जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/314 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या प्रणिता भ्र. प्रदीप परबते वय वर्षे 32, धंदा घरकाम रा.खानापुर ता.देगलूर जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. तालुका कृषी अधिकारी,देगलूर ता.देगलूर जि.नांदेड 2. व्यवस्थापक/मॅनेजर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कपंनी लि. 19,रिलायंस सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038 गैरअर्जदार 3. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्या वर हिंगोली नाका,नांदेड. 4. कबाल इन्शूरंन्स सर्व्हीसेस प्रा.लि. दीशा अलंकार शॉप नं.2, टाऊन सेंटर,सिडको कॅनॉट, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे गैरअर्जदार क्र.1 तर्फे - स्वतः गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील - अड.ए.जी.कदम गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या ) अर्जदार हिने स्वतःहा मंचासमोर पुरसीस दिलेली आहे.त्यामध्ये कंपनीने गैरअर्जदार क्र.2,3, व 4 ने अर्जदार हिला मंचास कूठलीही कल्पना न देता परस्पर न्यायमंचाबाहेर रुपये एक लाखाचा चेक दिला असे ती स्पष्ट करते. खरे तर केस जेव्हा न्यायप्रविष्ठ आहे त्यावेळी परस्पर अर्जदार व गैरअर्जदार यांनी व्यवहार करणे न्यायोचित नाही. मंचासमोर तडजोडपञ दाखल करुनही ही तक्रार मिटवता आली असती, पण तसे झाले नसल्यामुळे अर्जदार हिस मानसिक ञास व दावा खर्चाची कूठलीही नुकसान भरपाई रक्कम देण्यात येऊ नये या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा. 2. खर्च ज्यांचे त्यांने सहन करावा. 3. उभयपक्षांना नीर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |