जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/158. प्रकरण दाखल तारीख - 13/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 16/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य 1. पदमीनबाई भ्र.आनंदाव बारसे वय,31 वर्षे, धंदा घरकाम रा. बारसगांव ता.अर्धापूर जि. नांदेड अर्जदार 2. आंजनबाई गणेशराव बारसे वय 55 वर्षे, धंदा घरकाम रा.बारसगांव ता.अर्धापूर जि. नांदेड विरुध्द. 1. मा.तहसीलदार, अर्धापूर, तहसील कार्यालय अर्धापूर जि. नांदेड. 2. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत व्यवस्थापक/मॅनेजर, गैरअर्जदार स्टलिंग सिनेमा बिल्डींग, दूसरा मजला 65 मर्झबान रोड, डि.ओ. 14 ख फोर्ट, मुंबई -400001 3. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगिना घाट रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - कोणीही हजर नाही.(एकतर्फा) गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकिल - अड.रेयाझूल्ला खॉन. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार पदमिनीबाई ही मयत आनंदराव बारसे यांची पत्नी आहे. मयत आनंदराव बारसे हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवे मौजे बारसगांव ता. अर्धापूर येथे गट नंबर 10 मध्ये 48 आर व गट नंबर 11 मध्ये 15 आर एवढी जमिन होती व त्यावर ते शेती करीत होते. दि.29.9.2006 रोजी सकाळी मयत आनंदराव हे दूचाकी नंबर एम.एच.-26-एल-5018 वरुन जात असताना थोरवा पाटीवर बसमत कडून परभणी कडे जाणारी एस.टी. बस च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून अर्जदारास धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी णले व सरकारी दवाखाना नांदेड येथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यासाठी अपघातात विमा सूरक्षा मिळावी म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे विमा पॉलिसी घेतली होती व त्यांचा प्रिमियम शासनाने भरला आहे. मयत हे शेतकरी असल्यामूळे शेतक-याच्या मृत्यूनंतर अर्जदार हे लाभार्थी आहेत. पॉलिसीचा कालावधी दि.15.7.2006 ते दि.14.7.2007 असा आहे. मयत आनंदराव यांचा मृत्यू हा दि.29.9.2006 रोजी झाला आहे. याबददल पोलिस स्टेशन अर्धापूर यांचेकडे गून्हा नंबर 197/07 नोंद केली आहे. यानुसार गैरअर्जदार हे अर्जदारास नूकसान भरपाई व विम्याची रक्कम देण्यास बांधील आहेत. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार तलाठी सज्जा यांचेकडे अर्ज देऊन क्लेम फॉर्म घेऊन तहसिलदार अर्धापूर यांचेकडे आवश्यक त्या कागदपञासह विम्याची रक्कम मिळण्यासाठी सादर केला आहे. आजपर्यत त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही म्हणून शेवटी अर्जदााने दि.8.2.2008 रोजी गैरअर्जदार यांना वकिलामार्फत नोटीस दिली. अर्जदार ही पॉलिसीची रक्कम मिळण्यास हक्कदार आहे असे असताना गैरअर्जदाराने बेकायदेशीरपणे क्लेम दाखल करण्यास उशिर झाला म्हणून दावा नामंजूर केला. अर्जदाराची मागणी आहे की, पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याज, मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस बजावली असता ती प्राप्त होऊनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे संयूक्तपणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी आहे. गैरअर्जदाराने अद्यापही क्लेम नामंजूर केलेला नाही. अर्जदार हे 15 गुंठयाचे मालक आहेत त्यामूळे ते शेतकरी होऊ शकत नाहीत. अर्जदाराची तक्रार ही गेरअर्जदार यांना विलंबाने व एक वर्षानंतर मिळाली आहे. त्यामूळे यांचेकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. गैरअर्जदाराने यावर नीर्णय घेतलेला नसताना अर्जदार हे सरळ न्यायमंचात आलेले आहेत. त्यामूळे अर्जदार हे विम्याची रक्कम रु.1,00,000/-, मानसिक ञासाबददल रु.50,000/- मागण्यास पाञ अपाञ आहेत. सबब तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना क्लेम फॉर्म पूर्णतः भरुन त्यांची प्रत दाखल केलेली आहे पण यावर दिनांक नाही. तसेच या सोबत तहसिलदार अर्धापूरन यांना या योजने अंतर्गत विम्याची रक्कम मिळावी म्हणून अर्जदाराच्या सहीने अर्ज दिलेला आहे. तो त्यांना मिळाला काय या बददल माहीती नाही शिवाय यावर दिनांक ही नाही. तहसिलदार यांनी कबाल इन्शूरन्स सर्व्हीसेस यांना पञ लिहून मयत आनंदराव बारसे यांचे दि.29.9.2006 रोजी अपघाती नीधन झाले व ते पाञ लाभार्थी मध्ये आहेत असे म्हणून पञ लिहीलेले आहे. यावर तहसिलदार यांची स्वाक्षरी नाही किंवा याही पञावर दिनांक नाही. दि.29.9.2006 रोजीचा एफ.आय.आर. पोलिस स्टेशन बसमत दाखल केलेला आहे. यात मयत आनंदराव बारसे हे दि.29.9.2006 रोजी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान त्यांचे दूचाकीवरुन जात असताना समोरुन येणा-या एस.टी.ने भरधाव वेगाने त्यांना धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले व नंतर मरण पावले यांची प्रत दाखल केलेली आहे. शिवाय या संबंधी घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, दाखल केलेले आहे. या पी.एम. रिपोर्ट मध्ये डोक्याला मार लागून अपघात मृत्यू झाला असे डॉक्टरांनी आपले मत व्यक्त केले आहे. याप्रमाणे ग्रामपंचायत बारसगांव यांनी मृत्यूचे प्रमाणपञ दि.29.9.2006 रोजी जारी केलेले आहे. आनंदराव हे शेतकरी होते व त्यांची नांवावर जमिन होती या बददल 7/12 दाखल केलेला आहे. याप्रमाणे 49 आर क्षेञ गट नंबर 10 मध्ये व गट नंबर 11 मध्हये 15 आर क्षेञ त्यांचे नांवावर आहे. अर्जदाराच्या मते ते शेतकरी असून ते शेती करीत होते. एकूण 63 आर जमिनीची होल्डींग पण दाखल आहे. वारसा प्रमाणपञ या प्रकरणात दाखल केले असून यात मयताची पत्नी व इतर त्यांचे तिन मूले हे वारस आहेत. शिवाय अर्जदार हिचे बँकेत खाते असल्याबददलचे पासबूक दाखल केलेले आहे. त्यासंबंधी शीधापञिका ही जोडण्यात आलेली आहे. आमच्या मते एवढे सर्व कागदपञ या क्लेम प्रपोजल सोबत असल्यानंतर व गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांना क्लेम प्रपोजल मिळाले आहे. यानंतर त्यांना नीर्णय घेण्यास एवढा अवधी का लागतो यांचा खूलासा त्यांनी केलेला नाही. अर्जदाराने दि.8.5.2008 रोजी गैरअर्जदार यांचे नांवे नोटीस ही पाठविली आहे. यांचे उत्तर गैरअर्जदार कंपनीने दिलेले नाही ? गैरअर्जदार यांचा असा आक्षेप आहे की, अतीशय कमी जमिन असल्याकारणाने मयत आनंदराव बारसे हे शेतकरी होऊ शकत नाहीत ? मयत आनंदराव यांचे नांवावर कमी का जमिन असेना पण ते जमिन कसतच होते ते शेती करीत नव्हते असे म्हणणे पूरेसे होणार नाही. ते पूराव्यानीशी सिध्द करावे लागेल हे गैरअर्जदार सिध्द करु शकत नाहीत. कमी जमिन असली तरी ते शेती करुन त्यांस जोंडधंदा करु शकतात. त्यामूळे त्यांचा हा आक्षेप लक्षात घेण्याजोगा नाही. गैरअर्जदाराचा अजून एक आक्षेप आहे की, त्यांना तक्रार ही उशिराने प्राप्त झाली, असे नियम जरी असले तरी अर्जदार यांच्या परिस्थितीचा विचार करता तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर ती व तिच्या कूटूंबातील सदस्य हे दूखात असणार व त्यांना त्यावेळी क्लेम मागण्यावीषयी विचार करणे शक्य नसते. हा नियम जरी असला तरी तो बंधनकारक नाही असे शासनाचे र्सक्यूलर देखील आहे. त्यामूळे हा नियम बंधनकारक आहे असे म्हणता येणार नाही व हा नियम दाखवून गैरअर्जदार आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. अशा प्रकारे गैरअर्जदार यांनी टोलवाटोलवीचे कारण समोर करुन क्लेम दिला तर नाहीच पण त्यावर नीर्णय ही घेतला नाही व क्लेम प्रपोजल अद्यापही स्वतःकडे तसेच ठेवले आहे ? म्हणून त्यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते. गैरअर्जदार क्र.1 तहसीलदार हे जबाबदार अधिकारी आहेत. शासनाने शेतक-याच्या कल्याणासाठी विमा योजना राबवलेली आहे. शेतक-याचा क्लेम प्रोसेस करुन तो विमा कंपनीकडे पाठवीणे ही तलाठी व तहसिलदार यांची जबाबदारी आहे. शासनाने जारी केलेली योजना शेतक-यासाठी राबवावी व शासनाच्या अधिका-याने त्यांचेकडे दूर्लक्ष करावे यांचा नमूना म्हणून म्हणजे गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस तामील होऊन ही ते त्यांचा जवाब सादर करीत नाहीत व मंचात गैरहजर राहतात ? यांला लापरवाही असेच नांव दयावे लागेल. कारण ब-याच प्रकरणात गैरअर्जदार हे आम्हाला क्लेम प्रपोजल मिळालेच नाही असे म्हणत आहेत. क्लेम प्रपोजल पाठविले का हे सांगण्यासाठी तहसीलदार यांचा जवाब व कागदपञे अतीशय आवश्यक आहेत. गैरअर्जदार क्र.1 या प्रकरणात गैरहजर राहिले व त्यांनी जवाब देणे हे गांर्भीयाने घेतले नाही म्हणून ते वैयक्तीकरित्या दंडास पाञ आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल जाहीर झाले पासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर प्रकरण दाखल केलेली दि.13.07.2009 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम वसूल होईपर्यत व्याजासह अर्जदार क्र.1 व 2 यांना अर्धी/ अर्धी दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दाव्या खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेल्या निष्काळजीपणा बददल दंड म्हणून रु.2,000/- वैयक्तीकरित्या अर्जदारास दयावेत. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |