जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 121/2014.
तक्रार दाखल दिनांक : 30/04/2014.
तक्रार आदेश दिनांक : 25/07/2014. निकाल कालावधी: 00 वर्षे 02 महिने 25 दिवस
श्री. पांडुरंग बापू बनकर, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. मु.पो. खुडूस, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कं.लि.,
रा. पेनिन सुला कार्पोरेट पार्क, निकोलस पिरॅमल टॉवर,
नववा मजला, जी.के. मार्ग, लोअर परेल, मुंबई – 400 013.
(नोटीस व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : ए.एस. मोरे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : विदुला राव
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत प्रकरण मागील तारखेस उभय पक्षकारांच्या तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. आज रोजी प्रकरण मंचापुढे आले असता तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी तडजोड होऊन तडजोडीप्रमाणे रु.30,000/- रकमेचा धनादेश प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. तसेच विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द तक्रार शिल्लक राहिलेली नसल्यामुळे तक्रार निकाली काढण्याची विनंती केली. सबब, तक्रारदार यांच्या विनंतीप्रमाणे तक्रार निकाली काढण्यात आली.
(श्री. ओंकारसिंह जी. पाटील) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी÷)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
-00-
(संविक/स्व/25714)