निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/08/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/08/2011
तक्रार निकाल दिनांकः- 16/04/2013
कालावधी 01 वर्ष.08 महिने.12दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमती सुरेखा भ्र.जगन्नाथ भोरे. अर्जदार
वय 25 वर्षे. धंदा.घरकाम. अड.आर.एन.जोगदंड.
रा.आडगांव ता.पूर्णा.जि.परभणी.
विरुध्द
1 तहसिलदार साहेब, गैरअर्जदार.
तहसिल कार्यालय, पूर्णा.
2 तालुका कृषी अधिकारी.
कृषी कार्यालय,पूर्णा.ता.पूर्णा जि.परभणी.
3 विभागीय व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस.
प्रा.लि.भास्करायण एच.डी.एफ.सी.
होमलोन बिल्डींग प्लॉट नं.7,
सेक्टर इ 1, टाऊन सेन्टर सिडको,औरंगाबाद.
4 व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.
मंडल कार्यालय, क्र.2 अंबिका हाऊस, शंकर नगर चौक,
नागपूर.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
अर्जदार यांचे पती नामे जगन्नाथ पिता शंकर भोरे याचा शेतकरी अपघात विमा योजनेचा विमाक्लेम नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या कारणाने अर्जदार यांनी विमा कंपनी विरुध्द तकार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार यांचा पती नामे जगन्नाथ शंकर भोरे हा शेतकरी होता, गट नं 125 व गट नं.68 मध्ये त्याची अनुक्रमे 27 आर व 21 आर जमीन होती.
दिनांक 24/04/2010 रोजी मयत जगन्नाथ हा त्याच्या मोटार सायकल क्रमांक एम.एच. 22 एम 2816 या मोटार सायकलवर जात असतांना लोडींग मॅक्स एम.एच. 10 के 8593 या गाडीने त्याच्या मोटार सायकलला माघुन धडक देवुन त्यास गंभीर जखमी केले व त्याचा आधार हॉस्पीटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदरील घटना घडल्यावर दिनांक 31/05/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत विमा दावा दाखल केला. गैरअर्जदार कमांक 2 यांनी दिनांक 07/02/2011 च्या पत्राप्रमाणे कागद पत्राची पुर्तता करण्याचे पत्र दिले, परंतु अर्जदार यांनी अर्जासोबत मागणी केलेले सर्व कागदपत्रे जोडली होती तरीपण गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे ते त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांच्याकडे पाठवली नाहीत, अर्जदारांचे पुढे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना प्रत्यक्ष भेटून सर्व कागदपत्रांची पुर्तता केली हे निदर्शनास आणुन दिले, तरीपण गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी करारानुसार आपण क्लेम संबंधी कागदपत्रे पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न दिल्यामुळे आम्ही तुमचा दावा नाकारत आहोत. असे कळविले. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की 07/02/2011 च्या पत्रांत मयताचे ड्रायव्हींग लायसेन्सची मागणी केली होती ती मागणीपण नंतर पुर्ण केली होती.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचा विमादावा नाकारुन गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिली आहे म्हणून अर्जदार यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे .
अर्जदाराला रुपये 1,00,000/- मृत्यू तारखेपासून द.सा.द.श. 18 टक्के व्याजदराने देण्याचे गैरअर्जदारांना आदेशीत करावे, तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 5000/- देणेचे आदेश करावे.
अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे, तसेच आपल्या म्हणणेचे पुष्टयर्थ इतर कागदपत्रे नि.क्रमांक 5 वर दिलेल्या यादी प्रमाणे दाखल केली आहेत तसेच अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजनेत पुरावा म्हणून सादर करावयाचे कागदपत्रां सबंधीचे शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्रमांक एन.ए. आय.एस.-1204 सी.आर.-166/11 ए.ची झेरॉक्सप्रत जोडली आहे.ज्याचा नि.क्रमांक 30 आहे.
गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीसा पाठवण्यांत आल्यावर गैरअर्जदार कमांक 2 यांनी आपले लेखी म्हणणे मंचासमोर दाखल केले आहे. ज्याचा नि.क्रं.19 आहे व तसेच त्यांनी आपले शपथपत्र दाखल केले आहे, ज्याचा नि.क्रं.20 आहे व त्यांच्या म्हणणेच्या पुष्टयर्थ त्यांनी नि.क्र.21 वर दिलेल्या यादी प्रमाणे कागदपत्रे जोडली आहेत.त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सर्व कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांच्याकडे पाठवली आहेत व त्यांच्या म्हणणे नुसार ड्रायव्हींग लायसेंन्सची प्रत जोडणे आवश्यक नाही, त्यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीने मुदतीत अर्ज सादर केला नाही. व मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केले नाही या कारणास्तव विमा दावा फेटाळण्यांत आला व म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 हे जिम्मेदार नाहीत व त्यांची कांही चुक नाही.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्याचे म्हणणे नि.क्रमांक 11 वर दाखल केले आहे व तसेच त्यांचे शपथपत्र नि.17 वर दाखल केले आहे त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी अर्जदारास मयताचे ड्रायव्हींग लायसेन्सची प्रत मागीतली होती पण अर्जदाराने ती दिली नाही त्यांनी अर्जदारास तसेच तालुका कृषी व अधिक्षक कृषी अधिकारी यांना ड्रायव्हींग लायसेन्स दाखल करण्यासंबंधी पत्र व स्मरणपत्रे पाठवली होती तरीपण ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केलेले नाही म्हणून त्यांनी तो विमादावा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पाठवला व तो कंपनीने कागदपत्रा अभावी बंद केला.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी मंचास अशी विनंती केली आहे की, त्यांनी त्याचे काम व्यवस्थीत पार पाडले असल्यामुळे त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यांत यावे तसेच अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 3 यांस दावाखर्च म्हणून र,2,000/- रुपये देण्यास सांगावे.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी आपले म्हणणे नि.क्रमांक 24 वर दाखल केले आहे व नि.क्रमांक 25 वर त्यांचे शपथपत्र दाखल केले आहे त्यांचे थोडक्यात म्हणणे असे की, मयत याने गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीकडे स्वतः विम्याचा हप्ता भरला नसल्यामुळे तो कंपनीचा ग्राहक होत नाही, म्हणून त्याची तक्रार खारीज करावी गैरअर्जदार क्रमांक 4 यांचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 व्दारा अर्जदारास मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स दाखल करणेसाठी सांगीतले होते व तसे त्याला 06/07/2010, 05/10/2010, 03/11/2010, आणि 06/12/2010 रोजी स्मरणपत्रे दिली होती त्या उपरही त्याने ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केलेले नाही.
तसेच पॉलिसी 14/11/2010 रोजी संपली आणि अर्जदाराने कागदपत्रे 14/11/2010 च्या नंतर 90 दिवसांच्या Expiry नंतर दाखल केली गैरअर्जदार क्रमांक 4 चे शेवटी असे म्हणणे आहे की, ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केलेले नाही व दावा वेळेत दाखल केलेला नाही या कारणास्तव विमादावा नाकारलेला आहे आणि तो योग्य आहे आणि म्हणून विमा कंपनी कसल्याही प्रकारचे नुकसान भरपाई देणे लागत नाही,म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा दावा खर्चासह खारीज करावा, गैरअर्जदारा क्रमांक 4 यांनी त्यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे ज्याचा नि.क्रमांक 25 आहे.
गैराअर्जदार क्रमांक 4 यांनी त्यांच्या म्हणणेच्या पुष्टयर्थ विमा पॉलिसी दाखल केली आहे ज्याचा नि.क्रमांक 28 आहे.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केलेले नाही,
म्हणून दावा दाखल करुन घेण्यात विलंब करुन
व तसेच विमादावा वेळेत दाखल केले नाही,
हे कारण देवुन विमा दावा नाकारुन विमा कंपनीने
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
मयताचे अपघाती मृत्यू झाले या बद्दल कसलाही वाद नाही, तसेच विमा कंपनीने दाखल केलेल्या पॉलिसीच्या Terms & Condition मधील Exclusion Clouse मधील मुद्दा क्रमांक 1 ते 15 पैकी त्या अंतर्गत मयताचा मृत्यू झालेला नाही तसा मुद्दा विमा कंपनीने उपस्थित करुन विमा दावा नाकारला नाही म्हणून प्रस्तुत प्रकरणांत ड्रायव्हींग लायसेन्सची मागणी करुन दावा दाखल करुन घेण्यास विलंब करणे हे या मंचास संयुक्तिक वाटत नाही.
तसेच विमा कंपनीने आपल्या 24/03/2011 च्या पत्रात Repudiation पत्रात जे विलंबाचे कारण देवुन दावा नाकारला आहे ते या मंचास योग्य वाटत नाही. त्याचे कारण असे की, विमा कंपनीने स्वतःच Irrelevant कागदपत्रांची मागणी करुन दावा दाखल करण्यास विलंब केलेला आहे तसेच विमा कंपनीने दाखल केलेल्या Policy च्या Terms & Condition मध्ये मुद्दा क्रमांक IV – Procedure to be followed by the insurance company’s मधील मुद्दा क्रमांक 8 मध्ये असे म्हंटले आहे की, It has also been agreed by the Insurance Companies that the date of receipt of the claim documents by the Taluka Agriculture officer will be taken as the date of intimation of the claim. प्रस्तुत प्रकरणांत अर्जदाराने दाखल केलेला विमादावा तालुका कृषी अधिकारी यांने प्रथम 31/05/2010 रोजी पुढील कार्यवाहीस्तव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठविला होता ते पत्र नि.क्रमांक 5/21 वर आहे.म्हणून दावा दाखल करण्यास विलंब झाला हे विमा कंपनीचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण मृत्यूचा दिनांक 23/04/2010 असा आहे.
म्हणून निर्णयासाठी उपस्थित मुद्याचे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते
2 गैरअर्जदार क्रमांक 4 यांना असे आदेश देण्यांत येते की, त्यांनी अर्जदारास निकाल कळाल्या पासून 30 दिवसांच्या आत रु.1,00,000/- (अक्षरी रु.एकलाख फक्त) द्यावे.तसेच दिनांक 24/03/2011 ते रक्कम देई पर्यंत ह्या रक्कमेवर 09 टक्के द.सा.द.शे. व्याज द्यावा.
3 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष