ग्राहक तक्रार अर्ज क्र. 206/2011
दाखल दिनांक. 30/03/2011
अंतीम आदेश दि. 23 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
श्री. गोविंद रघुनाथ अंजोळकर, तक्रारदार
उ.व. सज्ञान,धंदा – सेवानिवृत्त, (अॅड.पंढरीनाथ बी.चोधरी)
रा.प्लॉट नं. 40/3, स्वामी समर्थ केंद्रमागे,
अयोध्यानगर, एम.आय.डी.सी. जळगांव,
विरुध्द
तापी सहकारी पतपेढी लि. चोपडा, सामनेवाला
मुख्य शाखा तापी भवन, (कोणीही नाही)
गांधी चौक, चोपडा, जि. जळगांव.
व इतर 3
निशाणी क्र. 01 वरील आदेश
मिलींद.सा.सोनवणे, अध्यक्ष – प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, तक्रारदार व त्यांचे वकील तक्रार दाखल केल्या नंतर व दि. 31/03/2011 रोजी नोटीस काढल्या नंतर सातत्याने गैरहजर आहेत. तक्रारदाराने सामनेवाल्यांवर नोटीस बजावणी साठी स्टेप्स घेतलेल्या नाहीत. त्या कामी नेमलेल्या प्रत्येक तारखांना ते सतत गैरहजर आहेत. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे वकीलांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्यांची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
दि. 23/01/2014 (श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव