरीक्त संच असल्यास तक्रारदारांना परत करण्यात यावे.
- हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.
npk/-