निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 475/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 11/04/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 13/05/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 01/08/2009
1. श्री.रमेश हरी कोल्हे,
उ.व.60 वर्षे, धंदाः व्यवसाय,
2. सौ.कल्पना रमेश कोल्हे,
उ.व.45 वर्षे, धंदाः घरकाम,
दोघे रा.विठठलपेठ, जुने जळगांव,
बदाम गल्ली, जळगांव, ता.जि.जळगांव. ........... तक्रारदार.
विरुध्द
1. तापी अर्बन को- ऑप क्रेडीट सोसा. लि., सावदा
शाखाः न्हावी, ता.यावल, जि.जळगांव.
2. तापी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा.लि., सावदा
मुख्य शाखाःसावदा, ता.रावेर, जि.जळगांव, तर्फे
प्रमोद मानसाराम कोल्हे (चेअरमन)
3. श्री.देविदास वाघोडे,
प्रशासक, तापी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा.लि., सावदा
मुख्य शाखाःसावदा, ता.रावेर, जि.जळगांव. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 01/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच सदस्य श्री. चंद्रकांत मोहन येशीराव यांचेकडून )
तक्रारदारा तर्फे श्री.ए.एम.खान वकील हजर
सामनेवाला क्रं.1 व 2 तर्फे श्री. ऋषीकेष मधुकर घोलप वकील हजर.
सामनेवाला क्रं. 3 स्वतः हजर
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 003285 | 07/11/2002 | 29,000/- | 07/06/2007 |
2 | 003243 | 14/10/2002 | 10,000/- | 14/05/2007 |
3 | 000734 | 19/08/2003 | 33,000/- | 19/03/2008 |
4 | 000735 | 19/08/2003 | 33,000/- | 19/03/2003 |
5 | 003219 | 01/10/2002 | 46,000/- | 01/05/2007 |
6 | 003242 | 14/10/2002 | 11,000/- | 14/05/2007 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावतीची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रं. क्रं. 1,2 व 3 यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होऊन लेखी म्हणणे सादर केलेले आहे.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी प्रस्तुत तक्रारीला लेखी म्हणणे सादर केलेले असुन तक्रार अर्ज व त्यातील कथन नाकारलेले असुन तक्रारदार हया दोन वेगवेगळया व्यक्ती असुन त्यांनी ठेव ठेवलेल्या ठेवी व त्यावरील व्याजदर वेगवेगळा असल्याने प्रस्तुत तक्रार कायदयाने चालु शकत नाही. सामनेवाला संस्थेचा कारभार हे सामनेवाला संस्थेच्या सर्वर सभासदांनी निवडुन दिलेल्या अधिकारावरुन व संस्थेने स्विकृत केलेल्या पोट नियमांच्या आधारे सामनेवाला क्र. 1 व 2 हे करीत असतात. सामनेवाला क्र. 1 कडे ठेवलेल्या ठेवी हया कर्ज स्वरुपात इतर सभासदांमध्ये वाटलेल्या असुन त्याचा दुरुपयोग सामनेवाला यांनी केलेला नाही त्यामुळे सामनेवाला यांचेवर मुदत ठेवी परतफेडीची कोणतीही जबाबदारी टाकु नये. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी उपस्थित केलेला वाद हा संस्थेचे सभासद व सामनेवाला सहकारी संस्था यातील वाद असल्याने सदरचा वाद सहकार न्यायालयाकडे उपस्थित करता येतो. सबब प्रस्तुत तक्रार या मंचासमोर चालण्यास पात्र नाही. तक्रारदारांना सामनेवाला यांनी कधीही उडवाउडवीची उत्तरे दिलेली नव्हती व नाहीत. ज्या ज्या ठेवीदारांनी संस्थेकडे रितसर सदरील ठेवी परत करणेसाठी अर्ज दिला होता त्या त्या ठेवीदारांचे ठेवी परत दिलेल्या आहेत. तक्रारदाराने संस्थेकडे ठेवी परत करणेबाबत कोणताही लेखी अर्ज अथवा नोटीस सामनेवाला क्र. 1 व 2 यांना दिलेली नाही. सबब सामनेवाला विरुध्द तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी व सामनेवाला यांना तक्रारदारांची ठेवीची रक्कम परत करण्यास सहा महीन्यांचा अवधी देण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र. 3 यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होऊन लेखी म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाला यांची तापी अर्बन संस्थेवर सहा.प्रशासक म्हणुन नेमणुक असुन त्यांचेकडे संस्थेचे कोणतेही व्यवहार करण्याचे अधिकार नसल्याचे तसेच संस्थेचे सर्व व्यवहार करण्याचे अधिकार श्री.बी.एच.कांबळे यांचेकडे असल्याने सदरील तक्रारीशी सामनेवाला यांचा काडीमात्र संबंध नाही. सबब प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क्र. 3 यांना जबाबदार धरु नये अशी विनंती सामनेवाला क्र. 3 यांनी केली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता व उभयतांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
6. मुद्या क्रमांक 1 सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्र दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे. सामनेवाला क्र. 3 यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होऊन पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त झाल्याचे कथन केलेले आहे तथापी कोणताही पुरावा अगर कागदपत्रे सादर केलेली नाहीत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 3 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांच्या आदेश कलम 1 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं. 1 ते 3 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 ते 3 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1 ते 3 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( फ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव