1. तक्रारदार यांचे कुटूंब एकत्रित कुटूंब असून त्यांचे कुटूंबात चार अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना शासना मार्फत अनुदानावर सोयाबिन बियाणे प्राप्त होण्यासाठी वि.प.क्रं 1 तालुका कृषी अधिकारी यांचे कडून परवाने मिळाले. तक्रारदार CC/103-2011 यांची मुख्य तक्रार ही वि.प.क्रं-2 महाबिज निर्मित सोयाबिन बियाण्याच्या दोषा संबधीची आहे. 2. सरकारी परवान्या प्रमाणे तक्रारदार यांना 3 बॅग, त.क.यांच्या पत्नी सौ.रुख्माबाई देवीदास गोटेफोडे यांना 1 बॅग आणि त्यांची मुले सर्वश्री उमेश देविदास यांना 2 बॅग आणि रमेश देवीदास यांना 1 बॅग असे महाबिजचे सोयाबिन बियाणे मिळणार होते. सोयाबिन बियाण्याचा दर प्रती बॅग रुपये-588/- या प्रमाणे होता. त्याप्रमाणे तक्रारदार व त्यांचे कुटूंबियांनी खालील प्रमाणे सोयाबिन बियाणे विकत घेतले. 3. त.क.चे तक्रारी वरुन विकत घेतलेल्या बियाण्याचा तपशिल खालील प्रमाणे
अक्रं | बियाणे विक्रेत्याचे नाव | विकत घेतलेले बियाणे | लॉट क्रमांक | प्रतीबॅग वजन 30 किलो, दर प्रत्येकी रुपये 588/- प्रमाणे विकत घेतलेल्या बॅग्स | बिल क्रमांक व दिनांक | बिलावर विकत घेणा-याचे नाव | बिलाची एकूण रक्कम रुपया मध्ये | शेरा | 1 | सचिन कृषी सेवा केंद्र, गिरड | सोयाबिन 335 महाबिज | ऑक्टों. 11/ 368-86619 II | 3 बॅग | 482 दि.12.06.2011 | देविदास गोविंदराव गोटेफोडे | 1764/- | | 2 | सचिन कृषी सेवा केंद्र, गिरड | सोयाबिन 335 महाबिज | जाने.11/-13-3201 -522 | 1 बॅग | 483 दि.12.06.2011 | रुख्माबाई देविदास गोटेफोडे | 588/- | | 3. | सचिन कृषी सेवा केंद्र, गिरड | सोयाबिन 335 महाबिज | ऑक्टों.-10/120/368-86619 II | 2 बॅग | 484 दि.12.06.2011 | उमेश देविदास गोटेफोडे | 1176/- | | 4. | जयकिसान अग्रो एजन्सीज, गिरड | सोयाबिन जे.एस.335 महाबिज | बॅच नं.39430 | 1 बॅग | 2035 दि.19.06.2011 | रमेश देविदास गोटेफोडे | 588/- | |
4. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांनी सदर बियाणे हे उमेश देविदास गोटेफोडे व त्यांची आई सौ.रुख्माबाई देविदास गोटेफोडे यांचे एकत्रित सलग शेत सर्व्हे नंबर 377/2 व 377/1 एकूण आराजी 3.76 हेक्टर आर मध्ये 7 एकरात जमीनयोग्य असल्यामुळे योग्य मशागत करुन तसेच रासायनिक खते देउन दिनांक 20.06.2011 रोजी पेरले.
CC/103-2011 5. परंतु पेरणी नंतर दिनांक 29.06.2011 पावेतो योग्य प्रकारे सोयाबिन बियाण्याची उगवण न झाल्यामुळे दिनांक 30.06.2011 रोजी वि.प.क्रं 1 व कृषी अधिकारी, पंचायत समिती, समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांचेकडे लेखी तक्रार केली असता त्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दिनांक 08.07.2011 रोजी प्रत्यक्ष्य पाहणी करुन, त्यानुसार पाहणी अहवाल दिनांक 25.07.2011 रोजी दिला. सदर पाहणीचे वेळी समिती सदस्यां सोबत श्री सुधीर पोहणकर कंपनी प्रतिनिधी व श्री राजू भगत, दुकानदार प्रतिनिधी सुध्दा उपस्थित होते. 6. जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने आपल्या अहवालात श्री उमेश देविदास गोटेफोडे राहणार गिरड यांचे सोयाबिन पेरणी केलेल्या शेताची पाहणी केली असून दिनांक 20.06.2011 रोजी महाबिज सोयाबिन बियाण्याचे एस 335 वाण लॉट नंबर 86619 ची पेरणी 7 एकर मध्ये केली असता, उगवण कमी झाल्याचे नमुद केले. समितीने पुढे नमुद केले की, 7 एकरा मध्ये 7 बॅग सोयाबिन बियाण्याची उगवण कमी झाल्याचे आढळून आले. उगवण कमी झालेल्या क्षेत्रातील 1X1 मीटर मधील झाडांच्या संख्येची रॅन्डम पध्दतीने मोजणी करण्यात आली. शिफारसी नुसार 1X1 मीटरमध्ये 44 झाडे आवश्यक असताना प्रत्यक्ष्यात मात्र 1X1 मीटरमध्ये सरासरी 17 झाडे आढळून आलीत व त्याची टक्केवारी ही 39 टक्के एवढी येते. समितीने आपल्या निष्कर्षात पुढे असेही नमुद केले की, क्षेत्रानुसार पेरणी केलेल्या बियाण्याचे प्रमाण योग्य आहे. प्रमाणका नुसार 70 टक्के बियाण्याची उगवण आवश्यक असयताना प्रत्यक्ष्य पाहणीचे वेळी रॅन्डम पध्दतीने मोजणी केली असता उगवण ही 39 टक्के पर्यंत झाल्याचे दिसून आले, त्यामुळे सदर बियाणे मानका नुसार योग्य दर्जाचे नाही असे नमुद केले. सदर लॉट बियाणे उपलब्ध नसल्याने तपासणी करीता नमुना घेण्यात आलेला नाही असेही समितीने नमुद केले. 7. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांना खालील प्रमाणे पेरणीसाठी विविध बाबींवर खर्च करावा लागला जसे एकूण 7 बॅग सोयाबिन बियाण्याची किंमत रुपये-4,116/- तसेच बिल क्रं 1397 दिनांक 15.06.2011 नुसार खताचा खर्च रुपये-3,700/- पेरणीखर्च रुपये-800/-, खताची मात्रा देण्यासाठी आलेला मजूरीचा खर्च रुपये-400/- या प्रमाणे एकूण खर्च रुपये-9016/- आलेला आहे. तसेच सोयाबिन बियाण्या पासून अपेक्षीत उत्पन्न हे प्रतीबग 10 क्विंटल प्रमाणे असल्याने व तक्रारदार यांनी एकूण 07 बॅग बियाण्याची पेरणी केली असल्यामुळे त्यांना CC/103-2011 70 क्विंटल सोयाबिन बियाणे अपेक्षीत होते. सोयाबिन बियाण्याचा प्रचलीत दर हा प्रतीक्विंटल रुपये-2300/- असल्यामुळे 70 क्विंटलचे रुपये-1,61,000/- एवढी किंमत येते. अशाप्रकारे तक्रारदार यांचे एकूण रुपये-1,70,016/- एवढे आर्थिक नुकसान झालेले आहे व तेवढी नुकसान भरपाई वि.प.कडून त.क.नां समभागात मिळावी अशी प्रार्थना तक्रारदार यांनी प्रतिज्ञालेखावरील तक्रारीद्वारे केली. 8. प्रस्तुत प्रकरणात वि.जिल्हा न्यायमंचाचे मार्फतीने यामधील विरुध्दपक्षांना नोटीसेस काढण्यात आल्या असता त्यांनी उपस्थित होऊन आप-आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले. 9. वि.प.क्रं 1 यांनी आपले लेखी उत्तरात नमुद केले की, त्यांनी तक्रारदार यांना सोयाबिन बियाणे पुरविण्याची जबाबदारी नसून , वि.प.क्रं 2 मार्फतीने बियाणे पुरविण्यात येते, ते केवळ परमिट देण्याचे कार्य करतात . बियाण्याची कमी उगवण याचेशी वि.प.क्रं 1 चा कोणताही प्रत्यक्ष्य संबध नाही, यामध्ये जी काही जबाबदारी येते ती वि.प.क्रं 2 ची आहे. म्हणून वि.प.क्रं 1 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 10. वि.प.क्रं 2 यांनी आपले लेखी उत्तरात नमुद केले की, त.क.यांनी खरेदी केलेले नमुद सोयाबिन बियाणे हे कोठून खरेदी केले या बद्यल वि.प.क्रं 2 यांना माहिती नाही. तक्रारीतील नमुद लॉट नंबर जाने-11/13-3201-522 हा क्रमांक सोयाबिन लॉटचा नसून तुरीचा आहे, तक्रारदार यांनी त्या बाबत खोटी माहिती तक्रारीत नमुद केलेली आहे. तक्रारीत नमुद पाहणीचे वेळी जिल्हास्तरीय समिती सोबत उपस्थित असलेले सदस्य ही माहिती खोटी आहे.तक्रारदार यांचे एकूण रुपये-1,61,000/- एवढे नुकसान झाले ही बाब सुध्दा खोटी आहे. तक्रारदार यांनी केलेली अन्य सर्व विपरीत विधाने त्यांनी नाकबुल केलीत. आपले विशेष कथनात नमुद केले की, त.क.ने नमुद केलेले बियाणे कोणत्या प्रकारच्या जमीनीत पेरले हे तक्रारीत नमुद केलेले नाही कारण ज्या जमीनीत सोयाबिन बियाणे पेरले ती जमीन सोयाबिन पिका करीता उपयुक्त व अनुकूल नाही. त.क.ने सदर बियाणे नेमके कोणत्या जमीनीत पेरले या बद्यल पुरावा नाही.
11. वि.प.क्रं 2 यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारी सोबत 7/12 चा उतारा सुध्दा जोडलेला नाही. त.क.ने सदर बियाणे चुकीचे साधनांचे आधारे पेरले तसेच CC/103-2011 सदर बियाणे शास्त्रशुध्द व आवश्यक त्या पध्दतीने पेरलेले नाही. पेरणीचे वेळी कुशल मजूर नव्हते व त्यांना पेरणीचा अनुभव नव्हता त्यामुळे बियाणे चुकीचे पध्दतीने पेरण्यात आल्याचे निदर्शनास आले. त.क.ने ज्यावेळी सोयाबिन बियाणे पेरले त्यावेळी वातावरण सोयाबिन पिकास अनुकूल व पोषक नव्हते व पुरेश्या प्रमाणात पाऊस पडलेला नव्हता असे निदर्शनास आलेले आहे. त.क.ने जमीनीचा पोत, जमीन सोयाबिन पिकास अनुकूल आहे किंवा कसे, शेताचा सासू कसा व किती आहे, त्यात अन्य पिके होतात किंवा नाही या बाबतची माहिती नमुद केली नाही वा त्या संबधाने पुरावा दाखल केला नाही. त.क.यांनी नमुद सोयाबिन लॉट पासून अन्य शेतक-यांना भरपूर उत्पादन झालेले आहे. 12. वि.प.क्रं 2 यांनी असे नमुद केले की, बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल हा पूर्णपणे चुकीचा व कायद्यातील तरतुदी नुसार तयार केलेला नाही. उगवण शक्ती कमी असणे किंवा पिक पेरणी नंतर भेसळ निघाल्यास कोणत्या कार्यपध्दतीचा अवलंब करावा या बाबत महाराष्ट्र राज्य कृषी संचालनालय पुणे यांनी दिनांक 24 मार्च, 1992 रोजीचे शासकीय परिपत्रक काढून मार्गदर्शन केलेले आहे. सदर समीतीने पाहणीचे वेळी पंचनामा केला नाही, शेताचा नकाशा काढला नाही, शेतामध्ये कोणकोणती पिके होती या बद्यल उल्लेख केलेला नाही. तसेच वादातील सोयाबिन बियाण्याचे लॉटचे बियाणे लगतचे अन्य शेतक-यांनी पेरले त्यांचे शेताची समितीने पाहणी केलेली नाही. समितीने नोंदविलेला निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला त्याचा उल्लेख अहवालात नाही. त्यामुळे सदर अहवाल पूर्णपणे फेटाळण्या योग्य आहे. सबब त.क.ची तक्रार पूर्णपणे खोटी व निराधार असयून, त.क.ने त्यांना अपेक्षीत उत्पन्ना बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रार खारीज व्हावी असा उजर वि.प.क्रं 2 यांनी घेतला. 13. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर सादर केली. सोबत तक्रार चालविण्या करीता डॉ.श्री नामदेव नारायण बेहरे यांचे नावे असलेले अधिकारपत्र दाखल केले.तसेच पान क्रं 7 वरील यादी नुसार दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये बियाणे खरेदी बिलाच्या प्रती, बियाणे पिशवी वरील लेबल, तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केलेली तक्रार, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचा अहवाल, प्रतिनिधीला दिलेले अधिकारपत्र इत्यादीचा समावेश आहे. त.क.यांनी पान क्रं 44 वर वि.प.क्रं 2 चे लेखी उत्तरास प्रतीउत्तरा दाखल प्रतिज्ञालेख दाखल केलेला आहे. तसेच पान क्रं 46 व 47 वर तलाठी प्रमाणपत्र, पान क्रं 48 ते 51 वर 7/12 उतारा प्रती, पान क्रं 52 वर शेताचा नकाशा तसेच वृत्तपत्र कात्रण दाखल केले. CC/103-2011 14. वि.प.क्रं 1 यांनी लेखी उत्तर पान क्रं 28 ते 30 वर प्रतिज्ञालेखावर दाखल केले. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत. 15. तर वि.प.क्रं 2 यांनी आपले लेखी उत्तर पान क्रं 31 ते 34 वर दाखल केले. सोबत पान क्रं 36 वरील यादी नुसार एकूण पाच दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये मटेरियल ट्रॉन्सफर नोट, बियाणे मुक्तता अहवाल इत्यादीचा समावेश आहे. तसेच पान क्रं 56 ते 58 वर आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. 16. उभय पक्षांचे शपथे वरील लेखी कथन, दाखल कागदोपत्री पुरावे, लेखी युक्तीवाद यांचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर व उभय पक्षांचा युक्तीवाद काळजीपूर्वक ऐकल्या नंतर मंचाद्वारे निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) त.क.नां निकृष्ट बियाणे पुरवून दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. (2) जर होय, तर, त.क.चे उत्पन्नाचे नुकसान झाले आहे काय ? होय. (3) नुकसान भरपाईसाठी कोण वि.प. वि.प.क्रं 2 जबाबदार आहेत? (4) काय आदेश? अंतीम आदेशा नुसार : कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 व 2 17. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजां वरुन ही बाब स्पष्ट होते की, वि.प.क्रं 2 द्वारा निर्मित व वि.प.क्रं 1 चे मार्फतीने विक्री केलेल्या सोयाबिन बियाण्याच्या 07 पिशव्या त.क.ने त्याचे शेतात पेरल्या होत्या व त्याचा लॉट क्रमांक- ऑक्टों 11/368-86619 II-03 बॅग तसेच ऑक्टों-10/120/368-86619 - II 02 बॅग तसेच बॅच नंबर 39430-01 बॅग असा होता, या बद्यल उभय पक्षांमध्ये वाद नाही. 18. त.क.ने नमुद केले की, त्याने पेरणी पूर्वी जमीनीची योग्य मशागत करुन तसेच योग्य मात्रेत रासायनिक खते देऊन दिनांक 20.06.2011 रोजी CC/103-2011 एकूण 7 एकर क्षेत्रात सदर बियाण्याची पेरणी आपले शेतात केली मात्र वादातील सोयाबिन बियाण्याची दिनांक 29.06.2011 पर्यंत उगवण न झाल्याने त.क.ने या बद्यल वि.प.क्रं 1 यांचेकडे लेखी तक्रार केली असता त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दिनांक 08.07.2011 रोजी मोक्यावर प्रत्यक्ष्य पाहणी करुन त्यानुसार पाहणी अहवाल दिनांक 25.07.2011 रोजीचा दिला. त.क.ने पुढे असेही नमुद केले की, त्याने योग्य ती काळजी घेऊन व योग्य मशागत करुन बियाण्यांची पेरणी केली, तरी देखील बियाण्यांची उगवण खूपच कमी झाली. 19. वि.प.क्रं 2 ने युक्तीवादात नमुद केले की, पेरणीचे वेळेस असलेले वातावरण, पडलेला पाऊस, जमीनीतील ओलावा तसेच जमीनीची प्रत इत्यादी संबधाने नोंद असलेला कोणतीही पुरावा त.क.ने प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेली नाही. तसेच त.क.ने त्याचे शेतात योग्य त्या प्रमाणात किटकनाशके , खते इत्यादीचा वापर केल्या बद्यल कुठेही स्पष्ट होत नाही आणि पेरणीचे वेळी पुरेश्या प्रमाणात पाऊस पडला नव्हता त्यामुळे पेरणी विलंबाने झाल्यास उगवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तसेच तांत्रिक मार्गदर्शना अभावी आणि योग्य पाऊस नसल्यास सोयाबिन संवेदनशिल बियाणे असल्यामुळे त्याची कमी उगवण होऊ शकते. वि.प.क्रं 2 यांनी पुढे असेही नमुद केले की, त.क.ने शास्त्रशुध्द पध्दतीने बियाणे पेरले नाही कारण पेरणी करते वेळी असलेले मजूर हे कुशल नव्हते. 20. वि.प.क्रं 2 यांनी युक्तीवादात असेही नमुद केले की, त.क.ने खरेदी केलेल्या सोयाबिन बियाण्याचे लॉटपैकी अन्य शेतक-यांनी देखील वादीत लॉटमधील बियाणे खरेदी केले होते व त्यांना भरपूर उत्पादन झालेले आहे परंतु वि.प.क्रं 2 यांनी मंचा समक्ष सदर भरपूर उत्पादन झालेल्या शेतक-यांचे शपथपत्र दाखल न करुन सदर म्हणणे सिध्द केलेले नाही. 21. मंचाचे मते,त.क.ने कोणताही सबळ पुरावा दाखल केलेला नाही, जेणेकरुन वि.प.चें आक्षेप पूर्णपणे फेटाळल्या जाऊ शकतील. तरी देखील मंचा समक्ष ही बाब स्वंयस्पष्ट होते की, त.क. हा शेतकरी आहे आणि त.क. सदर महाग बियाणे हे, कोणतेही कारण नसताना, योग्य वातावरण नसताना व योग्य मशागती शिवाय त्याची पेरणी आपल्या शेतात करेल. मंचा समक्ष वि.प.नीं सुध्दा सिध्द केलेले नाही की, त.क.ने त्याचे शेतात केंव्हा सदर बियाण्यांची पेरणी केलेली आहे आणि त.क.ची शेती करण्याची पध्दती ही अतांत्रिक आहे. CC/103-2011 22. त.क.ने नमुद केले की, जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अधिका-यांनी वादातील पिकाची त.क.चे शेतात प्रत्यक्ष्य पाहणी केली आणि त्यामध्ये त्यांना वादातील सोयाबिन बियाण्याची उगवण ही अत्यंत कमी झाल्याचे आढळून आले आणि 1x1 मीटर मध्ये सरासरी 17 झाडे आढळून आली व त्याची टक्केवारी ही फक्त 39 टक्के एवढी येते, जेंव्हा की हे प्रमाण 1x1 मीटर मध्ये सरासरी 44 झाडे म्हणजेच 70 टक्के असावयास हवी होती. त.क.ने शपथपत्र दाखल करुन नमुद केले की, वादातील सोयाबिन बियाण्याची उगवण ही फक्त 25 टक्के झालेली आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने आपले मत नोंदवित नमुद केले की, सदर वादातील सोयाबिन बियाणे हे मानका नुसार योग्य दर्जाचे नव्हते. 23. वि.प. क्रं 2 तर्फे सदर कथनास ठाम आक्षेप नोंदविण्यात आला आणि वि.प.नी युक्तीवादात नमुद केले की, सदर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने अवलंबलेली पिक पाहणीची पध्दत आणि त्यावरुन निष्कर्ष काढण्याची पध्दत ही शासनाने विहित केलेल्या पध्दती नुसार किंवा कृषी विभागाने/कृषी विद्यापिठाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वा नुसार नाही. सदर पिक पाहणीची पध्दती ही पूर्णतः अतांत्रिक आहे. तसेच जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने वादातील सोयाबिन बियाण्याचा नमुना सुध्दा घेतलेला नाही आणि बियाणे कायद्यातील तरतुदी नुसार योग्य ती कार्यवाही केलेली नाही. 24. उभय पक्षांचे युक्तीवादा वरुन वि.जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे असे मत झालेले आहे की, सदर वादातील सोयाबिन बियाण्या संबधाने जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा पिक पाहणी अहवाल हा प्रकरणात दाखल आहे. सदर अहवाला नुसार, वि.प.क्रं 2 चे प्रतिनिधी हे पिक पाहणीचे वेळेस प्रत्यक्ष्य मोक्यावर उपस्थित होते. मंचा समक्ष ही बाब कुठेही स्पष्ट झालेली नाही की, पाहणीचे वेळी जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने निष्कर्ष काढण्यास अवलंबलेली पध्दत योग्य नाही, असा आक्षेप वि.प.चे वतीने त्यांचे प्रतिनिधी यांनी घेतला आहे किंवा नाही ? मंचा समक्ष ही बाब स्पष्ट होते की, पिक पाहणीचे वेळी असे कोणतेही आक्षेप वि.प.चें वतीने त्यांचे प्रतिनिधीने घेतलेले नाहीत. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने पिक पाहणीचे वेळी रॅन्डम पध्दतीने मोजणी केलेली आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने मात्र आपले अहवालात झालेल्या पाऊसा बद्यल, जमीनीतील ओलाव्या बद्यल काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. मानका नुसार CC/103-2011 सोयाबिन बियाण्याची उगवण ही 70 टक्के असावयास हवी आणि त्यामुळे त्यापेक्षा कमी झालेली उगवण ही निश्चीतच योग्य नाही, कमी झालेल्या उगवणी संबधाने शेतीची पत, वातावरणातील बदल, मशागतीतील उणिवा, रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर, पाऊस व इतर अनुषंगीक बाबी काही अंशी जरी जबाबदार असल्या तरी मूळात बियाणे उत्कृष्ट दर्जाचे असल्यास पिकाची उगवण कमी जास्त का होईना परंतु ती दिलेल्या मानकाचे जवळपास होणे गरजेचे आहे. त्यानंतर झाडाची वाढ, फळधारणा व इतर बाबीं कडे लक्ष दिल्या जाऊ शकते. जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने पाहणीचे वेळी झाडांची मोजणी ही रॅन्डम पध्दतीने केलेली आहे व त्यांना 1x1 मीटर मध्ये सरासरी 17 झाडे आढळून आली म्हणजेच वादातील सोयाबिन बियाणे उगवणशक्तीचे प्रमाण हे 39 टक्के एवढे आढळून आल्याचे स्पष्ट होते. 25. वादीत लॉटचे बियाण्याची उगवणशक्ती ही 79 टक्के ते 82 टक्के इतकी (पान क्रं 40 व 41 ) असावयास हवी होती परंतु जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला नुसार सदर उगवणशक्ती ही फक्त 39 टक्के एवढीच प्रत्यक्ष्य मोक्यावर आढळून आली म्हणजेच उगवणशक्तीचे प्रमाण प्रमाणका प्रमाणे (79 टक्के ते 82 टक्के) 50 टक्के एवढेच येते. 26. जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती ही कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद (वर्धा) यांचे अध्यक्षते खाली प्रत्यक्ष्य मोक्यावर जाऊन पिकाची पाहणी करते. परंतु मंचास येथे खेदाने नमुद करावे लागते की, सदर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने पिक पाहणीचे वेळी योग्य काळजीपूर्वक पाहणी केलेली नाही. 27. वरील विवेचना वरुन त.क.ला पुरविलेले वादातील सोयाबिन बियाणे हे दोषपूर्ण होते आणि म्हणून वि.प.क्रं 2 महाबिज निर्मित बियाण्याची त.क.ला विक्री करुन वि.प.क्रं 2 यांनी दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 28. त.क.ने नुकसान भरपाई दाखल युक्तीवाद करीत नमुद केले की, त्याचे वादातील दोषपूर्ण सोयाबिन बियाण्यामुळे खूप मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. बियाणे खरेदी खर्च, मशागतीचा खर्च, खत व किटकनाशकांचा खर्च , मजूरीचा खर्च आणि अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसान या प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी. CC/103-2011 29. वि.प.क्रं 2 यांनी युक्तीवाद केला की, त.क.ने नुकसानी संबधाने कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला नाही. तसेच या आधी घेतलेल्या पिका बद्यल तसेच जमीनीचे प्रतवारी बद्यल कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही आणि म्हणून त.क.ची नुकसान भरपाई संबधाने केलेली मागणी ही योग्य नाही. 30. मंचाद्वारे दाखल दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, वादातील सोयाबिन बियाणे हे काही अंशी दोषपूर्ण होते परंतु त.क.ने त्याला झालेल्या प्रत्यक्ष्य पिकाचे उत्पादनाचा व केलेल्या खर्चाचा कोणताही हिशोब प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला नाही आणि म्हणून त.क.ला झालेल्या आर्थिक नुकसानीचे योग्य आकलन, योग्य पुराव्या अभावाने करता येत नाही. परंतु हे सुध्दा तेवढेच खरे आहे की, त.क.ला पुरविलेले वादातील सोयाबिन बियाणे हे काही अंशी दोषपूर्ण होते आणि म्हणून त.क.ला वादातील बियाण्यापोटी अपेक्षीत उत्पादना पैकी कमी उत्पादन झाल्यामुळे आर्थिक नुकसान झाले तसेच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे आणि म्हणून नुकसान भरपाई दाखल काही रक्कम त.क.ला मंजूर करणे हे कायदेशीर व न्यायोचित राहिल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 31. वि.प.क्रं 1 यांनी आपले लेखी उत्तरात नमुद केले की, त्यांची तक्रारदार यांना सोयाबिन बियाणे पुरविण्याची जबाबदारी नसून , वि.प.क्रं 2 मार्फतीने बियाणे पुरविण्यात येते, ते केवळ परमिट देण्याचे कार्य करतात . बियाण्याची कमी उगवण याचेशी वि.प.क्रं 1 चा कोणताही प्रत्यक्ष्य संबध नाही, यामध्ये जी काही जबाबदारी येते ती वि.प.क्रं 2 ची आहे, म्हणून वि.प.क्रं 1 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 32. त.क.ने वादातील सोयाबिन बियाणे खरेदीच्या बिलाच्या प्रती प्रकरणात दाखल केलेल्या आहेत. त.क.ला वादातील बियाण्या पासून काही अंशी उत्पादन 39 टक्के आलेले आहे. तसेच सदर बियाणे लागवड करताना जमीनीची मशागत तसेच बियाण्याची पेरणी यासाठी निश्चितच त.क.ला खर्च आलेला आहे परंतु वि.जिल्हा न्यायमंच त.क.ला बियाण्याचे अपेक्षीत उत्पादना पैकी तुट आलेल्या बियाण्याचे उत्पादनाची नुकसान भरपाई मंजूर करीत असल्यामुळे सदर जमीन लागवड व मशागतीचा खर्च पुन्हा नव्याने देण्याची आवश्यकता नाही असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. CC/103-2011 33. त.क.ने वादातील बियाण्या पासून अपेक्षीत उत्पादनापोटी 100 टक्के नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे परंतु जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला नुसार त.क.चे शेतात 39 टक्के उगवण झाल्याचे नमुद केले आहे . तसेच सोयाबिन बियाण्या पासून अपेक्षीत 100 टक्के उत्पादन हे आधुनिक तंत्र पध्दती नुसार व सामान्यतः जमीनीची चांगली प्रतवारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रासायनिक खताची योग्य मात्रा इत्यादी व अन्य घटक जसे हवामान, पुरेसा पाऊस इत्यादीवर अवलंबून असते. त.क.ला सर्वसाधारण स्थितीमध्ये वादातील सोयाबिन बियाण्या पासून अपेक्षीत उत्पादन न झाल्यामुळे व त्यामुळे त.क.चे आर्थिक नुकसान झाल्यामुळे, आर्थिक नुकसानी बद्यल रुपये-10,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचे खर्चा बद्यल रुपये-1000/-वि.प.कडून मिळण्याचे आदेशित करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 34. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार ,वि.प.क्रं 2 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.क्रं 2 निर्मित वादातील दोषपूर्ण सोयाबिन बियाणे त.क.ला पुरविल्याने वि.प.क्रं 2 यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. 3) वि.प.क्रं 2 यांनी त.क.ला वादातील सोयाबिन बियाण्याचे आर्थिक नुकसानी बद्यल भरपाई म्हणून रु.-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त ) त.क.ला देय करावे. 4) त.क.ला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रु.-5000/-(अक्षरी- रुपये पाच हजार फक्त ) तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रु.-1000/-(अक्षरी रुपये-एक हजार फक्त) वि.प.क्रं 2 यांनी, त.क.ला देय करावे. 5) सदर आदेशाचे अनुपालन, वि.प.क्रं 2 यांनी सदर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे, अन्यथा, आर्थिक नुकसानीची रक्कम रुपये-10,000/- तक्रार दाखल दिनांक-12/10/2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह त.क.ला देण्यास वि.प.क्रं 2 जबाबदार राहतील. CC/103-2011 6) वि.प.क्रं 1 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 7) उभय पक्षांना निकालपत्राची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 8) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ.सोमाणी) | (सौ.सुषमा प्र. जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |