जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/275 प्रकरण दाखल तारीख - 19/11/2010 प्रकरण निकाल तारीख – 05/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. कविता भ्र. प्रकाशराव शिंदे वय 35 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा. सिरपल्ली ता.हिमायतनगर जि. नांदेड विरुध्द. 1. तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर ता.हिमायतनगर जि.नांदेड 2. व्यवस्थापक यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19, तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन शंकर नगर चौक, नागपूर-440 010 3. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. गैरअर्जदार संतकृपा मार्केट, जी.जी.रोड, नांदेड. 4. कबाल इन्शुरन्स कंपनी प्रा.लि. दीशा अंलकार शॉप नं.2, टाऊन सेंटर, सिडको कॅनॉट, औरंगाबाद-431 003 अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.जी.नरवाडे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.एस.जी.मडडे गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष ) 1. अर्जदार कविता मयत प्रकाशराव दत्तराव शिंदे यांची पत्नी आहे. मयत प्रकाशराव हे शेतकरी व्यवसाय करुन त्यांचे कूटूंबीयाचे व त्यांचे पालनपोषन करीत होते. त्यांचे नांवे शेत गट नंबर 158 मध्ये क्षेञफळ 1 हेक्टर 40 आर आणि स्थित मौजे सिरपल्ली ता.हिमायतनगर येथे आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यास व त्यांचे कूटूंबियास सामाजिक न्याय देण्याच्या हेतूने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्यामध्ये मयत प्रकाशराव यांचा विमा गैरअर्जदार क्र.2 व 3 मार्फत उतरविण्यात आला आहे. सदर विम्याचा कालावधी दि.15.08.2009 ते 14.08.2010 असा होता. अर्जदाराचे पती दि.15.10.2009 रोजी मोटार वाहन अपघातामध्ये मरण पावले. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, इन्क्वेसट पंचनामा, दोषारोपपञ, मृत्यू संबंधी इत्यादी आवश्यक त्या सर्व नियमानुसार कागदपञासह शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी दि.30.11.2009 रोजी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन हिमायमतनगर जि. नांदेड येथे गुन्हा नंबर 60/2009 कलम 279, 304 (अ) द्वारे नोंदविली आहे. घटनास्थळ पंचनामा व साक्षीदाराचे बयान घेतले. अर्जदाराने अर्जासोबत एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, 7/12 उतारावरील होल्डींग, नमूना नं.8 चा उतारा, 6 क चा उतारा,वारसा प्रमाणपञ इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. दि.14.10.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून नूकसान भरपाई मिळण्याची विनंती केली व ती नोटीस मिळूनही आजपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई दिली नाही. म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर सन 2009 पासून 12 टक्के व्याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. 2. गैरअर्जदार क्र.1 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार हीने विमा क्लेम फॉर्म व इतर कागदपञे गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यालयात दि.17.12.2009 रोजी दाखल केले. त्यांनी सदर कागदपञाची तपासणी करुन सदर क्लेम फॉर्म कार्यालयाचे पञ क्र.716 दि.17.12.2009 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड या वरिष्ठ कार्यालयास पूढील कार्यवाहीसाठी पाठविला. त्यांनी सदर क्लेम पञ क्र.5981 दि.18.12.2009 रोजी गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे सादर केला. सदर पञाची झेरॉक्स प्रत सोबत जोडली आहे.शेतक-यास विमा रक्कम मिळणेबाबतची जबाबदारी त्यांची नाही. म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. गैरअर्जदार क्र.2 व 3 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही अपरिपक्व आहे कारण तो दावा हा गैरअर्जदार क्र. 1 व 4 मार्फत त्यांचे कडे दाखलच झालेला नाही. म्हणून सेवेत ञूटी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्यामध्ये गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार ही मयत प्रकाशराव यांची पत्नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही ? तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत प्रकाशराव हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही ? मयत प्रकाश हे शेतकरी असल्याबददल 7/12 मध्ये नोंद नाही ते वाहन चालक होते. परंतु त्यांच्याकडे वाहन चालविण्याचख वैध व प्रभावी परवाना नव्हता. अपघातास ते स्वतः कारणीभूत होते. अर्जदाराने पोलिसासोबत संगनमत करुन अपघाताचे वेळी सदर वाहन हे रविकांत श्रीधर जाधव हे चालवित होते असे म्हटले आहे पण त्यांचेकडे सूध्दा वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. अर्जदाराने काही कागदपञ दाखल केलेले नाहीत. त्यांना दि.14.10.2010 रोजी कायदेशीर नोटीस पाठविल्याबगददल कागदोपञी पूरावा द्वारे सिध्द केलेले नाही. अर्जदाराचा अर्ज ते मान्य करु शकत नाही. तसेच त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही अर्जदाराने विमा पॉलिसीच्या अटी प्रमाणे मयत प्रकाश शेतकरी असल्याबददल पूरावा, अपघाती मृत्यू झाल्याबददल कागदपञ, 7/12, एफ.आय.आर.घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, चालकाचा वैध व प्रभावी वाहन चालविण्याचा परवाना, वयाचा पूरावा, गाव नमूना सहा क, ड , मृत्यू प्रमाणपञ, इत्यादी कागदपञ दाखल केलेले नाहीत. म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे तर्फे शपथपञ दाखल केलेले आहे. 4. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.15.10.2009 रोजी झाला व त्यांना क्लेम हा दि.24.12.2009 रोजी प्राप्त झाला पण तो क्लेम सोबत काही कागदपञ कमी होते जसे की, ड्रायव्हींग लायसन्स, आरसी बूक, पोलिस अधिकारी यांचे सांक्षाकीत, या बाबत अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.1 मार्फत दि.5.2.2010 रोजी कळविण्यात आले.परत दि.1.1.6.2010 व दि.6.10.2010 रोजी परत पञ देण्यात आले. त्यामूळे अर्जदारांचा क्लेम हा प्रलंबित आहे. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 5. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून व दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 6. अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव प्रकाश दत्तराव शिंदे दाखवलेले आहे. ज्यामध्ये कविता ही प्रकाशराव यांची पत्नी आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा या ठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत प्रकाशराव यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार ही मयत प्रकाशराव यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- 7. अर्जदार हीने मयत प्रकाशराव यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत प्रकाशराव यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत प्रकाशराव हे दि.15.10.2009 रोजी मोटार वाहन अपघातामध्ये जागेवरच मरण पावले हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे ? अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराचा मृत्यू अटोच्या धडकेने झाला अशी माहीती पोलिस स्टेशन हिमायमनगर येथे दिलेली आहे. त्याबददल जवाब घेण्यात आला व घटनास्थळ पंचनामा दाखल केला. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत प्रकाशराव हे अटो पलटी झाल्याने गंभीर मार जागून जागीच मरण पावले हे सिध्द झालेले आहे. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये प्रकाशराव यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.15.10.2009 रोजी घटना घडली आहे व त्याबददलची कागदपञे गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी विम्याची रक्कम दिली नाही. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. 8. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी व त्या रक्कमेवर दि.14.10.2010 पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याजाने रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना दयावे लागेल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |