निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 19/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 18 /10/2011 कालावधी 06 महिने 13 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. संजीवनी भ्र.मधुकर फड. अर्जदार वय 35 वर्ष.धंदा.घरकाम. अड.अरुण डी खापरे. रा.ढेबे वाडी.ता.गंगाखेड.जि.परभणी. विरुध्द 1 तालुका कृषी अधिकारी साहेब. गैरअर्जदार तालुका कृषी कार्यालय.गंगाखेड. ता.गंगाखेड जि.परभणी. 2 विभागीय व्यवस्थापक. कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन,एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग. प्लॉट नं.7 सेक्टर ई 1,टाउन सेंटर.सिडको.औरंगाबाद. 3 व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. 570.जनरल रेक्टेफायर हाउस,इंदोरी जिन. इलेक्ट्रीक लि.नायगम क्रॉस रोड,नेकस्ट टू. रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट,वडाळा वेस्ट मुंबई.
------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराच्या पतीचा खून दिनांक 13/08/2009 रोजी झाला अर्जदाराचा पती हा महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात योजने अंतर्गत लाभार्थी होता अर्जदाराने तिच्या मयत पतीचा डेथक्लेमची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रासंह प्रस्ताव दिनांक 13/08/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला. तदनंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला, परंतु अर्जदारास विमा दावा मंजूर अथवा नामंजूर झाल्याचे गैरअर्जदाराकडून कळविण्यात आले नाही.म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी दावा त्रुटीमध्ये निघालेला आहे व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्वरित करा अशी सुचना अर्जदारास केल्यामुळे अर्जदाराने त्रुटी मधील सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सादर केली व गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिनांक 23/02/2010 रोजी सर्व कागदपत्र गैरअर्जदार क्रमांक 2 कडे सादर केली.तरी ही अर्जदारास अद्याप पावेतो नुकसान भरपाई मिळालेली नाही म्हणून अर्जदाराने हि तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदारांनी नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- अर्जदाराचा पती मयत झाला त्या तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज दराने द्यावी. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/20 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांना तामिल झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि.18 नि.9 व नि.22 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, अर्जदाराने दिनांक 17/08/2009 रोजी अर्ज त्यांच्याकडे दाखल केला होता तो दिनांक 09/09/2009 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला.त्यामुळे अर्जदाराचा दावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे प्रलंबीत नसल्यामुळे सेवेत त्रुटी असल्याचा प्रश्नच उदभवत नाही.पुढे गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, अर्जदाराचा विमा दावा मंजूर करण्याचा अधिकार त्याला नाही तसेच अर्जदार हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे ग्राहक नाही गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, ते IRDA चे मान्यता प्राप्त सल्लागार कंपनी असून महाराष्ट्र शासनाने सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. विमा कंपनीला प्रस्ताव पाठविण्यापूर्वी कागदपत्राची छाननी करणे आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी त्यांची आहे.त्याकरीता ते महाराष्ट्र शासनाकडून अथवा शेतक-यांकडून कोणतेही शुल्क किंवा चार्जेस घेत नाही. पुढे गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, अर्जदाराचा प्रस्ताव दिनांक 17/09/2009 रोजी त्यांना मिळाला होता प्रस्ताव त्रुटीपूर्ण असल्यामुळे आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यास अर्जदारास दिनांक 14/12/2009 रोजी DSAO परभणी मार्फत कळविण्यात आले होते.पुढे दिनांक 01/02/2010, दिनांक 15/04/2010 रोजी स्मरणपत्र पाठविण्यात आले होते,परंतु आवश्यक कागदपत्राची पूर्तता झालेली नसल्यामुळे विमा कंपनीकडे त्रुटीपूर्ण प्रस्ताव दिनांक 21/06/20010 रोजी पाठविण्यात आला.म्हणून वरील सर्व कारणास्तव गैरअर्जदार क्रमांक 2 ला सदर प्रकरणातून वगळण्यात यावे.तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 2000/- त्यास देण्यात यावे अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 2 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी निवेदनासोबत पुराव्यातील कागदपत्र नि.10 ते 17 वर मंचासमोर दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की, आवश्यक कागदपत्रा अभावी अर्जदाराचा प्रस्ताव हा त्रुटीपूर्ण होता व अर्जदारास सुचीत करुन देखील तीने अद्याप पावेतो आवश्यक कागदपत्राची पूर्तता केलेली नाही पुढे गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की,अर्जदाराच्या पतीचा खून झालेला असल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास अपात्र आहे. म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने मंचासमोर केली आहे. लेखी निवेदना सोबत गैरअर्जदार क्रमांक 3 ने शपथपत्र नि.23 वर मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराच्या पतीचा खून दिनांक 23/05/2009 रोजी झाला अर्जदाराचा पती महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत लाभार्थी होता अर्जदाराने मयत पतीच्या डेथक्लेमची रक्कम मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दिनांक 13/08/2009 रोजी दाखल केला.तदनंतर दिनांक 23/02/2010 रोजी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन देखील अर्जदारास अद्याप पावेतो नुकसान भरपाई मिळाली नाही. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदार क्रमांक 2 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचा प्रस्ताव त्रुटीपूर्ण असल्याचा बचाव घेतलेला आहे.निर्णयासाठी महत्वाचा व एकमेव मुद्दा असा की,अर्जदाराने गैरअर्जदाराने सुचीत केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पुर्तता केल्याचे ठोसपणे मंचासमोर शाबीत केले आहे काय ? यासाठी मंचासमोर दोन्ही पक्षांची दाखल केलेल्या पुराव्यातील कागदयपत्राचे अवलोकन करावे लागेल नि.10 ते नि.14 वर दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली असता मृत्यू प्रमाणपत्र (मुळप्रत) इनक्वेस्ट पंचनामा, 6 डी फेरफारची मुळप्रत व अंतिम अहवाल या कागदपत्राची मागणी गैरअर्जदाराने अर्जदाराकडे केल्याचे दिसते. अर्जदाराचे म्हणणे असे की, या कागदपत्राची पुर्तता केली होती व दिनांक .23/02/2010 रोजी जिल्हा अधिक्षक यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे सर्व कागदपत्र दाखल केली होती याचा पुरावा म्हणून नि.4/1 वर दिनांक 23/02/2010 रोजीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार कमांक 2 यांना पाठविलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत लावली आहे,परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदनात या संदर्भात मौन बाळगले आहे.तसेच अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता या कागदपत्रात अंतिम अहवाल,इनक्वेस्ट पंचनामा या सारख्या कागदपत्रांचा समावेश नाही. त्यामुळे कागदपत्राची पुर्तता करण्याचे राहिले असावे किंवा केली असेल तरी ही बाब ठोसरित्या मंचासमोर शाबीत झालेली नाही.म्हणून कागदपत्राची पुर्तता करण्या विषयीचे आदेश अर्जदारास देणे न्यायचित होईल असे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराने आदेश कळाल्यापासून 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्राची पुर्तता करावी.व गैरअर्जदार क्रमांक 3 ने संबंधित कागदपत्र मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्जदाराचा प्रस्ताव मंजूर करुन तीच्या पतीच्या डेथक्लेमची रक्कम रु.1,00,000/- अर्जदारास द्यावी. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |