आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रार अर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत शेतकरी जनता
अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा परत एकदा सर्व
त्या आवश्यक कागदपत्रसह गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सादर करावा, व
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तो स्विकारावा.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराचा सदरचा विमादावा त्यांच्या कार्यालयाकडे
प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत सदरचा विमादावा जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी परभणी यांचे मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवावा.
4 गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरचा विमादावा प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या
आत कागदपत्रची छाननी करुन सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 3
व 4 विमा कंपनीकडे पाठवावा.
5 गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 विमा कंपनीने सदरचा विमादावा त्यांच्या कार्यालयाकडे
प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत पॉलिसीच्या नियमा प्रमाणे गुणवत्तेवर
निकाली काढावा.
6 तक्रार अर्जाचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
7 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.