(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाले क्र.1 ते 14 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या मुदतठेवींची एकूण रक्कम रु.5,08,596/- मिळावी व या रकमेवर द.सा.द.शे.7%
तक्रार क्र.166/2011
दराने व्याजाची आकारणी होवून निर्धारीत व्याजासह मिळावी. मिळावी, या रकमेवर अर्जाचा निकाल होईपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याज आकारणी होवून संपुर्ण रक्कम मिळवी. नुकसान भरपाई पोटी रु.20,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाले क्र.12 यांनी याकामी पान क्र.40 लगत लेखी म्हणणे, सामनेवाला क्र.1 ते 11 व 13 यांनी पान क्र.50 लगत लेखी म्हणणे व सामनेवाला क्र.14 यांनी पान क्र.51 लगत लेखी म्हणणे, पान क्र.52 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे
काय?-- होय. फक्त सामनेवाले क्र.14 यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.
3. अर्जदार हे सामनेवाले क्र.14 यांचेकडून ठेवपावतीवरील रक्कम व्याजासह वसूल
होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय
4. अर्जदार हे सामनेवाले क्र.14 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय ---होय
5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.14 यांचेविरुध्द अंशतः
मंजूर करणेत येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 13
यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांचेवतीने अँड.श्रीमती आर.आर.महाजन यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांनी पान क्र.61 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
अर्जदार यांनी याकामी पान क्र.55,पान क्र.55 अ ते पान क्र.58 लगत एकूण 5 मुळ अस्सल ठेवपावत्या दाखल केलेल्या आहेत. पान क्र.55,पान क्र.55 अ ते पान क्र.58 लगतच्या ठेवपावत्या सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेल्या नाहीत. पान क्र.55,पान क्र.55 अ ते पान क्र.58 लगतच्या ठेवपावत्यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रार क्र.166/2011
अर्जदार यांनी याकामी सामनेवाले क्र.1 हे संस्थेचे विद्यमान चेअरमन व सामनेवाला क्र.2 हे संस्थापक चेअरमन म्हणून व सामनेवाला नं.13 यांना प्रभारी व्यवस्थापक म्हणून सामील केलेले आहे. परंतु प्रस्तुत तक्रार अर्जाचे कामी सामनेवाले क्र.1 ते 13 यांना महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 88 नुसार जबाबदार धरलेले आहे व तसा अहवाल तयार झालेला आहे याबाबत कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल नाहीत. याचा विचार होता मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचेसमोरील रिट पिटीशन क्र. 5223/2009 निकाल तारीख 22/12/2010 सौ. वर्षा रविंद्र इसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी या निकालपत्रामधील अंतीम आदेश व विवेचनाचा विचार करता प्रस्तुत तक्रार अर्जाचेकामी सामनेवाले क्र.1 ते 13 यांना संस्थेचे कारभाराबाबत व अर्जदार यांचे देय रकमेबाबत वैयक्तीकरित्या जबाबदार धरता येत नाही असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.13 हे प्रभारी व्यवस्थापक आहेत. ते पतसंस्थेत नोकरीस आहेत. त्यांचेवर ठेवी परत करण्याची जबाबदारी येत नसल्यामुळे सामनेवाला नं.13 यांना या कामी जबाबदार धरता येत नाही
सामनेवाला क्र.14 पतसंस्था यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “पतसंस्थेवर दि.5/4/2011 रोजी प्रशासकाची नेमणूक झालेली आहे. पतसंस्थेकडून वसुलीची कार्यवाही चालु आहे. वसुली झाल्यानंतर Priority of claims ठरवून सहकार कायद्यातील तरतुदीनुसार ठेवी परत केल्या जातील. तक्रार फेटाळण्यात यावी.” असे म्हटलेले आहे.
परंतु सामनेवाला पतसंस्थेने वर नमूद केल्याप्रमाणे म्हटले असले तरी सामनेवाला यांनी किती वसुली केली व वसूल रकमेतून किती ठेवीदारांना ठेवीच्या रकमा अदा केल्या याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचात सादर केलेला नाही. सामनेवाला क्र.14 यांनी पतसंस्थेच्या कर्जदारांचेकडून कर्जाऊ रक्कम वसूल करुन त्यामधून ठेवीदारांची रक्कम परत करणे कायद्याने गरजेचे असते व त्याकरीताच त्यांची नेमणूक करण्यात आलेली असते. परंतु अशाप्रकारे सामनेवाला क्र.14 यांनी अर्जदार यांना किती रक्कम परत केली याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. वरील सर्व कारणाचा विचार होता सामनेवाला क्र.14 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.55,पान क्र.55 अ ते पान क्र.58 चे ठेवपावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.14 पतसंस्था व प्रशासक यांचेकडून पान क्र.55,पान क्र.55 अ ते पान क्र.58 चे ठेवपावतीवरील संपुर्ण रक्कम व्याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रार क्र.166/2011
सामनेवाले यांचेकडून रक्कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार क्र.14 पतसंस्था व प्रशासक यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे अर्जदार यांचेतर्फे वकिलांचा युक्तीवाद, सामनेवाला यांचा लेखी युक्तीवाद व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 13 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.14 पतसंस्था व प्रशासक विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाले पतसंस्था क्र.14 व प्रशासक यांनी पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यातः
3.अ) ठेवपावती क्र.001141 वरील रक्कम रु.75,084/-दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.11/3/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के दराने व्याज द्यावे.
3.ब) ठेवपावती क्र.001145 वरील रक्कम रु.91,355/-दयावेत. तसेच सदर
मंजूर रकमेवर दि.17/3/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.7
टक्के दराने व्याज द्यावे.
3.क) ठेवपावती क्र.001146 वरील रक्कम रु.74,042/-दयावेत. तसेच सदर
मंजूर रकमेवर दि.17/3/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.7
टक्के दराने व्याज द्यावे.
3.ड) ठेवपावती क्र.001147 वरील रक्कम रु.93,958/-दयावेत. तसेच सदर
मंजूर रकमेवर दि.17/3/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.7
टक्के दराने व्याज द्यावे.
3.इ) ठेवपावती क्र.001148 वरील रक्कम रु.1,74,157/-दयावेत. तसेच सदर
मंजूर रकमेवर दि.17/3/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.7
तक्रार क्र.166/2011
टक्के दराने व्याज द्यावे.
4) वर कलम 3 अ ते 3 इ मधील ठेवपावतीचे मुद्दल किंवा व्याज यापैकी काही रक्कम यापुर्वी सामनेवाला यांनी अर्जदार यांना अदा केली असल्यास त्याची वजावट वर कलम 3 अ ते 3 इ मधील रकमेमधून करण्यात यावी.
5) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाले पतसंस्था क्र.14 व प्रशासक यांनी मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- दयावेत.
6) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाले पतसंस्था क्र.14 व प्रशासक यांनी अर्जाचे खर्चापोटी रु.1000/दयावेत.