Maharashtra

Kolhapur

CC/10/365

Tanaji Sawala Patil - Complainant(s)

Versus

Tapowan Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit, Kolhapur - Opp.Party(s)

24 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/365
1. Tanaji Sawala PatilPlot no 10, B Ward, Shahusena Chowk, Jawaharnagar, Kolhapur2. Sou.Suvarna Tanaji Patil,R/o. As above ...........Appellant(s)

Versus.
1. Tapowan Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit, KolhapurSeva sadan, Juni More Colony, S.T. Stand, Sambhajinagar, Kolhapur.2. Shri Dilip Ganpatrao MagdumR/o. Plot No.27, Juni More Colony, Sambhajinagar, Kolhapur3. Mahadeo Bapuso PatilR/o. Plot No.43, Tatyaso Mohite Colony, Kolhapur.4. Shri Sambhaji Bapuso SalokheR/o. 850/01, Bapuram Nagar, Kalamba, Kolhapur.5. Shri Tanaji Ratnappa PatilR/o. Plot No. , Juni More Colony, Sambhajinagr, Kolhapur.6. Shri Dhairyashil Keshavrao ManeR/o. Plot No.25, Juni More Colony, Sambhajinagar, Kolhapur.7. Shri Sachin Vasantrao SankpalR/o.Plot No.3, Shrikrishna Colony, Sambhajinagar, Kolhapur.8. Kamal Sampatrao PatilR/o. 530 R.K.Nagar Society, Kolhapur.9. Shri Somnath Shivajirao PatilR/o. 735/1, Radhika Gharkul Yojana, Juni More Colony, Sambhajinagar, Kolhapur.10. Shri Sanjay Balaso Kasote,R/o.712/22, Shahaji Vasahat, Kolhapur.11. Shri Rajendra Mahadeo GuravR/o. Plot No.28, Juni More Colony, Sambhajinagar, Kolhapur.12. Shri Anil Ramchandra VadiyarR/o. Plot No.28, Juni More Colony, Sambhajinagar, Kolhapur.13. Shri Datta Narayan BamaneR/o. Shrikrishna Colony, Deokar Panand, Kolhapur.14. Shri Shrikant Parashram DesaiR/o. Plot No.16, Juni More Colony, Sambajinagar, Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
Adv.Umesh Mangave for all the opponents.

Dated : 24 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.24.11.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी म्‍हणणे दाखल केले.  उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही.  सुनावणीचेवेळेस, सामनेवाला यांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदार, श्री.तानाजी सावळा पाटील व त्‍यांच्‍या पत्‍नी सो.सुवर्णा तानाजी पाटील हे एकत्र कुटुंबातील आहेत. सामनेवाला क्र.1 ही सहकारी संस्‍था आहे. सामनेवाला क्र.2 चे सदर संस्‍थेचे चेअरमन आहेत, तर सामनेवाला क्र.3 ते 15 हे संचालक आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
आजअखेर व्‍याजासह मिळणारी रक्‍कम
1.
019163
7500/-
11.09.2002
11.12.2002
15095/-
2.
019164
9500/-
11.09.2002
11.12.2002
19120/-
3.
019165
9500/-
11.09.2002
11.12.2002
19120/-
4.
019166
9500/-
11.09.2002
11.12.2002
19120/-
5.
019167
9500/-
11.09.2002
11.12.2002
19120/-
6.
019168
9500/-
11.09.2002
11.12.2002
19120/-
7.
21532
20000/-
12.12.2003
26.01.2004
40253/-

 
(3)        सदर पावत्‍यांची मुदत पूर्ण झाल्‍यावर व्‍याजासह होणा-या रक्‍कमांची तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे मागणी केली असता त्‍यांनी रक्‍कम परत देण्‍यास असमर्थता दर्शविली. तक्रारदारांना पैशाची अत्‍यंत निकड असल्‍याने सामनेवाला यांच्‍या शाखेत जावून वेळोवेळी पैशाची मागणी केली परंतु, सामनेवाला यांनी टाळाटाळ केली. तक्रारदारांनी सामनेवाला यांना रक्‍कम देणार आहात की नाही अशी विचारणा केली असता सामनेवाला यांनी कर्ज रक्‍कम वसुल झालेशिवाय रक्‍कम देणार नाही असे स्‍पष्‍ट सांगितले व रक्‍कम परत केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह बचत खात्‍यावरील रक्‍कम, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत मुदत बंद ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला 1 ते 14 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सभासद व संस्‍था यांचे दरमयान झाले वादाचे निराकरण करणेकरिता सहकार न्‍यायालय स्‍थापन झाले असल्‍याने प्रस्‍तुतचा अर्ज या मंचात चालणेस पात्र नाही. तसेच, प्रस्‍तुत अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला संस्‍थेचे लेखापरिक्षण होवून त्‍यामध्‍ये सामनेवाला संस्‍थेच्‍या संचालकांनी संस्‍थेमध्‍ये कोणताही अपहार केला नसलेचे सिध्‍द झालेले नाही. त्‍यामुळे महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 88 प्रमाणे देय रक्‍कमेची कोणतीही जबाबदारी प्रस्‍तुत सामनेवाला यांचेकवर सहकार खात्‍याने ठेवलेली नाही.  
 
(6)        प्रस्‍तुत सामनेवाला त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, एकाच वेळी सर्व ठेवीदारांनी मुदतपूर्व रक्‍कमा काढल्‍याने संस्‍थेतील रक्‍कमेची तरलता कमी झालेने दैनंदिन कामकाज चालविणे अडचणीचे झाले आहे. तसेच, कर्ज रक्‍कमा येणेबाकी आहेत. महाराष्‍ट्र शासन, कमिशनर, पुणे यांनी सहकारी खात्‍याअंतर्गत अध्‍यादेश काढून रक्‍कम रुपये 10,000/- च्‍या आंतील ठेवीदारांना प्राधान्‍याने ठेवी देणेचे आदेश दिलेले आहेत. त्‍याप्रमाणे पूर्तता करणे गरजेचे आहे. तसेच, वसुलीप्रमाणे रक्‍कमा अदा करणेचे काम चालू आहे; कर्जदारांकडून ताब्‍यात घेतलेल्‍या मिळकती ठेवीदारांना द्यायची तयारी आहे; परंतु ठेवीदार रोख रक्‍कमेची मागणी करीत असल्‍याने अडचणीचे झाले आहे. प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत नाही. सामनेवाला क्र.4, 13 व 14 हे सामनेवाला संस्‍थेचे कधीही संचालक नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही. इत्‍यादी कथने करुन सामनेवाला यांनी तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(7)        सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींची रक्‍कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्‍याने कारण घडत आहे. सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत आहे.
 
(8)        तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे ठे़वी ठेवलेल्‍या आहेत. सामनेवाला पतसंस्‍था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्‍हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्‍च न्‍यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्‍द मेसर्स युनायटेड वैश्‍य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्‍ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
 
 
(9)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 14 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   तसेच, सदर पावत्‍यांच्‍या पाठीमागील बाजूस तक्रारदारांना व्‍याज अदा केलेबाबतच्‍या नोंदी दिसून येतात. त्‍यामुळे सदर व्‍याजाच्‍या रक्‍कमा वळत्‍या करुन घेण्‍याचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित ठेवणेत येतो.
 
(11)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
019163
7500/-
2.
019164
9500/-
3.
019165
9500/-
4.
019166
9500/-
5.
019167
9500/-
6.
019168
9500/-
7.
21532
20000/-

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER