जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 88/2012 तक्रार दाखल तारीख – 31/05/2012
निकाल तारीख - 14/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 11 म. 14 दिवस.
श्रीमती सुरेखा राजेंद्र चव्हाण,
वय – 30 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. गाडवेवाडी ता.औसा,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, भादा रोड, औसा,
ता.औसा, जि. लातुर.
- जिल्हा अधीक्षक,
कृषी अधिकारी, प्रशासकीय इमारत,
लातुर.
- व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि.,
फरफोर बिल्डींग भानुदास नगर,
बिग बाजारच्या पाठीमागे, औरंगाबाद.
- व्यवस्थापक,
दि. न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि.,
प्लॉट नं. 201, दुसरा मजला, माऊंट वर्ल्ड,
झेनीथ बिल्डींग, एम.बी.शोरुमजवळ,
बाने रोड, पुणे.
- शाखा व्यवस्थापक,
दि. न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि.,
शाहु कॉलेज जवळ, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. व्ही.ए.कुंभार.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 व 5 तर्फे :- अॅड.एस.जी.दिवाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे गाढवेवाडी ता. औसा जि. लातुर येथील रहिवाशी असून मयत राजेंद्र रेवा चव्हाण यांची पत्नी असून कायदेशीर वारस आहे. राजेंद्र रेवा चव्हाण हे शेतकरी असून त्यांनी गैअर्जदार क्र. 1 ते 5 यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा महाराष्ट्र शासनाने विमा काढला आहे. दि. 15/08/10 ते 14/08/11 असा आहे. मयत संजय रेवा चव्हाण यांची मौजे गाढवेवाडी येथे गट क्र. 54/ब मध्ये एकुण क्षेत्रफळ 68 आर जमीन होती. तक्रारदाराचे पती हे दि. 27/02/11 रोजी नागरसोगा येथे दुपारी 3.30 वाजता महराराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सांगण्यावरुन लोडशेडींग असताना पोलवर चढून तारा जोडण्याचे काम करीत असताना महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे नागरसोगा ता. औसा युनिटचे अभियंता यांनी अचानक विदयुत प्रवाह चालू केल्याने विजेचा शॉक लागून अपघात होवून त्या अपघातात तो जागीच मरण पावला. सदरील अपघाताची नोंद औसा पोलीस स्टेशन आकस्मित नोंद क्र. 09/11 अन्वये कलम 174 सी.आर.पी.सी अन्वये करण्यात आलेली आहे.
अपघात झाल्यानंतर तात्काळ 7 दिवसात गैरअर्जदार क्र. 1 यांना अर्जदाराने सांगितले. परंतु त्यांनी सर्व कागदपत्रे मागितली त्यानुसार सर्व कागदपत्रे अर्जदाराने वेळेच्या आत गैरअर्जदार क्र. 1 कडे सामनेवाला क्र. 4 ने दि. 08/09/11 व 25/11/11 रोजीच्या पत्रान्वये अपघाताच्या प्रथम सुचना व व्हिसेरा अहवाल या दोन कागदपत्रांची मागणी केली. त्याप्रमाणे तक्रारदाराच्या दिराने आकस्मिक मृत्यूचा रिपोर्ट हस्तगत करुन गैरअर्जदार क्र. 4 कडे पाठवला त्यानंतर 4 यांनी दि. 15/02/12 रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ यांच्या इंजिनिअरच्या अहवालाची मागणी केली. अशा प्रकारे गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी अर्जदाराचा अर्ज मंजुर न करता फक्त कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदारास रु. 1,00,000/- व अपघात झालेल्या तारखेपासुन 15 टक्के व्याज देण्यात यावे. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 5,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत कृषी अधिकारी यांना दिलेला अर्ज, क्लेम फॉर्म, वैदयकीय अधिका-याचे पोलीस स्टेशनला दिलेले पत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, अखेर रिपोर्ट समरी, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र (ग्रामपंचायत), रहिवाशी प्रमाणपत्र, सात/बारा, आठ ‘अ’, फेरफारची नक्कल, ओळखपत्र मयताचे, ओळखपत्र अर्जदाराचे, रेशन कार्ड,बँक पास बुक, शपथपत्र,सात/बारा, गाव नमुना सहा(क), इन्शुरन्स कंपनी पत्र, इन्शुरन्स कंपनी पत्र, नोटीस, पोस्ट पावती, परत पावती पोस्ट, पत्र इन्शुरन्स कंपनीचे इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी अर्जदारास पत्र दि. 25/11/11 रोजी पाठवले आहे. त्यानुसार मयत राजेंद्र रेवा चव्हाण यांना प्रथम माहिती अहवाल आमच्याकडे 8 दिवसात ताबडतोब पाठविण्यासाठी सांगितले होते. परंतु आपण तो पाठवला नसल्यामुळे व आपल्या दाव्याला 60 दिवस पुर्ण झाले असल्यामुळे आम्ही हा दावा बंद करत आहोत. दि. 15/02/12 रोजी अर्जदारास विदयुत निरीक्षकाचा अहवाल मागितलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांच्या म्हणण्यानुसार कंपनीचे पत्र क्र. 651/23/02/12 नुसार महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ यांच्या इंजिनिअरच्या रिपोर्ट प्रमाणे शेतकरी राजेंद्र चव्हाण हे अनाधिकृत विज कनेक्शन घेताना विजेचा शॉक बसून मयत झाले आहेत. त्यामुळे बेकायदेशीररित्या विज कनेक्शन घेताना विमा धारक मयत झाल्यास त्याला दावा देता येत नाही असे विमा कंपनीचे म्हणणे आहे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्ज्दार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. अर्जदाराचे पती राजेंद्र चव्हाण यांना मौजे गाढवेवाडी येथे गट क्र. 54/ब मध्ये 00 हेक्टर 68 आर एवढी जमीन आहे. त्यामुळे तो गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांचा शेतकरी जनता अपघात विम्याचा तो लाभधारक आहे.
II 2010 CPJ 699 NC LIC V/S Syhamkumar
II 1998 CPJ 260 LIC V/S SMT.AMRIKABAI दोन Citation अर्जदारानी सदर केस संबंधीत दिलेली आहेत.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदार हा दि. 27/02/11 रोजी 15.30 वाजता आम्ही व मयत असे मिळून लाईटचा तार तुटल्यामुळे लाईट गेल्याने तार जोडण्यासाठी गेलो. राजेंद्र हा पोलवर चढला व तार जोडत असताना इलेक्ट्रीक सप्लाय आल्याने त्याला शॉक लागला. तो मला वाचवा म्हणत होता पण लाईट चालू होती. म्हणून आम्ही गेलो नाही नंतर फोन करुन लाईट बंद केली. व राजेंद्र यास दोरीला बांधून खाली घेतले. यातील मयत हा लाईटचा तार बसवण्यासाठी गेला असता, त्याचा मृत्यू अपघाती स्वरुपाचा झालेला आहे. अर्जदाराच्या शवविच्छेदन अहवालात Death due to sudden electric shock असे लिहिलेले आहे तसेच तालुका दंडाधिकारी यांनी जावक क्र. 785/11 नुसार मयताचा मृत्यू अपघाती कलम 174 सी.आर.पी.सी प्रमाणे नोंद केलेली असल्यामुळे, म्हणून अर्जदाराचे पती हे अनाधिकृतपणे लाईट घेत होते असे गैरअर्जदारांचे नुसते म्हणणे आहे. याच्या पुष्टयर्थ कागदोपत्री पुरावा गैरअर्जदाराने दाखल केलेला नसल्यामुळे हे मंच त्यावर पुर्णपणे निर्भर राहू शकत नाही. अर्जदार सदर अपघाती योजने अंतर्गत मिळणा-या लाभास पात्र आहे. अर्जदाराची कलम 174 सी.आर.पी.सी नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असल्यामुळे, त्याचा एफ.आय.आर करण्यात आलेला नाही. व शवविच्छेदन अहवालानुसार अर्जदाराचा मृत्यू हा विजेचा शॉक लागल्यामुळे झाला. गैरअर्जदाराने त्याचा मृत्यू हा अनाधिकृत विज घेताना झाला असे म्हटलेले आहे. परंतु याबाबतीतील कोणताही पुरावा न्यायमंचात दाखल केलेला नाही. म्हणून हे न्यायमंच अर्जदारास रु. 1,00,000/- गैरअर्जदार क्र. 4 ते 5 यांनी दयावेत. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावेत.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम
रु. 1,00,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन
30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.