निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 04/07/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 07/07/2011
तक्रार निकाल दिनांकः- 10/04/2012
कालावधी 09 महिने. 03 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या
सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
अच्युत पिता भगवानराव काकडे. अर्जदार
वय 35 वर्ष.धंदा.- शेती. अड.अरुण डी.खापरे.
रा.मानकेश्वर ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 मा.तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय,जिंतूर. स्वतः
ता.जिंतूर जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक. स्तवः
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन,एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग
प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर.
सिडको,औरंगाबाद.
3 व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.
प्रादेशिक कार्यालय,अंबीका भवन,क्र.19,
तिसरा मजला,धर्मपेठ एक्सटेन्शन,
शंकर नगर चौक, नागपूर 440 010.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.)
अर्जदाराच्या वडिलांच्या मृत्यूनंतर विमादावा फेटाळून दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदाराच्या वडिलांचा दिनांक 17/09/2009 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला.त्यानंतर दिनांक 24/06/2010 रोजी अर्जदाराने सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे विमादावा सादर केला.त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांच्याकडे मंजुरीस्तव पाठवला.त्यानंतर अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाव्या संबंधी विचारणा केली असता दावा मंजुरीस्तव गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 कडे पाठवलेला आहे असे सांगण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी अर्जदाराचा विमादावा विनाकारण प्रलंबित ठेवुन अर्जदाराला त्रुटीची सेवा दिलेली असल्यामुळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व रु.10,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने मिळावेत.मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदारांकडे दाखल केलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 ला मंचाची नोटीस मिळूनही मंचापुढे लेखी जबाब सादर केला नाही,म्हणून त्याच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याच्या लेखी जबाबात भगवान काकडे मानकेश्वर ता.जिंतूर ज.परभणी यांचा विमादावाच आपल्याला मिळाला नसल्यामुळे त्याबाबत काही ही सांगु शकत नाही असे म्हंटलेले आहे व अर्जदाराची तक्रार रु.2,000/- च्या खर्चासहीत फेटाळण्याची विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 3 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने दाखल केलेला त्याच्या वडिलांचा मृत्यूदावा आपल्याला मिळालेलाच नसल्यामुळे त्रुटीच्या सेवेचा प्रश्नच उदभवत नाही.असे म्हंटलेले आहे व अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर
1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली
आहे काय ? नाही.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
अर्जदाराचे वडिलांचा दिनांक 17/09/2009 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला व ते शेतकरी होते.याबाबत अर्जदाराने तक्रारीत कागदपत्र दाखल केलेले आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात त्यांना विमादावाच मिळाला नसल्याचे म्हंटलेले आहे.
अर्जदाराने गैरअर्जदारांना विमादावा मिळाला असल्याबाबत कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही,त्यामुळे गैरअर्जदारांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे असे म्हणता येणार नाही, म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे.
2 अर्जदार व गैरअर्जदारांनी तक्रारीचा खर्च आपापला सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या सदस्या अध्यक्ष.