Maharashtra

Nagpur

CC/267/2020

MOHD. NADEEM MOHD. IQBAL - Complainant(s)

Versus

TATA AIG GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH CLAIM MANAGER/ DEPUTY CLAIM MANAGER - Opp.Party(s)

ADV. AZMAT I. SHAH

24 Mar 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/267/2020
( Date of Filing : 05 Aug 2020 )
 
1. MOHD. NADEEM MOHD. IQBAL
R/O. AT KUMBHAR PURA, NEAR MASJID, YAVATMAL-445001
YAVATMAL
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TATA AIG GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH CLAIM MANAGER/ DEPUTY CLAIM MANAGER
OFF. AT, 2ND FLOOR, PLOT NO.9, VISION, NEAR TRAFFIC PARK, SBI IN TOUCH ATM, DHARAMPETH, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. HDFC BANK LTD., MANAGER
OFF. AT, CIVIL LINES, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. AZMAT I. SHAH, Advocate for the Complainant 1
 ADV.HITESH VARMA, Advocate for the Opp. Party 1
Dated : 24 Mar 2023
Final Order / Judgement

 

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तो वाहन चालक असून त्‍याने कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहाकरिता विरुध्‍द पक्ष 2 कडून कर्ज घेऊन Tata  LPT 3118 नोंदणी क्रं. MH29 T 1309 हा ट्रक विकत घेतला होता आणि सदरच्‍या वाहनाचा विरुध्‍द पक्ष 1 कडून दि. 13.05.2019 ते 12.05.2020 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 25,00,000/- करिता पॉलिसी क्रं. 0159779756 00 अन्‍वये विमा उतरविला होता.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने दि. 18.07.2019 ला 12.55 am वाजता शिवम शोरुम वाडी टोल नाका दाभा येथे वाहन उभे करुन कॅबिन मध्‍ये 4.00 am पर्यंत झोपला होता आणि पहाटे 4.00 am ला उठल्‍यावर त्‍याचे वाहन त्‍याच ठिकाणी पार्क करुन कुलूप लावून चहा पिण्‍याकरिता गेला व त्‍यानंतर वाहन ज्‍या ठिकाणी पार्क केले होते त्‍या ठिकाणी परत आला असता त्‍याला त्‍या ठिकाणी वाहन आढळून आले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वाहनाचा इतरत्र शोध घेऊन ही वाहन आढळून आले नाही. म्‍हणून दि. 18.07.2019 ला तक्रारकर्त्‍याने वाडी पोलिस स्‍टेशन येथे संपर्क साधला, परंतु तेथील पोलिसांनी तक्रारकर्त्‍याचा एफ.आय.आर. नोंदवून घेतला नाही आणि तक्रारकर्त्‍याला वाहनाचा शोध घेण्‍यास सांगितले, त्‍यावर देखील वाहन मिळून न आल्‍यास वाहन चोरीचा एफ.आय.आर. दाखल करण्‍यात येईल असे सांगितले.  तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ला दि. 18.07.2019 ला ठिक सकाळी 11.30 am वा. वाहन चोरीला गेल्‍याचे टोल फ्री क्रमांकावरुन कळविले आणि दावा दाखल करण्‍याची विनंती केली असता विरुध्‍द पक्ष 1 च्‍या अधिका-यांनी दूरध्‍वनीवरुन तक्रारकर्त्‍याला पोलिस स्‍टेशन वाडी येथे प्रथम एफ.आय.आर. नोंदविण्‍याचा सल्‍ला दिला व त्‍यांनतर विरुध्‍द पक्ष 1 हे विमा दावा नोंदविल असे सांगितले. तक्रारकर्त्‍याने  सदरच्‍या वाहनाचा आठवडाभर शोध घेऊन ही वाहन मिळून आले नाही या दरम्‍यानच्‍या काळात तक्रारकर्ता हा वाडी पोलिस स्‍टेशनच्‍या संबंधित अधिका-यांच्‍या संपर्कात होता व वाहनाच्‍या शोधाच्‍या प्रगतीबाबत व एफ.आय.आर. दाखल करण्‍याबाबत चौकशी करीत होता. त्‍यानंतर देखील वाहन मिळून न आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वाडी पोलिस स्‍टेशन येथे एफ.आय.आर.नोंदवून घेण्‍याची विनंती केली असता त्‍यांनी नकार दिला आणि शेवटी दि. 31.07.2019 ला वाडी पोलिस स्‍टेशन यांनी एफ.आय.आर.क्रं. 317 अन्‍वये वाहन चोरी गेल्‍याचा एफ.आय.आर.नोंदविला.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, एफ.आय.आर. नोंदविल्‍यानंतर त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडे एफ.आय.आर. प्रति व इतर दस्‍तावेजासह विमा दावा प्रस्‍ताव सादर केला होता, परंतु विरुध्‍द पक्ष 1 यांनी कोणत्‍याही दस्‍तावेजाची मागणी न करता तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी व फेक असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या विमा दाव्‍याचा विचार करु शकत नाही असे आशयाचे तक्रारकर्त्‍याला दि. 16.10.2019 ला पत्र पाठविले. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याला केवळ एक पानाची विमा पॉलिसी निर्गमित केली असून त्‍यासोबत विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचे दस्‍तावेज पाठविले नव्‍हते, त्‍यामुळे सदर प्रकरणी विमा पॅलिसीच्‍या शर्ती व अटी लागू होत नाही. त्‍यानंतर दि. 10.12.2019 ला पोलिस स्‍टेशन वाडी, नागपूर यांच्‍या द्वारे  तक्रारकर्त्‍याला पत्राद्वारे कळविले की, तक्रारकर्त्‍याची तक्रार खरी आहे परंतु वाहनाचा शोध न लागल्‍यामुळे चौकशी सध्‍या बंद करण्‍यात येत आहे. पोलिस स्‍टेशन वाडी यांनी फायनल रिपोर्ट फॉर्म / ए समरी रिपोर्ट  प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी नागपूर (जे.एम.एफ.सी. कोर्ट नागपूर) येथे अ फायनल नं. 33/2019 दि. 10.12.2019 अन्‍वये दाखल केला आहे. विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ला दि. 16.01.2020 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती, परंतु विरुध्‍द पक्ष 1 ने सदरच्‍या नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमामुल्‍य रक्‍कम रुपये 25,00,000/- चा विमा दावा द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ने आपल्‍या लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन व्‍यापारी दृष्‍टीकोनातून नफा मिळविण्‍याच्‍या उद्देशाने खरेदी केला असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत मोडत नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याचे वाहन क्रं. MH 29 T 1309 चा वि.प. 1 कडून दि. 13.05.2019 ते 12.05.2020 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 25,00,000/- करिता पॉलिसी क्रं. 0159779756 00 अन्‍वये विमाकृत केली होती. तक्रारकर्त्‍याने विमा दावा सादर करतांना नमूद केले की, त्‍याचे वाहन दि. 18.07.2019 ला शिवम शोरुम जवळ वाडी टोल नाका / दाभा वाडी पोलिस स्‍टेशन अंतर्गत पार्क केले होते, त्‍यावेळी अज्ञात व्‍यक्‍तीने त्‍याचे वाहन चोरले. तक्रारकर्त्‍याचे  वाहन जरी दि. 18.07.2019 ला चोरीला गेले तरी त्‍याचे वाहन चोरीला गेल्‍याची तक्रार 14 दिवसानंतर म्‍हणजेच दि. 31.07.2019 ला वि.प. 1 कडे  आणि पोलिस स्‍टेशनला दिली. विमा पॉलिसीच्‍या शर्तीनुसार वाहन चोरी प्रकरणात वाहन चोरीला गेल्‍याबाबतची माहिती तात्‍काळ वि.प.ला देणे आवश्‍यक होती. विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे. .......

CONDITIONS No.1

“ Notice shall be given in writing to the Company immediately upon the occurrence of any accidental Loss or Damage and in the event of any claim and thereafter the insured shall. In case of theft or criminal act which may be the subject of the claim under the policy the insured shall give immediate notice to the police and co-operate with the Company in securing the conviction of the offender.”

CONDITIONS NO. 4.

“The insured shall take all reasonable steps to safeguard the vehicle from loss or damage and to maintain it in efficient condition and the Company shall have at all times free and full access to examine the vehicle or any part thereof or any driver or employee of the insured. In the event of any accident or breakdown, the vehicle shall not be left unattended without proper precautions being taken to prevent further damage or loss and if the vehicle be driven before the necessary repairs are effected any extent ion of the damage or any further damage to the vehicle shall be entirely at the insured’s own risk.”

  1.      तक्रारकर्त्‍याने त्‍याचे विमाकृत वाहन दि. 18.07.2019 ला मिखा टी स्‍टॉल दाभा रोड वाडी नागपूर येथे पार्क करुन झोपी गेला आणि त्‍यानंतर दि. 18.07.2019 ला पहाटे 5.00 वा. दरम्‍यान तो उठला आणि चहाच्‍या टपरीवर गेला आणि वाडी चौकात जाऊन नाशता केला त्‍यावेळी वाहनाची किल्‍ली वाहनाच्‍या आंत होती. तक्रारकर्ता जेव्‍हा सकाळी 7.00 ते 7.30 वा. च्‍या दरम्‍यान वाहन पार्क केल्‍याच्‍या ठिकाणी आला असता त्‍याठिकाणी वाहन आढळून आले नाही. वरील बाब ही तक्रारकर्त्‍याने वाहनाची देखरेख करण्‍यात केलेला निष्‍काळजीपणा दर्शवितो. तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीच्‍या शर्त क्रं. 4 चे उल्‍लंघन केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिलेली नाही, म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 2 ला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही वि.प. 2 हे आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 08.09.2021 रोजी पारित.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            नाही

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडून वाहन क्र. MH29 T 1309 या वाहनाचा दि. 13.05.2019 ते 12.05.2020 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 25,00,000/- करिता पॉलिसी क्रं. 0159779756 00 अन्‍वये विमा उतरविला होता हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन दि. 18.07.2019 च्‍या पहाटे 12.55 am वा. शिवम दाभा वाडी टोल नाका इलेक्‍ट्रॉनिक शोरुमच्‍या बाजुला पार्क करुन झोपला व पहाटे 4.00 am ला उठून वाहनाची किल्‍ली गाडीच्‍या बाजुच्‍या बॉक्‍स मध्‍ये ठेवून चहा पिण्‍यासाठी गेला असल्‍याचे नि.क्रं. 2 (3) वर दाखल प्रथम खबरी अहवाल घटनेच्‍या जागेच्‍या वर्णन या मथळयात नमूद आहे. यावरुन तक्रारकर्त्‍याने घटनेच्‍या दिवशी स्‍वतःच्‍या वाहनाची देखभाल करण्‍यात निष्‍काळजीपणा केला असल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन दि. 18.07.2019 ला चोरीला गेल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 कडे  तसेच संबंधित पोलिस स्‍टेशनला वाहन चोरीला गेल्‍याची माहिती 14 दिवस विलंबाने दिली असल्‍याचे नि.क्रं. 2(iii) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍द पक्ष 1 च्‍या विमा पॉलिसीच्‍या शर्त क्रं. 1 व 4 चे उल्‍लंघन  केले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिलेली नाही असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

  1.      तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष 2 चा ग्राहक असून विरुध्‍द पक्ष 2 यांनी केवळ वाहन खरेदीकरिता तक्रारकर्त्‍याला कर्ज दिले असल्‍यामुळे सदरच्‍या वाहन चोरी प्रकरणाशी वि.प. 2 चा संबंध नसल्‍याने त्‍यांच्‍या विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.