निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 06/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 25/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19 /08/2013
कालावधी 10 महिने. 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुराधा भ्र.अरुणराव निर्वळ. अर्जदार
वय 25 वर्षे. धंदा.घरकाम. अड.पी.ई.तारे.
रा.सोमठाणा ता.मानवत जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय,मानवत जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार.
डेक्कन इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजाराच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया इन्शुरन्स कं.लि.
अड शर्मा यांचा वरचा मजला, नानलपेठ, परभणी.
4 विभागीय व्यवस्थापक.
न्यु इंडीया अशुरन्स कं.लि.
विभागीय कार्यालय क्रं.153400
सावरकर भवन शिवाजी नगर,कॉंग्रेस हाउस रोड.
पुणे 422005
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ने तिच्या पतीच्या शेतकरी अपघात विमादावा प्रलंबीत ठेवुन सेवेत ञुटी दिली आहे, या बद्दलची आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे, अर्जदाराच्या पतीच्या नावे गट 124 मौजे सोमठाणा ता.मानवत तलाठी सज्जा (कोल्हा) ता.मानवत जि.परभणी येथे होती, याची नोंद 7/12, 6-क, 6-ड प्रामणपत्रा मध्ये आलेली आहे.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे की, अर्जदाराच्या पतीचा दिनांक 30/01/2011 रोजी रेल्वे अपघाता मध्ये मृत्यू झाला. सदरच्या घटनेची खबर पोलीस स्टेशन मुकूंदवाडी औरंगाबाद येथे दिली या प्रकरणात पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा तसेच साक्षीदाराचे जबाब घेतले व इन्क्वेस्ट पंचनामा केला व तसेच मयताचे सिव्हील हॉस्पीटल औरंगाबाद येथे पोस्टमार्टेम करण्यात आले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दिनांक 05/11/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमादावा साठीच्या सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केला व नंतर विम्याच्या रक्कमे बद्दल विचारले असता गैरअर्जदार क्रमांक 1 याने तुमचा दावा बद्दल आजपर्यंत आपल्या कार्यालयाला मंजुरी नामंजुरी असे काहीही कळवले नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला कांही कळवु शकत नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की,गैरअर्जदार क्रमांक 3 हे नियमावर बोट ठेवुन अर्जदाराला त्रास देण्याच्या हेतूने व दावा प्रलंबीत ठेवण्याच्या हेतुने पत्रव्यवहार करीत आहेत,म्हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, गैरअर्जदाराला असा आदेश देण्यात यावा की, त्यानी अर्जदाराला तिच्या पतीच्या मृत्यू तारखे पासून 1,00,000/- रुपये द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत द्यावे. व मानसिकत्रासापोटी 25,000/- व खर्चापोटी 5,000/- रुपये देण्याची मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे, व नि.क्रमांक 6 वर 16 कागदपञांच्या यादीसह 16 कागदपञे दाखल केलेली आहेत. ज्या मध्ये कृषी अधीकारी मानवत यांना प्रस्ताव मिळाल्याची ओ.सी., अरुण यांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, क्लेमफॉर्म, तलाठ्याचे प्रमाणपत्र, गावनमुना 6 – क, होल्डींग प्रमाणपत्र, 7/12, बॅंकेचे पासबुकचे झेरॉक्स, Copy of Charge sheet, इन्क्वेस्ट पंचनामा, अर्जदाराला गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 तर्फे आलेले पत्र, गाव नमुना नं.9 चे प्रत, घटनास्थळ पंचनामा इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना त्याचे लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 हजर व त्यांचे लेखी म्हणणे नि.क्रमांक 11 वर दाखल त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरील प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर झाले नाही, त्रुटीची पुर्तता करणे आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी म्हणून आवश्यक ती कार्यवाही विहीत मुदतीत केली आहे म्हणून या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी यांना दोषी ठरवणे योग्य होणार नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 हजर व नि.क्रमांक 10 वर आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे त्यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, ते शेतकरी विमा योजनेत महाराष्ट्र शासनाचे सल्लागार आहेत, व विमा दाव्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन घेणे व ते विमा कंपनीस सादर करणे एवढीच भुमिका आहे व या कामासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही व तसेच त्यांची संस्था ही फक्त सेवा प्रदान करीत असते आणि संस्थेची भुमिका ही मर्यादीत आहे, म्हणून शेतकरी जनता अपघात विमा योजना सन 2010-2011, 2011-2012, 2012-13 यांचे अंतर्गत अर्जदाराने माझ्या संस्थेवर केलेल्या कसल्याही प्रकारच्या कामासाठी माझ्या संस्थेस जबाबदार धरण्यात येवु शकत नाही, म्हणून त्यांना दाव्यातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपले शपथपत्र नि.क्रमांक 10/1 वर दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर, नि.क्रमांक 17 वर आपला लेखी जबाब दाखल केला व त्यांत त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत मोडत नाही,व तसेच अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे कोणत्याही प्रकारचा हप्ता भरला नाही. व म्हणून तो गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 चा ग्राहक नाही,म्हणून विद्यमान मंचास सदरची तक्रार गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांच्या विरुध्द चालवण्याचा अधिकार नाही.
गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 चे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने फेरफारची नक्कल व 6 डी चा फॉर्म दाखल केलेला नसल्यामुळे तो शेतकरी कधी झाला आहे हे कळत नाही,व अर्जदारास सदरचे कागदपत्रे दाखल करावयास सांगून देखील ते त्याने दाखल केले नसल्यामुळे सदरचे प्रकरण प्रलंबीत ठेवलेले आहे. व म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 चे असे म्हणणे आहे की, त्यांनी अर्जदारास कोठल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून त्याला जबाबदार धरण्यात येवु नये व अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यांत यावा.
दोन्ही बाजुंच्या कैफियती वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवुन गैरअर्जदार
क्रमांक 3 व 4 यांनी सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक होता ही बाब नि.क्रमांक 6/6 वरील गाव नमुना नं. 6-क व तसेच 6/8 वरील 7/12 उतारा व 21/1 वरील 7/12
उता-या वरुन सिध्द होते, अर्जदाराचे पती नामे अरुण रामप्रसाद निर्वळ यांचा 30/01/2011 रोजी अपघातात मृत्यू झाला ही बाब नि.क्रमांक 6/2 वर दाखाल केलेल्या मृत्यू प्रमाण पत्रावरुन सिध्द होते. अर्जदाराने तीच्या पतीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर अपघात विमा रक्कम मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा दावा दाखल केला होता,ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनी 3 व 4 ने 7/12 उतारा व गाव नमुना नं.8 व 6-ड या कागदपत्रांची मागणी करुन विमादावा प्रलंबीत ठेवला होता ही बाब नि.क्रमांक 13/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. अर्जदाराने 6-ड कागदपत्र सोडून इतर सर्व कागदपत्राची पुर्तता गैरअर्जदार विमा कंपनीकडे केली होती हे तालुका कृषी अधिका-यांच्या जबाबावरुन सिध्द होते, वास्तविक अर्जदारास, गैरअर्जदार विमा कंपनीने 6-ड या कागदपत्राची मागणी अनेक वेळा तालुका कृषी अधिका-या मार्फत दाखल करण्याचे दिनांक 27/02/2012, 02/05/2012, 11/07/2012, 29/08/2012 या दिवशी कळविले होते, परंतु अर्जदाराने आज तारखे पर्यंत सदरचे कागदपत्र विमा कंपनीकडे दाखल केल्या बाबतचा कोठलाही पुरावा मंचासमोर आणला नाही, त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास सदरचे कागदपत्र मागणी करुन विमादावा प्रलंबीत ठेवुन कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी
दिली नाही. हे सिध्द होते,म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत सदरचे संबंधीत 6-ड
प्रमाणपत्राची नक्कल गैरअजदार विमा कपनीकडे दाखल करावी, व गैरअर्जदार
विमा कंपनीने ( क्रमांक 3 व 4) ने सदरचे कागदपत्र मिळाल्या तारखे पासून एक
महिन्याच्या आत सदरचा अर्जदाराचा क्लेम सेटल करावा.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष