आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री. विजय सी. प्रेेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 21 जुलै 2016)
1. अर्जदाराने सदर तक्रार अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून मिळण्याबाबत दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराने दिनांक 20/07/2016 रोजी गै.क्र 1 सोबत आपसी समझौता प्रकरणात दाखल केले. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं 2 ते 4 विरूध्द मागितलेली मांगणी परत घेत आहे असे आपसी समझौतानामा मध्ये नमुद आहे.
- कारण मिमांसा –
4. सदर तक्रार न्यायप्रविष्ट असतांना, अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी आपसी समझौता झालेला असल्याने अंतिम आदेश पारीत करावा, असा संयुक्त अर्ज दाखल केला. त्याअनुषंगाने, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// नि.क्र.1 वर आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदारास दयावी.
(3) गैरअर्जदार क्र. 2 व 4 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(4) अर्जदार व गैरअर्जदार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य दयावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/07/2016