जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, भंडारा.
तक्रार दाखल दिनांकः 04/12/2015
आदेश पारित दिनांकः 14/12/2016
तक्रार क्रमांक. : 102/2015
तक्रारकर्ती : 1. सौ.प्रेमलता मेघराज सोनगडे,
वय – 40 वर्षे, धंदा – शेती
2. श्री मेघराज रेवाराम सोनगडे,
वय – 49 वर्षे, धंदा – शेती दोघेही रा. जांब, ता.मोहाडी जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) तालुका कृषी अधिकारी, भंडारा
मोहाडी ता.मोहाडी जि.भंडारा
2) जिल्हा कृषी अधिकारी,
कृषि कार्यालय, राजीव गांधी चौक,
भंडारा
3) व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स सर्विसेस प्रा.लि.10
शिवाजीनगर निअर मंगला थीस्टर,
पुणे
4) व्यवस्थापक, न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड,
न्यु इंडिया सेंटर, सातवा मजला 17 ए कुपरेज रोड
मुंबई-400001 मार्फत विभागीय व्यवस्थापक,
न्यु इंडिया इ.क.लि.पाटनी भवन, गांधी बाग,
नागपुर
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड. जयेश बोरकर.
वि.प. तर्फे : अॅड.निला नशीने
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. हेमंतकुमार पटेरिया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक 14 डिसेंबर 2016)
तक्रारकर्ती क्र.1 ही मृतकाची आई व तक्रारकर्ता क्र.2 हे मृतकाचे वडील आहेत. मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे याच्या अपघाताचे शेतकरी अपघात विमा दाव्याचे रुपये 1,00,000/- विरुध्द पक्षाने न दिल्यामुळे तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . तक्रारकर्त्यांचा मुलगा एकेश्वर मेघराज सोनगडे हा व्यवसायाने शेतकरी होता व अविवाहित होता. त्याच्या मालकीची मौजा बिटेखारी, ता.मोहाडी जि.भंडारा येथे भुमापन क्र.72/4 ही शेतजमीन होती.
महाराष्ट्र शासनाने नागपुर विभागातील सर्व शेतक-यांचा शेतकरी ‘जनता अपघाता विमा’ योजनेअंतर्गत विरुध्द पक्ष क्र.4 दि. न्यु इंडिया अॅश्युअरन्स कं.कडे विमा उतरविला असल्याने तक्रारकर्त्याचा मुलगा सदर विमा योजनेचा लाभार्थी होता. विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र शासनाचे स्थानिक कार्यालय असून त्यांचे मार्फत विमा प्रस्ताव मंजुरीसाठी विरुध्द पक्ष क्र. 4 कडे पाठवावयाचे होते.
तक्रारकर्त्याचा मुलगा दिनांक 15/10/2013 रोजी पहाटे दोन वाजता मित्रासह मॉर्निंग वॉक करुन गणेश साठवणे यांचे शेताजवळ रोडच्या किना-यावर बसले असता जांब गावाजवळून बोलेरो गाडी क्र.MH 49 B 1923 च्या चालकाने अति वेगात आणून जखमी करुन निघून गेला व उपचारा दरम्यान त्याचा दुदैवीरित्या मृत्यु झाला. तक्रारकर्त्याने मुलाच्या अपघाती मृत्युबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- मिळावी म्हणुन विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत सर्व कागदपत्रांसह विमा दावा विरुध्द पक्ष क्र.4 कडे दिनांक 06/01/2014 रोजी सादर केला. परंतु आजपर्यंत विरुध्द पक्षाने विमा दावा मंजुर न करता विमा लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने सदर तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1. विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 15/10/2013
पासून प्रत्यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे.20 % व्याजासह मिळावी.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रुपये
20,000/-आणि तक्रारखर्च रुपये 10,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पृष्ट्यर्थ विमा दावा, 7/12 उतारा, गांव नमुना आठ अ, गांव नमुना सहा अ, फेरफाराची नोंदवही, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, एफ.आय.आर., पी.एम.रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मृतकाच्या वयाचा दाखल्याकरीता School Leaving Certificate इ.दस्तऐवज दाखल केले आहेत.
2. विरुध्द पक्ष क्र.1 ने लेखी जबाब दाखल केला असून तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव दिनांक 06/01/2014 रोजी प्राप्त झाला व सदर प्रस्ताव दिनांक 13/1/2014 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडे पाठविला, त्यांनी तो विरुध्द पक्ष क्र.3, कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस कडे पाठविल्यावर त्यांतील त्रृटींची पुर्तता करण्याबाबत पत्र प्राप्त झाले. त्याप्रमाणे तक्रारकर्तीने पुर्तता केली आणि दस्तऐवज जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले. विरुध्द पक्ष क्र.1 ने त्यांचे दिनांक 14/8/2013 चे पत्रानुसार म्हटले आहे की मृतक हा दिनांक 21/01/2013 पासून शेतकरी होता व त्याचे नांवे 7/12 मध्ये जमीनीची नोंद आहे. शेतक-याचा मृत्यु 9 महिन्यानंतर म्हणजे दिनांक 15/10/2013 ला झालेला आहे. संबंधीत दावा प्रकरण 23/08/2013 ते 30/10/2013 या कालावधी मधील आहे.
- . विरुध्द पक्ष क्र. 3 यांचा लेखी जबाब दिनांक 18/01/2016 रोजी पोस्टाने प्राप्त झाला. विरुध्द पक्ष क्र.3 यांचे म्हणणे असे की तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाहीत परंतु ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा उतरविला होता ते प्रिमियम न्यु इंडिया अॅशुरन्स कं.लि.मुंबई यांनी घेवून ही जोखिम स्विकारलेली आहे त्यांचेच ग्राहक होऊ शकतात. आम्ही केवळ मध्यस्थ सल्लागार आहोत. शासनास विना मोबदला सहाय करतो.
विरुध्द पक्ष क्र.3 यांनी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग,खंडपीठ, औरंगाबाद यांचे दिनांक 16/3/2009 च्या निर्णयाची प्रत इ.दस्तऐवज दाखल केले आहेत.
- विरुध्द पक्ष क्र.4 न्यु इंडिया अॅशुरन्स कं.लि. यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीस विरोध केला आहे. विरुध्द पक्ष क्र.4 यांचे म्हणणे असे की तक्रारकर्तीने मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे याचेशी संबंधीत दिलेल्या कागदपत्रानुसार मृतकाने शेतजमीन दिनांक 21/01/2013 ला खरेदी केली. महाराष्ट्र शासन आणि विमा कंपनी मध्ये जो करार झाला त्यानुसार जो शेतकरी 15/08/2012 रोजी 7/12 च्या उता-यानुसार शेतकरी होते. त्यांचाच विमा हप्ता विमा कंपनीला प्राप्त झाला. दिनांक 15/08/2012 ला मृतक हा शेतकरी नव्हता. त्याचा विमा हप्ता शासनाव्दारे विरुध्द पक्ष क्र.4 न्यु इंडिया अॅशुरन्स कंपनीला प्राप्त झाला नाही. म्हणजेच सदर पॉलीसी मध्ये मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे सामील नव्हता म्हणुन सदर दावा विरुध्द पक्ष क्र.4 ने नामंजुर केला. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली असून त्यांच्याकडून सेवेत कुठलीही त्रृटी नाही. म्हणुन तक्रारकर्तीचा सदर दावा खारीज करावा, अशी विनंती केली आहे.
- . तक्रारकर्त्याचे व वि.प.क्र. 1,3 व 4 चे कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) | वि.प.ने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे काय ? | - | होय. |
2) | तक्रारकर्ती मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | - | अंशतः |
3) | अंतीम आदेश काय ? | - | अंतीम आदेशाप्रमाणे. |
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्त्याने त्याचा मुलगा एकेश्वर मेघराज सोनगडे यांचे नावाने बिटेखारी ता.मोहाडी जि.भंडारा येथे भुमापन क्र.72/4 क्षेत्रफळ 0.40 ही शेती असल्याबाबतचा गांव नमुना 8 (अ) दस्त क्र.19 वर आणि 7/12 चा उतारा दस्त क्र.20 वर दाखल केला आहे. त्यातील नोंदीवरुन हे स्पष्ट होते की मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे हे भुमापन क्र.74 क्षेत्रफळ 0.40 हया शेतजमीनीचे मालक होते. तसेच फेरफाराची नोंद देखिल पान क्र.22 वर आहे.
प्रकरणातील उपलब्ध पोलीस दस्तऐवज, घटनास्थळ, पंचनामा आणि डॉक्टरांचे शव विच्छेन अहवाल मृत्यु प्रमाणपत्र यावरुन मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे दिनांक 15/10/2013 रोजी दिनांक 15/10/2013 रोजी पहाटे दोन वाजता मित्रासह मॉर्निंग वॉक करुन गणेश साठवणे यांचे शेताजवळ रोडच्या किना-यावर बसले असता जांब गावाजवळून बोलेरो गाडी क्र.MH 49 B 1923 च्या चालकाने अति वेगात आणून जखमी करुन निघून गेला व उपचारा दरम्यान दुदैवीरित्या मृत्यु झाला.
विरुध्द पक्ष क्र.4 न्यु इंडिया इन्शुरन्स कं.लि. यांनी दिनांक 07/04/2014 च्या पत्रान्वये म्हटले की, अपघातग्रस्त शेतकरी एकेश्वर मेघराज सोनगडे हा दिनांक 14/2/2013 रोजी शेतकरी झाला. महाराष्ट्र शासन आणि विमा कंपनी मध्ये जो करार झाला त्यानुसार जो शेतकरी 15/08/2012 रोजी 7/12 च्या उता-यानुसार शेतकरी आहे त्याचाच विमा हप्ता विमा कंपनीला प्राप्त झाला. दिनांक 15/08/2012 ला मृतक हा शेतकरी नव्हता. त्याचा विमा हप्ता शासनाव्दारे विरुध्द पक्ष क्र.4 न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीला प्राप्त झाला नाही. म्हणजेच सदर पॉलीसी मध्ये मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे सामील नव्हता म्हणुन सदर दावा विरुध्द पक्ष क्र.4 ने नामंजुर केला. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे यांच्या मालकीची मौजा धर्मापुरी ता.बिटापुरी ता.मोहाडी जि.भंडारा येथे भुमापन क्र.72/4 आर.जी. 0.40 हे. ही शेतजमीन असल्याचे नमुद केले आहे. त्यासाठी तक्रारकर्तीने गांव नमुना 8 (अ) आणि 7/12 चा उतारा दाखल केला आहे. त्यांत वरील शेतजमीन मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे यांच्या नांवे दर्ज आहे. तक्रारकर्तीने दस्त क्र.23 प्रमाणे फेरफार पंजीची नक्कल दाखल केली आहे.
विरुध्द पक्ष क्र.4 चे अधिवक्ता अॅड.निला नशीने यांनी म्हटले की, अपघात विम्याची पॉलीसी क्र.13080047122300000002 प्रमाणे पॉलीसीचा कालावधी 15/8/2012 ते 14/8/2013 पर्यंत आहे. ही पॉलीसी ज्या शेतक-याच्या नांवाने दिनांक 15/8/2012 रोजी शेतजमीन आहे व ज्यांचे नाव 7/12 उता-यावर आहे त्याचाच विमा हप्ता कंपनीला प्राप्त झाला. परंतु मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे दिनांक 15/8/2012 रोजी शेतकरी नव्हते. म्हणजेच सदर पॉलीसी मध्ये मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे सामील नव्हता म्हणून सदर विमा दावा विरुध्द पक्ष क्र.4 यांनी नामंजुर केला. म्हणुन विरुध्द पक्ष क्र.4 यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली असून त्याच्याकडून सेवेत कुठलीही त्रृटी नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती केली आहे.
तक्रारकर्तीचे अधिवक्ता अॅड.बोरकर यांनी जनता अपघात विमा पॉलीसी क्र.13080047132300000004 प्रमाणे पॉलीसी कालावधी दिनांक 23/9/2013 ते 22/10/2013 पर्यंत आहे. सदर विमा पॉलीसी नुसार ज्या शेतक-याचे नांव दिनांक 23/9/2013 रोजी 7/12 च्या उता-यावर आहे त्यांना विमा संरक्षण दिलेले आहे. मृतक एकेश्वर मेघराज सोनगडे फेरफार नोंदवही नुसार दिनांक 14/2/2013 रोजी नोंदणीकृत शेतकरी झाला असून दिनांक 29/9/2013 ते 22/10/2013 या पॉलीसी कालावधीत दिनांक 15/10/2013 रोजी त्याचा अपघाती मृत्यु झाला म्हणून तक्रारकर्ती सदर विमा दावा मिळण्याकरीता पात्र आहे.
वरील दस्तऐवजांवरुन हे स्पष्ट आहे की, दिनांक 23/9/2013 रोजी पॉलीसी सुरु झाली तेव्हा मृतक एकेश्वरचे नांव 7/12 मध्ये असल्याने तो विमा संरक्षण मिळण्यास पात्र असतांना दिनांक 15/8/2012 रोजी मृतक शेतकरी नव्हता असे कारण देवून तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजुर करण्याची विरुध्द पक्ष क्र.4 ची कृती समर्थनीय नाही. तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजुर करण्याची विमा कंपनीची कृती ही निश्चित सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणुन मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र.2 व 3 बाबत – मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर करुन विरुध्द पक्ष क्र. 4 यांनी सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (एक लाख) विरुध्द पक्ष क्र.4 ने विमा दावा नामंजुर केल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 07/04/2014 पासून द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. या शिवाय शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणुन मुद्दा क्र.2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
- आ दे श -
- तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार वि.प. क्र.4 विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येत
आहे.
- विरुध्द पक्ष क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी शेतकरी
अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (एक लाख) विमा
दावा नामंजुर केल्याचे दिनांकापासून म्हणजेच दिनांक 07/04/2014 पासून
प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह दयावे.
- . विरुध्द प क्ष क्र.4 यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी
नुकसान भरपाई रुपये 10,000/-(दहा हजार) दयावी.
- विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये
5,000/-(पाच हजार) दयावे.
5. वि.प. 4 ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.
6. वि.प. क्र.1,2 व 3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
8. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.