निकाल
दिनांक- 22.03.2013
(द्वारा- श्रीमती माधूरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांचे पती श्री.लहू अण्णासाहेब राऊत यांचे मालकीची शेतजमीन मौजे वारोळा, ता.माजलगाव येथे गट नं.345 मध्ये असून दुर्दैवाने दि.20.06.11 रोजी त्यांच्या मोटार सायकलला जीपने धडक देवून झालेल्या अपघातात ते मृत्यू पावले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर दि.19.09.11 रोजी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसहीत गैरअर्जदार क्र.2 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला आहे. गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने तक्रारदारांचा प्रस्ताव दि.22.11.11 रोजी वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे नाकारला आहे. तक्रारदारांचे पती रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबले असता जीपच्या ड्रायव्हरने चुकीच्या दिशेला येवून मोटार सायकलला धडक दिली असून सदरची बाब पोलीस तपासातील घटनास्थळ पंचनाम्यात स्पष्टपणे नमुद केले आहे. तसेच जीप चालकाविरुध्द पोलीसांनी गुन्हा नोंद करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सदर अपघातामध्ये तक्रारदारांच्या पतीचा कोणताही दोष नसूनही अयोग्य कारणास्तव तक्रारदारांचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने नाकारला आहे, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस मिळूनही गैरहजर असून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश घेण्यात आला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.3 यांना सदर प्रकरणातून वगळून टाकण्याबाबत केलेल्या अर्जानुसार त्यांचे नाव दि.20.02.13 रोजी आदेशानुसार वगळण्यात आले आहे.
गैरअर्जदार क्र.4 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या पतीजवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे तक्रारदारांचा प्रस्ताव योग्यरित्या नामंजूर केला आहे.
(3) त.क्र.13/2012
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार क्र.4 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.काकडे आणि गैरअर्जदार क्र.4 चे विद्वान वकील श्री.महाजन यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पती शेतकरी असून मोटार सायकलला जीपने धडक होवून झालेल्या अपघातात दि.20.06.11 रोजी मृत्यू पावले असल्याचे दिसून येते.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत दाखल केलेला विमा प्रस्ताव दि.22.11.11 रोजीच्या पत्रान्वये विमाधारकाजवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्यामुळे विमा दावा रक्कम देता येत नाही, या कारणास्तव नामंजूर केला आहे.
तक्रारदारांनी त्यांचे समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य आयोग, सर्किट बेंच औरंगाबाद यांचे पहिले अपील 661/2011 मध्ये दि.17.02.12 रोजी दिलेला न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
सदर न्यायनिवाडयानुसार “ only objection which has been raised by Insurance Company is that deceased had expired due to road accident while driving Motor cycle & that he was not Possessing the valid driving license. However it was the Policy for agriculturist, whatever may be the reason for death & agriculturist except suicide appellant (i.e. Insurance company) is under obligation to pay, Hence the respondent is entitled to receive the claim amount”.
वरील न्यायनिवाडा सदर प्रकरणात लागू होतो असे न्यायमंच नम्रपणे नमुद करत आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे कारणास्तव तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर करता येत नाही हे स्पष्ट होते.
गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने अयोग्यरित्या तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर करुन त्रुटीची सेवा दिल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.
(4) त.क्र.13/2012
वरील न्यायनिवाडयानुसार तक्रारदार शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र असल्यामुळे गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने विमा लाभ रक्कम रु.1,00,000/- तक्रारदारांना देणे न्यायोचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा लाभ रक्कम
रु.1,00,000/- ( अक्षरी रु. एक लाख ) आदेश मिळाल्यापासून
30 दिवसात द्यावी.
2) वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास 9% व्याजदरासहीत
द्यावी.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड