Maharashtra

Nanded

CC/11/31

Gangabai Dynoba Surner - Complainant(s)

Versus

Taluka Krishi Officer, Pardi Tq.Loha - Opp.Party(s)

U.A.Paul

20 May 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/11/31
1. Gangabai Dynoba SurnerGhotka Tq.LohaNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Taluka Krishi Officer, Pardi Tq.LohaPardi Tq. Loha NandedMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MR. President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :U.A.Paul, Advocate for Complainant

Dated : 20 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :- 2011/31
 
                                   प्रकरण दाखल तारीख -                 29/01/2011     
                                   प्रकरण निकाल तारीख              20/05/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.              -   सदस्‍या
 
गंगाबाई भ्र. ज्ञानोबा सुरनर,
वर्षे 40, धंदा घरकाम,
रा.घोटका ता.लोहा जि.नांदेड.                               अर्जदार.
 
      विरुध्
1.     तालुका कृषी अधिकारी, लोहा,
      ता.लोहा जि.नांदेड.
2.    व्‍यवस्‍थापक,
युनायटेड इंडिया इशुरन्‍स कंपनी लि,                  गैरअर्जदार
प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19,
तिसरा मजला, धरमपेठ एक्‍सटेंशन,
      शंकरनगर चौक, नागपूर – 440010.
3.    व्‍यस्‍थापक,
      युनायटेड इंडिया इंशुरन्‍स कंपनी लि,
      संतकृपा मार्केट, जी.जी.रोड, नांदेड.
4.    कबाल इशुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.
      दिशा अलंकार शॉप नं.2, टाऊन सेंटर,
      सिडको,कॅनॉट प्‍लेस, औंरगाबाद.
 
अर्जदारा तर्फे 1                 -   अड.स्‍वतः.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील  –    अड. अविनाशा जी.कदम
गैरअर्जदार क्र. 4                -  स्‍वतः
                                                          निकालपत्र
                               (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्‍या)
 
      अर्जदाराची पती नामे ज्ञानोबा भ्र केरबा सुरनर हे दि.18/02/2010 रोजी ऑटो क्र. एम एच. 24/जे 2771 मध्‍ये बसून अहमदपूकडे येत होते. सदर ऑटोच्‍या चालकाने त्‍याचा आटो भरधाव वेगात आणि निष्‍काळजीपणे चालविला त्‍यामुळे सदर ऑटो मोघा ते थोडगा पाटीचे मध्‍ये पलटी झाला त्‍यामुळे अर्जदाराच्‍या पतीस गंभीर जखमा झाल्‍या त्‍याना सरकारी दवाखान्‍यात अहमदपुर येथे आणले असता तेथील डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषीत केले. त्‍याबद्यल अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍युसंबंधी सर्व कागदपत्र दाखल केलेले आहे. सदरी घटनेबाबत पोलिस स्‍टेशन अहमदपुर जि.लातूर यांनी कलम 279, 304 भा.द.वि. नुसार गुन्‍हा क्र.31/2010 नोंदविला.
      अर्जदाराचे पती  ज्ञानोबा सुरनर हे व्‍यवसायाने शेतकरी होते, त्‍यांच्‍या नांवे मौजे घोटका येथे गट नं 145 मध्‍ये क्षेत्रफळ 0 हेक्‍टर, 65 आर एवढी जमीन आहे व त्‍या जमीनीचे ते मालक व ताबेदार होते, ते 7/12 धारक शेतकरी होते. अर्जदाराने 7/12 चा उतारा, नमुना नं. 8 चा उतारा व 6 क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-याचे, शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी शेतक-याचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे काढले व त्‍याचे प्रिमीअम गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याच्‍या हक्‍कात दिला. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्‍याचे प्रिमीअम महाराष्‍ट्र शासनाने भरलेले आहे व तो लाभार्थी आहे म्‍हणून अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे ग्राहक आहेत. सदरील पॉलिसीचा कालावधी हा 15 ऑगष्‍ट 2009 ते 14 ऑगष्‍ट 2010 असा आहे व घटना ही दि.18/02/2010 ची आहे व हा त्‍याच दिवसी म्‍हणजे मृत्‍यु दि.18/02/2010 आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्‍यास पात्र आहेत. अर्जदाराने आपल्‍या पतीच्‍या मृत्‍युनंतर क्‍लेम दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1,2 व 3 यांचेकडे क्‍लेम दाखल केल्‍यापासुन विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अनेक वेळा तोंडी विनंती केली पण गैरअर्जदार यांनी आज या, उद्या या म्‍हणुन नेहमी टाळाटाळ करीत राहीले व अर्जदाराने गैरअर्जदाराकडे चकरा मारुन सुध्‍दा आजपर्यंत विम्‍याची नुसान भरपाई दिलेली नाही जे की, नियमानुसार एक महिन्‍याच्‍या आत देणे बंधनकारक आहे तरीपण त्‍यांनी दिली नाही. म्‍हणुन अर्जदाराने शेवटी वकीला मार्फत दि.11/01/2010 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली तरीपण गैरअर्जदारांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिली नाही म्‍हणुन अर्जदाराने तक्रारअर्ज दाखल केला आहे. त्‍यांची मागणी आहे की, अर्जदारास शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-, 12 टक्‍के व्‍याजाने सन 2010 पासून अर्जदारास द्यावेत. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- अर्जदारास द्यावेत.   
      गैरअर्जदार क्र. 1 हे हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे सादर केले. गंगाबाई ज्ञानोबा सुरनर यांनी त्‍यांच्‍या कार्यालयास अपघात विमा दाखल केला होता. सदरील प्रस्‍तावाची छाननी करुन प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधीकारी यांना पाठविला. अधिक्षक कृषी अ‍धीकारी यांनी सदरी प्रस्‍ताव कबाल इन्‍शुरन्‍स यांना पाठविला. त्‍यांनी प्रस्‍तावामध्‍ये त्रुटी असल्‍याचे सांगून प्रस्‍ताव पुर्ण करुन पा‍ठविण्‍यास सांगीतले. सदरचा प्रस्‍ताव अधिक्षक, कृषी अधिकारी यांना प्रस्‍ताव प्राप्‍त झालेला नाही. प्रस्‍ताव प्राप्‍त होताच कबाल इंशुरन्‍सकडे पाठविण्‍ययत येईल.
      गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यांचे म्‍हणणे की, अर्जदारास प्रस्‍तुत अर्ज दाखल करण्‍याचा कोणताही कायद्याने अधिकार नाही. अधिकार नसतांना सुध्‍दा प्रस्‍तुत तक्रारअर्ज मा.न्‍यायमंचासमोर दाखल करुन मंचाची दिशाभूल करीत आहे. जे की, कायद्याने चुक असल्‍यामुळे तक्रारअर्ज रु.25,000/- दंड लावून फेटाळण्‍यास योग्‍य आहे. प्रस्‍तुत तक्रारअर्ज अपरिपक्‍व (Premature) आहे कारण अर्जदाराने प्रस्‍तुत दावा गैरअर्जदार क्र. 4 यांच्‍या मार्फत गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे दाखल केलाच नाही. जर क्‍लेम दाखलच केला नसेल तर गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी सदर न दाखल केलेला क्‍लेम नामंजूर करण्‍याचा किंवा क्‍लेम देण्‍यास टाळाटाळ करण्‍याचा किंवा विलंब करण्‍याचा किंवा सेवेत त्रुटी देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. असे असतांना सुध्‍दा अर्जदार प्रस्‍तुत न्‍यायमंचासमोर सत्‍य परिस्‍थीती लपवून मंचाचे दिशाभूल करीत आहे आणी खोटा दावा दाखल केलेला आहे. म्‍हणून अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र. 2 व 3 च्‍या विरुध्‍द खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील मधील सर्व मजकूर निखालस खोटे असून गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना मान्‍य नाही कारण सदर अपवघातासंबंधी किंवा सदर विमा क्‍लेम संबंधी कोणताही कागदोपत्री पुरावा गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्‍याकडे अर्जदाराने किंवा गैरअर्जदार क्र. 4 यांनी दाखल केले नाही. त्‍यामुळे सदर अपघाती विमा संबंधी गैरअर्जदार क्र. 1 व 2   यांच्‍या अर्जदाराप्रती कोणतेही जिम्‍मेदारी नाही जोपर्यंत अर्जदार यांनी विमा पॉलिसीच्‍या नियम व अटी अनसरुन कागदोपत्री पुरावा प्रतिवादी क्र. 2 व 3 यांच्‍याकडे रितसर अर्जासहीत दाखल करत नाही व आवश्‍यक बाबीचे पुर्तता करत नाही तोपर्यंत कसल्‍याही प्रकारची जिम्‍मेदारी राहत नाही. वास्‍तवात दि.18/02/2010 रोजी अर्जदाराचे पती ज्ञानोबा केरबा आटो क्र. एम.एच.24/जे -2771 च्‍या धडकेने झाला व त्‍यांना सरकारी दवाखान्‍यात उपचारासाठी अहमदपुर येथे शासकीय रुग्‍णांलयात दाखल केले नाही व त्‍यांचा मृत्‍यू दि.18/02/2010  जागीच ते मृत  झाला नाही व अहमदपुर  पोलिसांनी आकस्‍मात मृत्‍यू नोंदणी म्‍हणुन नोंद केली नाही व पंचनामा केला नाही. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील परिच्‍छेद क्र.2 व 13 यास उत्‍तर देण्‍याची गरज नाही. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील परिच्‍छेद क्र. 7,8,9,10 व 11 मधील ह सर्व मजकूर खोटी असून प्रतीवादी क्र. 2 व 3 यांना मान्‍य नाही. अर्जदाराचे पती सदर विमा पॉलिसीच्‍या अटी व नियमानुसार दि.18/02/2010 रोजी किंवा मयताचे मृत्‍युपूर्वी ते शेतकरी असल्‍याबद्यल व त्‍यांच्‍या मृत्‍यु दि.18/02/2010 रोजी झाल्‍याबद्यल व सदर विमा क्‍लेम प्रतीवादी क्र. 2 व 3 यांच्‍याकडे सर्व सत्‍यप्रती कागदपत्रासहीत प्रतीवादी क्र. 4 यांनी दाखल केल्‍याबद्यल व ते प्राप्‍त झाल्‍याबद्यल व दि.25/01/2011 रोजी कायदेशिर नोटीस पाठविल्‍याबद्यल कागदोपत्री पुराव्‍याच्‍या आधारे सिध्‍द करण्‍यात आला नाही. म्‍हणून अर्जदाराचे अर्ज प्रतीवादी क्र. 2 व 3 यांच्‍या विरुध्‍द फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. अर्जदाराने विमा पॉलिसीच्‍या अटी व नियमाचे पालन न केल्‍यामुळे व आवश्‍यक ते कागदपत्रांची पुर्तता केली नसल्‍यामुळे व त्रुटीची पुर्तता केली नसल्‍यामुळे अर्जदारास प्रतीवादी क्र.2 व 3 यांच्‍याकडुन कोणताही विमा रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.2010 पासुन 12 टक्‍के व्‍याज व रु.50,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- मागता येणार नाही. वरील सर्व गोष्‍टीचा विचार करुन अर्जदाराचा अर्ज प्रतीवादी क्र. 1 व 2 यांचे विरुध्‍द फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
            गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.18.02.2010 रोजी झाला व त्‍यांना क्‍लेम हा दि.21.10.2010 रोजी प्राप्‍त झाला पण तो क्‍लेम सोबत काही कागदपञ कमी असल्‍याचे दि.02/11/2010 रोजी कळविण्‍यात आले. परत दि.23/11/2010 व दि.06.12.2010 रोजी परत पञ देण्‍यात आले. त्‍यामूळे अर्जदारांचा क्‍लेम हा प्रलंबित आहे. म्‍हणून त्‍यांचे सेवेमध्‍ये कोणतीही ञूटी नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार ही फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
           
              अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2 व   यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात.
 
 
 
 
     मूददे                                                    उत्‍तर
 
1.     अर्जदार ग्राहक आहेत काय ?                                होय.
2.    गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्‍कम देण्‍यास
      बांधील आहेत काय ?                                      होय.
3.    काय आदेश  ?                                    अंतिम आदेशाप्रमाणे
 
मूददा क्र.1
                  अर्जदार यांनी इन्‍वेस्‍ट पंचनामाचे मृत्‍यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्‍ये मृत भोगवटदाराचे नांव ज्ञानोबा केरबा सुरनर दाखवलेले आहे. ज्‍यामध्‍ये गंगाबाई ही ज्ञानोबा यांची पत्‍नी आहे असे लिहीलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत ज्ञानोबा यांचे वारस आहेत हे सिध्‍द झालेले आहे. अर्जदार ही मयत ज्ञानोबा यांची पत्‍नी आहे हे सिध्‍द होत असल्‍यामूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
 
मूददा क्र.2 
                  अर्जदार ही मयत ज्ञानोबा यांचे नांवावर शेती असल्‍याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍यामध्‍ये मयत ज्ञानोबा यांचे नांवावर शेत जमीन असल्‍याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत बाजीराव हे दि.18.02.2010 रोजी त्‍यांचा ऑटोच्‍या पलटी खाल्‍यामुळे अपघाती मृत्‍यू झाला, हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्‍ये मृत्‍यूबदल पूरावा दाखल केला नाही म्‍हणून अमान्‍य आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्‍यामध्‍ये अर्जदाराचा मृत्‍यू हा झाला अशी माहीती पोलिस स्‍टेशन अहमदपुर यांनी अपघाती नोंद घेतली आहे. त्‍याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्‍यामूळे मयत ज्ञानोबा ऑटो पलटी खाल्‍यामुळे अपघाती मरण पावले हे सिध्‍द झालेले आहे. सन 2009-10 मध्‍ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्‍यांचा विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने भरला आहे. यामध्‍ये ज्ञानोबा यांचा सहभाग असल्‍यामूळे व अर्जदार ही त्‍यांची पत्‍नी असल्‍यामूळे ती प्रत्‍यक्षरित्‍या जरी नाही तरी अप्रत्‍यक्षरित्‍या अर्जदार ही ग्राहक आहे. त्‍यामूळे अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्‍यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्‍यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 4 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्‍याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.18.02.2010 रोजी घटना घडली आहे व त्‍याबददलची कागदपञे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे युनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी विम्‍याची रक्‍कम दिली नाही हे सिध्‍द होते. वरील सर्व कागदपञ सिध्‍द झाल्‍याने गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्‍कम रु.1,00,000/- एक महिन्‍याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
 
 
                  वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                                                                                     आदेश
 
1.                                          अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                          गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल कळाल्‍या पासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- रक्‍कम दयावी.
3.                                          मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
4                            वरील सर्व रक्‍कम एक महिन्‍याचे आंत न दिल्‍यास, एक 
महिन्‍यानंतर संपूर्ण रक्‍कमेवर 9 टक्‍के व्‍याज पूर्ण रक्‍कम  
फिटेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास दयावे लागेल.
5.                               पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                      श्रीमती सुवर्णा देशमूख          
     अध्‍यक्ष                                   सदस्‍या                                               
 
 
 
गो.प.निलमवार.
लघुलेखक
 
 
 
 
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT