अॅड निलेश भंडारी तक्रारदारांतर्फे
अॅड गोरख लामखेडे जाबदेणारांतर्फे
द्वारा- मा. श्री. मोहन पाटणकर, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 5/जुलै/2014
तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार जाबदेणार तापी सहकारी पतपेढी लि. यांच्या विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटीसंदर्भात दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
[1] जाबदेणार यांच्या आकर्षक व्याजदराच्या मुदतठेव योजनांवर विश्वास ठेवऊन तक्रारदारांनी जाबदेणार पतसंस्थेमध्ये दिनांक 4/10/2007 ते 28/7/2008 या कालावधीत एकूण रुपये 3,73,149/- च्या मुदतठेवी ठेवल्या होत्या. जाबदेणार यांच्या आश्वासनावर विसंबून तक्रारदारांनी जानेवारी 2009 पर्यन्त मुदतठेवी रिन्यू केल्या. तक्ररदारांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे तक्रारदारांनी मुदतठेवींची रक्कम जाबदेणार यांच्याकडून परत मागितली. परंतू जाबदेणार यांनी रक्कम परत केली नाही. अनेक वेळा विनंती केल्यानंतर जाबदेणार यांनी दिनांक 29/10/2010 रोजी रुपये 10,000/- तक्रारदारांना अदा केले. त्यानंतर पाच महिन्यांच्या कालावधीनंतर दिनांक 23/3/2011 रोजी रुपये 10,000/- अदा केले. परंतू उर्वरित रक्कम मागूनही परत केली नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार दाखल करुन जाबदेणार यांच्याकडून मुदतठेवींची उर्वरित रक्कम रुपये 3,48,222/- द.सा.द.शे 15 टक्के व्याजासह मिळावेत, तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- व नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
[2] जाबदेणार यांनी अर्ज दाखल करुन तक्रारदारांना चेकद्वारे रक्कम रुपये 4,18,222/- अदा केलेली असल्यामुळे तक्रार निकाली काढण्यात यावी अशी विनंती केली.
[3] तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल करुन जाबदेणार यांच्याकडून तक्रार दाखल करण्यापूर्वी रुपये 70,000/- मिळाल्याचे व मा. मंचासमोर रुपये 3,48,222/- मिळाल्याचे मान्य केलेले आहे. परंतू मॅच्युरिटी दिनांकानंतरही जाबदेणार यांनी रक्कम परत न केल्यामुळे तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 3,48,222/- वर द.सा.द.शे 18 टक्के व्याज दिनांक 23/1/2009 पासून मागतात. तसेच नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्चही मागतात.
[4] तक्रारदारांच्या मागणीस जाबदेणार यांनी दिनांक 1/2/2014 रोजी म्हणणे दाखल करुन विरोध दर्शविला.
[5] उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे, शपथपत्रांचे अवलोकन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित करण्यात येतात. सदरहू मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | तक्रारदार मॅच्युरिटी रकमेवर व्याज मिळण्यास पात्र आहेत काय | होय |
2 | अंतिम आदेश काय | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
[6] तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल करुन जाबदेणार यांच्याकडून तक्रार दाखल करण्यापूर्वी रुपये 70,000/- मिळाल्याचे व मा. मंचासमोर रुपये 3,48,222/- मिळाल्याचे मान्य केलेले आहे. परंतू मॅच्युरिटीची रक्कम मागणी करुनही जाबदेणार यांनी अदा केलेली नाही, प्रस्तूतची तक्रार मा. मंचासमोर दाखल केल्यानंतर अदा केलेली आहे, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. सबब जाबदेणार हे मॅच्युरिटी रक्कम रुपये 4,18,222/- वर दिनांक 23/1/2009 पासून बचतठेव खात्याच्या व्याजदराने व्याज देण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळून एकत्रित रक्कम रुपये 2000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांची मुदतठेवीची रक्कम मॅच्युरिटी दिनांकानंतरही
परत न करुन सेवेतील त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी रक्कम रुपये 4,18,222/- वर दिनांक 23/1/2009 पासून बचतठेव खात्याच्या व्याजदराने व्याजाची रक्कम आदेशाच्या तारखेपर्यन्तच्या कालावधीसाठी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत तक्रारदारांना अदा करावे.
4. जाबदेणार यांनी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळून एकत्रित रक्कम रुपये 2000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत तक्रारदारांना अदा करावी.
5. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यांच्या आत घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ-पुणे
दिनांक-5/7/2014