Maharashtra

Jalgaon

CC/10/1024

Sitabai Mali - Complainant(s)

Versus

Taluka Krushi Adhikari, Jalgaon - Opp.Party(s)

Adv.S.T.Pawar

24 Mar 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/10/1024
 
1. Sitabai Mali
Parola
Jalgaon
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Taluka Krushi Adhikari, Jalgaon
Jalgaon
Jalgaon
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:Adv.S.T.Pawar, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

         अति. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव                                                                      तक्रार क्रमांक 1024/2010                                                                तक्रार दाखल तारीखः- 05/08/2010
                                          तक्रार निकाल तारीखः- 24/03/2014
                                 कालावधी 03 वर्ष 07 महिने 19 दिवस  
                                 निशाणी – 29
 
सिताबाई भगवान माळी,                         तक्रारदार                     
       उ.व. 55  वर्षे,  व्‍यवसाय- घरकाम,                (अॅड. सतिश तु.पवार)  
      सर्व रा. इटवे, ता. पारोळा,
जि. जळगांव.
                 
विरुध्‍द
 
1.     तालुका कृषी अधिकारी,                       एकतर्फा
तालुका कृषी कार्यालय,
जळगांव, ता.जि. जळगाव.
2.    व्‍यवस्‍थापक,       
कबाल इन्‍शुरन्‍स कं.लि.                         
      श्रीरंग नगर, पंपीग रोड, नाशिक,
ता.जि. नाशिक,
3.    डिव्‍हीजनल मॅनेजर,                                                                      (अॅड.एस.बी.अग्रवाल)
ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि.
डिव्‍हीजन ऑफिस नं. 2
हिंन्‍दूस्‍थान कॉलनी, नेरआंजन चौक,
फरदा रोड, नागपूर                         
                            
(निकालपत्र सदस्‍य श्री.मिलींद सा. सोनवणे  यांनी पारित केले)
                                नि का ल प त्र
तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये सेवेत कमतरता झाली म्‍हणून दाखल केलेली आहे.
02.   तक्रारदाराचे म्‍हणणे थोडक्‍यात असे की, भगवान विठठल माळी हे तक्रारदारचे पती होते. दि. 29/08/2008 रोजी, त्‍यांचे अपघाती निधन झाले. त्‍यांचे नावे मौजे इटवे, ता.पारोळा, जि. जळगांव येथे शेतजमीन होती व ते शेती करत  होते.  
03.   तक्रारदाराचे असेही म्‍हणणे आहे की, शासन निर्णयाअन्‍वये महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेत‍क-यांसाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना राबविली जाते.  सदर योजनेत रस्‍त्‍यावरील अपघात, विज पडून मुत्‍यू किंवा इतर कोणत्‍याही नैसर्गिक आपत्‍तीत शेतक-यांचा मुत्‍यू झाल्‍यास रू 1 लाख देण्‍याबाबत तरतुद करण्‍यात आलेली आहे. शासनाशी केलेल्‍या करारा अंतर्गत सदर रक्‍कम देण्‍याची जबाबदारी सामनेवाला क्र. 3 यांची आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्‍या मार्फत सदरचे प्रस्‍ताव सादर करण्‍यात येतात. तक्रारदाराच्‍या पतीचा मृत्‍यू दि. 29/08/2008 रोजी म्‍हणजेच, सदर योजनेच्‍या कालावधीत झालेला आहे.
04.  तकाररदाराचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यांनी संपुर्ण कागदापत्रांची पुर्तता करुन विमा दावा सादर केला.  मात्र सामनेवाला क्र. 3 यांनी मयत भगवान विठठल माळी यांनी विमा अटींचा भंग केला म्‍हणून, विमा रक्‍कम देय होत नाही, असे कळवून तक्रारदारांचा विमा दावा फेटाळला. सामनेवाला क्र. 3 यांनी  अयोग्‍य कारणास्‍तव त्‍यांचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता केलेली आहे.    त्‍यामुळे विमा रक्‍कमेचे रू. 1 लाख, द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह व मानसिक शारीरीक त्रासापोटी रू 25,000/- मिळावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
05.  तक्रारदार यांनी पुराव्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ नि. 5 व 6 ला 7/12 उतारा, नि. 17 ला पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 23/1 ला पारोळा पोलीस स्‍टेशन यांनी दिलेला दाखला इ. कागदपत्रे, दाखल केलेली आहेत.
06.  सामनेवाला यांना नोटीस काढली असता सामनेवाला नं. 3 यांनी जबाब नि. 16 दाखल करुन प्रस्‍तुत अर्जास विरोध केला. त्‍यांच्‍या मते, मयताचा मृत्‍यू अपघातामुळे झाला याबाबत अर्जदार हिने काहीएक कागदोपत्री पुरावा अर्जासोबत दाखल केलेला नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या पतीचा मृत्‍यू दि. 26/06/2009 (तक्रारदाराने मंचाच्‍या आदेशाने केलेल्‍या तक्रार अर्ज दुरुसतीप्रमाणे दि.29/08/2008)  रोजी अपघाती निधन झाले हे विमा कंपनीस मान्‍य नाही.  तसेच मयत हे शेतकरी होते याबाबत अर्जदार यांनी अर्जासोबत काहीएक कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.   त्‍यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्‍यांच्‍या वारसांना विमा रक्‍कम मागण्‍याचा अधिकार नाही. वरील कारणास्‍तव तक्रारदारांचा अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात  यावा, अशी विनंती सामनेवाला क्र. 3 यांनी मंचास केलेली आहे. 
07.   सामनेवाला क्र. 1 यांच्‍या विरुध्‍द नोटीस मिळुनही ते गैरहजर राहीले म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍द तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्‍यात यावा असे आदेश करण्‍यात आले. मात्र सामनेवाला क्र. 2 यांची भुमिका कागदपत्रे गोळा करुन विमा कंपनीकडे पाठवावीत,  इतक्‍या मर्यादीत स्‍वरुपाची आहे. शिवाय त्‍या कामाचा ते मोबदला देखील घेत नाहीत. 
08.   उभयपक्षांच्‍या वकीलांचे युक्‍तीवाद ऐकण्‍यात आलेत.  
09.   निष्‍कर्षांसाठीचे मुद्दे व त्‍यावरील आमचे निष्‍कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.]
निष्‍कर्ष                              मुद्ये        
 
1.     तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ?         सा.क्र. 3 च्‍या
      बाबतीत होय
2.    सामनेवाल्‍यांनी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता        सा.क्र. 3 च्‍या
केली काय ?                                      बाबतीत होय 
3.    आदेशा बाबत काय ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
 
 
मुद्दा क्र. 1 बाबत
10.   तक्रारदारांनी त्‍यांची तक्रार व प्रतिज्ञापत्र नि. 02 मध्‍ये दावा केला की, त्‍यांचे पती मृत्‍यु समयी शेतकरी होते. त्‍यांचा शेतकरी विमा योजने अंतर्गत शासनाने विमा रक्‍कम भरलेली होती. ती रक्‍कम सामनेवाला क्र. 3 यांच्‍या कडे भरलेली असल्‍याने त्‍या त्‍यांच्‍या ग्राहक आहेत. तक्रारदाराने नि. 5 व 6 दाखल केलेल्‍या 7/12 उता-यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, मौजे इटवे  शिवारातील सर्व्‍हे क्र. 103 व 13/1 या शेत जमिनी तक्रारदारांच्‍या पतीच्‍या नावे होत्‍या. त्‍यामुळे तक्रारदारांचे पती शेतकरी होते, ही बाब शाबीत होते. शेतकरी अपघात योजने अंतर्गत शासनातर्फे प्रत्‍येक शेतक-याचा विमा काढण्‍यात येतो. प्रस्‍तुत केस मध्‍ये तो सामनेवाला क्र. 3 याच्‍याकडून काढण्‍यात आलेला होता. त्‍यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र. 3 यांच्‍या ग्राहक आहेत, ही बाब शाबीत होते. यास्‍तव मुद्दा क्र. 2 चा निष्‍कर्ष आम्‍ही सामनेवाला क्र. 3 च्‍या बाबतीत होकारार्थी देत आहोत.  
मुद्दा क्र. 2 बाबत
11.    सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराचा विमा दावा आपल्‍या पर्यंत आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह दिला नाही, त्‍यामुळे आम्‍ही तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही कमतरता केली नाही, असा मुदा सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि. 16 मध्‍ये उपस्थित केलेला आहे. तक्रारदारांनी त्‍यांचे पती शेतकरी होते व त्‍यांचा दि. 29/08/2008 रोजी अपघाती मृत्‍यू झाला या बाबत भुमापन क्र. 103 व 13/1 चे उतारे नि. 5 व 6 तसेच अकास्‍मात मृत्‍यू बाबत पारोळा पोलीस ठाणे यांनी दिलेला दाखला नि. 23/1 ला दाखल केलेले आहेत. शिवाय आपण सामनेवाला क्र. 1 व 2 मार्फत सामनेवाला क्र. 3 यांच्‍या कडे विमा दावा दाखल केला होता, ही बाब त्‍यांनी शपथेवर नि. 17 मध्‍ये सांगितलेली आहे. ग्रामीण भागातील वयोवृध्‍द महिला आपण दाखल केलेल्‍या विमा दाव्‍याचे कागदपत्रे पुढे कदाचित पुरावा म्‍हणून लागतील, या विचाराने सांभाळून ठेवेल, अशी अपेक्षा धरता येणार नाही. ज्‍यांच्‍या मार्फत तिने ती कागदपत्रे दाखल केली ते सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी प्रस्‍तुत केस मध्‍ये हजर होवून तक्रारदाराचे विधान नाकारलेले नाही. सामनेवाला क्र. 3 यांनी सामनेवाला क्र. 1 व 2 यांना पत्र लिहून त्‍या बाबत विचारणा केल्‍याचा कोणतेही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदाराने सामनेवाला क्र. 3 यांच्‍या कडे सामनेवाला क्र. 1 व 2 मार्फत विमा दावा सादर केला होता, हे गृहीत धरावे लागेल. परिणामी कागदपत्रे मिळूनही सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराचा विमा दावा आजतागायत मंजूर किंवा फेटाळलेला नाही. सदर बाब आमच्‍या मते सेवेतील कमतरताच ठरते. यास्‍तव मुदा क्र. 2 चा निष्‍कर्ष आम्‍ही सामनेवाला क्र. 3 च्‍या बाबतीत होकारार्थी देत आहोत.        
मुद्दा क्र. 3 बाबत
12.   मुदा क्र. 1 ते 3 चे निष्‍कर्ष स्‍पष्‍ट करतात की, तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे. तक्रारदार या सामनेवाला क्र. 3 यांच्‍या ग्राहक आहेत. सामनेवाला क्र. 1 यांनी सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र. 3 यांच्‍या कडे पाठवूनही त्‍यांनी तक्रारदाराचा विमा दावा आजतागायत मंजूर किंवा नामंजूर करुन सेवेत कमतरता केलेली आहे. परिणामी प्रस्‍तुत तक्रार अर्ज मंजूर करण्‍यास पात्र आहे. त्‍यामुळे सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारास विमा रक्‍कम रु. 1,00,000/-, तक्रार दाखल केल्‍याच्‍या दिनांका पासून म्‍हणजेच दि. 05/08/2010 पासून द.सा.द.शे 9 टक्‍के व्‍याजाने अदा करण्‍याचा आदेश न्‍यायोचित ठरेल. त्‍याचप्रमाणे सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारांना काही कारण नसतांना इतके दिवस विमा हक्‍का पासून वंचित केले, त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व प्रस्‍तुत अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- अदा करण्‍याचा आदेश न्‍यायसंगत ठरेल.   यास्‍तव मुदा क्र. 4 चा निष्‍कर्ष आम्‍ही होकारार्थी देत आहोत.      
 
आदेश
 
  1. सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारास विमा रक्‍कम रु. 1,00,000/- दि.05/08/2010 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजाने अदा करावेत.
  2. सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्जा खर्चापोटी रु. 5,000/- अदा करावेत.
  3. सामनेवाला क्र. 1 व 3 यांच्‍या विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत. 
  4. निकालाच्‍या प्रति उभय पक्षांस विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.
 
जळगांव.
दि.  24/03/2014
 
 
(श्री.सी.एम.येशीराव)        (श्री.एम.एस.सोनवणे)
 सदस्‍य                      अध्‍यक्ष
अति. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,जळगांव.
 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.