Maharashtra

Nagpur

CC/376/2015

Shadab Ismail Khan - Complainant(s)

Versus

Tara Homeopathic Clinic - Opp.Party(s)

17 Mar 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/376/2015
 
1. Shadab Ismail Khan
r/o Plot No 60,Navjivan Colony Wardha Road Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tara Homeopathic Clinic
306,Toran Complex Opp Ward No 6,old Padra Road
Vadodara
Vadodara
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

श्री मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.

 

 

 

- आदेश -

 (पारित दिनांक – 17 मार्च, 2016)

 

1.                तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली तक्रार थोडक्‍यात अशी आहे की,  तक्रारकर्ता वकीली व्‍यवसाय करतात. गेल्‍या 8, 9 वर्षापासून त्‍यांना डोक्‍यावरील केस गळण्‍याचा त्रास आहे. त्‍यासाठी त्‍यांनी अनेक उपाय केले, परंतू लाभ झाला नाही.

 

                  वि.प.क्र. 1 तारा होमिओपॅथिक क्लिनिक, वडोदरा हे केस गळतीच्‍या समस्‍येवर उपचार करण्‍यासाठी विविध ठिकाणी शाखा चालवून व्‍यवसाय करतात. तशीच एक शाखा वि.प.क्र. 2 नागपूर येथे आहे.

 

                  वि.प.क्र. 2 ने ‘दैनिक लोकमत समाचार’ मध्‍ये खालिलप्रमाणे आपल्‍या केसांवरील उपचार केंद्राची जाहिरात प्रसिध्‍द केली.

 

                  ‘डोक्‍यावर केस हे एक स्‍वप्‍न नाही..........

                  मुळापासून नैसर्गिक केस उगवा

                  फक्‍त थोडया दिवसांत

                  कोणत्‍याही सर्जरीशिवाय मुळापासून केस उगवणे.’

 

वरील जाहिरात त्‍याच वृत्‍तपत्रात दररोज प्रसिध्‍द होत होती. सदर जाहिरातीला भुलून तक्रारकर्त्‍याने दि.20.03.2013 रोजी वि.प.क्र. 2 ने जाहिरातीत दिलेल्‍या फोन नं. 9325045338 वर फोन करुन क्लिनिकला भेट दिली, तेव्‍हा तेथे असलेल्‍या महिला डॉक्‍टरांनी तक्रारकर्त्‍याच्‍या डोक्‍यावरील केसांची पाहणी करुन त्‍यांचे उपचार घेतल्‍यास डोक्‍यावर पुन्‍हा केस उगवतील, मात्र त्‍यासाठी रु.26,000/- द्यावे लागतील असे सांगितले.

 

                  तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 2 ला वेळोवेळी एकूण रु.26,000/- दिले आणि वि.प.क्र. 2 च्‍या महिला डॉक्‍टरांनी दिलेले औषध सांगितल्‍याप्रमाणे नियमित घेतले. परंतू त्‍याच्‍या डोक्‍यावर केस उगवले नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत वि.प.क्र. 2 च्‍या डॉक्‍टरांना विचारण केली असता जेथून केस उगवतात ते डोक्‍यावरील छिद्र (follicles) उघडलेले आहेत आणि त्‍यातून केस बाहेर येण्‍यास थोडा अवधी लागेल असे सांगितले. परंतू एक महीन्‍यानंतरही काहीच प्रगती दिसून न आल्‍याने तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 2 च्‍या क्लिनिकमध्‍ये जाऊन विचारणा केली असता केस उगविण्‍याच्‍या छिद्रात (follicles) अडथळा निर्माण झाल्‍याने तो दूर करण्‍यासाठी काही औषधी घेणे आवश्‍यक आहे, त्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास अधिकचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने अधिकचे पैसेदेखील दिले आणि वि.प.क्र. 2 च्‍या डॉक्‍टरांनी दिलेली औषधे घेतली, परंतू तरीही डोक्‍यावर केस उगवले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा वि.प.क्र. 2 च्‍या क्लिनिकमध्‍ये भेट दिली असता तेथील डॉक्‍टरांनी काही औषध दिले आणि त्‍यानंतरही फायदा झाला नाही तर तक्रारकर्त्‍याला डॉक्‍टरांच्‍या सल्‍यासाठी व पुढील औषधासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील अन्‍यथा क्लिनिकमध्‍ये येऊ नका असे सांगितले. तेव्‍हा तक्रारकर्त्‍यास असे कळून आले की, वि.प.ने तक्रारकर्त्‍याची फसवणूक केली असून वृत्‍तपत्रात खोटी व दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिध्‍द करुन जनतेची दिशाभूल करीत आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याने दि.23.08.2013 रोजी वि.प.क्र. 2 ला वकिलामार्फत पाठविलेली नोटीस मिळाल्‍यावर त्‍यांनी तक्रारकर्त्‍याशी संपर्क साधून पुन्‍हा उपचार सुरु करण्‍याबाबत व त्‍यानंतर लाभ न झाल्‍यास औषधोपचारासाठी घेतलेले रु.26,000/- आणि नुकसान भरपाई रु.10,000/- देण्‍याचे मान्‍य केले. त्‍यानंर ऑक्‍टोबर, 2013 मध्‍ये तक्रारकर्ता वि.प.क्र. 2 च्‍या क्लिनिकमध्‍ये गेला आणि तेथे महिला डॉक्‍टरांनी त्‍यास अधिकचे पैसे घेऊन काही औषध दिले. परंतू औषध घेऊनही तक्रारकर्त्‍याच्‍या डोक्‍यावर केस उगवले नाही. डॉक्‍टरांनीदेखील पुढे औषधोपचार घेऊन लाभ होणार नाही असे सांगितल्‍यावर तक्रारकर्त्‍याने दिलेले रु.26,000/- परत मागितले असता वि.प.क्र. 1 कडे पैसे मागा, वि.प.क्र. 2 ला पैसे परत करण्‍याचे अधिकार नाही असे सांगितले.

 

                  तक्रारकर्त्‍याने दि.18.04.2015 रोजी वि.प.क्र. 1 व 2 नोटीस पाठवून पैसे परत करण्‍याची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही वि.प.ने पैसे परत केले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

1)    उपचाराकरीता दिलेली रु.26,000/- ही रक्‍कम 12.50 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी.

2)    अधिक घेतलेल्‍या औषधाकरीता दिलेले रु.1,000/- परत मिळावे.

3)    मानसिक त्रासाबाबत रु.25,000/- व रु.25,000/- क्षतिपूर्तीबाबत वि.प.ने तक्रारकर्त्‍याला द्यावे.

4)    रु.15,000/- कार्यवाहीच्‍या खर्चादाखल मिळावे.

 

                  तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीसोबत रक्‍कम दिल्‍याच्‍या पावत्‍या, कायदेशीर नोटीस, पोचपावती, वर्तमान पत्रातील जाहिरातीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

 

2.                सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 ला प्राप्‍त होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्‍याने मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला.

 

3.                प्रकरणाच्‍या निर्णयासाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे - 

 

मुद्दे                                       निष्‍कर्ष

     

1) विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केला आहे काय ?   होय.

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?   अंशतः.

3) आदेश ?                                           अंतिम आदेशाप्रमाणे.              

                - कारणमिमांसा  -

 

 

4.                मुददा क्र. 1 बाबत – तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दैनिक लोकमत समाचार या वृत्‍तपत्रातील वि.प.ने दिलेल्‍या जाहिरातील टक्‍कल पडणे, केस गळणे, केस पांढरे होणे इ. समस्‍येवर त्‍यांच्‍या क्लिनिकमध्‍ये 100 टक्‍के खात्रीचे निदान व उपचार होत असल्‍याचे प्रसिध्‍द करुन वरील समस्‍याग्रस्‍तांना त्‍यांच्‍या क्लिनिकमध्‍ये उपचारासाठी आकृष्‍ट केले. सदर जाहिरातील वि.प.ने दावा केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या टक्‍कल पडलेल्‍या डोक्‍यावर हमखास केस उगवतील असे सांगून तक्रारकर्त्‍याकडून रु.26,300/- घेतल्‍याबाबतच्‍या पावत्‍या तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 1 ते 5 वर दाखल केलेल्‍या आहेत. परंतू वि.प.ने दिलेले उपचार घेऊनही तक्रारकर्त्‍याच्‍या डोक्‍यावर केस उगवले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने तक्रार केल्‍यावर वि.प.क्र. 2 ने पुन्‍हा अतिरिक्‍त औषधोपचारासाठी प्रत्‍येकी रु.200/- घेतले (पावती क्र. 6 व 7). परंतू त्‍यानंतरही डोक्‍यावर केस उगवले नाही हे तक्रारकर्त्‍याचे शपथपत्रावरील कथन वि.प.क्र. 1 व 2 यांनी नाकारलेले नाही.

 

                  तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 व 2 ला दि.18.04.2015 रोजी दस्‍तऐवज क्र. 10 प्रमाणे नोटीस दिली. त्‍याबाबत पोस्‍टाच्‍या रजि. पावत्‍या दस्‍तऐवज क्र. 11 वर आणि पोचपावत्‍या दस्‍तऐवज क्र. 12 वर दाखल आहेत.

 

                  तक्रारकर्त्‍याचे शपथपत्रावरील कथन खोटे ठरविणारा कोणताही पुरावा वि.प.ने दाखल केला नाही. वि.प.ने डोक्‍यावर केस उगवण्‍यासाठी दिलेल्‍या जाहिरातीप्रमाणे पैसे देऊन घेतलेल्‍या औषधाने तक्रारकर्त्‍याच्‍या डोक्‍यावर केस उगवले नाहीत. यावरुन वि.प.ने वृत्‍तपत्रात दिलेली जाहिरात खोटी असल्‍याचे सिध्‍द होत असल्‍याने वि.प.चे हे कृत्‍य ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 2 (r )  (1)  (ii) प्रमाणे अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब ठरते. सदरील तरतूद खालीलप्रमाणे आहे.

 

2 (r ) “unfair trade practice” means a trade practice which, for the purpose of promoting the sale, use or supply of any goods or for the provision of any service, adopts any unfair method or unfair or deceptive practice including any of the following practices, namely:-

 

(1) the practice of making any statement, whether orally or in writing or by visible representation-

 

  1. falsely represents that the goods are of a particular standard, quality, quantity, grade, composition, style or model;
  2. falsely represents that the services are of a particular standard, quality or grade;

 

म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

5.                मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्षावरुन वि.प.क्र. 1 व 2 यांनी डोक्‍यावर केस उगवण्‍याबाबत औषध उपलब्‍ध असल्‍याची खोटी जाहिरात देऊन त्‍याआधारे तक्रारकर्त्‍याकडून रु.26,700/- घेतले. परंतू त्‍यांनी केलेल्‍या उपचाराप्रमाणे तक्रारकर्त्‍यास डोक्‍यावर केस उगवले नाही. म्‍हणून तक्रारकर्ता वि.प.क्र. 2 ला दिलेली रक्‍कम रु.26,700/- ही दि.20.05.2012 पासून द.सा.द.शे.12.5 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

 

                  ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 14 प्रमाणे वि.प.ने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍यास व ग्राहकांना फसविणा-या जाहिरातीस प्रकाशित केल्‍यास त्‍यावर प्रतिबंध घालणे न्‍यायोचित होईल असे नमूद केले आहे. त्‍याप्रमाणे वि.प.क्र. 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या औषधोपचाराने डोक्‍यावर केस उगवतील ही फसवी जाहिरात यापुढे कोणत्‍याही वर्तमानपत्रात प्रसिध्‍द करु नये.

 

                  14. Finding of the District Forum …………….

 

(hc) to issue corrective advertisement to neutralize the effect of misleading advertisement at the cost of the opposite party responsible for issuing such misleading advertisement;

 

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

  • आ दे श

 

तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्‍द संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

1)    वि.प.ने तक्रारकर्त्‍याला रु.26,700/- ही रक्‍कम दि.20.05.2012 पासून रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे.12.5 टक्‍के व्‍याजासह द्यावी.

2)    वि.प.ने तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्‍हणून रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.

3)    सदर आदेशाची पुर्तता  वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत करावी.

4)    वि.प.क्र. 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या औषधोपचाराने डोक्‍यावर केस उगवतील ही फसवी      जाहिरात यापुढे कोणत्‍याही वर्तमानपत्रात प्र‍सिध्‍द करु नये.

5)    आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्‍य पुरवावी.

 

6)    तक्रारीची आणि प्रत तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.