Tapowan Nagari Sah Pat Sanstha Maryadit V/S Sumangal Gajanan Dhakars
Sumangal Gajanan Dhakars filed a consumer case on 12 Aug 2010 against Tapowan Nagari Sah Pat Sanstha Maryadit in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/10/265 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
CC/10/265
Sumangal Gajanan Dhakars - Complainant(s)
Versus
Tapowan Nagari Sah Pat Sanstha Maryadit - Opp.Party(s)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांनी स्वत: व सामनेवाला यांचे अॅड.पी.आर.कसबेकर यांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक गरजेकरिता बचत खाते क्र.3994 वर वेळोवेळी रक्कमा जमा केल्या आहेत. सदर रककमेवर सामनेवाला यांनी द.सा.द.शे.7 टक्के व्याज देणेचे मान्य केले आहे. सदर रक्कमेची सामनेवाला यांचेकडे मागणी केली असता सामनेवाला हे टाळाटाळ करीत आहेत. सबब, बचत खात्यावरील रक्कम रुपये 1,38,171/- व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत बचत खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत व शपथपत्र दाखल केले आहे.
(4) तक्रारदार हे वरिष्ठ नागरिक आहेत. सामनेवाला हे वकिलामार्फत हजर झाले, परंतु म्हणणे दाखल केलेले नाही. प्रस्तुत प्रकरणी दाखल बचत खाते क्र. 3994 चे अवलोकन केले असता सदर खात्यावर दि.31.03.2010 रोजीअखेर सामनेवाला संस्थेत तक्रारदारांच्या नांवे रक्कम रुपये 1,38,171/- इतकी रक्कम जमा असलेचे दिसून येते. सदरची रक्कम सामनेवाला यांनी दिली नसल्याचे दिसून येते. सामनेवाला यांचे अॅड.पी.आर.कसबेकर यांनी युक्तिवादाचेवेळेस तक्रारदारांनी मागितलेली रक्कम मान्य नसल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, सदर बचत खात्यावर रक्कम रुपये 1,38,171/- इतकी रक्कम नमूद असलेचे दिसून येते. सदरचे पासबुकाचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी सदरची रककम तक्रारदारांना अदा केली नसल्याचे दिसून येते. सदर रक्कम व्याजासह तक्रारदारांना अदा करणेबाबत सामनेवाला यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
(2) सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांच्या सेव्हिंग्ज खाते क्र.3994 वरील रक्कम रुपये 1,38,171/- (रुपये एक लाख अडतीस हजार एकशे एक्काहत्तर फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.01.04.2010 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे.
(3) सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
(4) सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.