तक्रार दाखल दिनांकः 04/12/2015
आदेश पारित दिनांकः 03/10/2016
तक्रार क्रमांक. : 103/2015
तक्रारकर्ती : श्रीमती सुमन आनंदराव खापेकर
वय – 53 वर्षे, धंदा – शेती
रा. खरबी, ता.तुमसर जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) तालुका कृषी अधिकारी, भंडारा
मोहाडी ता.मोहाडी जि.भंडारा
2) जिल्हा कृषी अधिकारी,
कृषि कार्यालय, राजीव गांधी चौक,
भंडारा
3) व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स सर्विसेस प्रा.लि.10
शिवाजीनगर निअर मंगला थीस्टर,
पुणे
4) व्यवस्थापक, न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड,
न्यु इंडिया सेंटर, सातवा मजला 17 ए कुपरेज रोड
मुंबई-400001 मार्फत विभागीय व्यवस्थापक,
न्यु इंडिया इ.क.लि.पाटनी भवन, गांधी बाग,
नागपुर
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड. जयेश बोरकर.
वि.प.1 : स्वतः
वि.प.2 : एकतर्फी
वि.प.3 : पोस्टाने जबाब प्राप्त
विप. 4 : अॅड.यु.के.खटी
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. हेमंतकुमार पटेरिया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक - 03 ऑक्टोबर, 2016)
तक्रारकर्तीचे पती आनंदराव टिल्लुजी खापेकर यांच्या अपघाताचे शेतकरी अपघात विमा दाव्याचे रुपये 1,00,000/- विरुध्द पक्षाने न दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . तक्रारकर्ती श्रीमती सुमन आनंदराव खापेकर हिचे पती मयत आनंदराव टिल्लुजी खापेकर हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा धरमापुरी, ता.मोहाडी जि.भंडारा येथे भुमापन क्र.74 ही शेतजमीन होती.
महाराष्ट्र शासनाने नागपुर विभागातील सर्व शेतक-यांचा शेतकरी ‘जनता अपघाता विमा’ योजनेअंतर्गत विरुध्द पक्ष क्र.3 व 4 दि. न्यु इंडिया अॅश्युअरन्स कं.कडे विमा उतरविला असल्याने तक्रारकर्तीचे पती सदर विमा योजनेचे लाभार्थी होते. विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र शासनाचे स्थानिक कार्यालय असून त्यांचे मार्फत विमा प्रस्ताव मंजुरीसाठी विरुध्द पक्ष क्र.3 व 4 कडे पाठवावयाचे होते.
तक्रारकर्तीचे पती आनंदराव टिल्लुजी खापेकर हयांचा मृत्यु दिनांक 01/09/2013 रोजी पाण्यात बुडून झाला. तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्युबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- मिळावी म्हणुन विरुध्द पक्ष क्र. 3 मार्फत सर्व कागदपत्रांसह विमा दावा विरुध्द पक्ष क्र.4 कडे दिनांक 23/01/2014 रोजी सादर केला. परंतु आजपर्यंत विरुध्द पक्षाने विमा दावा मंजुर न करता विमा लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने सदर तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1. विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 01/09/2013
पासून प्रत्यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे.20 % व्याजासह मिळावी.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रुपये
20,000/-आणि तक्रारखर्च रुपये 10,000/- मिळावा.
तक्रारकर्तीने तक्रारीच्या पृष्ट्यर्थ विमा दावा, 7/12 उतारा, गांव नमुना आठ अ, फेरफाराची नोंदवही, अकस्मात मृत्यु अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, पोलीस दस्तऐवज, पी.एम.रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, तलाठी टोंगा हयांचे पत्र, तक्रारकर्तीच्या पतीचा वयाचा दाखला इ.दस्तऐवज दाखल केले.
2. विरुध्द पक्ष क्र.2 ला नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले.
3. विरुध्द पक्ष क्र.1 ने लेखी जबाब दाखल केला असून तक्रारकर्तीने त्यांचेकडे विमा प्रस्ताव दिनांक 23/1/2014 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडे पाठविला, त्यांनी तो विरुध्द पक्ष क्र.3, कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस कडे पाठविल्यावर त्यांतील त्रृटींची पुर्तता करण्याबाबत पत्र प्राप्त झाले. त्याप्रमाणे तक्रारकर्तीने पुर्तता केली आणि दस्तऐवज जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले. विरुध्द पक्ष क्र.1 ने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली असल्याने त्यांचेकडून सेवेत कोणताही त्रृटीपुर्ण व्यवहार घडला नाही. म्हणुन त्यांना तक्रारीतून मुक्त करावे अशी विनंती केली आहे.
- . विरुध्द पक्ष क्र. 3 यांचा लेखी जबाब दिनांक 18/01/2016 रोजी पोस्टाने प्राप्त झाला. विरुध्द पक्ष क्र.3 यांचे म्हणणे असे की तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाहीत परंतु ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा उतरविला होता ते प्रिमियम न्यु इंडिया इन्शुरन्स कं.लि.मुंबई यांनी घेवून ही जोखिम स्विकारलेली आहे त्यांचेच ग्राहक होऊ शकतात. आम्ही केवळ मध्यस्थ सल्लागार आहोत. शासनास विना मोबदला सहाय करतो.
विरुध्द पक्ष क्र.3 यांनी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग,खंडपीठ, औरंगाबाद यांचे दिनांक 16/3/2009 च्या निर्णयाची प्रत इ.दस्तऐवज दाखल केले आहेत.
- विरुध्द पक्ष क्र.4 न्यु इंडिया इन्शुरन्स कं.लि. यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीस विरोध केला आहे. विरुध्द पक्ष क्र.4 यांचे म्हणणे असे की तक्रारकर्तीने मृतक आनंदराव टिल्लुजी खापेकर यांचे संबंधीत 7/12 मधील सर्व्हे नंबर आणि पूर्वीच्या फेरफार मधील गट नंबर जुळत नसून मृतकाचा मृत्युपुर्वीचा व नंतरचा 7/12 वारंवार मागुनही तक्रारकर्तीने दाखल केला नाही त्यामुळे विमा दावा मंजुर करता आला नाही. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली असून त्यांच्याकडून सेवेत कुठलीही त्रृटी नाही. म्हणुन तक्रारकर्तीचा सदर दावा खारीज करावा, अशी विनंती केली आहे.
- . तक्रारकर्त्याचे व वि.प.क्र. 1,2,3 व 4 चे कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) | वि.प.ने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे काय ? | - | होय. |
2) | तक्रारकर्ती मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | - | अंशतः |
3) | अंतीम आदेश काय ? | - | अंतीम आदेशाप्रमाणे. |
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्तीने तिचे पती आनंदराव टिल्लूजी खापेकर यांचे नावाने धर्मापुरी ता.मोहाडी जि.भंडारा येथे भुमापन क्र.74 क्षेत्रफळ 0.40 ही शेती असल्याबाबतचा गांव नमुना 8 (अ) दस्त क्र.7 वर आणि 7/12 चा उतारा दस्त क्र.8 वर दाखल केला आहे. त्यातील नोंदीवरुन हे स्पष्ट होते की मृतक आनंदराव टिल्लू खापेकर हे भुमापन क्र.74 क्षेत्रफळ 0.40 हया शेतजमीनीचे मालक होते. तसेच फेरफाराची नोंद देखिल पान क्र. 9 वर आहे.
प्रकरणातील उपलब्ध पोलीस दस्तऐवज, आकस्मीक मृत्यु समरी, घटनास्थळ, पंचनामा आणि डॉक्टरांचे शव विच्छेन अहवाल मृत्यु प्रमाणपत्र यावरुन मृतक आनंदराव टिल्लुजी खापेकर दिनांक 1/9/2013 रोजी सकाळी शेतावर गेला आणि शेताजवळील नाल्यावर बैल धुण्यास उतरला असता तोल गेल्यामुळे पाण्यात पाण्यात बूडून मृत्यु पावल्याचे सिध्द होते.
विरुध्द पक्ष क्र.4 न्यु इंडिया इन्शुरन्स कं.लि. यांनी दिनांक 28/8/2014 च्या पत्रान्वये अपघातग्रस्त शेतकरी आनंदराव टिल्लु खापेकर यांचा जुना फेरफार 6 (ड) व 7/12 यांतील भुमापन क्रमांक व सर्व्हे नं. जुळत नाही आणि याबाबत योग्य पुरावा दिला नाही म्हणुन दावा नामंजुर करण्यात आल्याचे कळविले आहे. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये मृतक आनंदराव खापेकर यांच्या मालकीची मौजा धर्मापुरी ता.मोहाडी जि.भंडारा येथे खाते क्रमांक 104 भुमापन क्र.74 आर.जी. 0.40 हे. ही शेतजमीन असल्याचे नमुद केले आहे. त्यासाठी तक्रारकर्तीने दस्त क्र.7 प्रमाणे गांव नमुना 8 (अ) आणि दस्त क्र.8 प्रमाणे 7/12 चा उतारा दाखल केला आहे. त्यांत वरील शेतजमीन मृतक आनंदराव खापेकर यांच्या नांवे दर्ज आहे. तक्रारकर्तीने दस्त क्र.9 प्रमाणे फेरफार पंजीची नक्कल दाखल केली आहे. त्याप्रमाणे फेरफार क्र.45 दिनांक 21/7/85 प्रमाणे आनंदराव टिल्लु खापेकर व भाऊ फुकटु टिल्लु खापेकर यांच्या नांवाने गट नं. 105 आर.जी.0.40 हे. ही शेतजमीन सुकनबाई लहानु तुमसरे यांच्या कडून रुपये 4,000/- मध्ये नोंदणीकृत खरेदी खतान्वये खरेदी केल्याची नोंद आहे. सन 1985 पासून ते 2015 पर्यंत 30 वर्षाच्या काळात सदर जमीनीचा गट नं.105 बदलून त्याचा भुमापन क्र.74 झाल्याने सदरची शेतजमीन आता भुमापन क्र.74 प्रमाणे मृतक आनंदराव आणि त्याचा भाऊ फुकटु याच्या नांवाने 7/12 मध्ये व गांव नमुना 8 (अ) मध्ये नोंदविली आहे. त्यामुळे जुना फेरफार क्र.45 दिनांक 21/7/85 आणि नवा 7/12 व गांव नमुना 8 (अ) मध्ये जमीनीचा गट नं. आणि भुमापन क्र. जुळत नाही असे अतार्किक कारण देवून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर करण्याची विरुध्द पक्ष क्र.4 ची कृती समर्थनीय नाही. मृतक आनंदराव टिल्लु खापेकर यांच्या नांवाने भुमापन क्र.74 क्षे. 0.40 ही शेतजमीन असतांना आणि त्याबाबत 7/12 चा उतारा आणि गांव नमुना 8 (अ) आणि तलाठी प्रमाणपत्र तक्रारकर्तीने सादर केले असतांना देखिल तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर करण्याची विमा कंपनीची कृती ही निश्चितच सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे म्हणुन मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र.2 व 3 बाबत – मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर करुन विरुध्द पक्ष क्र. 4 यांनी सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/-(एक लाख) विरुध्द पक्ष क्र.4 ने विमा दावा नामंजुर केल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 28/8/2014 पासून द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. या शिवाय शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणुन मुद्दा क्र.2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
- आ दे श -
- तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार वि.प. क्र.4 विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येत
आहे.
- विरुध्द पक्ष क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी शेतकरी
अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (एक लाख) दिनांक
28/8/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह
दयावे.
- . विरुध्द प क्ष क्र.4 यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी
नुकसान भरपाई रुपये 10,000/-(दहा हजार) दयावी.
- विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये
5,000/-(पाच हजार) दयावे.
5. वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.
6. वि.प. क्र.1,2 व 3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
8. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.