जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/327 प्रकरण दाखल तारीख - 31/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 06/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या 1. श्रीमती.अनुराधाबाई भ्र. गंगाधार सुरनर, वय वर्षे 25, धंदा- घरकाम,. अर्जदार. 2. संगीता पि.गंगाधर सुरनर, वय वर्षे 4, अज्ञान तर्फे अ.पा..क. आई, अर्जदार क्र. 1 अनुराधाबाई गंगाधर सुरनर, रा.आंडगा पो.माळेगांव ता.लोहा जि.नांदेड. विरुध् 1. तालूका कृषी अधिकारी पार्डी, ता.लोहा जि.नांदेड. गैरअर्जदार 2. व्यस्थापक/मॅनेजर, रिलांयन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि, 19 रिलायंन्स सेंटर, वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट,मुंबई -400 038. 3. व्यवस्थापक, रिलांयन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि, उज्वल इंटर प्रायझेसच्यावर हिंगोली नाका, नांदेड. 4. कबाल इंशूरंस सर्व्हिसेस प्रा.लि. दिशा अलंकार शॉप नं. 2, टाऊन सेंटर, सिडको, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद – 431003. अर्जदारा तर्फे वकील - अड.उध्दव आ.पौळ. गैरअर्जदार क्र. 1 – स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.ए.जी.कदम गैरअर्जदार क्र. 4 - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) अर्जदार श्रीमती अनुराधाबाई भ्र.गंगाधर सुरनर रा.आंडगा पो.माळेगांव ता.लोहा जि.नांदेड येथील रहीवाशी असून ती मयत शेतकरी गंगाधर पि.संभाजी सुरनर यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती नामे गंगाधर पि. संभाजी सुरनर हे दि.13/05/2009 रोजी रान डुक्कर चावले त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना त्याच दिवशी सुमारे 3.00 च्या दरम्यान त्यांचा अहमदपूर येथील सरकारी दवासखान्यात मृत्यु झाला. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा व मृत्यु संबंधी इतर कागदपत्रे दाखल केलेले आहेत. सदर घटनेची आकस्मीक नोंद क्र.0/09 अहमदपूर पोलिस स्टेशन येथे झाली. सदरचा घटनास्थळ व आंडगा गांव, माळाकोळी पोलिस स्टेशन हद्यीत असल्याने सदर घटेनची माहीती पोलिस स्टेशन माळाकोळी यांना देण्यात आली, त्यावरुन पोलिस स्टेशन माळाकोळी यांनी आ.मृ.क्र.11/2009 कलम 174 सी.आर.पी.सी.प्रमाणे केली व साक्षीदाराचे बयान नोंदविले. अर्जदाराचे पती गंगाधार पि.संभाजी सुरनर हे व्यवसायाने शेतकरी होते, त्यांच्या नांवे मौजे आंडगा येथे गट नं 529 मध्ये क्षेत्रफळ 0 हेक्टर 40 आर एवढी जमीन आहे व त्या जमीनीचे ते मालक व ताबेदार होते, ते 7/12 धारक शेतकरी होते. अर्जदाराने 7/12 चा उतारा, नमुना नं. 8 चा उतारा व 6 क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-याचे, शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी शेतक-याचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे काढले व त्याचे प्रिमीअम गैरअर्जदार क्र. 2 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याच्या हक्कात दिला. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्याचे प्रिमीअम महाराष्ट्र शासनाने भरलेले आहे व तो लाभार्थी आहे म्हणून अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे ग्राहक आहेत. सदरील पॉलिसीचा कालावधी हा 15 ऑगष्ट 2009 ते ऑगष्ट 2010 असा आहे व घटना ही दि.16/09/2009 ची आहे व मृत्यु 14 जुलै 2009 आहे. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. अर्जदाराने आपल्या पतीच्या मृत्युनंतर क्लेम दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1,2 व 3 यांचेकडे दि.14/08/2009 रोजी क्लेम दाखल केल्यापासुन विम्याची रक्कम मिळण्यासाठी अनेक वेळा तोंडी विनंती केली पण गैरअर्जदार यांनी आज या, उद्या या म्हणुन नेहमी टाळाटाळ करीत राहीले व अर्जदाराने गैरअर्जदाराकडे चकरा मारुन सुध्दा आजपर्यंत विम्याची नुकसान भरपाई दिलेली नाही जे की, नियमानुसार एक महिन्याच्या आत देणे बंधनकारक आहे तरीपण त्यांनी दिली नाही. म्हणुन अर्जदाराने शेवटी वकीला मार्फत दि.13/12/2010 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली तरीपण गैरअर्जदारांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिली नाही म्हणुन अर्जदाराने तक्रारअर्ज दाखल केला आहे. त्यांची मागणी आहे की, अर्जदारास शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-, 12 टक्के व्याजाने सन 2009 पासून अर्जदारास द्यावेत. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- अर्जदारास द्यावेत. गैरअर्जदार क्र. 1 हे हे हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे की, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-याच्ंया वारसांना रु.1,00,000/- अपघात विमा कंपनीकडुन देण्याची योजना आहे. अपघात विमा मिळण्यासाठीचा प्रस्ताव मयत शेतक-याच्या वारसाने या कार्यालयास त्वरीत सादर करणे आवाश्यक आहे. श्रीमती अनुराधाबाई गंगाधर सुरनर मयत शेतक-याच्या पत्नीने दि.14 ऑगष्ट 2009 रोजी मंडळ कृषी अधिकारी लोहा कार्यालयास प्रस्ताव सादर केला. मंडळ कृषी अधीकारी यांनी त्याच दिवशी प्रस्ताव तालुका कृषी अधीकारी कार्यालयास सादर केला. तालुका कृषी अधिकारी यांनी सदर प्रस्ताव तपासून हा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास सादर करण्यासाठी या कार्यालयाचे पत्र क्र.1251 दि.01/12/2009 रोजी सादर करण्यास या कार्यालयाचे खास दुतामार्फत पाठविण्यात आले आहे. परंतु तेथे सदर प्रस्तावास त्रुटी आहेत म्हणुन प्रस्ताव स्विकारला नाही. त्यामुळे सदर प्रस्ताव परत आणण्यात आला. सदर प्रस्ताव या कार्यालयाकडे दि.13/10/2010 रोजी फेर सादर झालेले आहे. नंतर या कार्यालयाने सदर प्रस्ताव पत्र क्र.1233 दि.14/10/2010 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांनी त्यांचे पत्र क्र.5314 दि.15/10/2010 रोजी विमा कंपनीकडे पाठविले सोबत पत्राची प्रत जोडलेली आहे, असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले त्यांचे म्हणणे असे की,अर्जदाराची तक्रार ही खोटी असुन फेटाळण्यात यावी. अर्जदार यांनी पत्नी असल्याबद्यल कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. मयत गंगाधार यांचा मृत्यू अपघाताने झाला हे अर्जदाराने सिध्द करायचे आहे. गैरअर्जदार यांना हे मान्य नाही की, पंचनामा व साक्ष झालेली आहे. अर्जदार यांनी हे सिध्द करायचे आहे की, गट नं.5296 मध्ये .40 आर जमीन मयत गंगाधर यांचे नांवाने आहे. गैरअर्जदारांना हे मान्य नाही की, अर्जदाराचे पती हे शेतकरी असून गैरअर्जदार क्र. 2 चे ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदार यांना कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही, त्यामुळे ते कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा दावा फेटाळलेला नाही त्यामुळे अर्जदार यांची तक्रार ही अपरिपक्व आहे. गैअर्जदार क्र. 1 यांनी मागतल्याप्रमाणे अर्जदार यांनी कागदपत्र दाखल केलेले नाही. अर्जदार यांना तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदार यांनी मागीतलेली नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार नाही. अर्जदार यांनी मुदतीनंतर तहसीलदार यांचेकडे क्लेम दाखल केलेला आहे त्यामुळे तो फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी सदर तक्रार दिवाणी न्यायालयात दाखल करावी. गैरअर्जदार यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.13.05.2009 रोजी झाला व त्यांना क्लेम हा दि.21.10.2010 रोजी प्राप्त झाला पण तो क्लेम सोबत काही कागदपञ कमी असल्याचे दि.14/11/2009 रोजी कळविण्यात आले. पॉलिसीच्या कराराप्रमाणे क्लेम हा 90 दिवसांत प्राप्त न झाल्यामुळे क्लेम रिलायंन्स जनरल इंशुरन्स कंपनी मुंबई यांचेकडे पाठविण्यात आले त्यांनी क्लेम बाबत लिमीटेशनचा मुद्या उपस्थित करुन दि.24/11/2010 क्लेम बंद केला.असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2,3 व 4 व यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुद्ये व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 अर्जदार यांनी जे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गांव नमूना 6 क व 7/12, वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव गंगाधर संभाजी सुरनर दाखवलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत गंगाधर संभाजी सुरनर यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार ही मयत गंगाधर संभाजी सुरनर यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र. 2 अर्जदार हीने मयत गंगाधर संभाजी सुरनर यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत गंगाधर संभाजी सुरनर यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत गंगाधर संभाजी सुरनर यांना रान डुक्कराने चावल्यामुळे त्यांचा दि.13.05.2009 अपघाती मृत्यू झाला, हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये मयताचा मृत्यू हा रान डुक्कराने चावा घेतल्याने झाला अशी माहीती पोलिस स्टेशन माळाकोळी यांनी अपघाती नोंद घेतली आहे. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत गंगाधर संभाजी सुरनर हे रान डुक्कराच्या चाव्याने अपघाती मरण पावले हे सिध्द झालेले आहे. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.2 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये गंगाधर संभाजी सुरनर यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.13.05.2009 रोजी घटना घडली आहे व त्याबददलची कागदपञे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे रिलांयन्स जनरल इन्शूरन्स कंपनी यांना दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी विम्याची रक्कम दिली नाही हे सिध्द होते. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आ वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी व त्या रक्कमेवर दि.10.12.2010 पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याजाने रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4 वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास दयावे लागेल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार. लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |