Maharashtra

Pune

CC/13/575

Ashok Dhanaji Shivale, - Complainant(s)

Versus

Tapi Co-Operative Patapedhi Ltd., - Opp.Party(s)

01 Jul 2014

ORDER

PUNE DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
PUNE
Shri V. P. Utpat, PRESIDENT
Shri M. N. Patankar, MEMBER
Smt. K. B. Kulkarni, MEMBER
 
Complaint Case No. CC/13/575
 
1. Ashok Dhanaji Shivale,
R/o S.No.278/5, 15 Number, Nr. Vitthal Nagar Grampanchayat Hadapsar, Pune-411 028.
...........Complainant(s)
Versus
1. Tapi Co-Operative Patapedhi Ltd.,
At 87/04, Kalamalati Bldg., Azad Nagar, Om Trimurti Colony, Kothrud, Pune-411 038, Head Office at Tapi Bhavan, Gandhi Chowk, At post Chopada, Dist. Jalgaon-425 107, Through its Chairman, Dr. Suresh P. Borole.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'BLE MR. MOHAN PATANKAR MEMBER
 HON'ABLE MRS. Kshitija Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

अॅड निलेश भंडारी तक्रारदारांतर्फे

जाबदेणारांतर्फे प्रतिनिधी

 

 

द्वारा- मा. श्री. मोहन पाटणकर, सदस्‍य

  :- निकालपत्र :-

      दिनांक 1/जुलै/2014

            तक्रारदारांनी प्रस्‍तूतची तक्रार जाबदेणार तापी सहकारी पतपेढी लि. यांच्‍या विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटीसंदर्भात दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्‍यात खालील प्रमाणे-

1.           तक्रारदारांनी जाबदेणार पतसंस्‍थेमध्‍ये रक्‍कम रुपये 30,000/- मिडीअम टर्म डिपॉझिट म्‍हणून दिनांक 17/8/2007 रोजी 13 महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी द.सा.द.शे 11 टक्‍के व्‍याजाने ठेवले होते. मुदतीअंती तक्रारदारांना रक्‍कम रुपये 33,575/- मिळणार होती. मुदतीअंती म्‍हणजेच दिनांक 17/9/2008 रोजी तक्रारदारांनी मॅच्‍युरिटी रक्‍कम रुपये 33,575/- ची मागणी जाबदेणार यांच्‍याकडे केली परंतू जाबदेणार यांनी त्‍यास दाद दिली नाही. दिनांक 10/11/2010 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्‍कम रुपये 10,000/- चेकद्वारे अदा केली, परंतू उर्वरित रक्‍कम वारंवार मागूनही जाबदेणार अदा केली नाही. म्‍हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याविरुध्‍द प्रस्‍तूतची तक्रार दाखल करुन उर्वरित रक्‍कम रुपये 23,575/- व्‍याजासह परत मागतात. तसेच नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- मागतात.   

2.          जाबदेणार यांना मंचाची नोटीस बजावण्‍यात आल्‍यानंतर दिनांक 22/1/2014 रोजी जाबदेणार यांनी अर्ज दाखल करुन लेखी जबाब दाखल करण्‍यासाठी मुदतवाढ मागितली. परंतू संधी देऊनही लेखी जबाब दाखल केला नाही. जाबदेणार यांनी दिनांक 22/1/2014 रोजीच्‍या अर्जामध्‍ये तक्रारदारांना उर्वरित रक्‍कम रुपये 23,575/- देण्‍यास तयार असल्‍याचे नमूद केले आहे. अर्जासोबत तक्रारदारांच्‍या नावे असलेला रक्‍कम रुपये 23,575/- दिनांक 17/1/2014 रोजीचा अॅक्सिस बँकेवर काढलेल्‍या चेकची प्रतही दाखल केली.

3.          उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे, शपथपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित करण्‍यात येतात. सदरहू मुद्ये, त्‍यावरील निष्‍कर्ष व कारणे खालील प्रमाणे-

 

अ.क्र 

मुद्ये  

निष्‍कर्ष

1    

तक्रारदार मॅच्‍युरिटी रकमेवर व्‍याज  मिळण्‍यास पात्र आहेत काय

होय  

2    

अंतिम आदेश काय  

तक्रार अंशत: मंजूर

 

कारणे-

मुद्या क्र 1 व 2-

4.          तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍येच दिनांक 10/11/2010 रोजी जाबदेणार  यांनी रक्‍कम रुपये 10,000/- चेकद्वारे अदा केल्‍याचे नमूद केले आहे. दिनांक 22/1/2014 रोजीच्‍या रोजनाम्‍याचे अवलोकन केले असता एक बाब स्‍पष्‍ट होते की, जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्‍कम रुपये 23,575/- चा चेक अदा केलेला आहे. सबब तक्रारदारांना मॅच्‍युरिटीची संपूर्ण रक्‍कम मिळालेली आहे. परंतू जाबदेणार यांनी मॅच्‍युरिटीची रक्‍कम रुपये 33,575/- मॅच्‍युरिटी दिनांक 17/9/2008 रोजी तक्रारदारांना त्‍यांनी मागणी करुनही अदा केलेली नाही. ही जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. सबब जाबदेणार हे मॅच्‍युरिटी रक्‍कम रुपये 33,575/-वर बचतठेव खात्‍याच्‍या व्‍याजदराने व्‍याज मॅच्‍युरिटी दिनांकापासून देण्‍यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळून एकत्रित रक्‍कम रुपये 2000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.

 

            वरील विवेचनावरुन मुद्यांचे निष्‍कर्ष काढण्‍यात येऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे-

                       

                                                      :- आदेश :-

      1.     तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.

      2.    जाबदेणार यांनी तक्रारदारांची मुदतठेवीची रक्‍कम मॅच्‍युरिटी दिनांकानंतरही

परत न करुन सेवेतील त्रुटी निर्माण केली आहे  असे जाहिर करण्‍यात येत आहे.

3.    जाबदेणार यांनी मॅच्‍युरिटी रक्‍कम रुपये 33,575/-वर बचतठेव खात्‍याच्‍या व्‍याजदराने व्‍याज मॅच्‍युरिटी दिनांक 17/9/2008 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यन्‍त आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत तक्रारदारांना अदा करावी.

4.    जाबदेणार यांनी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळून एकत्रित रक्‍कम रुपये 2000/- आदेशाची प्रत  प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत तक्रारदारांना अदा करावी.

5.    उभय पक्षकारांनी मा. सदस्‍यांसाठी दिलेले संच आदेशाच्‍या दिनांकापासून एका महिन्‍यांच्‍या आत घेऊन जावेत, अन्‍यथा संच नष्‍ट करण्‍यात येतील.

       आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्‍क पाठविण्‍यात यावी.

स्‍थळ-पुणे

दिनांक-1/7/2014

 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. MOHAN PATANKAR]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Kshitija Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.