निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11/08/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 18/08/2011 तक्रार निकाल दिनांकः- 15/03/2012 कालावधी 07 महिने 04 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. निर्मला भ्र. दशरथराव देशमुख अर्जदार वय 47 वर्ष.धंदा घरकाम अड.व्ही.पी.चोखट रा.लोहगांव, ता. जि.परभणी. विरुध्द 1 तालुका कृषी अधिकारी, गैरअर्जदार. ता.जि.परभणी. स्वतः
2 विभागीय व्यवस्थापक, कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि. स्वतः भास्करायन एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग. प्लॉट नं.7,सेक्टर ई-1, टाऊन सेंटर, सिडको औरंगाबाद. 3 व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.. अड.जी.एच.दोडिया. मंडळ कार्यालय, क्र.2 अंबिका हाउस, शंकर नगर चौक, नागपुर 440 010. --------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ----------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेची रूपये एक लाख नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे लोहगांव ता. जि. परभणी येथील रहिवाशी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा अर्जदारचा मयत पती दशरथ धोंडीराम देशमुख हा देखील लाभार्थी होता. तारीख 10/05/2010 रोजी सायंकाळी 7.30 वाजता शिवदास सुखदेव चव्हाण रा.वाढवणा तांडा याने अर्जदाराच्या पतीला वसुलीचे पैसे का मागतोस या कारणास्तव डोक्यात दगड मारून जागीच जिवानीशी ठार केले. आरोपीविरूध्द इ.पि.को. कलम 302 वगैरे खाली गु.र.नं. 134/10 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला त्यानंतर अर्जदारने गैरअर्जदार क्र.3 कडुन शेतकरी विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम फॉर्मसह आवश्यक ती कागदपञे गैरअर्जदार क्र.1 कडे सुपुर्द केली. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने क्लेम मंजुरीसाठी ती कागदपञे गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविली. परंतु क्लेम मंजुर करून नुकसान भरपाई तिला मिळाली नाही. गैरअर्जदाराने वरील प्रकारे सेवाञुटी करून नुकसान भरपाई देण्यापासून आजपर्यन्त वंचीत ठेवले आहे म्हणुन ग्राहक मंचात प्रस्तुतचा अर्ज दाखल करून नुकसान भरपाई एक लाख द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 14 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने नोटीस स्वीकारूनही नेमलेल्या तारखेस किंवा त्यानंतर संधी देवुनही लेखी जबाब सादर न केल्यामुळे त्यांचेविरूध्द तारीख 10.01.2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोष्टाव्दारे आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 30.09.2011 रोजी प्रकरणात नि. 8 ला समाविष्ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने तारीख 03.03.12 रोजी आपला लेखी जबाब (नि.12) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या लेखी जबाबात (नि.8) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्रांची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्यांना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत दशरथ धोंडिबा देशमुख याच्या विमा क्लेमची कागदपत्रे तारीख 30/04/2011 रोजी प्राप्त झाली होती. परंतु पॉलिसी कंडिशन प्रमाणे विमा पॉलिसीची मुदत तारीख 14.08.2010 रोजी संपल्यावर 90 दिवसांच्या आत नियमानुसार क्लेम दाखल करणे आवश्यक होते. अर्जदाराने क्लेम उशिरा दाखल केलेला असल्यामुळे तसा शेरा मारून विमा कंपनीला तारीख 29/06/2011 रोजी क्लेम व कागदपञे पाठविलेली आहे. त्याबाबतचा निर्णय समजलेला नाही. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत शपथपञ (नि.9) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.3 ने आपल्या लेखी जबाबात (नि.12) तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारून अर्जदारच्या पतीचा मृत्यु अपघातामुळे झालेला नसुन खुनी हल्ल्याने झालेला असल्याने ती नुकसान भरपाई मिळणेस पाञ नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रार अर्जासोबत दाखल केलेली पुराव्याची कागदपञे त्यांनी अमान्य करून अर्जदाराने कायदेशीररित्या काटेकोरपणे शाबीत करावे असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार अथवा तिच्या पतीने विमा पॉलिसीचा हप्ता भरलेला नाही, अर्जदार त्यांची ग्राहक नाही त्यामुळेही तक्रार फेटाळण्यात यावी असे त्यांचे म्हणणे आहे. पॉलिसी कंडीशन (क्लाज 3) 1 ते 15 नुसार अर्जदाराच्या पतीचा खुन झाल्याने मृत्यु झाला होता त्यामुळे शेतकरी विम्याची नुकसान भरपाई तिला मागता येणार नाही व तक्रार अर्ज ग्राहक मंचात चालण्यास पाञ नाही. तो खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत शपथपञ (नि.13) दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. व्ही.पी.चोखट आणि गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे अड दोडिया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार 3 यानी अर्जदारला तिच्या मयत पतीच्या मृत्यू पश्चात शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मयत पती दशरथ धोंडीबा देशमुख रा.लोहगांव, जि.परभणी हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.4/4 वरील गट.क्र.7/12 उतारा, नि.4/5 वरील फेरफार उतारा, नि.4/3 वरील होल्डींग प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 10.05.2010 रोजी अर्जदारचा मयत पती मोटर सायकलवरून वाढवणा तांडयाकडे जात असतांना सायंकाळी 7.30 वाजता रस्त्यात शिवदास सुखदेव चव्हाण या इसमाने त्याला अडवुन तु वसुलीचे पैसे का मागतोस या कारणास्तव दशरथ देशमुखच्या डोक्यात दगड मारून खुनी हल्ला करून त्याला ठार केले ही वस्तुस्थिती पुराव्यात दाखल केलेंडर नि.4/10 वरील गु.र.नं.134/10 मधील टेंभुर्णी (जालना) पोलीस स्टेशनमध्ये दिलेली एफ.आय.आर., नि.4/11 वरील घटनास्थळ पंचनामा, नि.4/12 वरील फिसेरा रिपोर्टस या कागदोपञी पुराव्यातून शाबीत झालेले आहे. शासनाच्या व विमा कंपनीच्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई जोखमीप्रमाणे अर्थातच अर्जदारच्या पतीचा खुनी अपघाती मृत्यु झाला होता ही बाब देखील शाबीत झाली आहे. मयत दशरथ देशमुख हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदारने (मयताची पत्नी) विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा क्लेमसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 4 लगत दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्यानंतर ती कागदपञे गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविल्यावर तारीख 30.04.2011 रोजी त्यांना ती मिळाली होती असे गैरअर्जदार क्र.2 ने लेखी जबाबातुन मान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 चे पुढे म्हणणे असे की, विमा क्लेम पॉलिसीची मुदत तारीख 14.08.2010 ला संपल्यानंतर 90 दिवसांचे आंत अर्जदाराने क्लेम दाखल केलेला नव्हता म्हणुन क्लेमची कागदपञे तसा शेरा मारून विमा कंपनी गैरअर्जदार क्र.3 कडे तारीख 26.09.2011 रोजी पाठविले आहेत परंतु विमा कंपनीने क्लेम मंजुरीबाबत अद्यापि काहीच कळविलेले नाही असे म्हटलेले आहे. परंतु शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही. मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेली शेतकरी अपघात विमा पॉलीसी लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. राज्यातील सर्व खातेदार शेतक-यांच्या विमा पॉलिसीचे हप्ते स्वतः राज्य सरकारने भरलेले आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही. या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते. अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनीने मंजुरीविना आजपर्यन्त रखडत ठेवुन अर्जदारला नुकसान भरपाई देणेपासुन तिला वंचीत ठेवुन मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केली आहे असे पुराव्यातुन स्पष्ट दिसते. गैरअर्जदार नं 3 यांने मयत दशरथ देशमुख याचा खुन झालेला असल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही. पॉलिसी कंडीशन (क्लाज 3) 1 ते 15 मध्ये अर्जदाराचा क्लम येत नाही असा खोटा बचाव घेतला आहे. कारण पुराव्यात नि.15 लगत दाखल केलेंल्या शेतकरी विम्यासंबंधी शासनाच्या 30 सप्टेंबर 2009 च्या परिपञकातील पा.क्र.11 वरील प्रपञ-ड मधील अ.न.6 ला ‘’खुन’’ चा समावेश असल्याने खुनी हल्ल्यातुन मृत्यु झाला असला तरी तो अपघाती मुत्यु असल्याने शेतकरी विमा जोखीम रक्कम मयताचे वारस मिळणेस पाञ आहेत. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |