तक्रारदार गैरहजर.
सा.वाले/गैरअर्जदार तर्फे वकील श्रीमती. वंदना मिश्रा हजर.
वकील प्रकरण आज विलंबमाफीच्या अर्जावरील सुनावणीकरीता नेमण्यात आले होते. परंतू तक्रारदार/अर्जदार मागील चार तारखांपासून सतत गैरहजर आहेत.
वकील श्रीमती. मिश्रा यांनी निवेदन केले की, सा.वाले यांनी तक्रारदार यांना विम्याची रक्कम रू. 1,00,000/-,अदा केलेले आहेत. व ही रक्कम तक्रार दाखल होण्यापूर्वीच अदा करण्यात आलेली आहे. बहुतेक त्यामुळे तक्रारदार यांना ही तक्रार चालविण्यात स्वारस्य नाही. सबब, ती फेटाळण्यात यावी.
अर्जदार यांचा विलंबमाफीचा अर्ज सुनावणीकरीता प्रलंबीत आहे. परंतू ते सतत गैरहजर.
सा.वाले/गैरअर्जदार यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य दिसून येते. अर्जदार यांना पुरेशी संधी देण्यात आलेली आहे. तरी सुध्दा ते गैरहजर.
मंचाचा कार्यभार विचारात घेता, प्रकरण त्याच टप्यावर तहकुब करणे योग्य होणार नाही. सबब, खालील आदेश.
आदेश
1. विलंबमाफीचा अर्ज व तक्रार क्र 329/2016 नस्ती करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
4. अतिरीकत संच तक्रारदारना परत करण्यात येते.
5. प्रकरण वादसूचीमधून काढून टाकण्यात येते.
npk/-