Maharashtra

Jalgaon

CC/12/224

Sangita Shaligram Patil - Complainant(s)

Versus

Tata A.I.G.General Insurance Co.Ltd & Others - Opp.Party(s)

Hemant Bhangale

24 Mar 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .                       

                               ग्राहक तक्रार क्र. 224/2012.                  

                              तक्रार दाखल तारीखः-12/09/2012.

                              आदेश पारीत तारीखः- 24/03/2015.

श्रीमती संगीता शालीग्राम पाटील,

उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,

रा.मु.पो.शेवगे बु, ता.पारोळा,जि.जळगांव.               ..........     तक्रारदार.

 

            विरुध्‍द

 

1.     टाटा ए आय जी जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि,

रजि.कार्यालय-पेनीनसुला कार्पोरेट पार्क,पिरामल टॉवर,

9 वा मजला, जी के मार्ग, लोअर परेल,मुंबई 13.

(समन्‍स मॅनेजर यांचेवर बजवावेत.)

2.    टाटा ए आय जी जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि,

      दि ओरीन, 3 रा मजला, 5 कोरेगांव पार्क रोड, पुणे 01.

(समन्‍स मॅनेजर यांचेवर बजवावेत.)

3.    टाटा ए आय जी जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि,

      मनोप्रभा आर्केड,4 एफ,सीटी बँक समोर,

निराला बाजार, औरंगाबाद 01 (समन्‍स मॅनेजर यांचेवर बजवावेत.)

4.    सातपुडा ऑटोमोबाईल्‍स,

एम आय डी सी चौक,अजिंठा रोड,जळगांव.

(समन्‍स व्‍यवस्‍थापक यांचेवर बजवावेत.)         .........      विरुध्‍द पक्ष

 

                        कोरम

                        श्री.विश्‍वास दौ.ढवळे                    अध्‍यक्ष

                                                श्रीमती पुनम नि.मलीक                 सदस्‍या.

 

            तक्रारदारातर्फेः श्री.हेमंत अ.भंगाळे वकील.

            विरुध्‍द पक्ष तर्फे 1 तर्फे श्री.डी व्‍ही भोकरीकर वकील.

            विरुध्‍द पक्ष क्र. 2,3 व 4 एकतर्फा.

निकाल-प्रत

व्‍दारा-श्री.विश्‍वास दौ.ढवळे,अध्‍यक्षः  विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिचे पतीचे मृत्‍युनंतर विमा क्‍लेम ची रक्‍कम देण्‍याचे बेकायदेशीररित्‍या नाकारुन दिलेल्‍या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी या मंचासमोर दाखल केलेला आहे.  तक्रारदाराच्‍या तक्रार अर्जातील हकीकत थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

            2.    तक्रारदार हे वर नमुद पत्‍यावरील कायमस्‍वरुपी रहीवाशी असुन विरुध्‍द पक्ष क्र. 1 हे विमा कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असुन विरुध्‍द पक्ष क्र. 2 व 3 हे त्‍यांचे शाखा कायालये असुन विरुध्‍द पक्ष क्र. 4 हे हिरो मोटो कॉर्पो.चे अधिकृत डिलर आहेत.    तक्रारदाराचे पती कै. शालीग्राम पंढरीनाथ पाटील हे वर नमुद पत्‍यावरील रहीवाशी होते व ते सामान्‍य रुग्‍णालय,जळगांव येथे लिपीक म्‍हणुन सेवारत होते.     तक्रारदार यांचे पतीने त्‍यांचे हयातीमध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र. 4 कडुन दि.30/12/2011 रोजी हिरो मोटो कॉर्पो ची नवीन पॅशन प्रो ही मोटार सायकल खरेदी केली त्‍याचा चेसीस क्रमांक BMLHA 10EWBGM56629 असा होता.     सदरची मोटारसायकल खरेदी किंमत रु.47,632/-, वाहनाचे रजिस्‍ट्रेशन रु.4,064/-, विमा करिता रु.1,307/-, मेंबरशीप करिता रु.150/- व उर्वरीत रु.550/- अशी एकुण रक्‍कम रु.53,703/- स्विकारुन पावत्‍या दिलेल्‍या आहेत.     ज्‍यावेळी म्‍हणजे दि.30/12/2011 रोजी वाहन खरेदी केले त्‍याचवेळी वाहनाचा विमा उतरवला गेला होता व त्‍याबाबत तक्रारदाराचे पतीला टू व्‍हीलर सर्टीफीकेट कम पॉलीसी त्‍याचे नांवे देण्‍यात आलेली होती व सदर पॉलीसीचा कालावधी दि.30/12/2011 ते दि.29/12/2012 पावेतो तसेच सर्टीफीकेट क्र.0180796767/000000/00, प्रिमियम रक्‍कम रु.1,306/- तक्रारदाराचे पतीने विरुध्‍द पक्ष क्र. 4 कडे दिलेला होता.    तक्रारदाराचे पती दि.2/1/2012 रोजी त्‍यांचे वर नमुद पत्‍यावरुन विरुध्‍द पक्ष क्र. 4 यांचेकडे सदरचे वाहनाचे नोंदणीकामी येत असतांना नॅशनल हायवे क्र.6 वर पिंपळकोठा शिवारात अज्ञात वाहनाचे धडकेने अपघात होऊन त्‍यात त्‍यांचा मृत्‍यु झाला व सदरची घटना पोलीस स्‍टेशन एरंडोल येथे रितसर नोंदही झाली.   त्‍यानंतर तक्रारदाराचे पतीचे भाऊ यांनी सदरचे वाहन विमा कृत असल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र. 4 कडे दुरुस्‍तीसाठी दिले व त्‍यांनी तक्रारदारास विमा क्‍लेम क्र.620433267 असा दिला.    त्‍यानंतर वाहनाचे दुरुस्‍तीचे इस्‍टीमेट रु.38,253.18 चे देऊन इस्‍टीमेट बनवण्‍याचा खर्च रु.622/- तक्रारदार यांचेकडुन दि.24/2/2012 रोजी घेण्‍यात आला त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाकडुन विमा क्‍लेम रक्‍कम देण्‍याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्‍याने तक्रारदार यांनी विधिज्ञांमार्फत नोटीस देऊन मागणी केली तसेच दरम्‍यान दुरुस्‍तीचा खर्च रु.27,079/- तक्रारदार यांनी स्‍वतः केला.     तक्रारदार यांनी आवश्‍यक ते कागदपत्रे वेळोवेळी देऊनही विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी दि.30/04/2012 रोजी बेजबाबदारपणाचे पत्र पाठवुन दावा अपात्र ठरवला.    सबब तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्‍यात यावी, तक्रारदारास विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 कडुन विमा पॉलीसी प्रमाणे रक्‍कम रु.1,00,000/- तसेच वाहन दुरुस्‍तीचा खर्च रु.27,079/- द सा द शे 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचे आदेश व्‍हावेत, तसेच वाहनाचे रजिस्‍ट्रेशन करिता आलेला खर्च रु.4,064/- व इस्‍टीमेट बनवण्‍यासाठी आलेला खर्च रु.622.22 अशी एकुण रक्‍कम रु.4,686.22 तक्रारदारास व्‍याजासह देण्‍याचे आदेश व्‍हावेत, तक्रारदार यांना झालेल्‍या मनस्‍तापा दाखल रक्‍कम रु.1,00,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.15,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.   

            3.    विरुध्‍द पक्ष यांना या मंचातर्फे रजिष्‍ट्रर ए.डी.नोटीस काढण्‍यात आली.  विरुध्‍द पक्ष क्र. 2,3 व 4 हे या मंचाची नोटीस मिळुनही याकामी गैरहजर राहील्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.

            4.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.  विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी मोटार सायकल चेसीसी क्रमांक BMLHA 10EWBGM56629 चा विमा पॉलीसी क्रमांक 0180796767 अन्‍वये दि.30/12/2011 ते दि.29/12/2012 या कालावधीत विमा उतरवला होता तसेच सदर विमा पॉलीसीत नमुद अटी शर्ती नुसार विरुध्‍द पक्षाची जबाबदारी निश्चित होते.   तक्रारदाराने विमाकृत वाहनाचे दुरुस्‍तीसाठी रक्‍कम खर्च केली हे योग्‍य त्‍या पुराव्‍याव्‍दारे शाबीत करावे, तक्रारदाराचे दि.28/2/2012 चे नोटीसीला दि.13/03/2012 अन्‍वये उत्‍तर दिलेले होते व ते योग्‍य होते.   तक्रारदाराकडे दि.23/2/2012 रोजीचे पत्राने वाहनाचे तात्‍पुरते व कायम रजिष्‍ट्रेशन ची कागदपत्रे मागणी करुनही त्‍यांनी ती विरुध्‍द पक्षास दिलेली नाहीत.    अनेक वेळा पत्र व्‍यवहाराअंती असे समजले की, अपघाताचे वेळेस विमाकृत वाहनाचे आर टी ओ सदरी रजिस्‍ट्रेशनच झालेले नव्‍हते व नाही.  तसेच तक्रारदार यांचेकडे अनेक वेळा मागणी करुनही त्‍यांनी वाहनाचे रजिस्‍ट्रेशन बाबत व टॅक्‍स भरणा केलेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा सादर न केल्‍याने तक्रारदाराचा विमा क्‍लेम कायदेशीररित्‍या नाकारलेला आहे.     सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी केलेली आहे.   

            5.    तक्रारदार यांची तक्रार,  दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, विरुध्‍द पक्ष क्र. 1 चे लेखी म्‍हणणे व उभयतांचा युक्‍तीवाद याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

            मुद्ये                                       उत्‍तर

1)    विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम

      अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन तक्रारदारास प्रदान केलेल्‍या

      सेवेत त्रृटी केली आहे काय ?                                     होय.

2)    आदेश काय ?                                     खालीलप्रमाणे.

                              वि वे च न

            6.    मुद्या क्र.1  -         तक्रारदाराचे पतीने त्‍याचे हयातीमध्‍ये  विरुध्‍द पक्ष क्र. 1 कडुन नवीन खरेदी केलेली मोटार सायकल चेसीसी क्रमांक BMLHA 10EWBGM56629 चा विमा पॉलीसी क्रमांक 0180796767 अन्‍वये दि.30/12/2011 ते दि.29/12/2012 या कालावधीत विमा उतरवला होता याबाबत उभयतांमध्‍ये कोणताही वाद नाही.   तथापी सदरचे वाहनाचे नोंदणीकरिता विरुध्‍द पक्ष क्र. 4 कडे दि.2/1/2012 रोजी शेवगे बु,ता.पारोळा येथुन येत असतांना नॅशनल हायवे क्रमांक 6 वर पिंपळकोठा शिवारात अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेत अपघात होऊन तक्रारदाराचे पती मृत्‍यु पावले व वाहनाचेही अपरिमित नुकसान झाले., सदर नुकसान भरपाईचा क्‍लेम विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन तक्रारदार यांना दिलेल्‍या त्रासादाखल प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केल्‍याचे प्रतिपादन तक्रारदाराचे विधिज्ञांनी या मंचासमोरील युक्‍तीवादातुन केले.   

            7.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 चे विधिज्ञांनी या मंचासमोर युक्‍तीवाद करतांना विमाकृत वाहनाचे तात्‍पुरते अगर कायमस्‍वरुपी आर टी ओ कडे रजिस्‍ट्रेशन केलेले नसल्‍याने तसेच तक्रारदारास वारंवार विचारणा करुनही त्‍यांनी वाहनाचा टॅक्‍स भरल्‍याबाबतच्‍या कोणत्‍याही पावत्‍या अगर योग्‍य तो पुरावा सादर केला नसल्‍याने मोटार व्‍हेईकल कायदा कलम 39 नुसार व विमा पॉलीसीत नमुद अटी व शर्ती नुसार तक्रारदाराचा विमा क्‍लेम योग्‍य त्‍या कारणास्‍तव कायदेशीररित्‍या नाकारल्‍याचे प्रतिपादन आमचे समोर केले.   

            8.    वर नमुद विवेचन, तसेच तक्रारदाराची तक्रार, त्‍यासोबत दाखल कागदपत्रे पाहता तक्रारदाराचे पतीने त्‍याचे हयातीमध्‍ये चेसीस क्रमांक BMLHA 10EWBGM56629 चे वाहन विरुध्‍द पक्ष क्र. 4 कडुन टॅक्‍सेस सह एकुण रक्‍कम रु.47,632/- इतक्‍या रक्‍कमेस खरेदी केल्‍याचे दाखल बिलाचे छायाप्रतीवरुन स्‍पष्‍ट होते.   तसेच एकुण प्रिमियम रक्‍कम रु.1,306/- विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांचेकडे भरणा करुन विमा पॉलीसीची कव्‍हर नोट चे छायाप्रतीवरुन दिसुन येते.   तक्रारदाराचे पतीचा विमाकृत वाहन नोंदणीसाठी घेऊन येत असतांना नॅशनल हायवे क्रमांक 6 वर दि.2/1/2012 रोजी अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेने अपघात होऊन त्‍यात मृत्‍यु झाल्‍याचे व विमाकृत वाहनाचे देखील नुकसान झाल्‍याचे पहीली खबर, घटनास्‍थळ पंचनामा, इंन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, मृत्‍यु प्रमाणपत्र इत्‍यादीचे अवलोकन करता दिसुन येते.   तसेच विमाकृत वाहनाचे अपघातानंतर दुरुस्‍तीसाठी रु.38,253.18 चे इस्‍टीमेट दिले असल्‍याचे व इस्‍टीमेट करिता रु.622/- खर्च झाल्‍याचे दाखल पावतीचे छायाप्रतीवरुन दिसुन येते.   तक्रारदाराचे पतीकडे अपघात समयी वैध वाहन चालविण्‍याचा परवाना असल्‍याचेही दाखल परवान्‍याचे छायाप्रतीवरुन स्‍पष्‍ट होते.   तक्रारदार यांनी या कागदपत्रांव्‍यतिरिक्‍त वारस दाखला, तक्रारदाराचे मतदार ओळखपत्र, रेशनींग कार्ड इत्‍यादी कागदपत्रांच्‍या छायाप्रतीही दाखल केलेल्‍या आहेत.     तसेच तक्रारदार यांनी याकामी मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडे दाखल केले ते खालीलप्रमाणेः-

1) II (2012) CPJ 512 राष्‍ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांचेकडील इफको टोकीयो जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि आणि इतर // विरुध्‍द // प्रतिमा झा यात नमुद महत्‍वाचे न्‍यायीक तत्‍व खालीलप्रमाणेः

Consumer Protection Act, 1986   Section 2 (1)(d),21(b)  Insurance—Non registration of vehicle—Vehicle stolen—Surveyor appointed—Claim repudiated on ground that on day of theft vehicle was not registered with transport authorities-  District Forum allowed complaint—State Commission dismissed appeal—Hence revision—Contention, there is violation of law, which prohibits use of unregistered vehicle – Not accepted – Insurance Company is not entitled to repudiate claim merely on ground that vehicle had not been registered –No jurisdictional error, material irregularity or illegality in impugned order.    Result: Revision Petition dismissed.

2) 1 (2012) CPJ 207  पंजाब राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, चंदीगढ यांचेकडील भारती एक्‍सए जनरल इंन्‍शुंरन्‍स कंपनी लि // विरुध्‍द // व्‍हीनस यात नमुद महत्‍वाचे न्‍यायीक तत्‍व खालीलप्रमाणेः

Consumer Protection Act, 1986 –Section 2(1)(g),14(1) (d),15—Insurance—Accident—Surveyor appointed –Claim repudiated—Plying vehicle without any registration certificate—Forum allowed complaint—Hence appeal—Contention, car being used without being registered and thus clear violation of law by respondent—Not accepted—Appellant had not produced terms and conditions of policy—Not producing copy of terms and conditions, which were settled between parties, shows that there was no violation of any terms and condition of policy by respondent—There is also nothing on record that non-registration of car has in any way contributed to the accident—Non registration of car has got no nexus with the accident—Not each and every violation of any provision, however slightest it may be, which can be labeled as committing breach of law –Non registration of vehicle cannot be ground of repudiation of just claim under the policy –Order passed by Forum is legal and valid –No interference required.   

            9.    वर नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांनी व्‍यक्‍त केलेले न्‍यायीक तत्‍वे तसेंच प्रस्‍तुत तक्रार अर्जातील घटना, परिस्थिती हया एकमेकाशी मिळत्‍या-जुळत्‍या असल्‍याने वर नमुन मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडे व त्‍यात नमुद न्‍यायीक तत्‍वे प्रस्‍तुत तक्रार अर्जास लागु होतात.    तक्रारदाराचे पतीकडुन वाहन खरेदी केल्‍यानंतर त्‍वरीत दि.30/12/2011 रोजी त्‍या वाहनाचा विमा उतरवल्‍यानंतर अवघ्‍या तीन दिवसातच वाहन नोंदणीसाठी घेऊन जात असतांना विमाकृत वाहनाचा अपघात झालेला आहे त्‍यामुळे अशा प्रसंगी तक्रारदाराचा विमा दावा हा योग्‍य व कायदेशीर असतांनाही केवळ वाहनाची कायम व तात्‍पुरती नोंदणी आर टी ओ सदरी न केल्‍याचे कारण दर्शवुन बेकायदेशीररित्‍या विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार विधवा महीलेचा विमा क्‍लेम नाकारुन तक्रारदारास प्रदान केलेल्‍या सेवेत त्रृटी केल्‍याचे निष्‍कर्ष आम्‍ही नोंदवित आहोत.   यास्‍तव मुद्या क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.   

            10.   विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी मा.सुप्रिम कोर्ट यांचेकडील सी ए नं.8463/14 एस एल पी (सी) क्र.26308/12 तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाकडील रिव्‍हीजन पिटीशन क्रमांक अनुक्रमे 2926/10 व 4043/08 मधील निवाडे याकामी दाखल केले त्‍याचे मंचाने अवलोकन करता त्‍यात नमुद परिस्थिती व प्रस्‍तुत तक्रार अर्जातील घटना व परिस्थिती हया भिन्‍न असल्‍याने ते या तक्रारीकामी लागु होणार नाहीत असे आमचे मत आहे.   

            11.  मुद्या क्र. 2 तक्रारदारास विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 कडुन विमा पॉलीसी प्रमाणे रक्‍कम रु.1,00,000/- तसेच वाहन दुरुस्‍तीचा खर्च रु.27,079/- द सा द शे 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचे आदेश व्‍हावेत, तसेच वाहनाचे रजिस्‍ट्रेशन करिता आलेला खर्च रु.4,064/- व इस्‍टीमेट बनवण्‍यासाठी आलेला खर्च रु.622.22 अशी एकुण रक्‍कम रु.4,686.22 तक्रारदारास व्‍याजासह देण्‍याचे आदेश व्‍हावेत, तक्रारदार यांना झालेल्‍या मनस्‍तापा दाखल रक्‍कम रु.1,00,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.15,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.    तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत विमाकृत वाहनाचे दुरुस्‍तीसाठी आलेल्‍या खर्चाचे इस्‍टीमेट तसेच ते घेण्‍यासाठी करावा लागलेल्‍या खर्चाबाबतचा योग्‍य तो कागदोपत्री पुरावा दाखल केलेला आहे.     सबब तक्रारदार हे विमा पॉलीसी नुसार विमा क्‍लेम रक्‍कम रु.1,00,000/- तसेच वाहन दुरुस्‍तीसाठी आलेला खर्च रु.27,079/- तसेच वाहनाचे रजिस्‍ट्रेशन खर्च रु.4,064/-, इस्‍टीमेट करिता झालेला खर्च रु.622/-अशी एकुण रक्‍कम रु.1,31,765/- विमा क्‍लेम नाकारल्‍याची दि.30/04/2012 पासुन द सा द शे 9 टक्‍के व्‍याजासह विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 कडुन वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या मिळण्‍यास पात्र आहेत.  तसेच तक्रारदार हिला झालेल्‍या मनस्‍तापा बद्यल रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 कडुन वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या मिळण्‍यास पात्र आहेत.   यास्‍तव आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

                              आ    दे    श 

( अ )       तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येतो.

( ब )       विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या असे निर्देशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार हिला विमा क्‍लेम पोटी एकुण रक्‍कम रु. 1,31,765/- (अक्षरी रक्‍कम रु.एक लाख एकतीस हजार सातशे पासष्‍ट मात्र) दि.30/04/2012 पासुन द सा द शे 9 टक्‍के रक्‍कम मिळेपावेतोच्‍या तारखेपर्यंतच्‍या व्‍याजासह या आदेशाचे प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.

( क )       विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3  यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या असेही निर्देशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारास झालेल्‍या मनस्‍तापाचे नुकसानी दाखल रु.15,000/-(अक्षरी रक्‍कम रु.पंधरा हजार मात्र )  व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र ) या आदेशाचे प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत.

    गा 

दिनांकः-  24/03/2014.   ( श्रीमती पुनम नि.मलीक )  ( श्री.विश्‍वास दौ.ढवळे )

                                                      सदस्‍या                         अध्‍यक्ष

                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.