तक्रारदारातर्फे :- अँड.विशाल वडमारे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता सदर शेतकरी भारत आण्णा मुंडे यांचा मृत्यू दि.18.2.2010 रोजी झालेला आहे. सदरचा प्रस्ताव शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दि.17.8.2010 पूर्वी किंवा पर्यत पाठविणे आवश्यक होते. सदरचा प्रस्ताव तक्रारदारांनी तालूका कृषी अधिकारी कार्यालयात दि.16.8.2011 रोजी सादर केलेला असल्याने तो मुदतीत नसल्याने तालूका कृषी अधिकारी धारुर यांनी दि.17.8.2011 रोजीच्या पत्रान्वये सदरचा प्रस्ताव हा तक्रारदारांना परत पाठविला आहे. या संदर्भात तक्रारदारांनी सदरचे पत्र तक्रारीत दाखल केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार वेळेवर मुदतीत प्रस्ताव अर्ज संबंधीत कार्यालयाकडे सादर होणे आवश्यक आहे. मुदतीचे कारणावरुन सदरचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांचे स्तरावरुन नाकारला गेला आहे. या संदर्भात तक्रार टेनेबल कशी ? या बाबत प्राथमिक मुददा काढण्यात आला. त्यांचा यूक्तीवाद दि.8.2.2012 रोजी ठेवण्यात आलेला होता. तक्रारदाराचे विद्वान वकील श्री. वडमारे यांनी युक्तीवादासाठी वेळोवेळी तारखा घेतल्या परंतु त्यांनी यूक्तीवाद केला नाही. प्रकरण दाखल करुन घेण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार 21 दिवस देण्यात आलेले आहेत. त्यापेक्षा जास्त कालावधी होत असल्याने सदरची तक्रार गुणवत्तेवर निकाली काढण्याचा निर्णय जिल्हा मंचाने घेतला. तक्रारदारांनी संबंधीत कार्यालयात विलंबाहने अर्ज दाखल केलेला असल्याने त्या विलंबा बाबत तक्रारदाराचा कोणताही आक्षेप नसल्याने तक्रार रदद करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड