Maharashtra

Nanded

CC/09/240

Shrimati vidya kapildev yadav - Complainant(s)

Versus

tata a.i.g.life ins.co.maryadit 302 bilding n.4 infiniti i.t.park filmcity road - Opp.Party(s)

Adv.n.s.choudhary

16 Feb 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/240
1. Shrimati vidya kapildev yadav ra.balajingar colani gadipura nanded NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. tata a.i.g.life ins.co.maryadit 302 bilding n.4 infiniti i.t.park filmcity road ricoshi road malad (purv)mumbaimumbaiMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 16 Feb 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/240
 
                    प्रकरण दाखल तारीख -   26/10/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    17/02/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
               मा.श्री.सतीश सामते.               - सदस्‍य
                
श्रीमती विद्या भ्र.कपीलदेव यादव,
वय वर्षे 50,                                            अर्जदार.
रा. बालाजीनगर कॉलनी, गाडीपुरा,नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
टाटा ए.आय.जी.लाईफ इन्‍शुरन्‍स कं.मर्यादित,
302 बिल्‍डींग क्र.4,इन्फिनिटी आय.टी.पार्क                   गैरअर्जदार.
फिल्‍मसिटी रोड,रिकॉशी रोड,मालाड (पुर्व)
मुंबई -98
 
अर्जदारा तर्फे वकील            - अड.श्रीरंग तु.चौधरी.
गैरअर्जदार तर्फे वकील          - अड.ए.आर.बंग.
 
निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्‍य)
 
          गैरअर्जदार टाटा ए.आय.जी. या विमा कंपनीच्‍या त्रुटीच्‍या सेवेबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार दाखल केली असून, याप्रमाणे अर्जदार ही डॉ.कपीलदेव यादव यांची विधवा आहे. विमाधारक यांचा दि.24/06/2008 रोजी औरंगाबाद येथे मृत्‍यु झाल्‍यानंतर त्‍यांनी दि.23/07/2008 ला गैरअर्जदार यांना सुचना करुन सर्व कागदपत्र पाठविली. यानंतर गैरअर्जदार यांनी दि.10/09/2008 ला पत्राद्वारे अर्जदार यांना त्‍यांचा दावा नामंजुर केल्‍याचे कळविले. विमाधारकाने सन 2005 मध्‍ये गैरअर्जदाराकडुन पॉलिसी क्र.सी 010647495 द्वारे विमा काढला होता. यानंतर त्‍यांनी दर वर्षाप्रमाणे तीन हप्‍ते भरलेले आहेत. विमा पॉलिसी देतांना गैरअर्जदार यांनी वैद्यकिय चाचणी न करता पॉलिसी दिली. विमाधारकाला त्‍यांच्‍या हयातीत किंवा मुदत संपल्‍यानंतर रु.1,55,000/- मिळणार होते ते मिळण्‍यासाठी अर्जदारांनी क्‍लेम दाखल केले आहे. मयत यांच्‍या लाभार्थी यांना दावा नाकरुन सेवेत त्रुटी केली म्‍हणुन अर्जदार यांची मागणी आहे की, अर्जदारास विम्‍याची रक्‍कम व लाभांश मिळावे व इतर कुठलेही आदेश जे आवश्‍यक आहे ते करावे असे म्‍हटले आहे.
         
          गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. तक्रारदाराचा अर्ज खोटा असुन पॉलिसी ही मुंबई येथुन काढल्‍यामुळे या मंचास कार्यक्षेत्रात येणार नाही. अर्जदाराची तक्रार ही खोटी असल्‍या कारणाने ती सेक्‍शन 26 प्रमाणे खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. ग्राहकाशी काही वाद असल्‍यस ते प्रकरण Ombudsman  यांचेकडे न्‍यावे असे असतांना अर्जदार सरळ मंचात आले. डॉ.कपीलदेव यादव यांनी दि.20/10/2005 रोजी गैरअर्जदाराकडुन पॉलिसी काढली व सर्व प्रस्‍ताव त्‍यांनी स्‍वतः बघुन त्‍यावर सही केली. पॉलिसी ही Mahalife with Accident Death & Dismemberment long scale benefis  अशा प्रकारची होती. त्‍यामुळे अर्जात काय होते ही सत्‍यता उघड करावयास पाहीजे. प्रस्‍तावामधील आरोग्‍या विषयीची माहीती त्‍यांना कुठल्‍याही प्रकारचे रोग या आधी नव्‍हते व आता नाही अशा प्रकारचे उत्‍तर दिले आहे. गैरअर्जदाराने पॉलिसी क्र.सी 010647495 ही पॉलिसी नियम व अटींवर अर्जदारास दिलेले आहे. अर्जदाराचा क्‍लेम हा दि.24/06/2008 रोजी मिळाले. यानंतर गैरअर्जदार यांनी याची सत्‍यता पडताळण्‍यासाठी तपासणीक अधिकारी यांना नेमले तेंव्‍हा मयत डॉ.कपीलदेव यादव यांना पॉलिसी घेण्‍याच्‍या आधी पासुन आजार होता व त्‍यांनी तो पॉलिसी घेते वेळेस लपविला यासाठी तपासणीक अधिकारी  मुस्‍ताकीन शेख यांनी तपास करुन ब-याच लोकांचे जबाब घेतले त्‍यात त्‍यांचे नातेवाईक,शेजारी, मित्र यांचा जबाब घेतला तो जाबाब व तपासणीक अधिका-याचा अहवाल या जबाबासोबत जोडले आहे. अहवालाप्रमाणे मयत विमाधारक हे गेल्‍या 8-10 वर्षा पासुन हायपरटेंशन या रोगाने पीडीत होते व Myocardial Infarction असल्‍या कारणाने त्‍यांच्‍यावर 2000 साली एंजीओप्‍लास्‍टी करण्‍यात आली होती, ही मुख्‍य बाब विमाधारक यांनी लपवुन ठेवली. अर्जदार यांना एक प्रश्‍नाली देऊन त्‍याचे उत्‍तर विचारले तेंव्‍हा त्‍यांनी तपासणीक अधिका-यास 1999 पासुन ते हायरपरटेंशन या रोगाने पीडीत होते व त्‍यांच्‍यावर उपचार चालु होता, त्‍यांना ऍंटी हायपरटेंशन ड्रग दिलेले आहे अशी साक्ष विलास यादव म्‍हणजे त्‍यांचा मुलाने दिला आहे. तपासणीक अधिका-याने त्‍यांचे शेजारी आरती सिंह यांचाही प्रश्‍नावलीप्रमाणे उत्‍तर घेतले आहे त्‍यांनी गेल्‍या दहा वर्षा पासुन विमाधारक आजारी होते असे म्‍हटले आहे, त्‍यांनी हे सांगीतले की, डॉ. मालु हे त्‍यांच्‍या आजारावर आस्‍था हॉस्‍पीटल येथे उपचार करीत होते व त्‍यांच्‍यावर 2000 साली एंजीओप्‍लास्‍टी करण्‍यात आली आहे. बसीन मेडीकल्‍स यांनी डॉ. मालु यांचे प्रिक्रीप्‍सनप्रमाणे मयत यांना गेल्‍या पाच वर्षा पासुन औषधी दिली आहेत. गैरअर्जदार यांनी पॉलीसी देतांना almost on good faith म्‍हणुन ही पॉलिसी दिलेली आहे. विमाधारकाचे रोगा विषयीचे वैद्यकिय माहीती त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध आहे. पॉलिसी देतांना वैद्यकिय तपासणी केलीच पाहीजे असे बंधनकार नाही. विश्‍वासावर पॉलिसी दिली जाते. त्‍यामुळे अर्जदाराचे म्‍हणणे चुकीचे आहे. खरी माहीती जर विमाधारकाने लपविली असेल तर गैरअर्जदार यांना क्‍लेम नाकारण्‍याचा अधिकार आहे. यासंबंधी मा.उच्‍च न्‍यायालय, मीथुलाल नायक विरुध्‍द एल.आय.सी.AIR 1962 SC 814 याचा आधार घेत आहोत असे म्‍हटले आहे. सेक्‍शन 17 कॉन्‍ट्रॅक्‍ट अक्‍ट याप्रमाणे the policy holder was clearly guilty of a fraudulent suppression of material facts व सेक्‍शन 19 प्रमाणे false representation याप्रमाणे गैरअर्जदाराने कार्यवाही केली आहे. गैरअर्जदाराने जो निर्णय घेतला यासाठी मा.उच्‍च न्‍यायालय, एल.आय.सी. विरुध्‍द श्रीमती जी.एम. चन्‍नाबसम्‍मा, 1991 (1) एस.सी.सी. 357, यानंतर मा.उच्‍च न्‍यायालय यांचा एक केस लॉ 1996 (2005) याप्रमाणे गुड फेथवर पॉलिसी देण्‍यात येते म्‍हणुन आदेश केलेला आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी असुन खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
     अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकीमा मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये                                     उत्‍तर.
 
1.   या मंचास कार्यक्षेत्र येते काय?                    नाही.
2.   काय आदेश?                                       अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                              कारणे.
मुद्या क्र. 1
 
          अर्जदाराने प्रस्‍ताव क्र.1784508 टाटा ए.आय.जी दाखल केलेला आहे. या प्रस्‍तावावर एजंट नेम आर.एम.पी. व एजंट कोड 410548 असे लिहीले आहे. डॉ. कपीललेव यादव यांनी पुर्ण माहीती भरुन दिलेले असून त्‍याप्रमाणे हा प्‍लॉन Mahalife with Accident Death & Dismemberment long scale benefis  असा असुन रु.1,55,000/- ची विमा संरक्षण दिले आहे. आपल्‍या तक्रारअर्जात अर्जदाराने मयत डॉ.कपीलदेव यादव यांनी ही पॉलिसी कुठून घेतली होती याचा उल्‍लेख केलेला नाही व गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यात यावर आक्षेप घेऊन आम्‍ही ही पॉलिसी मुंबईहुन दिले आहे, असा आक्षेप घेतला आहे. गैरअर्जदार टाटा ए.आय.जी.लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी यांचे नांदेड येथे एजंट असतील त्‍यांचे मार्फत ही पॉलिसी घेतली असण्‍याची शक्‍यता आहे. परंतु याचा कुठेही उल्‍लेख केलानाही. गैरअर्जदाराचे नांदेडला शाखा कार्यालय असले पाहीजे येथील त्‍यांचे कार्यालयास जर पक्षकार करण्‍यात आले असते तर या मंचास कार्यक्षेत्र आले असते परंतु अर्जदाराने या प्रकरणांत गैरअर्जदाराचे नांदेड येथील शाखेस पक्षकार केलेले नाही किंवा त्‍याचा उल्‍लेखही केलेला नाही. पॉलिसी पालिसी पाहीली असता, यावर पॉलिसी ही पुणे येथुन दिल्‍या गेल्‍याचे दिसते व पालिसी पाहीली असता, ही पॉलिसी गैरअर्जदाराच्‍या मुंबई ये‍थील कार्यालयातुन दिले गेल्‍याचे दिसते. अर्जदाराने केलेला पत्र व्‍यवहार पाहीले असता, तो पत्र व्‍यवहार मुंबई येथील कार्यालयास संबोधीत केलेले आहे व गैरअर्जदाराने देखील त्‍याचे उत्‍त्‍र मुंबई येथील कार्यालयातुन दिलेले आहे कारण तसा पत्र व्‍यवहारावर पत्‍ता नमुद आहे. ही कागदपत्र पुरावा म्‍हणुन बघीतला तरी पॉलिसी ही मुंबई येथेच दिल्‍या गेल्‍याचे दिसते. त्‍यामुळे कॉज ऑफ एक्‍शन जेथे घडते म्‍हणजे पॉलिसी जेथुन दिली गेली तेथेच अर्जदाराने तक्रार दाखल केली पाहीजे. म्‍हणुन केवळ तांत्रिक मुद्यावर अर्जदाराच्‍या तक्रारीचे मेरीट न बघता गैरअर्जदाराचा आक्षेप मान्‍य करुन या मंचास कार्यक्षेत्र येणार नाही म्‍हणुन या मंचात हे प्रकरण चालविता येणार नाही असा निर्णय देता आहोत व अर्जदाराची पुर्ण तक्रार ही खारीज न करता अर्जदारास योग्‍य मंचात म्‍हणजे मुंबई येथे त्‍यांची तक्रार दाखल करता येईल अशी सुचना देत आहोत. म्‍हणुन कार्यक्षेत्राच्‍या मुद्यावर या मंचातील तक्रार खरीज करण्‍यात येते. यासाठी या मंचास असे ऑबझारवेशन आहे की, अर्जदारांना तांत्रिक मुद्ये कळत नाहीत म्‍हणुनच ते वकीलाशी सल्‍लामसलत करतात व वकीला मार्फत प्रकरण दाखल करतात तेंव्‍हा कायदेशिर मुद्ये व तांत्रिक मुद्ये बघणे वकीलाचे काम असते यात वकीलाने आपली जबाबदारी व्‍यवस्‍थीत पार पाडली का?  हा मुद्या समोर येतो व या प्रकरणांत अर्जदारांचे वकील सतत गैरहजर दिसतात.
     (C)     Consumer Protection Act (68) (1986) 8.17—Territorial jurisdiction Air carrier company having its head ofice in Behrain running its business India—Can be sued in India—Not yound jurisdiction of consumer Forum.
 
     वरील बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                                  आदेश.
 
1.        अर्जदाराचा तक्रारअर्ज कार्यक्षेत्र येणार नाही या मुद्यावर
           खारीज करण्‍यात येतो.
2.        दावा खर्च ज्‍यांनी त्‍यांनी आपापला सोसावा.
3.        संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                                                                            (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                                                                                     सदस्‍य
 
 
 
 
गो.प.निलमवार.लघूलेखक.