निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 27/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 29/10/2012 कालावधी 09 महिने, 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- - सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
नंदा भ्र.बंडु उर्फ गोपीनाथ खटींग अर्जदार
वय 23 वर्षे.धंदा. घरकाम. अड.अरुण डी.खापरे.
रा.देवठाणा ता.जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी, परभणी गैरअर्जदार.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक.
कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग
प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर
सिडको,औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया
युनाइटेड इंडीया इन्शुरन्स कं लि.
दयावान बिल्डींग, स्टेशन रोड,परभणी
4 विभागीय व्यवस्थापक.
युनाइटेड इंडीया इन्शुरंस कं लि.
मंडल कार्यालय, क्रं 2, अंबिका हाउस,
शंकर नगर चौक, नागपुर 400 010
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.माधुरी विश्वरुपे.सदस्या.)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदारांचे पती श्री.गोपनीनाथ कुंडलिकराव खटींग यांच्या मालकीची शेत जमीन गट नं. 109, 114, व 48 मौ. देवठाणा येथे असून 7x12, 8 अ, 6 ड, 6 क उता-यामध्ये नोंद झालेली आहे.तक्रारदारांच्या पतीचा ता. 17/09/2009 रोजी सर्पदंशामुळे मृत्यू झाला असून घटनेची खबर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, अकस्मात मृत्यू रिपोर्ट, तसेच साक्षीदारांचे जबाब घेतले.मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवून अहवाल घेतला.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह ता.20/10/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दाखल केला, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ता. 28/10/2009 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठवल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे प्रस्तावा बाबत चौकशी केली असता गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या ता.15/10/2010 रोजीच्या पत्रानुसार पुर्तता झालेली नसल्यामुळे विमा कंपनीने ता.24/03/2011 रोजी फाईल बंद केली असे सांगितले.तक्रारदारांना या संदर्भात गैरअर्जदार 2 व 3 यांनी कोणतीही माहिती न देता प्रस्ताव नामंजूर केला अशी थोडक्यात तक्रारदाराची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव ता.25/10/2009 रोजी प्राप्त झाल्यानंतर वरीष्ठ कार्यालयाने गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या प्रस्तावामध्ये FIR, केमीकल अनालिसिस रिपोर्ट, 6 ड चा उतारा, गोपीनाथ व बंडु एकच व्यक्ती असल्याबाबत स्टँप पेपरवर वगैरे कागदपत्रांची त्रुटी असून सदर कागदपत्राची पुर्तता न झाल्यामुळे अपूर्ण प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीकडे पाठवल्यानंतर ता.24/03/2011 रोजीच्या पत्रान्वये क्लेम बंद केला.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या म्हणण्यानुसार 6 ड चा उतारा, FIR, केमीकल अनालिसिस रिपोर्ट, गोपीनाथ व बंडु एकच व्यक्ती असल्याबाबत स्टँप पेपरवर वगैरे कागदपत्रां अभावी तक्रारदारांचा प्रस्तावाची फाईल ता. 24/03/2011 रोजीच्या पत्रानुसार बंद केली.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र व गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विव्दान वकील श्री. अरुण डी.खापरे आणि गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे विव्दान वकील श्री. जी.एच.दोडीया यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती शेतकरी असून ता.17/09/2009 रोजी त्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची त्रुटी असल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्या वरुन स्पष्ट होते.
तक्रारदारांनी ता. 20/12/2010 रोजीच्या पत्रान्वये मृत्यू प्रमाणपत्र, 8 अ, 6 क, फेरफार, FIR, व्हिसेरा रिपोर्ट वगैरे कागदपत्रांची पुर्तता केल्याबाबत नमुद केले आहे, परंतु तक्रारदारांनी वरील कागदपत्रे तक्रारीत दाखल केलेली नाहीत.तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी मृत्यू प्रमाणपत्र, गोपीनाथ व बंडु एकच व्यक्ती असल्याबाबतचा स्टँप पेपर, फेरफार, तसेच घटनास्थळ पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे कागदपत्रे दाखल असल्याचे दिसून येते, परंतु व्हिसेरा रिपोर्ट / केमीकल अनालिसिस रिपोर्ट दाखल नसल्याचे दिसून येते, परंतु पोस्टमार्टम अहवालानुसार तक्रारदाराच्या पतीच्या मृत्यूचे कारण “ सर्पदंश ” असे नमुद केल्याचे दिसून येते शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत शासनाचे परिपत्रकातील प्रपत्र 3 नुसार अपघाताचे पुराव्यासाठी सादर करण्याच्या कागदपत्राबाबतचे निर्देश दिले आहेत.त्याप्रमाणे शेतक-याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला असल्याबाबत पोस्टमार्टम अहवालानुसार निष्कर्ष निघत असेलतर विमा कंपनी दावेदाराकडून रासायनिक विश्लेषण अहवालाची मागणी ( Viscera Report ) मागणी करणार नाही असे नमुद केले आहे अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत आवश्यक असलेली कागदपत्रे दाखल केल्याचे दिसून येते तक्रारदारांच्या पतीच्या पोस्टमार्टम अहवालानुसार त्यांच्या मृत्यूचे कारण सर्पदंश नमुद केलेले असल्यामुळे सदर प्रकरणात शासनाच्या परिपत्रकातील निर्देशानुसार व्हिसेरा रिपोर्ट सदर प्रस्तावा सोबत दाखल करण्याची आवश्यकता नाही.
तक्रारदारांनी विहीत मुदतीत आवश्यक कागदपत्रे दाखल करुनही गैरअर्जदार विमा कंपनीने विमा प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांच्या तांत्रिक कारणास्तव नामंजूर केला. गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट हाते.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने तक्रारदारांना सदर योजने अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- देण न्यायोचित होईल.असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आ दे श
1 गैरअर्जदार क्रमांक 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम
रु.1,00,000/- ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात देण्यात यावी.
2 वरील आदेश क्रमांक 1 मधील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे.
9 टक्के व्याजदरासहीत द्यावी.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.