निकालपत्र :- (दि.08/09/2010) (व्दारा-श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले.पैकी सामनेवाला क्र.1 व2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. परंतु सामनेवाला क्र.3 ते 14 यांना संधी देऊनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. उभय पक्षकारांचे वकीलांनी युक्तीवाद केला. (2) यातीलतक्रारदार क्र.1 हे जेष्ठ नागरीक असून तक्रारदार क्र.2 या तक्रारदार क्र.1 यांचे पत्नी आहेत. तर तक्रारदार क्र.3 हे भाऊ आहेत. तक्रारदार क्र.4 या भावजय व तक्रारदार क्र. 5 व 6 या नाती आहेत. तक्रारदार क्र.7 या तक्रारदार क्र.1 यांच्या आई आहेत. सर्व तक्रारदार हे एकत्र कुटूंबातील आहेत. सामनेवाला क्र.1ही सहकारी संस्था आहे. सदर संस्थेचे सामनेवाला क्र.2 चेअरमन तर सामनेवाला क्र.3ते14 हे संचालक आहेत. सदर सामनेवाला यांचेवर विश्वास ठेवून यातील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेत पुढीलप्रमाणे रक्कमा दामदुप्पट ठेव स्वरुपात व सेव्हींग खातेवर ठेवलेल्या होत्या. अ. क्र. | तक्रारदाराचे नांव | ठेवीचा प्रकार | ठेव पावतीक्र. | ठेव ठेवल्याचा दि. | ठेवीची मुदत संपलेचा दि. | ठेवलेली रक्कम | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 01 | पांडूरंग बा.कुलकर्णी | दामदुप्पट | 7980 | 17/09/02 | 17/06/07 | 10,000/- | 20,000/- | 02 | पांडूरंग बा.कुलकर्णी | दामदुप्पट | 7981 | 17/09/02 | 17/06/07 | 10,000/- | 20,000/- | 03 | पांडूरंग बा.कुलकर्णी सुनिता पां.कुलकर्णी | सेव्हींग खाते | 250 | 04/02/08 | | 76,292/- | | 04 | दत्तात्रय बा.कुलकर्णी माधुरी द.कुलकर्णी | सेव्हींग खाते | 19 | 22/03/07 | | 99,917/- | | 05 | सायली श्री.कुलकर्णी सुमेधा श्री.कुलकर्णी | सेव्हींग खाते | 934 | 26/03/09 | | 10,850/- | | 06 | पुर्वा मु.कुलकर्णी मानसी मु.कुलकर्णी | सेव्हींग खाते | 933 | 04/02/09 | | 40,000/- | | 07 | मालती वि.नाडगोंडा | सेव्हीं.खाते | 675 | 22/03/07 | | 76,894/- | |
(3) सदर ठेवींच्या मुदती संपलेनंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे व्याजासह ठेव रक्कमांची व सेव्हींग खातेवरील रक्कमांची मागणी केली असता सामनेवाला यांनी त्या परत करणेस टाळाटाळ केली व असमर्थता दर्शविली. यातील तक्रारदार यांना पैशाची अत्यंत निकड असलेने सामनेवाला यांचे शाखेत जाऊन वेळोवेळी पैशाची मागणी केली परंतु आज देतो उदया देतो, संस्थेची कर्ज रक्कम वसुल होताच देतो अशी चुकीची दिशाभूल करणारी कारणे सांगून सामनेवाला हे जाणूनबुजून तक्रारदार यांची रक्कम देणेची टाळाटाळ करीत आहेत. सबब सामनेवाला यांचेकडून रक्कम मिळणेची कोणतीही खात्री राहिलेली नाही. म्हणून तक्रारदार क्र.1 यांचे नांवे असलेल्या दामदुप्पट ठेव पावत्यां क्र.7980 व 7981 वरील एकूण दामदुप्पट रक्कम रु.40,000/-द.सा.द.शे. 20 टक्के व्याजासह व इतर तक्रारदारांच्या सेव्हींग खातेवरील जमा असलेल्या रक्कमा द.सा.द.शे.12 व्याजासह सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होऊन मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळणेकरिता सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत दामदुप्पट ठेव पावत्या व सेव्हींग खात्यांचे पासबुकांचा उतारा यांच्या सत्यप्रती जोडलेल्या आहेत व शपथपत्र दाखल केले आहे. (5) या मंचाने सामनेवाला यांना नोटीसा पाठविल्या असता सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले परंतु सामनेवाला क्र.3ते14 यांनी म्हणणे देणेकरिता मुदत मागितली. त्यांना म्हणणे दाखल करणेकरिता संधी देवूनही त्यांनी मुदतीत म्हणणे दाखल केले नाही. (6) सामनेवाला क्र.1व2 यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार ठेवींच्या रक्कमा वगळता पूर्णत: नाकारलेली आहे. प्रस्तुत सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, यातील तक्रारदार यांनी कधीही सामनेवाला संचालकांकडे रक्कमेची मागणी केलेली नाही. त्यामुळे सदर अर्जात कोणतेही कारण घडलेले नाही. सबब प्रस्तुतची तक्रार नामंजूर व्हावी. तसेच यातील सामनेवाला संस्थेचे शासकीय लेखापरिक्षण होऊन त्यामध्ये प्रस्तुत संचालकांनी संस्थेमध्ये कोणताही अपहार केला नसलेचे सिध्द झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकार कायदा कलम 88 अन्वये देय रक्कमेची कोणतीही जबाबदारी प्रसतुत सामनेवाला यांचेवर सहकार खात्याने ठेवलेली नाही. त्यामुळे संचालकांनी वैयक्तिक स्वरुपात ठेव खात्यातील रक्कमा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे संचालकांविरुध्दचा सदरचा अर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. (7) सामनेवाला क्र.1 व 2 आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, महाराष्ट्र राज्यामध्ये इतर पत संस्था या बुडीत गेल्याने ठेवींची मागणी एकाचवेळी सर्व ठेवीदारांनी केलेने संस्थेतील तरलता कमी झालेने सामनेवाला संस्थेचे दैनंदिन कामकाज चालविणे अडचणीचे झाले. तसेच सामनेवाला संस्थेने सभासदांना दिलेल्या कर्जाच्या मुदतीही संपावयाच्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांना ठेव रक्कम अदा करणे अडचणीचे झाले आहे.तसेच महाराष्ट्र शासन कमिशनर पुणे यांनी सहकार खात्याअंतर्गत अध्यादेशकाढून रक्कम रु.10,000/-च्या आतील ठेवीदारांना प्राधान्यायाने ठेव रक्कम देणेचे आदेश दिेलेले आहेत. त्यामुळे कर्जदारांकडून ताब्यात घेतलेल्या मिळकतीही ठेवीदारांना दयावयाची तयारी संस्थेची आहे. परंतु ठेवीदारांनी रोख एक रक्कमेची मागणी असलेचे तशी रक्कम देणे सामनेवाला संस्थेला शक्य नाही. तसेच यातील सामनेवाला क्र.4,13 व 14 हे कधीही सामनेवाला संस्थेचे संचालक नव्हते व नाहीत. सामनेवाला संस्थेकडे तक्रारदाराने कधीही ठेव रक्कमेची मागणी केलेली नव्हती त्यामुळे ती वेळेत देणेचा अथवा देणेस टाळाटाळ करणेचे कोणतेही कारण नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (8) तक्रारदाराचा तक्रार अर्ज शपथपत्र व दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे तसेच उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद यांचा या मंचाने साकल्याने विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे दामदुप्पट व सेव्हींग खातेच्या स्वरुपात सामनेवाला यांचेकडे रक्कमा ठेवलेल्या आहेत. सदर ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत व तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वारंवार मागणी करुनही त्या सामनेवाला यांनी परत केलेल्या नाहीत असे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या व्याजासह ठेव रक्कमा व सेव्हींग खातेवरील रक्कम मिळविणेकरिता या मंचासमारे तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. (9) या मंचाने सामनेवाला क्र. 3 ते 14 यांना संधी देवूनही आपले म्हणणे मुदतीत दाखल केलेले नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदाराचा तक्रार अर्ज मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी आपल्या म्हणणेमध्ये तक्रारदाराच्या ठेवी किंवा सेव्हींग खातेवरील रक्कमा नाकारलेल्या नाहीत. सामनेवाला संस्थेची कर्ज वसुली जसजशी होईल तसतशी रक्कम अदा केली जाईल असे कथन केले आहे. तसेच सामनेवाला क्र.4,13 व 14 हे सामनेवाला संस्थेचे संचालक नसलेचे कथन केले आहे. परंतु त्याबाबत कोणताही पुरावा सदर मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब सामनेवाला क्र. 1 ते 14 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या व्याजासह दामदुप्पट रक्कमा व सेव्हींग खातेवरील रक्कम परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या दामदुप्पट ठेव पावत्यांच्या सत्यप्रतीचे अवलोकन केले असता सदर दामदुप्पट ठेव पावत्यांच्या तक्रार दाखल करणेपूर्वीच मुदती संपलेल्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या दामदुप्पट ठेव पावती क्र. 7980 व 7981 वरील दामदुप्पट रक्कम रु.20,000/- व रु.20,000/- मिळणेस पात्र आहेत. सदर रक्कमांवर दि.17/06/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सेव्हींग खाते क्र.250 वरील रक्कम रु.76,292/- मिळणेस पात्र आहेत व सदर रक्कमेवर दि.04/02/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सेव्हींग खाते क्र.19 वरील रक्कम रु.99,917/- मिळणेस पात्र आहेत व सदर रक्कमेवर दि. 22/03/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सेव्हींग खाते क्र.934 वरील रक्कम रु.10,850/- मिळणेस पात्र आहेत व सदर रक्कमेवर दि. 26/03/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सेव्हींग खाते क्र.933 वरील रक्कम रु.40,000/-मिळणेस पात्र आहेत व सदर रक्कमेवर दि.04/02/2009पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.3.5टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सेव्हींग खाते क्र.675 वरील रक्कम रु.76,894/-मिळणेस पात्र आहेत व सदर रक्कमेवर दि.04/02/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच वरील सर्व रक्कमा सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना देणेस जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा दयाव्यात व सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दयावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेवीची मुदत संपलेचा दि. | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 01 | 7980 | 17/06/07 | 20,000/- | 02 | 7981 | 17/06/07 | 20,000/- |
(3) सामनेवाला क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या तक्रारदारांना सेव्हींग खाते क्र.250 वरील रक्कम रु.76,292/- अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 04/02/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज अदा करावे. तसेच सेव्हींग खाते क्र.19 वरील रक्कम रु.99,917/-अदा करावी व सदर रक्कमेवर दि.22/03/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज अदा करावे. तसेच सेव्हींग खाते क्र.934 वरील रक्कम रु.10,850/- अदा करावी व सदर रक्कमेवर दि.26/03/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज अदा करावे.तसेच सेव्हींग खाते क्र.933 वरील रक्कम रु.40,000/- अदा करावे व सदर रक्कमेवर दि. 04/02/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज अदा करावे.तसेच सेव्हींग खाते क्र.675 वरील रक्कम रु.76,894/- अदा करावे व सदर रक्कमेवर दि. 04/02/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज अदा करावे. (4) सामनेवाला क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |