निकालपत्र
तक्रार दाखल दिनांक - 15/01/2016.
तक्रार नोंदणी दिनांक - 16/01/2016
तक्रार निकाल दिनांक - 18/05/2016
कालावधी 04 महिने 03 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
श्रीमती.शेषीकलाबाई माणीक जाधव, अर्जदार
वय 40 वर्ष धंदा घरकाम, अॅड.ए.टी.पांडुळे
रा.सांगवी मैराळ ता.गंगाखेड,
जि.परभणी.
विरुध्द
1. तालुका कृषी अधीकारी, गैरअर्जदार
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,गंगाखेड, अॅड.अजय व्यास
टॉवर दलाल स्टिट फोर्ट,मुंबर्इ 400023.
2. युनिवर्सल इन्शुरन्स बोकर्स कंपनी लिमीटेड,
पहिला मजला भारत बाजार,ए.पी.आय.कॉर्नर,
चिकलठाणा एम.आय.डी.सी.औरंगाबाद.
कोरम – श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
आदेश
दिनांक 18/05/2016.
(आदेश पारित व्दारा.श्रीमती.ए.जी.सातपुते,अध्यक्षा ) - अर्जदार शशीकलाबाई व गैरअर्जदार क्र.3 यांचेमध्ये तडजोड होऊन अर्जदाराला रक्कम रु.1,00,000/- प्रकरण निकाली निघाले पासुन एक महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे तडजोडीवरील अर्जदाराची सही व अंगठावरुन तसेच उभय वकीलांचे पुरसीसवरुन सदरचे प्रकरण हे तडजोड झाल्याचे स्पष्ट होते. अर्जदार ही खेडयातील महिला आहे. परंतु ती आज न्यायमंचात येवून स्वतः सांगते की, सदरचे प्रकरणांत तडजोड झालेली आहे. म्हणुन अर्जदाराचे सदरचे प्रकरण काढुन टाकण्यात येते.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा