Maharashtra

Latur

CC/12/155

Smt.Kusum Shivaji Awale - Complainant(s)

Versus

Talukha Krushi Adhikari - Opp.Party(s)

A.P.Mekhale

16 Apr 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES RESDRESSAL FORUM LATUR
NEAR Z.P. GATE LATUR
LATUR 413512
 
Complaint Case No. CC/12/155
 
1. Smt.Kusum Shivaji Awale
R/o.Rachannawadi,Tq.Cakur
Latur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Talukha Krushi Adhikari
Krushi Adhikari Karylaya,Cakur Tq.Cakur
Latur
Maharashtra
2. Dist.Supted. Krushi Adhikari
Latur
Latur
Maharashtra
3. Deccon Insurnce &Rinsurance Brokers Pvt.Ltd.
Office No.13, 3rd floor Saghvinagar,Prhar chowk, Aundh, Pune411007
Pune
Maharashtra
4. The New India Assurance Co.Ltd.
Office 153400, 1st floor, Swatantya veer Sawarkar Udoyog Bhavan,Shivaji nagar, Pune-411005.
Pune
Maharashtra
5. The New India Assurance Co. Ltd.
Office GayatriKrupa,Chandrnagar,Near Shahu College, Latur-413512
Latur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt A.G.Satpute PRESIDENT
 HON'BLE MR. Ajay Bhosrekar MEMBER
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 
For the Complainant:A.P.Mekhale, Advocate
For the Opp. Party: DIWAN S G, Advocate
ORDER

निकालपत्र

(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्‍यक्षा )

     अर्जदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्‍द दाखल केली आहे.   

       अर्जदार श्रीमती कुसुम शिवाजी आवाळे रा. राचन्‍नावाडी ता. चाकुर जि. लातुर येथील रहिवाशी असून शिवाजी आवळे यांची कायदेशीर पत्‍नी आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी जनता अपघात विमा अंतर्गत सदर शेतक-याची विमा पॉलिसी गैरअर्जदार क्र. 3 ते 5 यांच्‍याकडे काढलेली आहे. व गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे शेतक-यांच्‍या विमा पॉलीसी बाबत सेवा पुरवितात. मयत शिवाजी मल्‍हारी आवाळे यास मौजे राचन्‍नावाडी येथे गट क्र. 14/1/1 क्षेत्रफळ 0 हेक्‍टर 80 आर, गट क्र. 40/2 क्षेत्रफळ 1 हेक्‍टर 1 आर एवढी जमीन आहे. दि. 31/01/11 रोजी प्रल्‍हाद सुळे व शिवाजी आवाळे दोघेजण मोटार सायकल क्र.  एम.एच. 04 /आरएफ - 245 वरुन खाजगी कामानिमित्‍त उदगीर येथे गेले होते. उदगीरचे काम संपवून ते मोटारसायकलने परत हंडरगुळीकडे निघाले होते. त्‍यांची मोटारसायकल सायंकाळी 7 वाजता उदगीर ते अहमदपुर जाणा-या डांबरी रोडवर बालाजी जनरल बुक स्‍टॉलच्‍या समोर आली असता उदगीरहून अहमदपुरकडे जाणारा माल ट्रक ज्‍याचा क्र. एम. एच 04 / पी - 6131 च्‍या चालकाने त्‍याच्‍या ताब्‍यातील ट्रक हयगयीने व निष्‍काळजीपणाने चालवून मोटारसायकलला जोराची धडक दिली. सदर अपघातामुळे मेाटारसायकलवरील प्रल्‍हाद सुळे व शिवाजी आवाळे दोघाना गंभीर मार लागला त्‍यांना उपचारासाठी उदगीर येथे दाखल केले असता तेथील डॉ. नी दोघांचा मृत्‍यू झाल्‍याचे सांगितले सदर घटनेचा जबाब अरविंद सुळे यांनी पोलीस स्‍टेशन वाढवणा मोहन हाके विरुध्‍द गु.र.नं 04/11 कलम 279,304 (अ) सदरचा अपघात हा गैरअर्जदार क्र. 4 च्‍या विमा योजने अंतर्गतचा दि. 15/08/2010 ते 14/08/2011 या कालावधीचा आहे. गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदाराचा अर्ज दि. 21/09/2011 रोजी पत्र पाठवून विमा धारक मयत शिवाजी आवाळे यांचा वैध वाहन चालक परवाना न दिल्‍यामुळे हा दावा बंद करीत आहोत. शिवाजी आवाळे यांचा वैध वाहन चालक परवान्‍या बरोबर फाईल पुन्‍हा उघडण्‍यासाठी पुन्‍हा पाठवून देणे गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी अर्जदारास कळविलेले आहे. मयत शिवाजी आवाळे यांचा मृत्‍यू ट्रक चालकाच्‍या चुकीमुळे झालेला असून त्‍यात मोटार सायकल चालकाची काही चुक नाही. म्‍हणून गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. म्‍हणून अर्जदारास रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 12 टक्‍के दराने व्‍याज दयावे . मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्‍याचा खर्च रु. 7,000/- देण्‍यात यावा.

      तक्रारदाराने तक्रारी सोबत फेरफार नक्‍कल 6 ‘ड’ ची नक्‍कल, अरविंद सुळेचा जबाब/फिर्याद, मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर, घटनास्‍थळ पंचनामा, सकाळ पेपरचे कात्रण, दोषारोप/अंतिम अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, गाव नमुना 6 ‘क’, धारण जमीनीचे नोंदवही नमुना नं. 8 ‘अ’, 7/12 (दोन प्रती), तलाठी प्रमाणपत्र, क्‍लेम फॉर्म भाग – 1, न्‍यु इंडिया इंन्‍शुरन्‍स कं. चे दावा बंद करणे बाबतचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.   

      गैरअर्जदार क्र. 1 ने दि. 03/12/2012 रोजी आपले म्‍हणणे दाखल केले असून अर्जदाराचा प्रस्‍ताव हा ड्राव्‍हींग लायसन व सहा ‘ड’ च्‍या त्रुटी बाबत कार्यालयास कळविले. त्रुटीची पुर्तता करुन कार्यालयाने जा.क्र.15/60/ दि. 18/11/12 अन्‍वये मा. जिल्‍हा कृषी अधिक्षक लातुर यांच्‍याकडे कार्यवाहीस्‍तव सादर केला होता.

      गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार अर्जदाराच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍याबाबत व तो शेतकरी असून मोटार अपघातात मृत्‍यू झालेला आहे. त्‍यामुळे त्‍याने  वाहन परवाना देणे वाहन परवाना न देता गाडी चालवत असेल तर तो विमा पॉलीसीच्‍या अटी  व शर्तीचा भंग करीत आहे. म्‍हणून अर्जदाराचा  विमा दावा फेटाळण्‍यात आलेला आहे. गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही.

          मुद्दे                                               उत्‍तरे 

  1.  अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?             होय
  2. गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या सेवेत त्रूटी केली आहे काय ?      होय 
  3. अर्जदार अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे काय ?                    होय
  4. काय आदेश ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे

     मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. त्‍याने शेतकरी जनता अपघात विम्‍या अंतर्गत त्‍याची विमा पॉलीसी असून शेतकरी म्‍हणून त्‍याला मौजे राचन्‍नावाडी येथे गट क्र. 14/1 मध्‍ये 2 हेक्‍टर 5 आर जमीन तसेच गट क्र. 40/2 मध्‍ये 2 हेक्‍टर 20 आर एवढी जमीन दिसुन येते. यावरुन तो ग्राहक आहे हे सिध्‍द हेाते.

      मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होय असून दि. 31/01/11 रोजी संध्‍याकाळी अरविंद सुळे हे कामावरुन परत येत असताना फायनान्‍स कार्यालयाजवळ रोडच्‍या पलीकडे एक माल ट्रक उदगीरकडुन अहमदपुरकडे जात असताना एका मोटार सायकलला धडक दिल्‍याने माल ट्रकच्‍या समोरुन किनर साईडने पडलेली दिसते व टायरच्‍या बाजुने एक व टपाच्‍या बाजूने एक पडल्‍याचे दिसते. त्‍यावर माझे चुलत आजोबा व प्रल्‍हाद सुळे व पुढील चालकाच्‍या बाजुकडील टायर गेलेले ते डोक्‍यास मार लागुन तसेच त्‍यांचे मेव्‍हुणे शिवाजी आवाळे हे पण पडलेले दिसले. त्‍यांना जमलेल्‍या लोकांनी एका जीप व मिनीडोअर मध्‍ये घालून उदगीर येथे दवाखान्‍यात दाखल केले एम एच. 04 / पी - 6131 च्‍या चालकाने माल ट्रक निष्‍काळजीपणाने भरधाव वेगात चालवून गंभीर जखमी केले आहे. मयताच्‍या शवविच्‍छेदन अहवालावर death Due to Multiple injuries असे लिहिलेले आहे.  यावरुन अर्जदाराचे पती हे सदर केसमध्‍ये आरोपी नाहीत. म्‍हणून मयताचा मृत्‍यू हा अपघाती झालेला दिसुन येतो. गैरअर्जदाराने अर्जदारास विमा रक्‍कम न देवून त्‍याच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सदर केसमध्‍ये आरोपी हा मोहन हाके आहे. शेतकरी जनता अपघात विम्‍याच्‍या दोषी व्‍यक्‍त्‍ी वाहन चालक नसेल तर त्‍याचा शेतकरी जनता अपघात विमा देण्‍यास काही हरकत नाही असे परिच्‍छेद क्र. 6 मध्‍ये असे महाराष्‍ट्र शासनाच्‍या परीपत्रकात नमुद केले आहे. तसेच मा. राज्‍य आयोग मुंबई 2008 (2) All MR (J0URNAL) 13

ICICI Lombard General Insurance Co.Ltd.

             v/s

smt. Sindhubai khanderao khainar   दि. 07/01/2008  न्‍याय निर्णयात In fact driving license is not necessary. From the perusal of the F.I.R it is revealed that one Hundai car gave dash to the motor cycle from Hundai car gave dash to the motor cycle from behind, which was driven by the deceased. In the said accident shri. Khanderao Krishna Khairnar sustained serious head injury and ultimately succumbed to the head injury and ultimately succumbed to the head injury in civil hospital on 07/06/05 He was not at the fault, He did not attribute for the commission of an accident. Therefore, driving license is not at all necessary to settle the insurance claim. In case of an accident on the road, information report spot panchanama, inquiry report and post-mortem report are required as pre the scheme. In fact, these documents were submitted to the insurance company म्‍हणून हे न्‍यायमंच अर्जदाराचा सदरचा अर्ज मंजुर करत आहे. अर्जदारास रु. 1,00,000/-, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु. 2,000/- गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी दयावेत.

सबब हे न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.

आदेश

1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्‍यात येत आहे.

2) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्‍यात येतो की, अर्जदारास रक्‍कम            

   रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख रुपये फक्‍त) आदेशाची प्रत प्राप्‍तीपासुन 30  

   दिवसाच्‍या आत देण्‍यात यावेत.

3) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्‍यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत

   न  केल्‍यास तक्रार दाखल तारखेपासुन त्‍यावर द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज

   देण्‍यास जबाबदार राहतील.

4) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्‍यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक

   त्रासापोटी रु. 3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु. 2,000/-

   (अक्षरी दोन हजार रुपये फक्‍त) आदेशाची प्रत प्राप्‍तीपासुन 30 दिवसाच्‍या आत

   देण्‍यात यावेत.

 
 
[HON'BLE MRS. Smt A.G.Satpute]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Ajay Bhosrekar]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.