(घोषित दिनांक 13/01/2011 द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष गैरअर्जदारांनी अंगठी बाबत फसवणूक केल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदाराने दिनांक 26/7/2009 रोजी गैरअर्जदार तनिष्क, निराला बाजार, औरंगाबाद यांच्याकडून रक्कम रु 33,620/- किंमतीचे एक सोन्याचे नेकलेस व त्यासोबत ईअररिंग सेट खरेदी केला होता. सदर ईयररिंग व नेकलेस खरेदी संदर्भात गैरअर्जदार क्रमांक 1 तनिष्क यांनी दिलेल्या बिलामध्ये नेकलेस व ईयररिंगमधील स्टोनची किंमत व दर्जा नमूद केलेला नव्हता. सदर नेकलेस व ईयररिंग कांही घरगुती कारणाने विक्री करण्यासाठी तक्रारदाराने परत गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे नेला असता त्यांनी ईयररिंग व नेकलेसची किंमत अत्यंत कमी सांगितली त्यावरुन गैरअर्जदारांनी तक्रारदाराची फसवणूक केल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. गैरअर्जदारांनी नेकलेस व ईयररिंग बाबत दिलेल्या अधिकृततेच्या प्रमाणपत्रामध्ये डायमंडची क्वॉलिटी, रंग, क्लिअरीटी तसेच वजन व किंमती बाबत कांहीही उल्लेख केला नव्हता. गैरअर्जदारांनी अशा प्रकारे फसवणूक केली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, दागिन्याची खरेदी किंमत रु 33,620/-, तक्रारीचा खर्च रु 2,000/-, मानसिक त्रासापोटी रु 5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तनिष्क यांनी लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्यांच्याकडून दिनांक 26/7/2009 रोजी नेकलेस आणि ईयररिंग खरेदी केल्यानंतर ती पुन्हा कोणत्याही कारणासाठी त्यांच्याकडे परत आली नाही. तक्रारदाराने नेकलेस आणि ईयररिंग खरेदी केले त्यावेळीच सदर दागिन्याचा दर्जा आणि इतर बाबीबाबत तिने खात्री करुन घेतली होती. तक्रारदाराने तोच दागिना जर खरेदी केल्यानंतर सात दिवसांच्या आत परत आणला असता तर तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण करता आले असते. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेले नेकलेस आणि ईयररिंगमध्ये डायमंड नसून त्यामध्ये पाचुचा खडा आहे. त्यामुळे तक्रारदाराला देण्यात आलेल्या पावतीमध्ये डायमंडचा दर्जा आणि किंमती बाबत उल्लेख करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेला दागिना परत खरेदी करावा किंवा नाही हा पूर्णत: गैरअर्जदारांचा अधिकार असून तक्रारदाराची कोणतीही फसवणूक करण्यात आलेली नसून तक्रारदाराने ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे. म्हणून ही तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्हीही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. तक्रारदार हे सिध्द करु शकते का की, गैरअर्जदारांनी नाही नेकलेस व ईयररिंग बाबत तिची फसवणूक केली आहे? 2. गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी आहे काय? नाही. 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 :- दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड राहूल जोशी व गैरअर्जदारांच्या वतीने अड एस.पी.जोशी यांनी युक्तिवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 26/7/2009 रोजी खरेदी केलेले नेकलेस आणि ईयर रिंगमध्ये बसवलेल्या खडयाबाबत गैरअर्जदारांनी फसवणूक केल्याचे सिध्द करण्यास तक्रारदार असमर्थ ठरलेली आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले नेकलेस व ईयररिंग मंचासमोर सादर केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी नेकलेस व ईयर रिंगमध्ये बसवलेला खडा हा हिरा आहे किंवा नाही हे कळू शकत नाही. तक्रारीमध्ये तक्रारदाराने फसवणूकीबाबत संदीग्ध आरोप केलेले आहेत. गैरअर्जदारांनी नेकलेस आणि ईयर रिंगमध्ये बसवलेला खडा हिरा असल्याचे सांगितल्या बाबत तक्रारदाराने तक्रारीमध्ये कोणताही आरोप केलेला नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदाराला विक्री केलेला नेकलेस आणि ईयररिंगमधील खडा हा हिरा नसून पाचू असल्याचे गैरअर्जदारांचे म्हणणे आहे . अशा परिस्थितीत तक्रारदाराने नेकलेस व ईयररिंग मंचासमोर सादर करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने मंचासमोर नेकलेस व ईयर रिंग सादर केले नाही व त्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारदाराची फसवणूक केल्याचे सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात येते. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च संबंधीतांनी आपआपला सोसावा. 3. संबंधीतांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |