Maharashtra

Gondia

CC/16/96

VIMAL RAMESH KAPGATE - Complainant(s)

Versus

TATA AIG GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

MR. UDAY KSHIRSAGAR

27 Apr 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/16/96
 
1. VIMAL RAMESH KAPGATE
R/O. POST- SIREGAON, TAH. ARJUNI MORGAON
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TATA AIG GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER
R/O. A-501, 5 TH FLOOR, BUILDING NO. 4, ENFINITI PARK, DINDOSHI, MALAD (WEST) MUMBAI-400097
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. G. CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. H. M. PATERIYA MEMBER
 
For the Complainant:MR. UDAY KSHIRSAGAR, Advocate
For the Opp. Party: MRS. SUCHITA DEHADRAI, Advocate
Dated : 27 Apr 2017
Final Order / Judgement

आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष श्री. एम. जी. चिलबुले

           तक्रारकर्तीचे पती रमेश विठोबा कापगते यांच्या अपघाती मृत्यूबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई रू.1,00,000/- विरूध्‍द पक्ष यांनी नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 12 अन्वये सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्ती श्रीमती विमल कापगते हिचे पती मृतक रमेश विठोबा कापगते हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा सिरेगाव, तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 152 क्षेत्रफळ 0.68 हे.आर. या वर्णनाची शेतजमीन होती. 

3.    महाराष्ट्र शासनाने नागपूर विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विरूध्द पक्ष टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे विमा उतरविलेला होता व तक्रारकर्तीचे मृतक पती रमेश विठोबा कापगते हे शेतकरी असल्याचे सदर विमा योजनेचे लाभार्थी होते. 

4.    तक्रारकर्तीचे पती रमेश विठोबा कापगते यांचा दिनांक 25/05/2014 रोजी अज्ञात ट्रॅक्‍टरने धडक देवून जबर जखमी केल्याने मृत्यू झाला.  तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्यूबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांसह विमा दावा प्रस्ताव दिनांक 16/08/2014 रोजी रितसर सादर केला.  परंतु विरूध्द पक्षाने त्यांच्या दिनांक 05/02/2015 रोजीच्या पत्राद्वारे ‘मयत रमेश विठोबा कापगते अपघाताचे वेळी मद्यार्काच्या (अल्कोहोल) अंमलाखाली होते अशी विधाने साक्षीदारांनी दिलेली असून अकस्मात मृत्यू समरीत सुध्दा नमूद करण्यांत आलेले असल्यामुळे सदर विमा दावा दारूच्या नशेच्या अंमलाखाली असतांना मृत्यू होणे या संज्ञेमध्ये मोडत असल्याने व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत यासाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे सदर दावा प्रकरण नामंजूर करण्यांत येत आहे’ असे कारण देऊन नामंजूर केला.   विरूध्द पक्षाची सदरची कृती सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारकर्तीने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

      (1)   शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- दिनांक 16/08/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत  द.सा.द.शे. 18% व्याजासह मिळावी.

      (2)   शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.30,000/- मिळावी. 

      (3)   तक्रारीचा खर्च रू.15,000/- मिळावा.  

5.    तक्रारकर्तीने तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्षाने दावा नामंजूर केल्याचे पत्र, शेतीचा 7/12 उतारा, गांव नमुना आठ-अ, मर्ग खबरी, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, इत्‍यादी दस्तावेज दाखल केले आहेत.    

6.    सदर प्रकरणात विरूध्‍द पक्ष टाटा एआयजी जनरल इन्शुरन्‍स कंपनी लिमिटेड यांनी लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे.  त्यांचे म्हणणे असे की, अकस्मात मृत्यू समरी बुकावर नमूद करण्यात आल्याप्रमाणे मृतक रमेश विठोबा कापगते दारूच्या नशेत, रस्‍त्‍याच्या कडेला पडला असल्याने त्याला अज्ञात ट्रॅक्‍टरची धडक लागून मरण पावला अशी विधाने मृतकाचे नातेवाईकांनी आणि साक्षीदारांनी केलेली आहेत.  म्हणून शेतकरी जनता अपघात विमा योजना प्रपत्र ‘क’ विमा संरक्षणामध्ये समाविष्ट नसणा-या बाबी (4) अनुसार अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेल्या अपघाताबाबत विमा दावा देय नसल्याने विरूध्द पक्षाची विमा दावा नामंजूर करण्याची कृती ही सेवेतील न्यूनता ठरत नाही.  त्यामुळे तक्रारकर्ती सदर योजनेअंतर्गत विमा लाभ मिळण्यास अपात्र आहे म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करावी अशी विरूध्द पक्षाने विनंती केली आहे.

7.    तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले.  त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-  

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र आहे काय?

अंशतः

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

अंतिम आदेशाप्रमाणे

- कारणमिमांसा

8.    मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणांत तक्रारकर्तीने तिचे पती मयत रमेश विठोबा कापगते यांच्या नांवाने मौजा सिरेगाव, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन  क्रमांक 152 क्षेत्रफळ 0.68 हे.आर. ही शेतजमीन असल्याबाबत 7/12 चा उतारा तसेच फेरफर पत्रक दाखल केले आहे.  यावरून हे स्पष्ट होते की, मयत रमेश विठोबा कापगते हे शेतकरी होते व त्यांच्या मालकीची तक्रारीत नमूद शेतजमीन होती. 

      सदरहू प्रकरणात दाखल घटनास्थळ पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र या दस्तावेजांवरून मृतक रमेश विठोबा कापगते हे दिनांक 25/05/2014 रोजी अज्ञात ट्रॅक्‍टरने धडक दिल्याने अपघातात मरण पावले असून पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये  “probable cause of death is due to head injury”. असे नमूद आहे.

       विरूध्द पक्षाच्या अधिवक्ता श्रीमती सुचिता देहाडराय यांनी असा युक्तिवाद केला की, मृतक दारू पिऊन रस्‍त्‍याच्या कडेला पडला होता असे साक्षीदार दिपक कापगते याने सांगीतल्याचे मृतकाचा भाऊ विलास विठोबा कापगते याने पोलीस स्‍टेशन अर्जूनी मोरगाव येथे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले असून प्रथम खबरी दस्‍त क्रमांक 6 मध्‍ये देखील ही बाब नोंदविली आहे. यावरुन अपघात झाला तेव्‍हा मृतक नशेच्या अंमलाखाली होता.  त्यामुळे अशा मृत्‍यूस विमा दावा देय नाही.

      त्यांनी आपल्या युक्तिवादाच्या पुष्ठ्यर्थ पॉलीसी शेड्यूल व शेतकरी जनता अपघात विमा योजना 2013-14 आणि विरूध्द पक्षासोबत झालेल्या कराराची प्रत दाखल केली आहे.  सदर पॉलीसी शेड्यूलच्या Part B: GENERAL EXCLUSIONS मध्ये खालीलप्रमाणे नमूद आहेः-

            Part B: GENERAL EXCLUSIONS

            This entire Policy does not provide benefits for any loss resulting in whole or in part from, or expenses incurred, directly or indirectly in respect of;

            1.         …….

            2.         suicide, attempted suicide (whether sane or insane) or intentionally self-inflicted Injury or illness, or sexually transmitted conditions, mental or nervous disorder, anxiety,stress or depression, Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS), Human Immune-deficiency Virus (HIV) infection; or

            3.         ……..

            4.         being under the influence of drugs, alcohol, or other intoxicants or hallucinogens unless properly prescribed by a Physician and taken as prescribed; or

            मृतकाचा अपघाती मृत्यू मद्याच्या अंमलाखाली असतांना झाला असून सदर विमा दावा नामंजूर करण्याची कृती सेवेतील न्यूनता ठरत नाही आणि म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यांत यावी.

            तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री. उदय क्षीरसागर यांनी आपल्‍या युक्तिवादात सांगीतले की, सदर प्रकरणांत फिर्याद देणारा मृतकाचा भाऊ विलास कापगते याने स्वतः मृतकास दारु पिऊन पडलेला पाहिला नव्‍हता.  त्यांस दिपक कापगतेने मृतक सायंकाळी दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडलेला होता असे सांगितल्याचा उल्लेख त्याने अज्ञात ट्रॅक्टरचालकावर कारवाई होण्यासाठी दिलेल्या फिर्यादीत आणि त्यावरून प्रथम खबरीत असला तरी मयत दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडला असल्याबाबत दिपक कापगते याचा जबाब अभिलेखावर नाही.  तसेच शवविच्छेदन अहवालात देखील मृतकाच्या पोटात मद्यार्क आढळून आल्याचा कोणताही उल्लेख नाही किंवा विरूध्द पक्षाने व्हिसेरा अहवाल देखील दाखल केलेला नाही.  म्हणून अन्य पुष्टीकारक पुराव्याअभावी मयत हा दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला पडला होता हे सिध्द होत नाही.

      आपल्या युक्तिवादाच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी माननीय राष्ट्रीय आयोग व माननीय राज्य आयोग यांचे खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत. 

      1.         I (2015) CPJ 146 (NC) – Bajaj Allianze General Insurance Co. Ltd. v/s Achala Rudranwas Marde

      2.         III (2015) CPJ 104 (NC) – M. Sujatha v/s Bajaj Allianze General Insurance Co. Ltd.

      3.         2014 (2) CPR 734 (NC) – United India Insurance Co. Ltd. v/s Sheela & Ors.

      4.         IV (2011) CPJ 243 (NC) – New India Assurance Co. Ltd. v/s M. S. Venkatesh Babu

      5.         2007 (3) CPR 142 (MAH) - New India Assurance Co. Ltd. v/s Smt. Hausabai Pannalal Dhoka

      वरील न्यायनिर्णयांत म्हटले आहे की, “Since it was not been firmly established that deceased was under influence of intoxicating liquor at the time he had accident, Insurance Company needs to fulfil its obligation under insurance policy and pay sum assured to complainants along with appropriate interest”.  

      उभय पक्षाचा युक्तिवाद आणि अभिलेखावर उपलब्‍ध दस्‍तावेजांचा विचार करता मयत रमेश कापगते यास अज्ञात ट्रॅक्‍टरने धडक दिल्‍याने त्‍याचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याचे सिध्‍द होते, मात्र अपघाताचे वेळी तो दारुच्‍या नशेत होता हे सिध्‍द करणारा पुष्‍टीकारक पुरावा दिपक कापगतेचा जबाब, शवविच्छेदन अहवाल किंवा व्हिसेरा अहवालाचे रूपात अभिलेखावर नसल्‍याने केवळ प्रथम खबरीमध्‍ये दिपक कापगते याने मृतक सायंकाळी दारु पिऊन रस्‍त्‍याच्‍या कडेला पडला होता असे सांगितल्याचा उल्‍लेख मयत अपघाताचे वेळी दारुच्‍या नशेत होता हे सिध्‍द करण्‍यासाठी पुरेसा विधीग्राहय पुरावा ठरत नाही. म्हणून तक्रारकर्तीने सादर केलेल्या वरील न्यायनिर्णयान्वये विरूध्द पक्षाने मृतक अपघाताचे वेळी मद्याच्या अंमलाखाली होता असे कारण देवून तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याची कृती निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरते.  वरील कारणामुळे मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.  

9.    मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 05/02/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे.  याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.5,000/- मिळण्यास पात्र आहे.  म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.  

      वरील निष्कर्षास अनुसरून खालील आदेश पारित करण्यांत येत आहे.

-// अंतिम आदेश //-

      तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12    अन्वये दाखल करण्यांत आलेली तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

1.     विरूध्‍द पक्षास आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्‍याची रक्‍कम रू.1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 05/02/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.

2.    विरूध्‍द पक्षास आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई म्‍हणून रू.10,000/- व या तक्रारीचा खर्च म्‍हणून रू.5,000/- असे एकूण रू.15,000/- तक्रारकर्तीस द्यावे.   

3.    विरूध्‍द पक्षास आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

4.    आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.

5.    प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीस परत करावी. 

 
 
[HON'BLE MR. M. G. CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. H. M. PATERIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.