तक्रारदार - स्वतः
सामनेवाले - विनाकैफीयत.
आदेश - मा. श्री. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
निकालपत्र
(दिनांक 06/05/2016 रोजी घोषित)
तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे जिमखान्यामध्ये आपल्या मुलाला प्रवेश देण्या करिता परत मिळणारी ठेव म्हणून रु.20,000/- भरले होते व एक वर्षानंतर ते परत मिळणार होते. परंतु सामनेवाले यांनी ती ठेव परत न केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदारांनी ठेवीची रक्कम व्याजासह व मानसिक व शारिरीक त्रासासाठी व तक्रारीच्या खर्चासह परत मागितली आहे. मंचाची नोटीस सामनेवाले यांना दि.24.01.2015 ला प्राप्त झाली होती व त्याबाबत संचिकेत पोस्टाची पावती, ट्रॅक रिपोर्ट दाखल केला आहे. परंतु सामनेवाले हे मंचात उपस्थित झाले नाहीत व आपली लेखी कैफीयत दाखल केली नाही. सबब, प्रकरण त्यांच्या विरुध्द दि.01.08.2015 च्या आदेशा प्रमाणे विनाकैफीयत चालविण्यात येत आहे.
2. तक्रारदारानुसार सामनेवाले यांची चारकोप येथे शाखा आहे व त्यांचा मुलगा अभिषेक वय-17 वर्षे याला जिमखान्यामध्ये प्रवेशासाठी त्यांनी दि.26.03.2013 ला रु.20,000/- भरले ही रक्कम एक वर्षानंतर तक्रारदारांना परत मिळणार होती. तक्रारदारांनी त्याप्रमाणे दि.09.03.2014 ला अर्ज केला असता, सामनेवाले यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही किंवा योग्य प्रतिसाद दिला नाही. सबब, तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली. त्या सोबत सामनेवाले यांचे सेवाशर्ती व रु.20,000/- भरल्या बाबतची पावती दाखल केली.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला.
4. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन हे सिध्द होते की, त्यांनी सामनेवाले यांच्याकडे आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी दि.26.03.2013 रु.20,000/- भरले होते. सामनेवाले यांच्या सेवाशर्ती क्र.5 व 10 प्रमाणे ही जमा केलेली रक्कम एक वर्षानंतर तक्रारदारांना देय होती. तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे. तो अमान्य करण्या करिता कोणतीही कायदेशीर अडचण नाही. ठेव म्हणून स्विकारलेली रक्कम सामनेवाले यांनी सेवाशर्ती प्रमाणे परत न करुन, सेवा देण्यात कसूर केल्याचे स्पष्ट होते.
5. तक्रारदारांनी सामनेवाले यांना रक्कम परत करण्या करिता दि.09.06.2014 ला पत्र दिले व ते त्यांना, त्याच दिवशी प्राप्त झाल्याचे दिसून येते. परंतु सामनेवाले यांचे काही उत्तर आल्याचे संचिकेवरुन दिसून येत नाही.
6. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
7. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापुर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 478/2014 बहुतांशी मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना ठेव म्हणून स्विकारलेली रक्कम रु.20,000/- (रुपये वीसहजार), दि.01.06.2014 पासून द.सा.द.शे.10 टक्के व्याजासह दि.30.06.2016 पर्यंत अदा करावी.
4. सामनेवाले यांनी मानसिक व शारिरीक त्रासासाठी रु.3,000/- (रुपये तीन हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- (रुपये दोन हजार) तक्रारदार यांना दि.30.06.2016 पर्यंत अदा करावे.
5. उपरोक्त क्लॉज 3 व 4 मधील आदेशीत रक्कम दि.30.06.2016 पर्यंत अदा न केल्यास, त्या रक्कमेवर दि.01.07.2016 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याज लागू राहील.
6. आदेशाची प्रत उभयपक्षांना निःशुल्क देण्यात/पाठविण्यात यावी.
7. अतिरीक्त संच तक्रारदारांना परत करावे.
db/-