Maharashtra

Parbhani

CC/10/192

Godawaribai Vitthalrao More - Complainant(s)

Versus

Taluka Krashiadhkari,Purna - Opp.Party(s)

Adv.A.D.Khapre

29 Nov 2010

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/192
1. Godawaribai Vitthalrao MoreR/o Aharewadi Tq.PurnaParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Taluka Krashiadhkari,PurnaTq.PurnaParbhaniMaharashtra2. Kabal Insurance Broking Services pvt.ltd.Bhaskarayan,AurangbadHDFC.Home loane Building Plot no.7 S.E1 TownCentre,Cidco-AurangbadAurangbadMaharashtra3. Relance General Insurance Company limited,570 retifire House,Indoregion electrictcal limited,Naygamcroos Road,Next turoyal Indisterial estetes vadala(west)MumbaiMumbaiMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.A.D.Khapre, Advocate for Complainant

Dated : 29 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र

 

                        तक्रार दाखल दिनांकः-  12/08/2010

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 16/08/2010

                        तक्रार निकाल दिनांकः- 29/11/2010

                                                                                    कालावधी 03 महिने 13 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

 

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

       सदस्‍या                                                                                  सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

          गोदावरी भ्र.विठ्ठलराव मोरे.                                       अर्जदार

वय 30 वर्षे,धंदा शेती व घरकाम.                             अड.ए.डी.खापरे.

रा.आहेरवाडी ता.पुर्णा.जि.परभणी.  

               विरुध्‍द

1     तालुका कृषी अधिकारी.                                        गैरअर्जदार.

      कृषी अधिकारी कार्यालय.पुर्णा.ता.पुर्णा.जि.परभणी.                  स्‍वतः

2     कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.                     स्‍वतः

      भास्‍करायन, एच.डी.एफ.सी.होमलोन‍ बिल्‍डींग.

      प्‍लॉट नं.7,सेक्‍टर ई 1, टाऊन सेंटर सिडको.औरंगाबाद.

3     रिलायंस जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.                       अड.जी.एच.दोडीया.

      570 रेक्‍टीफायर हाऊस,इंदो रिजीन इलेक्‍ट्रीक लि.

      नायगम क्रॉस रोड,नेकस्‍ट टू रॉयल इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट.    

वडाळा (वेस्‍ट) मुंबई.

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)        सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------

         

            (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

      शासनातर्फे उतरविलेल्‍या  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय  नुकसान भरपाई मयत शेतक-याच्‍या वारसास  देण्‍याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदाराने ही  तक्रार दाखल केली आहे.

            अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे आहेरवाडी ता.पुर्णा. जि. परभणी येथील रहिवाशी शेतकरी  आहे . महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यानी पुरस्‍कृत  केलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता त्‍या पॉलीसीचा मयत  पती विठ्ठलदत्‍तराव मोरे हा देखील लाभार्थी होता तारीख 04/08/2008  रोजी नगरसोल ते नांदेड असा रेल्‍वेने प्रवास करीत असतांना दारातून खाली पडल्‍याने अपघातात मरण पावला. पोलीसानी अपघाती मृत्‍यू नोंद करुन घटना स्थळाचा मयताचा इन्क्वेस् पंचनामा केला व प्रेताचे  पोष्‍ट मार्टेम केले.मयत पतीचे  मृत्‍यू पश्‍चात शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई िळणेसाठी अर्जदाराने तारीख 21/07/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे विमा क्‍लेम व आवश्‍यक  ती कागदपत्रे सपूर्त केली.  त्‍यानुसार  गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार नं 2 यांचेकडे अर्जदाराचा विमा दावा  सादर केला. परंतू क्‍लेम मंजुरी बाबत अर्जदाराला आजपर्यंत कळविलेले नाही.  व पतीच्‍या  अपघाती निधनाची नुकसान भरपाई दिलेली नाही अशारितीने विमा कंपनीने सेवेतील त्रूटी करुन मानसिक त्रास दिला व नुकसान भरपाई मिळण्‍याच्‍या लाभापासून वंचीत ठेवले म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून रुपये 100000/-  विमा नुकसान भरपाई मा‍नसिक त्रासापोटी रुपये 25000/- अर्जाचा खर्च रुपये 5000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2)  पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण  28  कागदपत्र दाखल केली आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी मंचाची नोटीस मिळूनही नेमले तारखेस मंचापुढे हजर होवुन म्‍हणणे दाखल न केल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोष्‍टाव्‍दारे आपले लेखी म्‍हणणे मंचाकडे पाठविले ते दिनांक 24.09.2010 रोजी प्रकरणात नि. 8 ला समाविष्‍ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी ता.28/10/2010 रोजी आपला लेखी जबाब (नि.13) प्रकरणात सादर केला.

     

गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्‍या लेखी जबाबात (नि.8) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्‍या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्‍लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्‍यक ती पूर्तता व छाननी करण्‍यासाठी शासनाने त्‍याना मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून नेमलेले आहे त्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्‍यांचेकडून विम्‍याचा हप्‍ताही स्विकारला जात नाही. मयत विठ्ठल दत्‍तराव मोरे रा.आहेरवाडी याच्‍या विमा क्‍लेमची कागदपत्रे गैरअर्जदार क्रं 1 कडून दिनांक 02/01/2009 रोजी प्राप्‍त झाली होती परंतू विमा कंपनी व महाराष्‍ट्र सरकार यांच्‍या दरम्‍यान शेतकरी अपघात विम्‍या संबंधी घेतलेल्‍या पॉलिसी संबंधी झालेला करारामध्‍ये पॉलीसीची मुदत संपल्‍यावर 90 दिवसाचे आत विमा क्‍लेमची कागदपत्रे सादर केली पाहीजेत अशी अट आहे.  पॉलीसीची मुदत दिनांक 15.08.2007 ते 14.08.2008 अखेर होती त्‍यानंतर क्‍लेम 14.11.2008 पर्यंत सादर केला पाहिजे होता परंतु तो उशिरा सादर केलेला असल्‍यामुळे  तो 90 दिवसांच्‍या मुदतीनंतर दि.2/1/09 रोजी गैरअर्जदारास मिळाल्‍यावर दि.31/01/09 रोजी क्‍लेमची कागदपत्रे विमा कंपनीस पाठविली होती.परंतु वरील कारणास्‍तव त्‍यांनी क्‍लेम अडमिट केलेला नाही.सबब,गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या

प्रकरणातून वगळण्‍यात यावे.अशी शेवटी विनंती केली आहे.

गैरअर्जदार क्रमांक 3 यानी आपल्‍या लेखी जबाबात नि.13  तक्रार अर्जातून त्‍यांच्‍या विरुध्‍द केलेल्‍या विधानांचा इन्‍कार करुन प्रस्‍तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्‍द मुळीच चालणेस पात्र नाही त्‍यांचेकडून कोणत्‍याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही असे म्‍हंटलेले आहे.कारण कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज सर्व्‍हीसेस ( गैरअर्जदार क्रमांक 2 ) यांचेकडून आजपर्यंत विठ्ठल दत्‍तराम मोरे याच्‍या डेथक्‍लेमची कागदपत्रे कंपनीला मिळालेली नाहीत त्‍यामुळे अर्जदारला नुकसान भरपाई देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.अर्जदारने शेतकरी विम्‍या संबंधी तक्रार अर्जातील परिच्‍छेद नंबर 1 ते 4 मधील दिलेल्‍या  मजकुरा बाबत अर्जदारने पॉलिसीची प्रत व शासनाचे परिपत्रकही दाखल केलेले नसल्‍यामुळे काहीही भाष्‍य केलेले नाही.तसेच परिच्‍छेद 6 ते 16 मधील मजकूर देखील साफ नाकारला आहे.अतिरिक्‍त लेखी जबाबात पुढे असा खुलासा केला आहे की, शेतकरी विम्‍या संबंधी महाराष्‍ट्र सरकार व विमा कंपनी यांचे दरम्‍यान झालेल्‍या लेखी करारनाम्‍यानुसार तहशिलदार किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडून कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकरला कागदपत्रे पाठविल्‍यानंतर ब्रोकरने त्‍याची छाननी करुन विमा कंपनीकडे पाठवावी लागतात त्‍यानंतर एक महिन्‍यात विमा कंपनी क्‍लेम मंजूर अथवा नामंजुरीचा निर्णय घेते मयत विठ्ठल दत्‍तराव मोरे यांच्‍या डेथक्‍लेमची कोणतीही कागदपत्रे कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकर कडून आजतागायत दिलेली नाहीत त्‍यामुळे याबाबतीत गैरअर्जदार क्र.3 कडून मुळीच सेवात्रुटी झालेली नाही.सबब,तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदार नं 3 चे शपथपत्र (नि.14) दाखल केले आहे.

तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. खापरे आणि   गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे अड दोडिया  यानी युक्तिवाद केला.

      निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये.

    मुद्ये                                    उत्‍तर

 

1              गैरअर्जदार 1 ते 3 यानी अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या

मृत्‍यू पश्‍चात शेतकरी अपघात विम्‍याची नुकसान भरपाई

मंजूर करण्‍याच्‍या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ?           होय  

  2           अर्जदार नुकसान भरपाई  मिळण्‍यास पात्र आहे  काय ?          होय

                        कारणे

मुद्या क्रमांक 1 व 2 - 

      अर्जदाराचा मयत पती विठ्ठल दत्‍तराव मोरे  हा  शेतकरी  अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी शेतकरी होता हे अर्जदाराने पुराव्‍यात सादर केलेल्‍या नि.4/7, 4/11,  व 4/12 वरील मयताचे मालकीच्‍या शेतजमीनीचे 7/12 चे  उतारे नि.4/8 वरील होल्‍डींग प्रमाणपत्र,नि.4/13 नं.नं.6 - क चा उतारा नि.5/10 वरील फेरफारचा उतारा या कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे  दिनांक 04/08/2008. रोजी मयत विठ्ठल दत्‍तराव मोरे याचा नगरसोल ते नांदेड रेल्‍वेने प्रवास करीत असतांना दारातून खाली पडल्‍याने अपघाती मृत्‍यू झाला होता ही वस्‍तूस्थिती पुराव्‍यातील पुर्णा पोलिस स्‍टेशन एफ आयर आर 28/08 मधील  घटनास्‍थळ पंचनामा ( नि.4/20) आणि ग्रामीण रुग्‍णालय पुर्णा  येथे मयताचा दिनांक 04/08/2008 रोजी केलेला पी.एम.रिपोर्ट (नि.4/24)  मरणोत्‍तर पंचनामा ( नि.4/16) या कागदोपत्री पुरात्‍यातील  नोंदीतून ही शाबीत झालेले आहे.

      मयत विठ्ठल दत्‍तराव मोरे हा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचा लाभार्थी असल्‍यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्‍नी  )  विम्‍याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा क्‍लेमसह आवश्‍क ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्‍याच्‍या छायाप्रती अर्जदाराने पुराव्‍यात नि. 4 लगत दाखल केलेल्‍या आहेत. कागदपत्रामध्‍ये अपूर्णता होती असा गैरअर्जदार क्रं 1 आणि 2 यांचा आक्षेप नाही परंतु 90 दिवसात डेथक्‍लेम सादर केलेला असल्‍यामुळे तो मुदतबाहय असल्‍याचे गैरअर्जदार नं 2 चे म्‍हणणे आहे परंतु शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकामध्‍ये नुकसान भरपाई क्‍लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच  बंधनकारक  नाही  मुळातच राज्‍यातील खातेदार  शेतक-यासाठी महाराष्‍ट्र शासनातर्फे  शेतकरी विमा पॉलीसीचा उचलेला खर्च लाभार्थी शेतक-यांना अकस्‍मात अपघाती मृत्‍यू झाल्‍यावर कुटूबांचा आर्थिक उपासमारीची पाळी येवू नये या उदात्‍त हेतूने कल्‍याणकारी योजना  रा‍बविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्‍लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून  अर्जदाराचा क्‍लेम  बेकायदेशीररित्‍या नाकारुन निश्‍चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच निष्‍कर्ष निघतो. क्‍लेम उशीरा दाखल केला म्‍हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्‍या अपघाती मृत्‍यूची नुकसान भरपाई देण्‍याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.

 या संदर्भात मा. महाराष्‍ट्र राज्‍य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्‍द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्‍यक्‍त केले आहे की, क्‍लेम दाखल करण्‍यास 90 दिवसांपेक्षा जास्‍त  उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्‍तूत प्रकरणालाही  लागू पडतात. याखेरीज मा. राष्‍ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्‍या निकालपत्रात व्‍यक्‍त केलेली मतेही प्रस्‍तूत प्रकरणास लागू पडतात. शिवाय अलिकडेच रिपोर्टेड केस 2010 (1) सी पी आर.पान 219 (महाराष्‍ट्र राज्‍य आयोग) कमलाबाई चव्‍हाण विरुध्‍द आय सी आय सी आय लोंबार्ड इन्‍शु.कंपनी या प्रकरणात देखील वरील प्रमाणेच मते व्‍यक्‍त केले आहेत.   गैरअर्जदारांनी अर्जदाराचा क्‍लेम चुकीच्‍या पध्‍दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार नं 3 यांनी मयत विठ्ठल दत्‍तराव मोरे यांच्‍या डेथक्‍लेमची कागदपत्रे आजतागायत मिळालेली नाही.असे लेखी जबाबात म्‍हंटले असले तरी गैरअर्जदार नं 2 ( कबाल इंन्‍शुरन्‍स ब्रोकरेज सर्व्‍हीसेस ) यांनी ता.20/01/2009 रोजी कागदपत्रांची छाननी करुन सर्व पेपर्स विमा कंपनीकडे पाठविले आहेत असे त्‍यांच्‍या लेखी जबाबामध्‍ये सांगीतलेले असल्‍यामुळे गैरअर्जदार नं 3 कडे ती कागदपत्रे नक्‍कीच असली पाहिजेत.

 

 

 

 

सबब मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देवून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

           दे                         

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          गैरअर्जदार नं 3 यांनी अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या डेथक्‍लेमची नुकसान भरपाई रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत अर्जदारास द्यावी.

3     याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल  नुकसान भरपाई म्‍हणून  रुपये 1000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये 500/- आदेश मुदतीत द्यावा.

4     पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरावाव्‍यात.  

 

 

 

 

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

 

 

 

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member