जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2011/17 प्रकरण दाखल तारीख - 18/01/2011 प्रकरण निकाल तारीख – 05/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. श्रीमती सुमंगलाबाई भ्र.मारोती कापसे वय 41 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा. कापसी बु. ता.लोहा जि. नांदेड विरुध्द. 1. तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालय, लोहा ता.लोहा.जि.नांदेड 2. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19, गैरअर्जदार तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन, शंकर नगर चौक, नागपूर 3. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. शाखा गुरु कॉम्पलेक्स,जी.जी.रोड, नांदेड. 4. कबाल इन्शूरंन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस,सिडको औरंगाबाद-03. अर्जदारा तर्फे वकील - अड.के.जे.कवटीकवार गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः. गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.एस.जी.मद्ये गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष ) 1. अर्जदार सुमंगलाबाई ही मयत मारोती यांची पत्नी आहे. मयत मारोती पि.व्यंकोबा कापसे हे शेतकरी व्यवसाय करुन त्यांचे कूटूंबीयाचे व त्यांचे पालनपोषन करीत होते. त्यांचे नांवे शेत गट नंबर 319 मध्ये क्षेञफळ 2 हेक्टर 06 आर आणि स्थित मौजे कापसी बु. ता.लोहा येथे आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यास व त्यांचे कूटूंबियास सामाजिक न्याय देण्याच्या हेतूने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्यामध्ये मयत मारोती यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 ते 4 मार्फत उतरविण्यात आला आहे. सदर विम्याचा कालावधी ऑगस्ट 2009 ते ऑगस्ट 2010 असा होता. अर्जदाराचे पती दि.17.09.2009 रोजी ऑटो क्र.एम.एच.-26/एच-3091 च्या चालकाने त्यांचा ऑटो हलगर्जीपणे व निष्काळजीपणाने चालविला व त्याच ऑटोने मारोती कापसे यांना जोराची धडक दिली त्या अपघातात अर्जदाराचे पतीचा मृत्यू झाला.. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, एफ.आय.आर. मृत्यू संबंधी इतर कागदपञे इत्यादी आवश्यक त्या सर्व नियमानुसार कागदपञासह शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन उस्माननगर जि.नांदेड येथे गुन्हा नंबर 64/2009 कलम 279,337, 338, 304 (अ) फौ.प्र.सं द्वारे गून्हा नोंदविला आहे. घटनास्थळ पंचनामा व तपास केला. अर्जदाराने अर्जासोबत घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, 7/12 उतारावरील होल्डींग, आठ अ चा उतारा,सहा-क चा उतारा इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. अर्जदाराचा क्लेम हा गैरअर्जदार क्र.1 कडे कागदपञासह दाखल केला परंतु क्लेम रककम मिळाली नाही, म्हणून दि.13.12.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून नूकसान भरपाईची मागणी केली.नोटीस मिळूनही त्यांनी नूकसान भरपाई दिली नाही. म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की नूकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- व त्यावर दि.17.09.2009 पासून 12 टक्के व्याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. 2. गैरअर्जदार क्र.1 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचे पती मयत मारोती यांचा अपघात दि.18.09.2009 रोजी झाला. विमा प्रस्ताव हा अर्जदाराने अपूर्ण कागदपञासह विलंबाने सादर केला. अर्जदाराला काही कागदपञाची मागणी करण्यात आली परंतु त्यांनी अद्यापपर्यत कागदपञ सादर केले नाही म्हणून त्यांचा क्लेम हा विमा कंपनीस सादर करण्यात आला नाही. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते हे मान्य असून तसेच ते लाभार्थी होते हे सूध्दा मान्य आहे. परंतू अर्जदाराने कागदपञ सादर न केल्यामूळे प्रस्ताव त्यांचेकडे पडून आहे आताही त्यांनी कागदपञ सादर केल्यास ते विमा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यास तयार आहेत.म्हणून त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही म्हणून सदर तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. 3. गैरअर्जदार क्र,2 व 3 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही अपरिपक्व आहे.अर्जदाराने प्रस्तूत दावा हा गैरअर्जदार क्र.1 व 4 मार्फत गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्याकडे दाखल केलेला नाही.म्हणून दावा फेटाळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अर्जदार हे कागदपञाची पूर्तता करीत नसल्यामूळे त्यांचा क्लेम हा निकाली काढलेला नाही. ज्यामध्ये गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार ही मयत मारोती यांची पत्नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही ? तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत मारोती हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही ? तसेच मयत मारोती यांनी प्रत्यक्षरित्या गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. मयत मारोती हे दि.17.09.2009 रोजी ऑटो क्र.एम.एच.-26/एच-3091 च्या चालकाने त्यांचा ऑटो हलगर्जीपणे व निष्काळजीपणाने चालविला व त्याच ऑटोने मारोती कापसे यांना जोराची धडक दिली त्या अपघातात अर्जदाराचे पतीचा मृत्यू झाला हे अर्जदाराने सिध्द केलेले नाही ? अर्जदाराचा अपघात झाला हे गैरअर्जदार यांना मान्य नाही ? अर्जदाराचा अर्ज ते मान्य करु शकत नाही. अर्जदार यांची शेतकरी अपघात विमा पॉलिसी होती हे त्यांना मान्य आहे. अर्जदार यांने हे सिध्द करावे की, गैरअर्जदाराच्या सेवेत ञूटी आहे सदर तक्रार ही गैरअर्जदार यांना मानसिक ञास देण्यासाठी दाखल केलेली आहे म्हणून त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे तर्फे श्री. भगवान रामाजी कोठाळे यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. 4. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 मार्फत अर्जदाराचा क्लेम हा त्यांचाकडे दाखल झालेला नाही. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 5. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2, 3 व 4 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात ते मूदे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. (फक्त गैरअर्जदार क्र.2 व 3) 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 6. अर्जदारांनी मयत मारोती यांचे नांवे असलेल्या शेतीचा सातबारा दाखल केलेला आहे. त्यावरुन मयत मारोती हे शेतकरी होते हे सिध्द होते. त्यांचप्रमाणे अर्जदार यांनी 7/12 तसेच वारसा प्रमाणपञनमुना सहा-क,फेरफाराचे रजिस्ट्रर दाखल केलेले आहे.यामधील नोंदीनुसार मृत भोगवटदाराचे नांव मारोती दाखवलेले आहे. ज्यामध्ये सुमंगलाबाई ही मारोती यांची पत्नी आहे असे लिहीलेले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे ओळखपञ दाखल केले आहे त्यात सुमंगलाबाई हिचे पतीचे नांव मारोती असे दाखविलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत मारोती यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. म्हणून अर्जदार ही त्या योजनेचा लाभ घेण्यास हक्कदार आहे. अर्जदार ही मयत मारोती यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- 7. अर्जदार हीने मयत मारोती यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत मारोती यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत मारोती हे दि.17.09.2009 रोजी ऑटो क्र.एम.एच.-26/एच-3091 च्या चालकाने त्यांचा ऑटो हलगर्जीपणे व निष्काळजीपणाने चालविला व त्यांच ऑटोने मारोती कापसे यांना जोराची धडक दिली त्या अपघातात अर्जदाराचे पती हे मरण पावले हे पोलिस रिपोर्ट वरुन स्पष्ट होते. हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे, हे म्हणणे बरोबर नाही. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा ऑटोची धडक लागून गंभीर जखमी झाल्यामूळे त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याबददल जवाब घेण्यात आला व घटनास्थळ पंचनामा व पोस्ट मार्टेम अहवाल दाखल केला. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत मारोती हे ऑटोची धडक बसल्यामूळे त्यातच मृत्यू पावले हे सिध्द झालेले आहे. तसेच तलाठी यांचे प्रमाणपञानुसार मयत मारोती यांची पत्नी सुमंगला आहे हे सिध्द होते. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये पांडूरंग यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, बँकेचे पासबूक, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह तहसील कापसी बु. ता.लोहा यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 चे म्हणणे आहे की, अर्जदार यांचा क्लेम हा गैरअर्जदार क्र.1 व 4 मार्फत त्यांचेकडे आलेलाच नाही त्यामूळे त्यांच्या सेवेमध्ये ञूटीच नाही. मंचात तक्रार दाखल केली त्यासोबत सर्व कागदपञ जोडलेली आहेत व त्यानंतरही गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारी निकाली काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाही ? अर्जदार ही अडाणी असल्यामूळे व योजनेची माहीती नसल्यामूळे क्लेम दाखल करण्यास विलंब झाला परंतु शासनाच्या नियमानुसार असा विलंब माफ करावा असे शासनाचे निर्देश आहेत. अर्जदाराला दावा रक्कम दिली नाही असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केलेली आहे. सदरील सर्व कागदपञ तहसील कार्यालय लोहा यांना अर्जदार हिने पाठविले आहेत. यावरुन अर्जदाराने क्लेम तहसील यांचेकडे वेळेत पाठविला होता व त्यांनी तो कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविला आहे हे सिध्द होते. 8. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचंचे कार्यक्षेञ हे इतर पर्यायी सुवीधेसाठी पुरक आहे, त्यामुळे ही तक्रार या मंचासमोर चालू शकते. गैरअर्जदारांनी याबददल तोंडी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आहे पण त्या आक्षेपा पूष्टयर्थ कांहीही पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेले वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. 9. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 3. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना दयावे लागेल. गैरअर्जदार क्र. 1 व 4 विरुध्द आदेश नाही. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |