ग्राहक तक्रार क्रमांकः-297/2009 तक्रार दाखल दिनांकः-27/04/2009 निकाल तारीखः-20/04/2010 कालावधीः-0वर्ष11महिने24दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे 1)श्री.सुरेश तुकाराम बने 2)श्रीमती शामा सुरेश बने दोघेही राहणार 6, पहिला मजला, श्री बिल्डींग,नांदीवली रोड,डोंबिवली(पू) ता.कल्याण जि.ठाणे. ...तक्रारदार नं.1 व 2 विरुध्द 1)दी मॅनेजर अँडमिनिस्ट्रेशन, तापी सहाकरी पतपेढी लि, चोपडा हेवींग हेड ऑफिस तापी भवन दंढी चौक,चोपडा जि.जळगाव. ...वि.प.1( एकतर्फा) 2)दी ब्रँच मॅनेजर, तापी सहकारी पतपेढी लि,डोंबिवली ब्रँच, लक्ष्मी सागर को.ऑप.हौसिंग सोसायटी, पोष्ट ऑफिस जवळ,फडके क्रॉस रोड, डोंबिवली(पू)ता.कल्याण जि.ठाणे. ... वि.प.2(एकतर्फा उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.आर.बी.लोखंडे विरुध्दपक्षः-गैरहजर(एकतर्फा) गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 2.श्री.पां.ना.शिरसाट , मा.सदस्य -एकतर्फा निकालपत्र - (पारित दिनांक-20/04/2010) सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहू तक्रार श्री.सुरेश बने व श्रीमती शामा बने यांनी मॅनेजर अँडमीनिस्ट्रेशन तापी सहकारी पतपेढी लि.चोपडा व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्दपक्षकाराकडे गुंतवलेले रुपये1,08,126/- व्याजासकट मागितले आहेत. 2/- 2)तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांच्या पतपेढीमध्ये एफ.डी.आर. नं.34/426 दिनांक27/09/2006 रोजी गुंतवलेले रुपये50,000/- व मॅच्युरिटी दिनांक27/12/2007 रोजी व्याजासकट मिळणारी रक्कम रुपये56,563/- तसेच एफडीआर नं.34/432 दिनांक04/08/2006 रोजी व्याजासकट मिळणा-या रकमेपैकी तक्रारदारास आत्तापर्यंत विरुध्दपक्षकार यांचेकडून रुपये5,000/- एवढया रकमेची पोच झाल्यामुळे आता त्यापैकी रुपये51,563/- एवढी रक्कम मिळणे बाकी राहीले आहे असे एकुण रुपये1,08,126/- एवढी रक्कम विरुध्दवक्षकार हे तक्रारदार यांस देणे लागातात व त्यासाठी ही तक्रार विरुध्दपक्षकार यांच्या सेवेतील त्रुटीसाठी दाखल केली आहे. 3)महाराष्ट्र सहकारी संस्था (पुणे) कलम72अन्वये व अधिनियम 1960 चे कलम79 प्रमाणे दिनांक07/11/2007 रोजी निर्देश जारी केले होते व त्यामध्ये समाविष्ट ठेवीदारांच्या दिनांक01नोव्हेंबर,2007 पर्यंत पुर्ण झालेल्या कालावधीनंतरच्या ठेवीदारांना बचतखाती वर्ग करुन रुपये5,000/- व रुपये10,000/- प्रमाणे दरमहा परत करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे हे मंच सदर निदेर्शावर अवलंबून राहून पुढील आदेश करीत आहे 4)विरुध्दपक्षकार यांना मंचाने नोटीस बजावूनही ते हजर नाहीत व त्यांनी त्यांची लेखी कैफियत दाखल केली नाही. म्हणून त्यांचेविरुध्द मंचाने दिनांक18/08/2009रोजी ''नो.डब्ल्यु.एस.'' आदेश करुन ''एकतर्फा'' चौकशी करुन पुढील एकतर्फा अंतिम आदेश हे मंच पारीत करत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 297/2009 ही अंशतः मंजूर करण्यात येत असून या तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षकार यांनी रुपये500/-(रुपये पांचशे फक्त)तक्रारदार यांस द्यावा. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदाराचे एफ.डी.आर.नं.34/426 मॅच्युरिटी दिनांक27/12/2007 चे रुपये56,563/- एवढी रक्कम या आदेशाची प्रत मिळाल्यापासून दरमहा रुपये10,000/- याप्रमाणे (रुपये दहा हजार फक्त)तक्रारदार यास पुर्णपणे देय रक्कम फिटेपर्यंत द्यावेत. 3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदारचे एफडीआर नं.34/432 याची मॅच्युरिटी तारीख04/10/2008 होती. त्याबद्दल विरुध्दपक्षकार यांनी अद्यापी रुपये51,563/- एवढी रक्कम देणे बाकी आहे. म्हणून सदर रक्कम या आदेशाची प्रत मिळाल्यापासून दरमहा रुपये 5,000/-(रुपये पांच हजार फक्त) 3/- प्रमाणे तक्रारदार यांस देऊन पुर्ण देय रक्कम फेडावी. 4)विरुध्दपक्षकार यांनी मानसिक त्रासाचे रुपये500/-(रुपये पांचशे फक्त)तक्रारदार यांस द्यावेत. 5)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-20/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|