Maharashtra

Kolhapur

CC/10/305

Smti.Asha Dattatray Kulkarni. - Complainant(s)

Versus

Tapowan Nagri Sah Pat Sanstha and others. - Opp.Party(s)

Sou.S.D.Chipade.

30 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/305
1. Smti.Asha Dattatray Kulkarni.Plot 32.Saiukat Maharashtra Housing Society Rajarampuri 13 lane.Kolhapur2. Vijay Dattatry KulkarniPlot no 32,Sayukat Maharashtra Housing Society.Rajarampuri 13 Lane.Kolhapur3. Kum.Jaswandi Anand Kulkarni,Plot no 32,Sayukat Maharashtra Housing Society.Rajarampuri 13 Lane.Kolhapur4. Sou.Jai Anand Kulkarni.Plot no 32,Sayukat Maharashtra Housing Society.Rajarampuri 13 Lane.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Tapowan Nagri Sah Pat Sanstha and others.Seva sadan.S.T.Stand Sambahjinager.Kolhapur.2. Dilip Ganpatrao MagdumSevarth.Plot no 27, Old More Colony,Kolhapur3. Tanaji Rtnappa PatilPlot no-25,Old More Colony.Kolhapur4. Mahadev Bapuso PatilPlot no 53,Tatyso Mohite colony.Kolhapur5. Dhondiram Bapuso Salokhe.850/1,Bapuram Nagar.Kolhapur6. Dhairshil Keshvrao Mane.Plot no 25,Old More Colony.Kolhapur7. Sachin Vasantrao Sankpal.Plot no 3, Shrikrishna Colony.Kolhapur8. Sou,Kamal Sampatrao PatilPlot no 503,R.K,Nagar Society.no 6 Kolhapur9. Somnath Shivajirao Patil.765/1,Radhika Gharkul Yojana.Old More Colony.Kolhapur10. Sanjay Balaso Kachote.712/22,Shahaji Vasahat.Kolhapur11. Rajendra Manadev Gurav.Plot no 18,Old More Colony.Kolhapur12. Anil Ramchandra VadiyarPlot no 28,Old More Colony.Kolhapur13. Prashant Dinkar Kambale767 c.no-710/11,Mhada Colony,Kolhapur14. Sou.Vijaya Abaso Sawant712/16,Shahaji Vasahat.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Sou.S.D.Chipade for the complainants

Dated : 30 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.30.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना संधी देवूनही त्‍यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला संस्‍थेचे मॅनेजर व वकिल हजर होते.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद, दामदुप्‍पट ठेवींच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
1.
1011092
10000/-
11.03.2002
11.04.2003
2.
003347
1000/-
16.07.2001
16.08.2003
3.
000796
2000/-
08.06.2001
08.07.2003
4.
0006410
500/-
11.08.2000
11.10.2004
5.
001910
500/-
03.01.200
03.03.2004
6.
बचत खाते नं. 1260
2943/-
--
--

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदार क्र.1 या उच्‍च मधुमेह असून गंभीर आजारी असून त्‍यांन ना सदर रक्‍कमांची औषधोपचारासाठी अत्‍यंत आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.14.04.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 ते 14 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 14 यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(6)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता पावती क्र.001910 व 0006410 या दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तसेच, तक्रारदार यांनी मुदत बंद ठेवींच्‍या स्‍वरुपातही रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत. पावती क्र.011092, 003347 व दि.000796 या पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 1260 वर दि.10.11.2005 रोजीअखेर रुपये 2,943/-/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
1011092
10000/-
2.
003347
1000/-
3.
000796
2000/-

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
व्‍याज देय तारीख
1.
0006410
1000/-
11.10.2004
2.
001910
1000/-
03.03.2004

        (3) सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूद तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे. 
 
 (4)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.1260 वरील रक्‍कम रुपये 2,943/- (रुपये दोन हजार नऊशे त्रेचाळीस फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.10.11.2005 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(5)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
 
(6)   सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवींपोटी यापूर्वी जर काही व्‍याजाच्‍या रक्‍कमा अदा केल्‍या असतील तर सदर व्‍याजाच्‍या रक्‍कमा वळत्‍या करुन घेण्‍याचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित ठेवणेत येतो.

 


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER