जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 86/2012 तक्रार दाखल तारीख – 31/05/2012
निकाल तारीख - 03/02/2015
कालावधी - 02 वर्ष , 08 म. 03 दिवस.
तयबाबी बाशा शेख,
वय – 28 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. लोहारा, ता. उदगीर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,
उदगीर, जि. लातुर.
2) जिल्हा अधिक्षक,
कृषी अधिकारी,
प्रशासकीय इमारत, लातुर.
3) व्यवस्थापक/अध्यक्ष,
कबाल इन्शुरंन्स सर्व्हीस प्रा. लि.,
राज अपार्टमेंट, प्लॉट नं. 29, जी सेक्टर
रिलायंन्स फ्रेशच्या पाठीमागे,
चिस्तीया पोलीस चौकी जवळ,
एम.जी.एम रोड, सिडको टाऊन सेंटर,
औरंगाबाद- 431003.
4) महाव्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.,
प्रादेशिक कार्यालय, अंबीका भवन क्र. 19 तिसरा मजला,
धरमसेठ एक्सटेंशन, शंकर नगर चौक,
नागपुर - 440010.
5) व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि.,
मेन रोड, गोरक्षण समोर, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.व्ही.कुंभार.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- एकतर्फा.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 व 5 तर्फे :- अॅड.एस.व्ही.तापडीया.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराचे मयत पतीचा अपघाती मृत्यू दि. 02/09/2009 रोजी झाला. अर्जदार हा मौजे लोहारा, ता. उदगीर जि. लातुर येथील रहिवाशी असून, गट क्र. 349 व 366 मध्ये एकुण 1 हेक्टर 49 आर जमीन अर्जदाराच्या मयत पतीची होती.
अर्जदाराचे मयत पती दि. 02/09/2009 रोजी लोहारा येथून टेम्पो क्र. एम.एच. 24- एफ-5812 मंचर जिल्हा पुणे येथे जात असताना सदर टेम्पोस बीड नगर रोडवर ट्रक क्र. ए.पी- 16 वाय- 4421 अतिशय वेगात येवून निष्काळजीपणे धडक दिली, त्यात अर्जदाराच्या मयत पतीचा अपघाती मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद क्र. 104/2009 करण्यात आली. अर्जदाराने शेतकरी विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून 7 दिवसाच्या आत गैरअर्जदार क्र. 1 कडे विमा दावा कागदपत्रासह क्लेम फॉर्म भरुन दिला. सदर शेतकरी योजनेचा कालावधी दि 15/08/2009 ते 14/08/2010 होता. अर्जदाराचा विमा प्रस्ताव दि. 24/03/2011 रोजी गैरअर्जदार क्र. 4 ने पॉलीसी कालावधी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत कागदपत्रे न दिल्यामुळे विमा प्रस्ताव नामंजुर केला आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत विमा रु. 1,00,000/- व त्यावर अपघात घटनेपासुन 15 टक्के व्याज तसेच मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 5,000/- मिळण्याची मागणी तक्रारी अर्जात केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व त्यासोबत एकुण 08 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द अर्जदाराने स्टेप्स घेतली नाही. गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द दि. 02/01/2013 रोजी एकतर्फा आदेश झाला आहे.
गैरअर्जदार क्र. 3 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराने विमा दावा दि. 01/11/2009 रोजी अपुर्ण दिला आहे. अर्जदारास दि. 05/11/2009, 05/02/2010,16/04/2010, 06/08/2010, 05/10/2010, 03/11/2010, 06/12/2010 रोजी पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केली आहे. अर्जदाराने मागणी प्रमाणे कागदपत्रे दिली नसल्यामुळे अर्जदाराचा विमा प्रस्ताव दि. 21/12/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 4 कडे पाठविला आहे. गैरअर्जदार क्र. 4 ने सदरचा विमा प्रस्ताव दि. 24/03/2011 रोजी बंद केला.
गैरअर्जदार क्र. 4 व 5 ने लेखी म्हणणे दिले आहे. सदरचे प्रकरण मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. अर्जदाराने सिध्द करावे की त्याच्या मयत पतीच्या नावे गट क्र.349 आणि 366 मध्ये 1 हेक्टर 49 आर जमीन होती. अर्जदाराने सिध्द करावे की, मयत बाशा राजेसाब शेख यांचे कायदेशीर वारस आहेत. अर्जदाराने सिध्द करावे की, गैरअर्जदाराच्या मागणीप्रमाणे 7/12 चा उतारा, 8 अ चा उतारा हे कागदपत्र गैरअर्जदार क्र. 1 कडे मुदतीत दिली आहेत. अर्जदाराने कागदपत्रे मुदतीत न दिल्यामुळे दि. 24/03/11 रोजी विमा दावा नामंजुर करण्यात आला. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही, गैरअर्जदाराने अकार्यक्षम अशी सेवा दिली नाही. गैरअर्जदाराने कारण नसताना अर्जदाराचा विमा दावा नामंजुर केला हे अर्जदाराचे म्हणणे गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
अर्जदाराने दाखल केलेले कागदपत्र व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र, गैरअर्जदार क्र. 3,4,5 यांचे लेखी म्हणणे अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता, पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- महाराष्ट्रातील संपुर्ण शेतक-यांचा महाराष्ट्र शासनाने प्रिमियम देवून शेतकरी विमा काढला आहे. सदरचा प्रिमियम विमा कंपनीने स्विकारला आहे अर्जदार हे वारस या नात्याने लाभार्थी ग्राहक या संज्ञेत येतात. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराचे मयत पतीचा अपघाती मृत्यू दि. 02/09/2009 रोजी झाला आहे. अर्जदाराचे मयत पती दि. 02/09/2009 रोजी टेम्पो क्र. एम.एच. 24 – एफ-5812 मंचर जिल्हा पुणे येथे जात असताना बीड नगर रोडवर समोरुन येणारा ट्रक क्र.ए.पी-16 वाय- 4421 च्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून सदरचा अपघात झाला आहे. सदर अपघाताची नोंद क्र. 104/2009 ने पोलीस स्टेशनला केली आहे. सदर अपघात झाला हे एफ.आय.आर घटनास्थळ पंचनामा यावरुन दिसुन येते. गैरअर्जदार क्र. 4 ने दि. 24/03/2011 रोजी विमा दावा पॉलीसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत कागदपत्रे न दिल्यामुळे नामंजुर केल्याचे दि. 24/03/2011 च्या पत्रावरुन दिसुन येते. शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी हा दि. 15/08/2009 ते 14/08/2010 आहे. अर्जदाराचे मयत पतीचा मृत्यू विमा योजनेच्या मुदत कालावधीत झाल्याचे दिसुन येते. अर्जदाराने दि. 01/11/2009 रोजी अपुर्ण विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 3 कडे दिल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र. 3 ने अर्जदारास दि. 05/11/2009 ते दि. 06/12/2010 पर्यंत वेळोवेळी पत्र पाठवून कागदपत्राची मागणी केल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र.3 ला अर्जदाराने मागणी प्रमाणे संपुर्ण कागदपत्रे दिल्याचा तक्रारी अर्जातील मुद्दा क्र. 7 मध्ये सांगितल्याचे दिसुन येते. अर्जदाराने मौजे लोहारा येथे मयत बाशा राजेसाब यांना गट क्र. 349 व 366 मध्ये शेत जमीन असल्याबद्दलचा 6 क चा उतारा दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराने दि. 22/04/2002 रोजीचा 6 क उतारा राजेसाब यासीनसाब शेख यांचे नावाचा करडखेड ता. उदगीर येथील दाखल केला आहे. त्यात अर्जदाराचे मयत पतीचे नाव वारस म्हणून असल्याचे दिसुन येते. गैरअर्जदारास अर्जदाराने मागणी प्रमाणे कागदपत्रे देवून सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा प्रस्ताव कागदपत्रासह 90 दिवसाच्या आत मिळाला नाही, म्हणून नामंजुर करुन सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते. अर्जदाराने शासनाचे परिपत्रक दिले आहे पेज क्र. 8 वर मुद्दा क्र 4 वर असे नमूद केले आहे की, शेतक-याचा विमा प्रस्ताव विहीत कागदपत्रासह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्यापासुन 90 दिवसापर्यंत विमा प्रस्ताव स्वीकारावेत समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्विकारावे तथापि अपघाताचे सुचनापत्र विमा कालावधी संपल्यानंतर घेणे बंधनकारक राहिल त्यानंतर सविस्तर प्रस्तावावर कार्यवाही करणे बंधनकारक राहील. सदरचा करार महाराष्ट्र शासन व विमा कंपनीत झालेला आहे. कराराचे पालन विमा कंपनीने केल्याचे दिसून येत नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराचे मयत पतीचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द होत असल्यामुळे अर्जदार हा शेतकरी अपघात विमा रक्कम रु. 1,00,000/- व मानसिक, शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 8,000/- अनुतोषास पात्र आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु.
1,00,000/-(अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या
आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास
जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/-(अक्षरी पाच हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.