Maharashtra

Bhandara

CC/17/102

KAPUR RAMA THAWRE - Complainant(s)

Versus

TALUKA KRUSHI ADHIKARI. BHANDARA - Opp.Party(s)

Adv. JAYESH M. BORKAR

20 Jul 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/17/102
( Date of Filing : 21 Dec 2017 )
 
1. KAPUR RAMA THAWRE
KHAMARI, POST. MATORI, TA.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. RANA KAPURDAS THAWRE
KHAMARI, POST. MATORI, TA.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TALUKA KRUSHI ADHIKARI. BHANDARA
HARSH NIWAS, BHAIYYAJI NAGAR, KHAT ROAD, BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. MANAGER, NATINAL INSURANCE CO. LTD
SAKET, LAXMI BHAWAN, DHARAMPETH NAGPUR THROUGH BRANCH MANAGER, NATIONAL INSURANCE CO. LTD. ZILLA PARISHAD SQUARE, SONKUSRE BUILDING. TAH.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv. JAYESH M. BORKAR, Advocate
For the Opp. Party:
Dated : 20 Jul 2019
Final Order / Judgement

                  (पारीत व्‍दारा  श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्‍या)

                                                                                 (पारीत दिनांक–  20 जुलै,  2019)   

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं- 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत त्‍याचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      उभय तक्रारदार हे उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तक्रारकर्ता क्रं-1) श्री कपूरदास रामा ठवरे यांची पत्‍नी आणि तक्रारकर्ती क्रं-2) कु.राणी कपूरदास ठवरे हिची आई नामे रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे ही व्‍यवसायाने शेतकरी होती व तिचे मालकीची मौजा घोगरा, तालुका-तिरोडा, जिल्‍हा- गोंदीया येथे तलाठी साझा क्रं-19, खाते क्र-318, भूमापन/गट क्रं- 379/1, आराजी-0.33 हेक्‍टर आर ही शेत जमीन असून त्‍यावर तिचा आणि तिचे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्‍दपक्ष क्रं- 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-1) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा  स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सन-2015-2016 वर्षा करीता तक्रारदारांचे अनुक्रमे पत्‍नी व आई असलेल्‍या श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने उभय तक्रारदार हे अनुक्रमे  पती आणि मुलगी या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे.

     उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, नात्‍याने अनुक्रमे पत्‍नी आणि आई असलेली श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे ही दिनांक-19/09/2016 रोजी दुपारी-1.30 वाजताचे दरम्‍यान स्‍वतःच्‍या शेतावर गवत कापण्‍यासाठी गेली असता विषारी सापाने चावल्‍यामुळे प्रथम तिला प्राथमिक आरोग्‍य केंद्र, खमारी येथे वैद्दकीय उपचारासाठी नेण्‍यात आले परंतु प्रकृती गंभिर असल्‍याने पुढे तिला वैद्यकीय उपचारार्थ जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथे नेत असताना अंदाजे दुपारी-2.30 वाजताचे दरम्‍यान त्‍याच दिवशी म्‍हणजे दिनांक-19.09.2016 रोजी तिचा मृत्‍यू झाला. त्‍यानंतर तिला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे आणले असता तेथील डॉक्‍टरांनी तपासणी करुन तिला मृत घोषीत केले. सदर अपघाती घटनेची माहिती पोलीस स्‍टेशन कारधा, तालुका जिल्‍हा भंडारा येथे देण्‍यात आली असता पोलीसानीं जा.फो.चे  कलम 174 अंतर्गत केली आणि अकस्‍मात मृत्‍यूची नोंद क्रं- 36/2016 केली व घटनास्‍थळावर प्रत्‍यक्ष भेट देऊन पंचनामा तयार केला. उभय तक्रारदार यांची नात्‍याने अनुक्रमे पत्‍नी व आई असलेली मृतक रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचे मृत्‍यू नंतर तिचे पती श्री कपूरदास रामा ठवरे आणि सज्ञान मुलगी कु. राणी कपूरदास ठवरे तसेच मुलगा उमेश कपूरदास ठवरे असे कायदेशीर वारसदार आहेत.

उभय तक्रारदारांच्‍या नात्‍याने अनुक्रमे पत्‍नी व आई असलेली मृतक रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचे  मृत्‍यू नंतर त्‍यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-1 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला. त्‍यानंतरही बरेचदा त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे विमा दावा रक्‍कम मंजूर करण्‍या बाबत विनंती केली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने दिनांक-26.07.2017 रोजी तक्रारकर्ता क्रं-1) श्री कपूरदास रामा ठवरे यांचे नावे पत्र देऊन त्‍याव्‍दारे पॉलिसी पि‍रेडच्‍या 90 दिवसा नंतर विमा दावा पत्र सादर केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केला. वस्‍तुतः तक्रारकर्ता क्रं-1) यांनी विहित कालावधीत विमा दावा सादर केलेला आहे. तसेच महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या परिपत्रका प्रमाणे 90 दिवसा नंतरचे विमा दावे सुध्‍दा स्विकारण्‍याची तरतुद आहे. अशी स्थिती असताना सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने खोटे कारण दर्शवून त्‍यांचा विमा दावा नामंजूर केला आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे तक्रारदारांना दिलेली ही दोषपूर्ण सेवा असून त्‍यामुळे त्‍यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/-अपघाती घटना घडल्‍याचा दिनांक-19.09.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो दरमहा दरशेकडा.-15% दराने व्‍याजासह मागितली असून त्‍यांना झालेल्‍या त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द  केलेली आहे.

 

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 43 व 44 वर दाखल केले, त्‍यांनी लेखी उत्‍तरात नमुद केले की, तक्रारकर्ता क्रं-1) श्री कपूरदास वल्‍द रामा ठवरे यांची पत्‍नी मृतक श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा त्‍यांचे कार्यालयात आवक क्रं 879 दिनांक-12.04.2017 रोजी प्राप्‍त झाला, त्‍यांनी विमा दाव्‍याची तपासणी करुन पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव जा.क्रं 939, दिनांक-15.04.2017 अन्‍वये जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात सादर केला व पुढे तो विमा प्रस्‍ताव बजाज कॅपीटल लिमिटेड, वर्धा रोड, नागपूर यांचेकडे दिनांक-19.04.2017 रोजी दाखल करण्‍यात आला. तक्रारकर्ता क्रं-1) यांची पत्‍नी नामे श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचा विषारी सर्पदंशामुळे दिनांक-19.09.2016 रोजी दुपारी मृत्‍यू झाला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने दिनांक-26.07.2017 रोजी तक्रारकर्ता क्रं 1 श्री कपूरदास वल्‍द रामा ठवरे यांचे नावाने पत्र पाठवून पॉलिसी पिरेडच्‍या 90 दिवसा नंतर दावा पत्र सादर केल्‍यामुळे दावा नामंजूर केला आहे.  त्‍यांचे कडून सदर प्रकरणात कोणतीही चुक अथवा विलंब झालेला नाही करीता त्‍यांना तक्रारीतून मुक्‍त करण्‍याची विनंती केली.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने आपले लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 48 ते 51 वर दाखल केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरात तक्रारकर्ता क्रं 1) श्री कपूरदास वल्‍द रामा ठवरे यांची पत्‍नी आणि तक्रारकर्ती क्रं-2) कु. राणी कपूरदास ठवरे हिची आई असलेल्‍या  श्रीमती रुखमा विना कपूरदास ठवरे हिचे नावाने शेती होती व तिचा विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये विमा काढलेला होता, विम्‍याचे वैध कालावधीत दिनांक-19.09.2016 रोजी ती शेतात काम करीत असताना तिला सर्पदंश झाला आणि पुढे तिला वैद्यकीय उपचारार्थ जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथे नेत असताना त्‍याच दिवशी दुपारी 2.30 वाजता तिचा अपघाती मृत्‍यू झाला, सदर अपघाती घटने संदर्भात पोलीसांनी गुन्‍हा नोंदविला अशी तक्रार असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्ता क्रं 1) श्री कपूरदास ठवरे यांनी दाखल केलेला विमा दाव्‍या बाबत त्‍यांनी दिनांक-26/07/2017  रोजीचे पत्रान्‍वये स्‍पष्‍टपणे नमुद केले होते की, वारंवार स्‍मरणपत्र देऊन आवश्‍यक दस्‍तऐवजाची मागणी करण्‍यात आली होती तरी सुध्‍दा त्‍याची पुर्तता तक्रारकर्ता क्रं-1 यांनी न केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केलेला आहे. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह 90 दिवसात दाखल करणे बंधनकारक असताना  तक्रारकर्ता क्रं-1 यांनी 90 दिवसांची मुदत संपल्‍या नंतर विमा दावा दाखल केल्‍यामुळे त्‍यांचे विमा दाव्‍याची फाईल बंद करण्‍यात आली व सदर कारणामुळे त्‍यांचा विमा दावा नामंजूर करण्‍यात आला. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नसल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी. त्‍यांनी तक्रारदारांना कोणतीही दाषपूर्ण सेवा दिलेली नाही वा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

05.    तक्रारकर्ता क्रं-1) यांनी तक्रारीचे समर्थनार्थ पृष्‍ठ क्रं- 12 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण-21 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये क्‍लेम फॉर्म भाग क्रं 1 ते 3 व क्‍लेम फॉर्म भाग 1 ते 3 चे सहपत्र, शेतीचे 7/12 उतारे,  गावनमुना-8-अ, घोषणापत्र, मृतक श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचे निवडणूक ओळखपत्र, मृत्‍यू प्रमाणपत्र, अकस्‍मात मृत्‍यू सुचना, घटनास्‍थळ पंचनामा, मरणान्‍वेषन प्रतिवृत्‍त, शवविच्‍छेदन अहवाल, रेशन कॉर्ड, तक्रारकर्ता क्रं 1 यांचे  बँकेचे पासबुक आणि आधारकॉर्ड, विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे विमा दावा मंजूरीचे पत्र अश्‍या दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 52 ते 54 वर तक्रारकर्ता क्रं 1 यांचा शपथेवरील पुरावा दाखल केला. तसेच पृष्‍ट क्रं-55 वर तक्रारदारांनी लेखी युक्‍तीवादा संदर्भात पुरसिस दाखल केली.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 48 ते 50 वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं-2 विमा कंपनीतर्फे  पुराव्‍याचे शपथपत्र पृष्‍ठ क्रं- 54  वर दाखल केले. पृष्‍ट क्रं-56 वर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी युक्‍तीवादा संदर्भात पुरसिस दाखल केली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे पान क्रं 59 वरील दस्‍तऐवज यादी नुसार शेतकरी अपघात विमा योजनेचे दिनांक-05.12.2017 रोजीचे परिपत्रकाची प्रत दाखल केली.

07.   उभय तक्रारदारांचीतक्रार, दाखल केलेले दस्‍तऐवज तसेच  विरुध्‍दपक्ष क्रं-1 तालुका कृषी अधिकारी यांचे उत्‍तर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तर इत्‍यादीचे मंचातर्फे अवलोकन करण्‍यात आले. मौखीक युक्‍तीवादाचे वेळी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 गैरहजर होते. तक्रारदारांचे वकीलांचा तसेच विरुदपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.   

                                                                          :: निष्‍कर्ष ::

08.   सदर प्रकरणात उभय तक्रारदारांची नात्‍याने अनुक्रमे पत्‍नी आणि आई असलेली श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे ही दिनांक-19/09/2016 रोजी दुपारी-1.30 वाजताचे दरम्‍यान स्‍वतःच्‍या शेतावर गवत कापण्‍यासाठी गेली असता विषारी सर्पदंशामुळे प्रथम तिला प्राथमिक आरोग्‍य केंद्र, खमारी येथे वैद्दकीय उपचारासाठी नेण्‍यात आले परंतु प्रकृती गंभिर झाल्‍याने पुढे तिला वैद्यकीय उपचारार्थ जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथे नेत असताना अंदाजे दुपारी-2.30 वाजताचे दरम्‍यान त्‍याच दिवशी म्‍हणजे दिनांक-19.09.2016 रोजी तिचा मृत्‍यू झाला. त्‍यानंतर तिला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे आणले असता तेथील डॉक्‍टरांनी तपासणी करुन तिला मृत घोषीत केले या बाबी उभय  पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नाहीत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्ता क्रं-1) श्री कपूरदास रामा ठवरे यांनी विमा योजनेच्‍या अटी व शर्ती प्रमाणे विमा योजनेच्‍या 90 दिवसा नंतर दावा पत्र सादर केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केला असे नमुद केले. तक्रारकर्ता क्रं-1   श्री कपूरदास ठवरे यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दिनांक-26.07.2017 रोजीचे तक्रारकर्ता क्रं-1 यांचे नावे असलेले विमा दावा नामंजूरीचे पत्र पान क्रं 38 वर अभिलेखावर दाखल केले, त्‍यामध्‍ये पॉलिसी पिरेडच्‍या 90 दिवसा नंतर दावा पत्र सादर केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर असे नमुद केलेले आहे.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-1) यांना वारंवार स्‍मरणपत्र देऊन आवश्‍यक दस्‍तऐवजाची मागणी करण्‍यात आली होती परंतु त्‍याची पुर्तता तक्रारकर्ता क्रं-1 यांनी  न केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केल्‍याचे नमुद केले परंतु विमा दावा नामंजूरीचे पत्रात मात्र विमा योजनेच्‍या 90 दिवसा नंतर दावा पत्र सादर केल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केल्‍याचे नमुद आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-1 यांना वारंवार स्‍मरणपत्र देऊन कोणत्‍या दस्‍तऐवजांची मागणी करण्‍यात आली होती या बद्दल कोणताही सक्षम पुरावा विरुध्‍दपक्षा तर्फे दाखल करण्‍यात आलेला नाही त्‍यामुळे मागणी केलेल्‍या दसतऐवजाची पुर्तता न केल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं-1 यांचा विमा दावा नामंजूर केल्‍याचा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्‍तरात घेतलेला बचाव मान्‍य करता येणार नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दिनांक-26.07.2017 रोजीचे पत्रात पॉलिसी पिरेडच्‍या 90 दिवसा नंतर दावा पत्र सादर केल्‍यामुळे दावा नामंजूर हे एकच कारण विमा दावा नामंजूरी संबधाने नमुद केलेले आहे त्‍यामुळे या नामंजूरीचे कारणावर विचार होणे आवश्‍यक आहे.

09.    तक्रारकर्ता क्रं-1) यांनी विमा दावा प्रस्‍तावा सोबत त्‍यांची मृतक पत्‍नी श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचे नावे असलेल्‍या शेतीचे आवश्‍यक दस्‍तऐवज तसेच तक्रारकर्ता क्रं-1 श्री कपूरदास रामा ठवरे यांनी त्‍यांची पत्‍नी श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचा सर्पदंशामुळे  अपघाती मृत्‍यू झाल्‍या बाबत पोलीस दस्‍तऐवज जोडले असल्‍याची बाब दाखल विमा दावा प्रस्‍तावाचे प्रती वरुन सिध्‍द होते. शेतीचे दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्ता क्रं 1 यांची मृतक पत्‍नी श्रीमती विना कपूरदास ठवरे हिचे नावे शेती होती ही बाब सिध्‍द होते. पोलीस दस्‍तऐवजावरुन विम्‍याचे वैध कालावधीत तिचा सर्पदंशामुळे अपघाती मृत्‍यू झाल्‍याची बाब सिध्‍द होते. तक्रारकर्ता क्रं-1) यांनी त्‍यांचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू नंतर विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दसतऐवजांसह तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला होता ही बाब तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली असून त्‍यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-1) श्री कपूरदास ठवरे यांनी विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह त्‍यांचे कार्यालयास दिनांक-12.04.2017 रोजी सादर केला आणि त्‍यांनी पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात लगेच म्‍हणजे दिनांक-15.04.2017 रोजी सादर केल्‍याचे नमुद आहे. तक्रारकर्ता क्रं 1 यांची पत्‍नी हिचा दिनांक-19.09.2016 रोजी सर्पदंशामुळे अपघाताने मृत्‍यू झाला होता व त्‍यांनी दिनांक-12.04.2017 रोजी विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला म्‍हणजेच अपघाती घटना घडल्‍याचे दिनांका पासून जवळपास 06 महिने 12 दिवसात दाखल केला.  महाराष्‍ट्र शासनाचे दिनांक-26 नोव्‍हेंबर, 2015 परिपत्रका अनुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-2015-2016 या वर्षा करीता राबविली होती आणि त्‍यामध्‍ये अपघाती मृत्‍यू आल्‍यास संबधित शेतक-याला रुपये-2,00,000/- विमा संरक्षण देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने स्विकारलेली होती. 

10.   तक्रारकर्ता क्रं-1) श्री कपूरदास रामा ठवरे यांची पत्‍नी नामे श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचा सर्पदंशामुळे दिनांक-19.09.2016 रोजी मृत्‍यू झाला होता आणि विमा योजने नुसार योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसांच्‍या आत विमा दावा दाखल करणे आवश्‍यक आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्ता क्रं-1) श्री कपूरदास रामा ठवरे यांनी सर्वप्रथमविमा दावा प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयात दिनांक-12.04.2017 रोजी दाखल केला आणि त्‍यांनी पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात लगेच म्‍हणजे दिनांक-15.04.2017 रोजी सादर केल्‍याचे नमुद आहे. महाराष्‍ट्र शासनाचे दिनांक-26 नोव्‍हेंबर, 2015 चे परिपत्रकातील परिच्‍छेद क्र 5 प्रमाणे विमा दावा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह योजनेच्‍या कालावधीत कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्‍या अखरेच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातांसाठी, योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्‍या नंतर 90 दिवसा पर्यंत, तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहिल. शिवाय समर्थनीय कारणांसह 90 दिवसा नंतर प्राप्‍त होणारे विमा प्रस्‍ताव  सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. प्रस्‍ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत, या कारणास्‍तव विमा कंपनीला विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं-1 श्री कपूरदास ठवरे यांनी पॉलिसी पिरेडच्‍या 90 दिवसा नंतर दावा पत्र सादर केल्‍यामुळे दावा नामंजूर असे जे दिनांक-26/07/2017 रोजीचे दावा नामंजूरीचे पत्रात दिलेले कारण हे उपरोक्‍त शासन निर्णयावरुन चुकीचे दिसून येते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून तक्रारदारांचा अस्‍सल विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते, त्‍यामुळे तक्रारदारांना शारिरीक मानसिक त्रास होणे स्‍वाभाविक आहे.

या मंचा तर्फे विमा दावा मुदती संबधात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येते.

  1. Hon’ble Maharashtra State Disputes Redressal Commission, Mumbai-Appeal No.- A/15/580, Decided on- 25th April, 2018- “Futere Generali India Insurance Co.Ltd.-Versus- Mrs. Kalpana Rajendra Rajpure

मंचा तर्फे सदर न्‍यायनिवाडयाचे वाचन केले असता आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग यांनी असे नमुद केले की, मृतकाचे कायदेशीर वारसदारांनी विमा दावा दाखल करण्‍यास 05 महिन्‍याचा उशिर  केला परंतु अशिक्षीत कुटूंबातील सदस्‍य असल्‍याने त्‍यांना विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचे ज्ञान नसते. त्‍याच प्रमाणे सदर शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या अटी व शर्ती मध्‍ये नमुद केलेले आहे उशिरा प्राप्‍त झालेल्‍या विमा दाव्‍यांची योग्‍य ती शहानिशा करुन विमा दावा मंजूर करावेत असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे.

                                                                  *****

  1. Addl.D.C.D.R.F.Nagpur C.C. No.17/3 Decided on-18th August 2018 “Shri Ratiram Ramchandra Ukey and others-Versus-New India Assurance Company Ltd. And others.

    सदर न्‍यायानिवाडया मध्‍ये सुध्‍दा समर्थनीय कारणास्‍तव 90 दिवसा नंतर सुध्‍दा विमा दावे स्विकारावेत अशी सुचना विमा कंपनीला शासन निर्णयात केलेली आहे.

                                                                     *****

  1. Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.

    उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नाकारल्‍याचे पत्र तक्रारकर्त्‍याला दिल्‍या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नसल्‍याने सदर न्‍यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे.

                                                               *****

  1. Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-3216 of 2016 Decided on-01st August, 2018-“National Insurance Company-Versus-Hukam Bai Meena and others.

    उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात विमा कंपनीने विमा दावा दाखल करण्‍यास का उशिर झाला याचे स्‍पष्‍टीकरण संबधितां कडून मागविण्‍यासाठी संधी देणे आवश्‍यक असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे.

                                                                   *****

(5).   मंचाव्‍दारे मा. राष्‍ट्रीय आयोग, न्‍यु दिल्‍ली यांनी विम्‍याच्‍या संदर्भात दिलेल्‍या Landmark न्‍यायनिवाडयावर आपली भिस्‍त ठेवली आहे. त्‍याचा तपशिल असा आहे.

      REVISION PETTTION NO. 3118-3144 OF 2010  Lakshmi Bai & Ors. ICICI Lombard General Insurance   Dated 05 August, 2011

   या न्‍यायनिवाडयामधील परिच्‍छेद क्रं. 13 मधील अनुक्रंमांक 2) Cases where claim is made to nodal officer or nodal officer has forwarded the claim to Insurance Company or claim has been directly filed with Insurance Company within 2 years of the death and the claim has remained undecided. In such a case the cause of action will continue till the day the Respondent/insurance Company pays or rejects the claim.

       मंचा तर्फे आणखी स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, वस्‍तुतः विमा योजनेचा कालावधी संपल्‍याचे दिनांका पासून 90 दिवसांचे आत विमा दावा दाखल करावा ही अट मार्गदर्शक (Directory) असून बंधनकारक (Mandatory) नाही तसेच 90 दिवसांची मुदत संपल्‍यावरही विलंबा नंतर समर्थनीय कारणांसह प्रस्‍ताव स्विकारावा असे शासन निर्णयात नमुद आहे.

11.    उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदार हे अनुक्रमे त्‍यांची पत्‍नी व आई असलेल्‍या श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात दाखल केल्‍याचा दिनांक-12/04/2017 नंतर महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजना परिपत्रकाप्रमाणे विमा कंपनीला विमा दावा निश्‍चीतीसाठी 60 दिवसाची मुदत देऊन म्‍हणजे दिनांक-12/06/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीकडून मिळण्‍यास पात्र आहेत. त्‍याचप्रमाणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीकडून मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-(1) तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

12.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                                      :: आदेश ::

(01)  उभय तक्रारदारांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं क्रं 2 विमा कंपनी विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी उभय तक्रारदारांना नात्‍याने अनुक्रमे पत्‍नी व आई असलेल्‍या श्रीमती रुखमा उर्फ विना कपूरदास ठवरे हिचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) दिनांक-12/06/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह उभय तक्रारदारांना द्यावी.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(1) तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारदारांना देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारदारांना “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.