Maharashtra

Dhule

cc11/194

kokilabai jydve patil - Complainant(s)

Versus

TALUKA KRUSHI OFFICER - Opp.Party(s)

S T PAWAR

30 Apr 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. cc11/194
 
1. kokilabai jydve patil
AT POST ACHONA .DHULE
...........Complainant(s)
Versus
1. TALUKA KRUSHI OFFICER
DHULE
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                 ग्राहक तक्रार क्रमांक –   १९४/२०११


 

                                  तक्रार दाखल दिनांक – १९/०९/२०११


 

                                 तक्रार निकाली दिनांक – ३०/०४/२०१३


 

 


 

ग.भा. कोकीळाबाई जयदेव पाटील                       


 

उ.वय-५१ वर्षे, धंदा – घरकाम  


 

ता.जि. धुळे.                                  ................ तक्रारदार


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

१.   म. तालुका कृषि अधिकारी सो.   


 

पत्‍ताः– तालुका कृषि कार्यालय,  


 

     शेतकरी अपघात विमा योजना विभाग, धुळे.


 

     ता. धुळे, जि. धुळे.   


 

२.   म. व्‍यावस्‍थापक सो.


 

     कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट लि.


 

     पत्‍ताः- ४ अ, देहमंदीर सोसायटी, श्रीरंगनगर,


 

     माईलेले श्रवण विकास महाविदयालयाजवळ,


 

     पंपीग स्‍टेशन रोड,


 

     नाशिक.


 

३.   मा.डिव्‍हीजनल मॅनेजर सो.


 

     ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.


 

     डिव्‍हीजन ऑफिस नं.२,


 

     पत्‍ताः- ८, हिंदुस्‍थान कॉलनी, नेरआंजन चौक,


 

     फरदा रोड, नागपूर.                         .............. सामनेवाल     


 

न्‍यायासन  


 

(मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.टी. पवार)


 

(विरुध्‍दपक्ष तर्फे – अॅड.सी.के. मुगूल)


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.अध्‍यक्षा – सौ.वी.वी. दाणी)


 

 


 

      तक्रारदार यांनी,  सामनेवाला क्र.१, २ व ३ यांनी,  महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकाप्रमाणे, तक्रारदारांचा शेतकरी जनता अपघात विमा दावा नाकारल्‍याने विमा क्‍लेम रक्‍कम मिळणेकामी सदरची तक्रार या न्‍यामंचात दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांचे थोडक्‍यात असे म्‍हणणे आहे की, त्‍यांचे पती जयदेव चुडामण पाटील यांचे दि.०७/०४/२०१० रोजी रस्‍ते अपघातात निधन झाले. त्‍यानंतर तक्रारदार यांनी तालुका कृषि अधिकारी, धुळे, जिल्‍हा धुळे यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रककम मिळावी म्‍हणून अर्ज दाखल केला होता. त्‍या अर्जावर काहीएक कारवाई पुढे झाली नाही म्‍हणून नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळून सुध्‍दा तक्रारदार यांना आजपर्यंत क्‍लेम मिळाला नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून विमा क्‍लेमपोटी रू.१,००,०००/-, मानसिक त्रासापोटी रू.२५,०००/- व मंजूर रक्‍कमेवर द.सा.द.शे. १८ टक्‍के प्रमाणे व अर्जाचा संपूर्ण खर्च सामनेवाला यांचेकडून मिळावा याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला.  


 

 


 

     तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ, नि.७/१ वर फिर्याद,  नि.७/२ वर घटनास्‍थळ पंचनामा, ७/३ मरणोत्‍तर पंचनामा, नि.७/४ वर पी.एम. रिपोर्ट, नि.७/५ मृत्‍यु दाखला, नि.७/६ वर वरास दाखला, नि.७/७  वर वरासाचा फेरफार नोंदवहीचा उतारा, नि.७/८ वर फेरफार पत्रक, नि.७/९ वर ७/१२ चा उतारा दाखल केले आहे.


 

 


 

२.   सामनेवाला क्र.१  तालुका कृषि अधिकारी, धुळे जि. धुळे. यांचा लेखी खुलासा नि.८ वर दाखल केलेला आहे. त्‍यांनी आपल्‍या लेखी खुलाश्‍यात असे म्‍हटले आहे की, विमा कंपनीने वाहन परवाना नुतनीकरण न केल्‍यामुळे तक्रारदार यांचा प्रस्‍ताव नामंजूर झाला आहे असे तक्रारदारांना कळवीले आहे.


 

 


 

३. सामनेवाला क्रं.२ यांचा पोष्‍टामार्फत खुलासा नि. ९ वर दाखल केला आहे. त्‍यात त्‍यांनी असे नमुद केले आहे की, सदर सामनेवाले क्रं.२ हे केवळ शासनाचे मध्‍यस्‍थ व सल्‍लागार आहेत व शासनास विना मोबदला सहायय करतात. तक्रारदार हे आमचे ग्राहक नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना सदर तक्रारीतून निर्दोष मुक्‍त करावे. यांनी पुढे असे म्‍हटले आहे की, मयत जयदेव चुडामण पाटील यांचा विमा प्रस्‍ताव दि.१८/०६/२०१० रोजी प्राप्‍त झाला, पुढील कार्यवाहीसाठी ओरीएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी नागपुर यांना दि.२१/०६/२०१० रोजी पाठविण्‍यात आला. सदरील विमा अर्ज विमा कंपनीने नामंजूर केला होता व तसे अर्जदारास दि.२०/११/२०११ च्‍या पत्रादयारे कळविले होते.


 

 


 

४.   सामनेवाला क्र.३ ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. यांनी आपल्‍या लेखी खुलाश्‍यात असे म्‍हटले आहे की, तक्रारदार यांचे पती जयदेव चुडामण पाटील हे शेतकरी असल्‍याबाबतचा कोणताही पुरावा नाही. सदर विमा क्‍लेम हा तालुका कृषी अधिकारी अथवा म. तहसिलदार यांच्‍यामार्फत पाठवावा लागतो. परंतु अशा प्रकारचा कोणताही प्रस्‍ताव विरुध्‍द पक्ष कबाल इन्‍शुरन्‍स अथवा त्‍यांच्‍या मार्फत कंपनीकडे आला नाही. 


 

 


 

      तसेच तक्रारदार यांचे मयत पती हे मोटर सायकल चालवित होते. त्‍यांच्‍याकडे मोटर सायकल चालविण्‍याचे कोणतेही ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी जर अपघाताच्‍या वेळी वाहन चालवित असेल तर त्‍याच्‍याकडे ड्रायव्‍हींग लायसन्‍स असणे कायदयाप्रमाणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे ड्रायव्‍हींग लायसन्‍स नसल्‍याकारणाने तक्रारदाराचा अर्ज नामंजुर करण्‍यात आला आहे.


 

 


 

५.   तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता तसेच सामनेवाला क्रं.१ ते ३ यांचा खुलासा आणि दोन्‍ही पक्षांच्‍या विदवान वकीलांनी केलेला युकितवाद ऐल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.


 

 


 

               मुददे                                  निष्‍कर्ष


 

१.     तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?                 होय


 

२.     सामनेवाला क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

कमतरता केली आहे काय ?                                                   नाही


 

३.     सामनेवाला क्र.३ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

कमतरता केली आहे काय ?                                                   होय


 

४.     तक्रारदार हे सामनेवाला क्र.३ यांच्‍याकडून विᛂमा क्‍लेम


 

व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

५.     तक्रारदार हे विᛂरूध्‍द पक्ष क्र.३ यांच्‍याकडून मानसिक


 

त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन


 

मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

६.     अंतिम आदेश ?                                 आदेशाप्रमाणे


 

 


 

 


 

 


 

विवेचन



 

६.   मुद्दा क्र.१-  सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या जबाबात सदर शेतकरी अपघात विमा योजना नाकरलेली नाही तसेच तक्रारदार या मयत श्री.जयदेव चुडामण पाटील यांच्‍या पत्‍नी आहेत ही बाब नाकरलेली नाही. तक्रारदार या मयत श्री.जयदेव चुडामण  पाटील  यांचे  वारस असल्‍याने सामनेवाला क्र.२ व ३ यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुददा क्र.’१’ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे.


 

 


 

७.   मुद्दा क्र.२ -  सामनेवाला क्रं.१ यांनी त्‍यांच्‍या लेखी खुलाश्‍यामध्‍ये असे नमुद केले आहे की, तक्रारदाराने या योजनेअंतर्गत लाभासाठी प्रस्‍ताव सादर केला आहे व तो प्रस्‍ताव सामनेवाला क्रं.२ यांनी सामनेवाला क्र.३ यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. 


 

 


 

     सामनेवाला क्रं.२ यांनी त्‍यांच्‍या जबाबामध्‍ये असे म्‍हटले आहे कीमहाराष्‍ट्र राज्‍य शासनाला सदरील विमा योजना  राबवण्‍यासाठी  विना  मोबदला  सहाय  करतो.  यामध्‍ये मुख्‍यत्‍वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार यामार्फत आमच्‍याकडे आल्‍यावर विमा दावा अर्ज योग्‍यपणे भरला आहे का? सोबत जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्‍या प्रमाणे आहेत का? नसल्‍यास तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांना कळवून त्‍यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्‍य कागदपत्रे मिळाल्‍यावर योग्‍य त्‍या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढाच आहे. यासाठी आम्‍ही राज्‍य शासन वा शेतकरी यांच्‍याकडून कोणताही मोबदला घेत नाही, असे नमूद केले आहे.


 

 


 

     याचा विचार होता सामनेवाला क्रं.१ व २ यांच्‍यावर केवळ विमा प्रस्‍ताव स्विकारणे व त्‍याची तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे पाठवणे एवढीच जबाबदारी दिसत आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर विमा क्‍लेम देण्‍याची जबाबदारी नाही. सबब सामनेवाला क्रं.१ व २ त्‍यांचे विरूध्‍द सदर तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात यावा असे या न्‍यायमंचाचे मत आहे. म्‍हणून मुददा क्रं. २ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात आले आहे.


 

 


 

८.   मुद्दा क्र.३ - सामनेवाला क्रं.३ यांनी त्‍यांच्‍या लेखी खुलाश्‍यामध्‍ये असे नमुद केले आहे की, त्‍यांनी त्‍यांच्‍या खुलाश्‍यामध्‍ये कलम ४ मध्‍ये तक्रारदार यांचा प्रस्‍ताव हा कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडुन प्राप्‍त झालेला नाही, त्‍यामुळे त्‍याबाबात कोणतीही माहीती नाही. तसेच कलम क्रं.६ मध्‍ये मयताकडे ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते या कारणाने तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करण्‍यात आला आहे, असे नमुद आहे. वरील दोन्‍ही कलमातील कथन पाहता सामनेवाला यांचा खुलासा हा परस्‍पर विरोधी दिसत आहे.


 

 


 

     तसेच सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र नि.१५/३ वर दाखल केले आहे. सदर पत्र पाहता त्‍यामध्‍ये मयताकडे अपघाताच्‍यावेळी वाहन चालवण्‍याचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते या कारणानी क्‍लेम नामंजुर केला आहे असे दिसत आहे. याबाबतचा विचार होता अपघाताच्‍या बाबत पोलीसांकडील कागदपत्र पाहता त्‍यात अपघाताच्‍या वेळी सदर मयत हे स्‍वतः वाहन चालवीत होते असे कुठेही स्‍पष्‍टपणे नमुद केलेले नाही. याचा विचार होता सामनेवाले यांनी मयताच्‍या ड्रायव्‍हींग लायसन्‍सीची मागणी केली ती योग्‍य नाही.


 

 


 

     याबाबत महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकाचा विचार करणे आवश्‍यक आहे. सदरचे परिपत्रक नि.१५/१ वर दाखल केलेले आहे. सदर परिपत्रकातील प्रपत्र - अपघाताच्‍या  पुराव्‍यासाठी  सादर  करावयाचे  कागदपत्र, यामध्‍ये क्रं.१  रस्‍ता अपघात, या कलमाखाली दाखल करावयाचे आवश्‍यक असलेले कागदपत्र मध्‍ये ड्रायव्‍हींग लायसन्‍स नमुद केलेले नाही. याप्रमाणे सामनेवाले यांनी ड्रायव्‍हींग लायन्‍सीची मागणी करणे व त्‍या कारणानी क्‍लेम नाकारणे रास्‍त नाही. 


 

 


 

     आमच्‍या मते मयत हा स्‍वतः वाहन चालवत होता हे सिध्‍द होत नाही, तसेच प्रपत्र प्रमाणे ड्रायव्‍हींग लायसन्‍सीची मागणी करता येत नाही. त्‍यामुळे सामनेवाले यांनी क्‍लेम नाकारून सेवत त्रृटी केली आहे असे दिसते.


 

 


 

     तक्रारदार यांनी नि.७/, ७/७, ७/८, ७/९ वर वारस दाखला, फेरफार पत्र, ७/१२ चा उतारा व खाते उतारा दाखल केलेला आहे. या वरील नोंदी पाहता अर्जदाराचे नाव वारस म्‍हणून लागलेले आहे. सबब मयत हे अपघाताच्‍या वेळी शेतकरी होते हे स्‍पष्‍ट होत आहे.


 

 


 

     वरील सर्व कारणांचा व परिपत्रकांचा विचार होता सामनेवाले यांनी केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारला आहे. त्‍यामूळे सामनेवाला यांनी सेवा देण्‍यात कमतरता केली आहे असे मंचाचे मत आहे. म्‍हणून मुददा क्रं. ३ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे.


 

 


 

९.   मुद्दा क्र.४ -  शासन परिपत्रकाप्रमाणे शेतक-यांचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यास सामनेवालाक्रं.३ यांनी रक्‍कम रू.१,००,०००/- ची विमा जोखीम स्‍वीकारलेली आहे हे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला क्रं.३ यांचेकडून विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रू.१,००,०००/- सदर आदेश तारखे पासून रक्‍कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.९ टक्‍के दरा प्रमाणे व्‍याजासह अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या न्‍यायमंचाचे मत आहे. म्‍हणून मुदद क्रं.४ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे.


 

 


 

१०. मुद्दा क्र.५ -   तक्रारदार यांनी सामनेवाला क्रं.३ यांच्‍याकडून मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चाची मागणी केली आहे. ‍सामनेवाला क्रं.३ यांनी कोणत्‍याही तांत्रीक बाबीचा आधार न घेता तक्रारदाराचा विमा क्‍लेम योग्‍य वेळेत मंजूर केलेला नाही.  त्‍याकामी तक्रारदार यांना या ग्राहक मंचात दाद मागावी लागलेली आहे.  वरील कारणामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास व खर्च सहन करावा लागलेला आहे याचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवालाक्रं.३ यांचेकडून मानसिक त्रासापोटी रू.१,०००/- व अर्जाचा खर्च रू.५००/- मिळण्‍यास पात्र आहेत असे या न्‍यायमंचाचे मत आहे. म्‍हणून मुददा क्रं. ५ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे.


 

 


 

११. तक्रारदार व सामनेवाले यांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली सर्व कागदपत्रे व दोन्‍ही वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

आ दे श



 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.   सामनेवाला क्रं.१ व २ यांच्‍या विरूध्‍द अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

३.  सामनेवाला क्रं.३ यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे


 

     आत, तक्रारदारांना खलीन प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.


 

(१) विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रू.१,००,०००/- (अक्षरी रूपये एक लाख मात्र)  


 

 व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने संपूर्ण रक्‍कम  फिटेपर्यंत व्‍याज दयावे.


 

(२) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व


 

 अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.


 

 


 

 


 

                  (सौ.एस.एस. जैन)                  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                 सदस्‍या                            अध्‍यक्षा

                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.