(घोषित द्वारा – श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचा मुलगा मयत गणेश कारभारी हा शेतकरी आणि शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता. दिनांक 17/3/2008 रोजी एका अज्ञात वाहनाने विमाधारकास जोरात धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन त्यात विमाधारक मरण पावला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. इन्क्वेस्ट पंचनामा, पीएम करण्यात आले. तक्रारदारानी दिनांक 5/5/2008 रोजी सर्व कागदपत्रासहीत तहसिलदार खुलताबाद यांच्याकडे क्लेम दाखल केला. क्लेमची रक्कम मिळाली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून क्लेमची रक्कम रु 1 लाख 18 टक्के व्याजदराने, मानसिक त्रासापोटी रु 50,000/-, शारीरिक त्रासापोटी रु 25,000/-, आर्थिक त्रासापोटी रु 20,000/- आणि तक्रारीचा खर्च रु 5,000/- मागतात. तक्रारदारानी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 तहसिलदार खुलताबाद यांनी लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने त्यांच्या कार्यालयात दिनांक 3/5/2008 रोजी प्रस्ताव दाखल केला होता . तो प्रस्ताव कार्यालयाने दिनांक 5/5/2008 रोजी कबाल इन्शुरन्स कडे पाठविला. गैरअर्जदार क्रमांक 2 कबाल इन्शुरन्सने त्यांचा लेखी जवाब दाखल केला नाही म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश मंचाने पारित केला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार पॉलिसी घेतेवेळेस शेतक-याच्या नावावर शेत असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल. सदरील प्रकरणामध्ये तक्रारदाराने विमाधारकाचा फेरफार दाखल केला नाही त्यामुळे ते क्लेमची रक्कम देण्यास जबाबदार ठरत नाहीत. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यु दिनांक 17/3/2008 रोजी झाला. तक्रारदाराने विमाधारकाच्या नावावर जमिन असल्याबद्दलचा पुरावा म्हणून फरफारची प्रत, सातबाराची प्रत दाखल केली आहे. विमाधारकाचा मृत्यु अपघाताने झाला हे एफआयआर आणि पीएम वरुन सिध्द होते. तक्रारदाराने क्लेमसोबत फेरफाराची नक्कल दाखल केली नसल्याबद्दल तहसिलदार यांना पाठविलेले पत्र दिनांक 5/6/2008 वरुन दिसून येते. त्यानंतर कदाचित तक्रारदाराने फेरफाराची नक्कल तहसिलदार खुलताबाद मार्फत कबाल इन्शुरन्स कडे आणि रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे पाठविले असावे. शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारानी सर्व कागदपत्रे दिलेली आहेत. कबाल इन्शुरन्सने, तहसिलदार खुलताबाद यांना दिनांक 5/6/2008 च्या पत्रान्वये विमाधारकाचा फेरफर मागवलेला आहे तो तहसिलदार खुलताबाद यांनी दिनांक 15/6/2008 रोजी प्राप्त झाला असे कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु तहसिलदार खुलताबाद यांनी कबाल इन्शुरन्स कंपनीकडे कधी पाठविले याबाबतचा पुरावा नाही. तरी सुध्दा तो एका महिन्याने पाठविला असे समजून मंच 15/7/2008 पासून गैरअर्जदार रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास रु 1 लाख 9 टक्के व्याजदराने द्यावेत असा आदेश देत आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या विरुध्द आदेश नाही. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 3 रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास रक्कम रु 1 लाख दिनांक 15/7/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत द्यावेत. तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |